पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी गांभीर्याने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्याची विनंती राज्याचे आ. मुख्यमंत्री श्री. @mieknathshinde यांच्याकडे आ. श्री. @PawarSpeaks जी यांनी पत्राद्वारे केली.
दापोडी, ता. दौंड येथे वीजेचा धक्का बसून तीन जणांचा मृत्यू झाला. हि अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन संबंधित परिवारास नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. यासोबतच यासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली.
@CMOMaharashtra
सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय @PawarSpeaks साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत.
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार!
@OfficeofUT@CMOMaharashtra
आदरणीय @PawarSpeaks
साहेब कोणताही त्रास तुमच्यासाठी किरकोळ असला तरी आमच्यासाठी तो मोठा असतो. लवकर बरे व्हा! सर्वांच्या सदिच्छा तुमच्यासोबत आहेत! तुम्ही लवकर बरे व्हावेत म्हणून श्री. विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो!🙏
@supriya_sule
पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीचे स्वीकृत सदस्य शिवाजीअप्पा पोमन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले.ते लवकर यातून बरे होऊन आपल्यासोबत यावेत ही सदिच्छा.
येथूनच शिवरायांनी सर्वाधिक काळ स्वराज्याचा कारभार पाहिला. इतकेच नाही, तर स्वराज्याचा विस्तारही केला. मोघलांच्या ताब्यातील गड घेताना सरदार तानाजी मालुसरे यांनी सिंहगडावर आपल्या प्राणांची आहुती दिली.
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सिंहगड, राजगड, रोहिडा, तोरणा व रायरेश्वर या किल्ल्यांना वर्षभरात लाखो शिवप्रेमी तसेच पर्यटक भेट देतात. यापैकी रायरेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली, तर राजगडावर तब्बल २५ वर्षे स्वराज्याची राजधानी होती.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट च्या वतीने आयोजित योद्धा@८० या डॉक्युमेंटरी व शॉर्टफिल्म स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या फिल्म्स या https://t.co/g2Hj6wQpmK टप्याटप्याने सर्व जनतेला बघण्याकरिता (cntd)
आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच व पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन दिव्यांग वधू-वर नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी एक नोंदणी संकेतस्थळ सुरु करण्यात येत आहे.