🔸Woman’s life saved through timely intervention!
During his morning walk, Assistant Sub-Inspector Pansare of Powai Police Station noticed a 65-year-old woman attempting to jump from the fifth floor of a building within the jurisdiction of @VikhroliPS. Acting swiftly, he alerted the Control Room and, with the coordinated efforts of Police Inspector Gadade, Police Personnel Sudham Binnar and MSF Jawan Rathod, ensured her timely rescue.
The woman was safely rescued, counselled and provided with the necessary guidance.
In case of an emergency or if you require police assistance #Dial112
🔸सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचविण्यात यश!
@VikhroliPS परिसरात एक ६५ वर्षीय महिला इमारतीच्या ५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करत आहे, असे मॉर्निंग वॉकला जात असलेले पवई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पानसरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि विक्रोळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गडदे तसेच अंमलदार सुधाम बिन्नर, एमएसएफ जवान राठोड यांची मदत घेऊन आवश्यक कार्यवाही केली.
पोलिसांच्या तत्परता व समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले. त्यानंतर तिची समजूत काढून तिला आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
मुंबई पोलिसांची सतर्कता, तत्परता आणि संवेदनशीलता नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध आहे. तरीही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा.
#MumbaiPolice4All
🔸Lost and stolen property recovered and reunited with Mumbaikars.
A collective property distribution event was organized by six police stations under East Zone-2 to return recovered property linked to various crimes to its rightful owners.
Through investigations combining technical expertise with human intelligence and investigative skills, the police recovered 410 mobile phones, gold jewellery weighing 79 grams, 5 motorcycles, and cash amounting to ₹79,855.
The recovered property, with a total value of ₹51,73,341, was returned to the respective complainants.
🔸मुंबईकरांची मालमत्ता पुन्हा मुंबईकरांना सुरक्षितपणे सुपूर्द!
पूर्व परिमंडळ-२ अंतर्गत ६ पोलीस ठाण्यांकडून गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमाल परत करण्यासाठी सामूहिक मालमत्ता वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तांत्रिक व मानवी कौशल्याने केलेल्या तपासातून ४१० मोबाईल, ७९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५ मोटारसायकल व रोख रक्कम ₹ ७९,८५५ हस्तगत करण्यात आली होती.
एकूण ₹५१,७३,३४१ किंमतीचा हस्तगत मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला.
#MumbaiPolice4All