Rahul Gandhi is not as good at electoral politics because he does not play emotional victim card like Supreme Leader does. Never used the assassinations of his father & grandmother in his narrative. Never cried or made a big deal about the trolls and abuses he got for 15 years.
दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांची काल २९ जुलै २०२६ रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने कोळसा घोटाळा आरोपातून निर्दोष मुक्तता करत संबंधित प्रकरण निकाली काढल्याची घोषणा केली आहे. आता भक्त अशा वावड्या उठवत आहेत की ते हयात नसल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली! हे किती खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी संबंधित वार्तांकनातून एक उतारा इथे देत आहे.
"A three-judge Bench headed by Chief Justice of India Surya Kant said the apex court would have ordinarily dismissed the case as infructuous solely on the ground of the demise of the appellant, however, the Bench said it had gone through the closure reports filed by the premier agency in the trial court, only to discover that the trial judge had no “compelling reason” to reject the premier agency’s closure reports and make adverse observations against the former Prime Minister."
(The Hindu)
थोडक्यात, संबंधित प्रकरणात सीबीआयने कोणतेही पुरावे नसल्याचा क्लोजर रिपोर्ट आधीच सादर केला होता. त्यानंतर २०१५ मध्ये एका स्पेशल कोर्टाने हा रिपोर्ट स्थगित करून डॉ. सिंग यांना समन्स बजावलं होतं. त्या स्पेशल कोर्टाचे संबंधित आदेश आता सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवून सीबीआय रिपोर्टवर शिक्कामोर्तब केला आहे. यासाठी डॉ. सिंग यांच्या वकिलांचे आणि त्यांच्या परिवाराचे विशेष अभिनंदन...
अण्णा आंदोलनाच्या वेळी या तथाकथित घोटाळ्याच्या नांवाने डॉ. मनमोहन सिंग यांची यथेच्छ बदनामी केली गेली. त्यांना वाटेल ती दूषणे झेलावी लागली. "चोरांचा सरदार" अशी तेव्हा प्रसिद्ध झालेली हेडलाईन त्यांना स्वतःला किती वेदनादायक वाटली होती हे डॉ. सिंग यांनी नंतर दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.
डॉ. सिंग आज आपल्यात नाहीत. त्यांची वेदनाही त्यांच्याबरोबर निघून गेली. मात्र अशा भारतरत्न दर्जाच्या माणसाला आपल्या देशाने त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांत जी वागणूक दिली ती आपल्या देशासाठी शरमेची गोष्ट आहे! अण्णा हजारे आणि त्यांच्या विखारी टोळीच्या नादी लागून आपण देश म्हणून डॉ. सिंग यांच्यासारख्या विद्वान आणि सज्जन माणसाला शेवटपर्यंत ज्या वेदना दिल्या, त्या पापातून आपली एवढ्या लवकर सुटका होणार नाही!!
अण्णा हजारे आणि त्यांच्या टोळीचे या देशावर अनेक अपकार आहेत. राजकीय/सामाजिक चर्चेत शिव्या देणं-अपशब्द वापरणं हे चांगलं दिसत नाही, पण अण्णा हजारे, त्यांची टोळी आणि त्यांचे पंटर लोक यांनी देशाचं जे नुकसान केलं आहे त्यासाठी अपशब्दही पुरे पडणार नाहीत! डॉ. सिंग यांच्यासारख्या या देशाच्या आर्थिक प्रगतीची पायभरणी करणाऱ्या सज्जन माणसाला त्यांच्या उतारवयात जी 'विच हंट' सहन करावी लागली, त्यासाठी या देशाचा इतिहास अण्णा हजारे आणि त्यांच्या मायावी राक्षसांच्या टोळीला कधीही माफ करणार नाही!!
- मकरंद देसाई
#DrManmohanSingh
This isn’t just about NEET paper leaks. It’s a revolt against feeling generally suppressed in a democracy & the mainstream media’s brainwashing.
As a father of two, I know first hand : suppressing & brainwashing today’s youth will never work.
हजारो शेतकऱ्यांना भेटलो आणि शेतीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला!
एक काळ असा होता, जेव्हा मलाही वाटायचं, शेतीत खरंच पैसा आहे का?
२०११ ते २०१५ मी प्रयागराजमध्ये आमच्या सोन्या-चांदीच्या फॅमिली बिझनेसमध्ये होतो. त्यावेळी साधारण २०१२ पासून मी देश फिरायला सुरुवात केली. हिमाचल, काश्मीर, सिक्कीम, उत्तराखंड फिरलो; पण तेव्हा माझं शेतीकडे फारसं लक्ष नव्हतं.
पण शेतीशी नातं मात्र लहानपणापासूनच होतं. कारण, आजोबांसोबत बैलगाडीतून शेतात जाणं, गुरं राखणं, घरची शेती जवळून पाहणं हे सगळं मनात कुठेतरी रुजलेलं होतं.
मग २०१६ मध्ये बिझनेस सोडून गावी आलो. तेव्हा त्याआधी भेटलेल्या अनेक शेतकऱ्यांकडून सतत ऐकलं होतं, “शेतीत काही फायदा नाही.” त्यामुळे माझ्याही मनात शेतीबद्दल थोडी निगेटिव्हिटी होती.
पण महाराष्ट्रामधील खूप प्रगतशील शेतकऱ्यांना भेटलो आणि माझा विचारच बदलला. ते शेतकरी शेतीतून चांगलं उत्पन्न घेत होते. तेव्हाच एक गोष्ट समजली, तुम्ही ज्यांना भेटता, त्यांच्या विचारांचा प्रभाव तुमच्यावर पडतो.
मग २०१८ उजाडलं आणि तेव्हाच 'इंडियन फार्मर' सुरू केलं. त्यानंतर खरी शेती बघण्यासाठी, शिकण्यासाठी भारतभर फिरलो. यादरम्यान देशभर फिरताना मी किमान १० ते २० हजार शेतकऱ्यांना भेटलो.
हिमाचलमध्ये सफरचंद, पंजाब-हरियाणात भात, मध्य प्रदेशात पेरू आणि स्ट्रॉबेरी, राजस्थानच्या 'मिनी इस्रायल'मध्ये शेकडो एकरवर पसरलेले पॉलीहाऊसेस. हे सगळं बघितल्यावर लक्षात आलं, या प्रत्येक भागातली शेती वेगळी, परिस्थिती वेगळी आणि या सगळ्यांची सक्सेस स्टोरी सुद्धा वेगळी होती.
तेव्हा मला जाणवलं, शेतीत पैसा नाही, हा समज चुकीचा आहे. योग्य पीक, योग्य परिसर, योग्य नॉलेज आणि योग्य माणसांकडून शिकण्याची तयारी असेल, तर शेती फायद्याची होऊ शकते.
याच अनुभवातून मी माझ्या भागाची इकोसिस्टम समजून घेतली. माझ्या शेतात द्राक्षं लावली, टोमॅटो लावला, कॅप्सिकमचं उत्पादन घेतलं. अर्थात, काही निर्णय यशस्वी झाले, काही फसले पण या सगळ्यातून मला शिकायला मिळालं.
मात्र हजारो शेतकऱ्यांच्या भेटीतून मला मिळालेली सर्वात मोठी शिकवण एकच, शेती बदलण्याआधी आपला दृष्टिकोन बदलावा लागतो. आणि कधी कधी तो बदलण्यासाठी फक्त योग्य माणसांना भेटणंही पुरेसं असतं!
-संतोष जाधव (इंडियन फार्मर)
Mumbai police should take strict actions against this cop who threatened students by putting them in jail permanently by inserting 50 gram of drug in their pockets. The cop even said he is bad guy & no Azadi permanently. Horrible way to silent the students & spoil their career.
हे सरकार किती लबाड, ढोंगी, दांभिक आणि विश्वासघातकी आहे हे आज पुन्हा सिद्ध झालं. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात नेमलेल्या समितीचे प्रमुख मा. प्रवीणसिंह परदेशी साहेब यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या विनाअट सरसकट कर्जमाफीसंदर्भात आज सकाळी 10.30 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. ठरल्यानुसार नेते मंडळींच्या शिष्टमंडळासमवेत आम्ही सर्वजण वेळेत उपस्थित होतो, परंतु या बैठकीसाठी एकही प्रमुख अधिकारी उपस्थित राहिला नाही आणि आयत्या वेळी बैठक रद्द झाल्याचं फोनवर सांगण्यात आलं. हे अत्यंत संतापजनक आहे. सरकारच्या आदेशाशिवाय कोणताही अधिकारी अशी हिंमत करणार नाही. हा केवळ आमच्या शिष्टमंडळाचा अवमान नाही तर राज्यातील तमाम शेतकऱ्यांची सरकारने चालवलेली ही घोर थट्टा आहे..
अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीसोबत मूक संवाद साधण्याची वेळ या सरकारने आमच्यावर आणली. आता शेतकऱ्यांनाही विनंती आहे की, या विश्वासघातकी सरकारमुळं येणारं वर्ष अत्यंत अडचणीचं ठरणार आहे. त्यामुळं या फसव्या कर्जमाफी योजनेविरोधात आम्ही तर लढतच आहोत, पण तुम्हालाही हा संघर्ष पुढं घेऊन जावं लागणार आहे.
#विनाअट_सरसकट_कर्जमाफी
#विश्वासघातकी_सरकार
खरं नातं हे कॉन्ट्रॅक्टमुळे तयार होत नाही, तर वर्षानुवर्षांच्या विश्वासामुळे तयार होतं!
२०१९ मध्ये Plantix सोबत पहिल्यांदा काम सुरू केलं. तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की एका मोबाईल ॲपच्या मार्केटिंगपासून सुरू झालेला हा प्रवास एक दिवस त्यांच्या को-फाउंडरना माझ्या शेतापर्यंत घेऊन येईल.
मध्यंतरी कामानिमित्त 2-3 वेळा भारतातल्या इंदोरमधल्या त्यांच्या ऑफिसमध्ये जाणं झालं. चर्चा झाल्या, मीटिंग्स झाल्या. पण मनात नेहमी एक इच्छा होती, "एकदा त्यांनीही माझं शेत पाहावं. इथली माती, इथले प्रयोग आणि शेतकऱ्यांचं खरं जग अनुभवावं."
आणि तो क्षण अचानक आला.
तर सहजच मी दुपारी ट्रॅक्टरवर स्प्रे करत होतो. इतक्यात आकाशचा फोन आला, "रॉब आपल्या भागात आहेत." आधी विश्वासच बसला नाही. मग लगेच फोन, मेसेज केले आणि संध्याकाळी ते खरंच माझ्या गावात आले. मग पुढचे दोन तास आम्ही फक्त शेतात फिरलो.
त्यांना क्रिमसन व्हरायटीची द्राक्षबाग दाखवली. आलं, ऊस, मिरची, टोमॅटो दाखवले. सॉईल सेन्सरपासून ड्रिप इरिगेशनपर्यंत मी काय-काय करतोय, त्यात कोणत्या अडचणी येतात, कोणते डिसिजन्स घ्यावे लागतात या सगळ्यावर मनमोकळी चर्चा केली.
रॉब फक्त शेत बघत नव्हते तर ते प्रत्येक गोष्ट समजून घेत होते. प्रश्न विचारत होते. निरीक्षण करत होते. आणि तेव्हा मला पुन्हा जाणवलं, मोठ्या कंपन्या फक्त चांगलं प्रॉडक्ट बनवून मोठ्या होत नाहीत; तर त्या जमिनीशी जोडलेल्या असल्यामुळे मोठ्या होतात.
मग शेवटी घरी आलो. गरमागरम भजी, चहा, आंबे, चिंचा यावर ताव मारत गप्पा सुरूच ठेवल्या. त्यांनी आमचं बेस लोकेशनही पाहिलं. इथूनच इंडियन फार्मरचे कोर्सेस तयार करतो, व्हिडिओ शूट करतो, शेतकऱ्यांपर्यंत नॉलेज पोहोचवतो हे पाहून त्यांनाही आनंद झाला.
दुपारी ट्रॅक्टरवर बसलेला मी आणि संध्याकाळी इंटरनॅटशनल कंपनीच्या को-फाउंडरसोबत माझ्या शेतात फिरणारा मी, या दोन क्षणांमध्ये फक्त एकच गोष्ट कॉमन होती आणि ती म्हणजे शेतीवरचा विश्वास.
मला वाटतं, आयुष्यात काही भेटी आपण ठरवत नाही. तर ते आपलं काम आणि त्याच्याशी असलेला प्रामाणिकपणा ठरवतं. आणि तेच सांगून जातं की योग्य काम करत राहिलं तर योग्य माणसं एक दिवस तुमच्यापर्यंत स्वतःहून येतात.
-संतोष जाधव (इंडियन फार्मर)