रायगड लोकसभा मतदारसंघातील रेवदंडा इथं महायुतीच्या वतीने आयोजित कोळी महासंघाचा भव्य जाहीर मेळावा पार पाडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं नेतृत्व करत स्वराज्याचं रक्षण कष्टकरी मच्छीमार समाजानं केलं असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी या मेळाव्यात समाजाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला, येणार्या संकटांना सामोरं जाऊन पुन्हा त्याच ताकदीनं उभा राहतो म्हणत त्यांनी गौरवौद्गार काढले. मेळाव्याच्या आधी भव्य रॅलीनं कोळी बांधवांनी सुनिल तटकरे यांचं स्वागत केलं.
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना खासदार म्हणून मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी राबवल्या जातील असा शब्दही सुनिल तटकरे यांनी दिला. अलिबाग मतदारसंघासाठी जयंत पाटील यांनी जितका निधी आणला त्यापेक्षा तिप्पट निधी आमदार महेंद्र दळवी यांनी आणल्याचंही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.
रायगड मतदारसंघात ४ जूनला ��ड्याळाचा गजर ऐकायला मिळेल आणि विधानसभेला महेंद्र दळवी यांच्या धनुष्यबाणावर सर्वाधिक मताधिक्य असेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. त्यासाठी मतदानादिवशी घड्याळ या चिन्हासमोरचं बटण तुम्हाला दाबायचंय. त्यामुळे उद्याच्या भविष्यात या भागाचं चित्र बदललेलं दिसेल असं सुनिल तटकरे म्हणाले.
रायगड लोकसभा मतदारसंघातील जनमानसात सुनिल तटकरे यांचं स्थान अढळ आहे. त्यामुळे कुणीही कितीही प्रयत्न केले तरी ते निवडून येणारच असं आमदार महेंद्र दळवी म्हणाले. कोळी आणि आगरी बांधव तटकरे साहेबांच्या पाठीशी उभं राहणार असून त्याचा प्रत्यय मतपेटीतून येईलच असंही महेंद्र दळवी यांनी सांगितलं.
सुनिल तटकरे यांच्या रुपानं मतदारसंघाला एक अनुभवी आणि सुशिक्षित उमेदवार लाभलाय. नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी सुनिल तटकरे यांना निवडून द्यायचंय असं म्हणत रायगडचा कोळी समाज प्रामाणिकपणे पाठीशी उभा राहिल असा शब्द आमदार रमेश पाटील यांनी यावेळी दिला.
या मेळाव्याला कोळी महासंघाचे राष्ट्रीय अ��्यक्ष आमदार रमेश पाटील, कोळी समाजाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, युवा नेते चेतन पाटील, सरपंच प्रफुल मोरे, देवानंद भोईर आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
#सुनिलतटकरे #महायुती #रेवदंडा #कोळी #मच्छिमार #नरेंद्रमोदी #रायगड #लोकसभाचुनाव2024 #राष्ट्रासोबत_राष्ट्रवादी #suniltatkare #Mahayuti #raigad #LokSabhaElections2024 #ncpspeaksofficial
राष्ट्रीय स्तरावर मौलाना आझाद संशोधन व प्रशिक्षण संस्था असावी असा प्रयत्न राहील. या संस्थेच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्���ण, उद्योग व रोजगाराच्या संधी लाभतील यासाठी निधी व उपायोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही राहणार.
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांची २७ एप्रिलला विराट सभा कोल्हापूरमधील तपोवन मैदानात होणार आहे. सुमारे अडीच लाखापेक्षा अधिक नागरिक या सभेस उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मोदीजींच्या सभेनंतर कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा विजय १०० टक्के निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
@mrhasanmushrif
#LokSabhaElections2024 #Kolhapur #महायुती
राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
वसंतऋतुच्या आगमनासोबत दारोदारी गुढी उभारुन साजरा होणारा गुढीपाडवा आणि त्यासोबत सुरु होत असलेलं मराठी नववर्ष हे आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, चैतन्य, उत्साह, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. सर्वांच्या मनातल्या आशा-आकांक्षा, उरी बाळगलेली सर्व स्वप्न��� पूर्ण होवोत. यश, किर्ती, पराक्रमाची गुढी आकाशात उंच जावो हीच सदिच्छा.
यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे. सुखी, समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी, शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा, संस्कृती अशा सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्राला अव्वल बनवण्यासाठी राज्यातील प्रत्येक पात्र मतदारानं आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. योग्य उमेदवाराला मतदान करुन, महाराष्ट्राच्या, देशाच्या प्रगतीची ग���ढी अधिक उंचीवर नेण्यासाठी योगदान दिलं पाहिजे, असं आवाहन आहे.
गुढीपाडवा हा महाराष्ट्रवासियांच्या, मराठी माणसाच्या जीवनातील महत्वाचा सण. अज्ञान, अनीती, असत्य, अंधश्रद्धेसारख्या दुष्प्रवृत्तींचा विनाश करुन सत्प्रवृत्तीची गुढी उंच उभारण्याचा आजचा हा दिवस. महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव असलेला गुढीपाडव्याचा सण सर्वजण मिळून साजरा करुया. दारोदारी गुढी उभारुया. शोभायात्रा, सांस्कृतिक ���ार्यक्रमांनी यंदाचा गुढीपाडवा संस्मरणीय करुया. महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी, आपण सर्व महाराष्ट्रवासी एकजूट होऊन, आपलं योगदान देऊया..!
#GudiPadwa
#गुढीपाडवा
@PawarSpeaks साहेब कसे बरोबर बोलले ह्याची सारवासारव करणाऱ्या शिल्लक गटातील समर्थकांची अक्षरशः कीव येते...
@AjitPawarSpeaks तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्यच होता हेच इथे सिद्ध होते.
@SunetraA_Pawar वहिनींना विजयाचा आजच खूप खूप शुभेच्छा 💐🙏
कोणताही धर्म अथवा धर्मग्रंथ ईश्वराने निर्माण केला नाही.इथला जातीभेद,वर्णव्यवस्था ही तर माणसाने स्वार्��ी हेतूने निर्माण केली ही भूमिका अग्रक्रमाने मांडणारे व स्त्री शिक्षण,इंग्रजी सत्ता,दारिद्र्य,रोगराई,दुष्काळ,सावकारी फास गुलामगिरी,शेतकऱ्यांची होरपळ,अनेक कारणांनी पिचत असलेल्या समाजाला योग्य दिशा देणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏
अनिष्ट चालीरितींमध्ये गुरफटलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारे, स्त्रीविरोधी मानसिकतेचा बिमोड करीत स्त्रीशिक्षणाचा पाय��� रचणारे, थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#MahatmaJyotibaPhule
#महात्मा_जोतिबा_फुले