काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचं निधन झालं. शिक्षणक्षेत्रात संस्थाउभारणीचं मोठं काम करणाऱ्या या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.
डी. वाय. पाटील ज्या काळात राजकारण आणि समाजकारणात आले, तो काळ वेगळा होता. तो केवळ सत्तेचा नव्हता, तर संस्थात्मक उभारणीचा होता. ग्रामीण महाराष्ट्रात सहकारी संस्थांचं जाळं वेगाने विस्तारत होतं आणि त्यातून राज्यातील मोठ्या भागात आर्थिक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली होती.
मात्र त्याच काळात देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उच्च शिक्षणाच्या संस्था, विशेषतः अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या अपुरी होती. आज पुणे, मुंबईसारख्या शहरांतील अनेक नामांकित महाविद्यालयांचा इतिहास ब्रिटिशकालापर्यंत पोहोचतो. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयआयटींसारख्या संस्थांची स्थापना करून उच्च शिक्षणाचा भक्कम पाया घातला; पण इतक्या विशाल देशात व्यावसायिक शिक्षणाची मागणी प्रचंड वेगाने वाढत होती. ती गरज केवळ सरकारच्या बळावर पूर्ण होणं शक्य नव्हतं. आणि त्याही पेक्षा शिक्षणावरचा सरकारचा खर्च हा प्रत्येक दशकांत कमीच होत चालला आहे. त्यामुळे शिक्षणाचं खाजगीकरण हे अपरिहार्य होतं.
अशा वेळी डी. वाय. पाटील यांनी शिक्षणातील संस्थात्मक उभारणीचं मोठं काम हाती घेतलं. आदर्श परिस्थितीत प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण सरकारमार्फत उपलब्ध व्हायला हवं, यात दुमत असण्याचं कारण नाही. पण वास्तव हे आहे की भारतात शिक्षणावरील सार्वजनिक खर्च दीर्घकाळ अपेक्षेपेक्षा कमीच राहिला. अशा परिस्थितीत खाजगी क्षेत्राने शिक्षणात पुढाकार घेऊन संस्था उभारण्याची गरज निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर डी. वाय. पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब विखे पाटील आणि दत्ता मेघे यांच्यासारख्या नेत्यांनी शिक्षणक्षेत्रात उभारलेल्या संस्थांचं महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवतं.
गेल्या तीन-चार दशकांत डॉक्टर, अभियंते, संशोधक, उद्योजक आणि विविध क्षेत्रांत काम करणारे लाखो विद्यार्थी या संस्थांतून घडले. हे योगदान मोठं आहे.
एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाहीत; त्याभोवती वसतिगृहं, रुग्णालयं, लहान उद्योग, वाहतूक व्यवस्था आणि रोजगाराचं संपूर्ण अर्थकारण उभं राहतं. एका संस्थेमुळे संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलू शकतो, हे जुन्या पिढीतील अनेक नेत्यांच्या मनात पक्कं रुजलेलं होतं.
शिक्षण क्षेत्रात उभारलेल्या संस्था असोत किंवा नवी मुंबईतील स्टेडियम—दोन्हीकडे त्यांच्या विचारातील भव्यता आणि दीर्घकालीन दृष्टी स्पष्टपणे दिसून येते.
राजकारणातून संस्था उभारून समाजावर दीर्घकालीन ठसा उमटवणाऱ्या पिढीतील ते अखेरच्या महत्त्वाच्या प्रतिनिधींपैकी एक होते.
डॉ. डी. वाय. पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे |
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाने एक दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, लोकाभिमुख नेता आणि समाजसेवक गमावला आहे. डॉ. पाटील यांचे संपूर्ण आयुष्य सार्वजनिक सेवेच्या सर्वोच्च मूल्यांचे प्रतीक होते. तळागाळातील लोकप्रतिनिधी म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास राज्यपाल या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचला.
हा प्रवास त्यांच्या निष्ठा,नम्रता आणि समाजकल्याणाप्रती असलेल्या अखंड बांधिलकीचा साक्षीदार आहे. आपल्या दीर्घ सार्वजनिक जीवनात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारधारा, परंपरा आणि मूल्यांशी कायम एकनिष्ठ राहिले आहेत .त्यांच्या कार्यामुळे त्यांना राजकीय सीमांच्या पलीकडे जाऊन सर्व स्तरातील लोकांचा आदर आणि स्नेह कायम लाभला.
त्यांचे योगदान हे सार्वजनिक जीवनापुरतेच मर्यादित नव्हते . त्यांनी शिक्षण,आरोग्यसेवा, क्रीडा आणि समाजकारण या क्षेत्रांत त्यांनी उभारलेल्या अग्रगण्य संस्थांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे जीवन उजळले. त्यांच्या या कार्यामुळे असंख्य तरुणांना शिक्षण, संधी आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग खुला झाला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने, मी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांचे असंख्य चाहते आणि विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांचा विशाल परिवार, ज्यांच्या आयुष्याला त्यांनी स्पर्श केला, त्यांच्याप्रती मी मनापासून शोकसंवेदना व्यक्त करतो.
मनःपूर्वक अभिनंदन!
मा. श्री. संतोष एस. लाड यांची कर्नाटक राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदी झालेल्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा.💐 @eshwar_khandre@SantoshSLadINC
आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही एका बापाचं मन केवळ आणि केवळ आपल्या कुटुंबातच गुंतलेलं असतं, याचा प्रत्यय आणून देणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.
कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या एका पित्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी आपल्या चिमुकल्या मुलाशी, 'मंत्र'शी साधलेला अंतिम संवाद सध्या सर्वांचेच मन हेलावून टाकत आहे.
आपल्या निष्पाप मुलाच्या खांद्यावर संपूर्ण घराची जबाबदारी सोपवताना ते म्हणाले, "आईचं नेहमी ऐक, तिची काळजी घे अन् तुझ्या दोन्ही बहिणींचे रक्षण कर. मी कुठे गेलो, हे कोणाला विचारत बसू नकोस; जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल, तेव्हा मी तुझ्या आसपासच आहे, हे कायम लक्षात ठेव."
स्वतः वेदनेत असतानाही मुलाला धीर देत कुटुंबाचे छत्र बनण्याची शिकवण देणारा हा बाप, निधनानंतरही एका मुलाच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरणार आहे. अंतिम क्षणी व्यक्त केलेलं हे पितृप्रेम आणि दिलेली जबाबदारीची जाणीव…
साभार - नवाकाळ
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ह्याच सदिच्छा.
@OfficeofUT
दिल्लीत विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनाचं यश हे पूर्णपणे विद्यार्थी आणि युवा एकजुटीचं आहे… तसंच सत्तेच्या दहशतीला न घाबरता राज्यातील अनेक मराठी पत्रकारांनीही थेट दिल्लीत आंदोलनस्थळी जाऊन हा विषय महाराष्ट्रासह देशभरातील मराठी माणूस आणि देशवासियांसाठी कव्हर केला. या सगळ्यांचेच आभार मानायला हवेत. काही पत्रकारांना ‘गोदी मिडिया’ म्हणून आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं असलं तरी ही आंदोलकांची चूक नाही आणि पत्रकारांनीही ही बाब मनावर घेतली नाही, हा त्यांच्यातील समजूतदारपणा आहे. चॅनेल किंवा वर्तमानपत्राचे मालक हे जरी सरकारच्या दबावाखाली असले तरी ग्राऊंडवर रिपोर्टींग करणारे पत्रकार हे नेहमी सत्याच्याच बाजूने असतात.. हे सत्य दाखवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतल्याचं मी स्वतः अनुभवलंय. यासोबतचत हजारो सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि छोट्या माध्यमांचे पत्रकार यांनीही खूप प्रभावी कामगिरी केली. या सर्वांचीच नावं घेणं शक्य नसलं तरी त्यांचंही योगदान मुख्य माध्यमातील पत्रकारांइतकंच महत्त्वाचं आहे, हे मान्य करतो. या सगळ्यांचेच मनापासून आभार..!
तरुणांच्या आंदोलनाचा विजय झाला. धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायला तरुणांनी भाग पाडलं. आम्ही कोणाचं ऐकणार नाही, कोणाशी बोलणार नाही, आम्हाला कोणी सांगायचं नाही असा या सरकारचा जो माज होता तो या आंदोलकानी उतरवला. यासाठी या देशातील तमाम तरुण-तरुणीचं आणि त्यांच्या पालकांचं मनापासून अभिनंदन. हे अभिनंदन करण्यासाठी आज मी आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. उद्या २६ जुलै २०२६ ला जो तिरंगा मार्च होणार होता त्याचं रूपांतर विजयोत्सव सोहळ्यात होत आहे. उद्या ठरलेल्या वेळेतच सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आपण सगळे ठरलं तसं जमणार आहोत. देशभरातील तरुण-तरुणींनी केलेल्या संघर्षाचं कौतुक आणि अभिनंदन करणार आहोत. तेंव्हा आपलं ठरलं आहे तसं भेटूया. पत्रकार परिषदेत बाकी जे काही बोललो त्याची चित्रफीत सोबत जोडली आहे.
एक रात में अचानक, बिना किसी टीम और बिना किसी तैयारी के, एक सेकंड-हैंड मोबाइल से शुरू हुए इस सफर में आज 6 लाख लोग जुड़ चुके हैं! यह मेरे लिए किसी सपने के सच होने जैसा है। आने वाले कुछ दिनों में चैनल को और भी बेहतर और अलग बनाने की तैयारी है, उम्मीद है आपका यह साथ यूं ही बना रहेगा। पिछले तीन सालों में आपने जो प्यार और भरोसा दिया है, उसके लिए मैं हमेशा आपका आभारी रहूंगा। 🙏🏻
एका रात्रीत अचानक, कोणतीही टीम नसताना आणि कोणत्याही पूर्वतयारीशिवाय, एका सेकंड-हँड मोबाईलवरून सुरू झालेल्या या चॅनेलशी आज ६ लाख लोक जोडले गेले आहेत! हे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखेच आहे. येत्या काळात चॅनेलमध्ये आणखी काही चांगले बदल करण्याची तयारी आहे, आशा आहे की तुमची साथ अशीच कायम राहील. गेल्या तीन वर्षांत तुम्ही जे प्रेम आणि विश्वास दिलात, त्याबद्दल मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन. 🙏🏻
Started overnight with no team, no preparation, and just a second-hand mobile phone—today, this channel has grown to a family of 6 lakh! This is nothing short of a dream come true for me. There are many more changes planned for the channel in the future, and I hope your support continues. I will forever be grateful for the love and trust you’ve shown me over the last three years. 🙏🏻
YOUTH POWER 💪
आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे ‘नव्या दमाची, नवी ताकद’ पुन्हा एकदा दिसून आली.
तिरंगा अभिमानाने फडकला आणि एकजुटीने, एकदिलाने म्हटलेल्या राष्ट्रगीताने सर्वांना एक नवी ऊर्जा दिली.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी तरुणाईच्या आंदोलनाला दिलेली बळकटी, युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे आणि मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे ह्यांचा युवा आवाज पुन्हा एकदा गरजला...
मागणी एकच,
धर्मेंद्र प्रधान ह्यांचा राजीनामा!