@Prksh_Ambedkar मतदानाचा अधिकार म्हणजेच लोकशाहीचा आत्मा!
हा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक भारतीयाने जागरूक होऊन एकत्र येणे गरजेचे आहे. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन, मुंबई येथे एकत्र येऊन मतदानाचा अधिकार आणि संविधानाच्या रक्षणासाठी आवाज बुलंद करूया!
जयभीम 🙏🙏
अशोक विजया दशमीच्या सर्वांना शुभेच्छा!
कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकांनी तथागत बुद्धांचा शांतीचा, विचार स्वातंत्र्याचा, समानतेचा मार्ग स्वीकारला. ही एक क्रांती होती, ह्याविरोधात प्रतिक्रांती झाली.
महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वैदिक धर्माविरोधात बंधुभाव, व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्याची क्रांती सुरुवात केली. आज व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे मतदान!
या मतदानाला आरएसएस-भाजप सरकार निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमारला सोबत घेऊन यावर घाला घालत आहेत.
तमाम भारतीयांना माझे आवाहन आहे, जोवर मतदान आहे, तोपर्यंत स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य राखण्यासाठी 28 ऑक्टोबर 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन, मुंबई येथे आपण सर्वांनी एकत्र येऊन आम्ही आमचा अधिकार हिसकवू देणार नाही. हे सांगण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचे आहे. आपण आपला अधिकार शाबूत ठेवूया!
#मुंबई #निवडणूक_आयोग
Congress presents itself as constitutionalist,but its ideology in practice reflects RSS influence!
And one of the important pillars of this ideology is those who call themselves Ambedkarites while allegedly acting as political brokers.
@VBAforIndia@Prksh_Ambedkar#संविधान
आज राजगृह येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजयादशमी निमित्ताने तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन#विजयादशमी
प्रज्ञा प्रसार, धम्म संस्कार केंद्राचे भन्ते विशुद्दानंद बोधी महाथेरो यांनी दिलेले निमंत्रण स्वीकारून मी उद्या सायंकाळी 05 वा. बुद्ध लेणी, औरंगाबाद येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त उपस्थित राहणार आहे.
#बुद्धलेणी#औरंगाबाद
वसई-विरार: सुजात आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; वंचित बहुजन आघाडी आक्रमक, अभिनव परब यांच्या कार्यालयाला फासले काळे
वसई-विरार : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपावरून अभिनव परब यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. या वक्तव्याचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीच्या वसई-विरार शहरातील कार्यकर्त्यांसह महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अभिनव परब यांच्या कार्यालयाला काळे फासले.
सुजात आंबेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अभिनव परब यांनी स्वतः कार्यालयात येऊन जाहीर माफी मागावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
तसेच, वालीव पोलीस ठाण्यात अभिनव परब यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे.
अभिनव परब यांना अटक करून त्यांनी जाहीर माफी मागेपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
सुजात आंबेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी, वसई-विरार शहर व महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
#VanchitBahujanAghadi #VBA #SujatAmbedkar #AbhinavParab #VasaiVirar #MaharashtraNews #BreakingNews #PoliticalNews #AmbedkariteMovement #WomenWing #AtrocityAct #JusticeForSujatAmbedkar #VBAProtest #MarathiNews #LatestNews
बालमटाकळीत मराठा समाजातील अनेक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
शेवगाव : शेवगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या बालमटाकळी गावात विविध पक्षांतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. सामाजिक कार्यकर्ते बंडू पाटील शिंदे आणि अशोक वाघुबरे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. किसन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महेश खरात, सागर पाटेकर, बाळासाहेब शिंदे, आदिनाथ राजपुरे, संभाजी काटे, शंकर बांगडे, डिगांबर कोकाटे, सरताज शेख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शाहूराव खंडागळे, तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, अरुण झांबरे, पाटील बन्नूभाई शेख, धोंडीराम मासाळकर, विष्णू वीर, दाराशींग भोंगळे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे अरुण भोंगळे आणि सूर्यकांत भोंगळे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
#Balmatakali #Shevgaon #VanchitBahujanAghadi #VBA #VBAJoinings #PoliticalNews #MaharashtraPolitics
साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका
मुंबई : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी त्याचे आई वडील बऱ्याच दिवसापासून आंदोलन करत आहेत. मात्र आंदोलन करणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांसह काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे. तसेच राहुल सोनपिंपळे आणि त्यांच्या AIISCA संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईचा वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी साकीनाका येथील पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी त्यांनी युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याशी संपर्क साधून पोलिसांशी त्यांचे फोनवरून बोलणे करून दिले. यावेळी सुजात आंबेडकर यांनी पोलिसांशी संवाद साधत ताब्यात घेतलेल्या सर्वांना तातडीने सोडण्याच्या सूचना केल्या.
साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना आणि संबंधित पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईचा वंचित बहुजन आघाडीने निषेध केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही हस्तक्षेप केला. त्यांनी मुंबई पोलीस दलातील वेस्ट झोन-३ चे पोलीस उपायुक्त (DCP) यांच्याशी फोनवरून संवाद साधला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्तक्षेपानंतर साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा, यासाठी लढणाऱ्यांची पोलिसांतून सुटका करण्यात आली आहे.
जोपर्यंत साहिल वाकोडे प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. जर प्रा. डुल्ला यांना अटक करण्यात आली नाही तर सम्यक विद्यार्थी आंदोलन मंत्रालयावर मोर्चा काढेल असा इशारा मुंबई सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे आनंदराज घाडगे यांनी दिले आहे.
#SahilWakode
#SahilWakodeJustice
#IITBombay
#VanchitBahujanAaghadi
#PrakashAmbedkar
#SujatAmbedkar
#MumbaiPolice
#StudentProtest
चलो अकोला
भव्य धम्म मेळावा
धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव - 2026
यावर्षी होणाऱ्या भव्य धम्म मेळाव्यात फुले-शाहू-आंबेडकरवादी आणि संविधानवादी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
: ॲड. सुजाता वालदेकर
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
दिनांक :🗓️ 21 ऑक्टोबर 2026
वेळ :🕕 सायंकाळी 6 वाजता
स्थळ :📍अकोला
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन
#भव्य_धम्म_मेळावा
#Akola
@Prksh_Ambedkar The struggle to free Deekshabhoomi and Mahabodhi Buddha Vihar, fight institutional injustice against students, and build independent political power for the oppressed must grow stronger! ✊
🙏Jai Bhim 💙
@VBAforIndia@Prksh_Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar’s conversion to Buddhism at Deekshabhoomi, Nagpur, on Ashoka Vijayadashami, October 14, 1956, alongside hundreds of thousands of his followers, was far more than a religious act. The conversion was perhaps one of his most profound and strategically significant socio-political moves in our modern history.
It was a radical assertion of a distinct socio-political identity, a reclamation of dignity and equality, and a decisive step towards liberation from caste oppression.
It was a shift in power! A defiant declaration that the caste-oppressed would no longer submit to a Brahmanical, Manuwaadi social order that made inequality their destiny. Babasaheb challenged not merely the rituals of caste, but the very structures of socio-religious political power that legitimised it, and shattering the notion that one’s birth determines one’s worth.
This Ashoka Vijayadashami and Dhamma Chakra Parivartan Din, on October 20, let us take a firm collective stand to challenge Brahmanical, Manuwaadi dominance and keeping their forces in check —
• The struggle to wrest control of Deekshabhoomi and Mahabodhi Buddha Vihar from RSS Brahmanical, Manuwaadi hands must intensify.
• The institutional murders of our children must be resisted with unwavering determination.
• Above all, we must strengthen our collective resolve to realise Babasaheb’s dream of an independent political power, which speaks for the oppressed and challenges the socio-political structures that perpetuate our subjugation.
चलो अकोला
भव्य धम्म मेळावा
धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव - 2026
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गेल्या ४२ वर्षांपासून अकोला येथे भव्य धम्म मेळावा पार पडतो. या मेळाव्यात दरवर्षी बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करतात.
या वर्षी होणाऱ्या भव्य धम्म मेळाव्यास फुले शाहू आंबेडकरवादी आणि संविधानवादी जनतेने मोठ्या संख्येने सामील व्हावे.
: मिलिंद इंगळे
अकोला जिल्हा महासचिव, वंचित बहुजन आघाडी
दिनांक :🗓️ 21 ऑक्टोबर 2026
वेळ :🕕 सायंकाळी 6 वाजता
स्थळ :📍अकोला
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन
#भव्य_धम्म_मेळावा
#Akola
आयोगाने घेतलेल्या पेपरसोबत @TCS ने घेतलेल्या सर्व परीक्षांचीही चौकशी का होत नाही?
सरळसेवा मध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद खंडपीठाने तलाठी भरती २०२३ मधील सायबर गैरप्रकार प्रकरणात स्पष्ट आदेश दिले आहेत. TCS च्या ऑडिट लॉग रिपोर्टनुसार संशयास्पद डिजिटल पॅटर्न आढळल्याने २१ उमेदवारांचे अर्ज बाद ठरवत, सखोल फॉरेन्सिक चौकशी करून टोळीचा शोध घ्यावा आणि सायबर गुन्ह्यांअंतर्गत कारवाई करावी, असे निर्देश राज्य सरकारला दिले होते.कोर्टाचे हे स्पष्ट आदेश असतानाही @DGPMaharashtra यांनी अजून तपास का सुरू केला नाहीये.
@Dev_Fadnavis त्यासाठी पण विद्यार्थ्यांना आंदोलनच करायचे आहे का?
राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी
#TalathiBharti #MATOrder #TCSExamScam #ForensicProbe #MaharashtraCorruption #JusticeForAspirants #DevendraFadnavis #DGPMaharashtra
चलो अकोला
भव्य धम्म मेळावा
धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव - 2026
भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी आघाडीच्या वतीने पुढील काळातील धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय वाटचाल काय असेल यासंदर्भात बाळासाहेब आंबेडकर भव्य धम्म मेळाव्यात मार्गदर्शन करतात.
फुले-शाहू-आंबेडकरवादी जनतेने मोठ्या संख्येने भव्य धम्म मेळाव्यास अकोला येथे उपस्थित रहावे.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
दिनांक :🗓️ 21 ऑक्टोबर 2026
वेळ :🕕 सायंकाळी 6 वाजता
स्थळ :📍अकोला