🔷ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ३००० मिलीमीटर व्यासाच्या मुंबई-III जलवाहिनीला आढळलेली गळती बंद करण्याचे काम शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता पूर्ण झाले आहे.
🔷जलवाहिनी भारीत (Charged) झाल्यानंतर म्हणजेच रात्री ९ वाजेपासून मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत होणार आहे.
🔷मुंबई-III जलवाहिनीला गुरुवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री गळती आढळली. महानगरपालिका जल कार्य (नगरबाह्य) विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून जलवाहिनीवरील छिद्र लाकडी खुंटी बसवून बंद केले.
🔷दरम्यानच्या कालावधीत क्षतिग्रस्त जलवाहिनीच्या भागाभोवतीचा परिसर खोदकाम करून उघडण्यात आला. तेथील साचलेले पाणी उपसून परिसर कोरडा करण्यात आला. खराब झालेल्या भागावर मृदू पोलाद (MS) पॅच प्लेट बसवून ती वेल्डिंगद्वारे कायमस्वरूपी दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री जलवाहिनीला पुन्हा एकदा गळती लागली. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे दुरुस्ती कार्यवाहीत अडथळे निर्माण झाले. परिणामी, शहर व पूर्व उपनगरातील पाणीपुरवठा प्रभावित झाला.
🔷अखेरीस, पिसे उदंचन केंद्र व पांजरापूर जल शुद्धीकरण प्रकल्प यांच्यासमवेत समन्वय साधून पाणीपुरवठ्यावर नियंत्रण आणण्यात आले. क्षतिग्रस्त दाबयुक्त जलवाहिनीची सुरक्षितपणे दुरुस्ती करण्यात आली. जल कार्य (नगरबाह्य) विभागाचे अभियंते आणि कर्मचारी यांच्या चमूने गळती दुरुस्ती कार्यवाही सायंकाळी पाच वाजता युद्धपातळीवर पूर्ण केली आहे.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
स्वातंत्र्यदिनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचा अनोखा पुढाकार
महापौर बंगल्याचे आवार स्थानिक नागरिकांच्या प्रभातफेरी (मॉर्निंग वॉक) साठी खुले
🔷मुंबईच्या महापौरांचे शासकीय निवासस्थान असलेला, भायखळा स्थित महापौर बंगल्याचा निसर्गरम्य परिसर आता स्थानिक नागरिकांच्या प्रभातफेरीसाठी अर्थात ‘मॉर्निंग वॉक’ साठी खुला करण्यात आला आहे.
🔷भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक १५ ऑगस्ट २०२६) सकाळी महापौर निवासस्थानी ध्वजारोहण केल्यानंतर स्वतः या निवासस्थानाचे मुख्य प्रवेशद्वार खुले करून परिसरातील रहिवासी नागरिकांना ही विशेष आणि अनोखी भेट दिली.
🔷मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना, शांत, मोकळ्या आणि निसर्गरम्य वातावरणात प्रभातफेरीसाठी हक्काची जागा मिळावी, या उद्देशाने महापौर श्रीमती रितू तावडे यांनी हा निर्णय घेतला आहे.
🔷स्थानिक नागरिकांना बंगल्यालगतच्या पदपथावरून आणि तेथून थेट निवासस्थानाच्या विस्तीर्ण आवारात दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत नियमित मॉर्निंग वॉक करता येईल.
🔷मुंबईच्या महापौरांचे सध्याचे निवासस्थान हे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात स्थित आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, जून २०२६ च्या अखेरीस महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या शासकीय निवासस्थानात वास्तव्यास प्रारंभ केला.
🔷महापौर बंगल्याच्या परिसरातील स्थानिक नागरिकांशी महापौर नियमित संवाद साधत असतात. पुरातन वारसा अर्थात हेरिटेज श्रेणीत असलेल्या या बंगल्याचा परिसर वृक्षांनी वेढलेला आहे. भल्या सकाळी निसर्गाच्या सान्निध्यात फिरणे नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असते. हे लक्षात घेऊन आणि स्वातंत्र्यदिनी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्वतः घेतलेल्या या जनहिताच्या निर्णयामुळे स्थानिक रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, महापौरांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🇮🇳स्वातंत्र्य दिन निमित्ताने, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते, भायखळा स्थित महापौर निवासस्थान येथे आज (१५ ऑगस्ट २०२६) सकाळी ठिक ७ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
🔷यावेळी उपायुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव, इ विभागाचे सहायक आयुक्त श्री. आनंद कंकाळ यांच्यासह परिसरातील स्थानिक रहिवासी, महानगरपालिकेचे विविध अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
#IndependenceDay
#स्वातंत्र्यदिन
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
जलवाहिनी गळती दुरुस्ती कामामुळे शहर व पूर्व उपनगरातील पाणीपुरवठा होणार प्रभावित
🔷ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ३००० मिलीमीटर व्यासाच्या मुंबई-III जलवाहिनीला आढळलेली गळती बंद करण्याचे काम काल रात्री पासून सुरू आहे. तथापि, तांत्रिक कारणांमुळे या दुरुस्ती कार्यवाहीत अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, शहर व पूर्व उपनगरास शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणारा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.
🔷महानगरपालिका जल कार्य विभागाचे (नगरबाह्य) अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून जलवाहिनीवरील गळती थांबवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.
🔷क्षतिग्रस्त दाबयुक्त जलवाहिनीच्या दुरुस्ती कामामुळे शहर व पूर्व उपनगरास शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणारा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.
🔷याची नागरिकांना नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे नम्र आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
@sudhirtopaz आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी -SX_202600093483
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/ozk0QouMND येथे कृपया भेट द्यावी.
@Paddy11210@mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - SX_202600093532
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/ozk0QouMND येथे कृपया भेट द्यावी.
@Pradeip_130487@mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - SX_202600093609
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/ozk0QouMND येथे कृपया भेट द्यावी.
@R_KAMBLE_INDIA@mybmc@AshwiniBhide@TawdeRitu@mumbaimatterz आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - SX_202600093681
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/ozk0QouMND येथे कृपया भेट द्यावी.
@VVM400083@mybmc@mhadaofficial@MhadaMitra@SawantUpendra We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/ozk0QouMND
Your MARG registration number : SX_202600093531