MPSC मुख्य कार्यालय, बेलापूर : विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन आज तिसऱ्या दिवशी!
MPSC परीक्षा CBT (Computer-Based Test) पद्धतीऐवजी पारंपरिक ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्यात, या विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी MPSC मुख्यालय, CBD बेलापूर येथे सलग तिसऱ्या दिवशी शांततापूर्ण धरणे आंदोलन करत आहेत.
तीन दिवस उलटूनही MPSC प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कोणताही सकारात्मक संवाद साधलेला नाही. विद्यार्थ्यांच्या भावना, शंका आणि भविष्यासंदर्भातील गंभीर चिंतांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. ही भूमिका अत्यंत दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे.
आज लातूरमध्येही हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, राज्यभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला सक्रिय पाठिंबा देत असून, त्यांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत संघर्ष करत राहील.
आजच्या आंदोलनात MPSC प्रशासनाच्या असंवेदनशील भूमिकेचा निषेध म्हणून काँग्रेस कार्यकर्ते काळ्या फिती बांधून आणि काळ्या रंगाचे कपडे परिधान करून आंदोलन करणार आहेत.
दुर्दैवाने, आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरू असतानाही पोलीस प्रशासनाकडून आंदोलनाची जागा रिकामी करण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संवाद साधण्याऐवजी आंदोलनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न लोकशाहीला शोभणारा नाही. सरकारने दडपशाहीचा मार्ग न स्वीकारता विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने चर्चा करावी.
महाराष्ट्रातील सर्व MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आमचे आवाहन आहे—
🖤 आज आपल्या WhatsApp Status वर काळा रंग (Black Status) ठेवा किंवा काळ्या पार्श्वभूमीवर “MPSC परीक्षा ऑफलाइन घ्या”, #OfflineMPSC, #JusticeForMPSCAspirants हा संदेश पोस्ट करून या न्याय्य लढ्याला आपला पाठिंबा दर्शवा.
हा केवळ एका परीक्षेचा प्रश्न नाही; हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, पारदर्शकतेचा आणि परीक्षेवरील विश्वासाचा प्रश्न आहे.
चला, लोकशाही मार्गाने एकजुटीने विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आवाज उठवूया.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्यास काँग्रेसचा ठाम पाठिंबा आहे. न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील!
जय महाराष्ट्र!
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@satejp@VijayWadettiwar@DGPMaharashtra@bhimanwar@MahaChiefSec
#OfflineMPSC #JusticeForMPSCAspirants #MPSC #StudentsFirst #Maharashtra
आमदार @AUThackeray जी 25 जून पासून #MPSC चे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी #ऑनलाइन परीक्षा विरुद्ध वर्धा ,यवतमाळ, अमरावती ,छत्रपती संभाजीनगर आणि आज लातूर येथे आंदोलन झाले आहे. #mpsc च्या #ऑनलाईन परीक्षेविषयी तुमची भूमिका काय आहे ती लवकर जाहीर करावी.
आजचे लातूर येथील आंदोलन
लातूर जिल्ह्यातील ओसा मतदारसंघाचे आमदार @AbhiPawarBJP तुम्ही आज लातूर मधील #MPSC_ऑनलाइन परीक्षा_विरोधी आंदोलनात सहभागी झाला असता तर बरं झालं असते. तुम्ही शब्द दिलेला आहे की विद्यार्थ्यांचा #समाधान होईपर्यंत तुम्ही #सोबत असाल म्हणून. परंतु तुम्ही एवढे बोलून #आज्ञावासात गेला आहात.
@Dhananjay4INC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एवढे पण #आंधळे पणाचे सोंग करू नाही. आज तिसरा दिवसा असताना तुम्ही आंदोलकांशी चर्चा करत नसाल तर ही आतिश #लाजीरवाणी गोष्ट आहे.
#ऑनलाइन परीक्षेचा निर्णयाचा #पुनर्विचार तर करावाच लागणार आहे. परीक्षा A to Z #ऑफलाईन
#MPSCमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा #ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्यात यासाठी
वर्धा यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर नंतर आज #लातूर येथे विद्यार्थी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरले आहेत. @mpsc_office ने ऑफलाईन चा निर्णय घ्यावा ही नम्र विनंती
@waglenikhil@RahulAsks तुम्ही पण दखल घ्या
@waglenikhil तुम्हाला तरी कुठे दिसतात तरुणाच्या वेदना आपल्या महाराष्ट्र मध्ये MPSC च्या #ऑनलाइन परीक्षेच्या विरोधात विद्यार्थी 25 जून पासून विविध ठिकाणी आंदोलन करत आहे तुमच्यासह किती माध्यमांनी ती बातमी दाखवली. लाज वाटली पाहिजे सर्वांना फक्त राजकीय मलिदा पाहिजे
आज लातूर येथील आंदोलन चित्र
@Dhananjay4INC ज्या ज्या वेळेस विद्यार्थ्यांवर अन्याय होतो त्या त्या वेळेस @Dhananjay4INC साहेब नेहमी विद्यार्थ्या सोबत असतात , पूर्ण विद्यार्थी वर्ग तुमचा कायमच ऋणी राहील ,
मा. @bhimanwar सर तुमच्यावर कोणाचा राजकीय दबाव असेल तर सरळ राजीनामा द्या.
MPSC मुख्य कार्यालय, बेलापूर येथे सुरु असलेल्या “MPSC च्या परीक्षा ऑफलाईन व्हाव्यात” या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा दुसरा दिवस.
आंदोलन स्थळावरून लाईव्ह!
महाराष्ट्रातील सर्वात मोठा #ऑनलाइन_पेपरफुटी घोटाळा उघड,तलाठी भरती २०२३-२४ मधील सर्वात मोठी अपडेट MAT खंडपीठाचा निकाल जाहीर
तलाठी भरतीत घोटाळा झाल्याचे निष्पन्न ! घोटाळ्याच्या #सखोल तपासाचे शासनाला आदेश दिले आहे,आता मा. @mpsc_office तुम्ही ठरवा परीक्षा #ऑनलाईन घ्यायची का #ऑफलाईन
आयोगाला आवाहन!
तुम्ही घटनात्मक संस्था आहात. तुमची स्वायत्तता, पारदर्शकता आणि सन्मान हेच लाखो विद्यार्थ्यांचा तुमच्यावरचा विश्वास आहे. जर हा सन्मान आणि विश्वास टिकवायचा असेल, तर तुम्हाला एकच मार्ग अवलंबावा लागेल - सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेणे.
#MPSC#ऑफलाइन@mpsc_office
आमचं आंदोलन #MPSCच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात आहे. आंदोलन करणाऱ्यांवर #नक्षलवादी म्हणून टीका BJP चे प्रवक्ते अजित चव्हाण करताय. @Dev_Fadnavis@RaviDadaChavan#MPSC ला BJP मधे #विलीन केल्यासारखे वागू नका.BJP च्या बुडा खाली खूप अंधार आहे, आधी तिकडे एखादी मेनबत्ती लावा
मा. @mpsc_office , @bhimanwar
जेव्हापासून आपण #Online चा घाट घातलाय तेव्हा पासून #सर्व_परीक्षार्थी मानसिक त्रासात जगत आहेत हा मानसिक त्रास फक्त ऑनलाइन परीक्षा मुळे होतोय हे लक्षात घ्या यातून काही विपरीत घडलं तर याला जबाबदार कोण ? विद्यार्थी हितासाठी "#सर्व_ऑफलाईन परीक्षा घ्या".
एमपीएससीने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षांच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी आणि परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ व त्यांच्या न्याय्य मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री. धनंजय शिंदे व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. रामचंद्र दळवी यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन नवी मुंबईतील MPSC च्या मुख्य कार्यालयासमोर सुरू केले आहे.
सर्व नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या संवेदनशील मागणीला पाठिंबा देऊन उपोषणात सहभागी व्हावे.
@INCHarshsapkal@satejp@DalviAaba@Dhananjay4INC