केंद्र सरकारचे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ अर्थात एनएसडीसीच्या अंतर्गत पुण्यात कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या केंद्राचा उद्घाटन सोहळा उद्या पुण्यात संपन्न होणार आहे
सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय प्रशाळेत अंतराळ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
मुंबई विद्यापीठात आता कृत्रिम बुद्धिमत्ता च्या मदतीने आरोग्य संशोधन होणार असून त्यासाठी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात लवकरच शैक्षणिक सामंजस्य करार होणार आहे.
शासकीय तंत्रनिकेतन इमारतींच्या बांधकामासंदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीस मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सहभाग घेऊन तंत्रनिकेतन इमारतीचे बांधकाम दर्जेदार करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
#उच्चवतंत्रशिक्षण
नमस्कार !
आपण सर्वांना माहिती आहेच की राज्य शासनाने राज्यातील सर्व मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याबाबतची घोषणा केली. त्यानंतर वचनपूर्ती करत संबंधीत शासननिर्णयही प्रसिद्ध केला. मात्र, या योजनेचा लाभ घेत असताना विद्यार्थिनींना काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी, मुलींना मोफत उच्च शिक्षण घेण्यासाठीच्या प्रक्रियेत काही समस्या असल्यास त्यांनी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत 07969134440 आणि 07969134441 या हेल्पलाइन क्रमांकावर तसेच https://t.co/zkKfakn5Q6 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
धन्यवाद !
आपले सरकार, महायुती सरकार!
#GirlsEducation #FreeEducation
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
शासन सर्वसामान्यांचे,
निर्णय जनकल्याणाचे!
मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज १३ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
#CabinetDecision
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
राज्य शासन देत आहे उच्च शिक्षणाला गती !
आज झालेल्या मंत्रीमंडळ निर्णयात उच्च शिक्षणाला गती देण्यासाठी डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांचे मनःपूर्वक आभार!
#CabinetDecision
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत काल मंत्रालयात महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडल नियामक परिषदेची पहिली बैठक पार पडली. दरम्यान कलाशिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळाने प्रयत्नशील राहण्याच्या सूचना यावेळी चंद्रकांत दादांनी बैठकीत दिल्या.
मुक्त विद्यापीठाचे अमळनेर उपकेंद्र आठ महिन्यात पूर्णत्वाला येणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टाकरखेडानजीक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, उपकेंद्रासाठी विलंब न करता भाड्याने जागा घेऊन उपकेंद्र सुरू करण्याचे निर्देश यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी काल अमरावती जिल्हा नियोजन समितीचा आढावा घेतला. यावेळी दादांनी मंजूर झालेल्या निधीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.