महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
#MPSC गट-क 2026 पूर्व परीक्षेसाठी #Normalization लागू
वेगवेगळ्या सत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आणि नंतर गुणांचे समानीकरण. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रक्रियेबाबत आयोगाने संपूर्ण सूत्र व पद्धत स्पष्ट करावी.
Tags:
@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
🔥 #PSI_परीक्षा अवघ्या ३ दिवसांवर!
वयोमर्यादा वाढीचा निर्णय तातडीने घ्या.
स्पर्ध��� परीक्षा विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीवर अजूनही तोडगा नाही. महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुद्दामहून PSI वयोमर्यादा वाढीचा निर्णय लांबवत आहेत.
राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी चालवलेला हा क्रूर खेळ आहे.
ही केवळ निष्क्रियता नाही तर ही महायुती प्रणित अन्यायाची नीती आहे. मात्र सुशिक्षित विद्यार्थी हा अन्याय अजिबात सहन करणार नाहीत.
निवडणुकीत मतांसाठी तरुणांची आठवण येते,
पण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आला की फडणवीस सरकार निर्दयीपणे पाठ फिरवते.
हा प्रश्न प्रशासनाचा नाही, तर राजकीय इच्छाशक्तीचा आहे.
आणि ही इच्छाशक्ती महायुती सरकारकडे अस्तित्वातच नाही.
सरकारने ताबडतोब निर्णय जाहीर केला नाही,
तर काँग्रेस पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरेल.
#PSI परीक्षार्थी एकटे नाहीत, काँग्रेस त्यांच्यासोबत उभी आहे.
🔥 हा लढा नोकरीचा नाही,
हा लढा तरुणांच्या स्वाभिम��नाचा आणि न्यायाचा आहे.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
परीक्षेला काही दिवस उरलेत आणि सरकार अजूनही निवडणुकीच्या युती आघाडीत अडकलेलं आहे.विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी त्यांना काहीही देणंघेणं नाही.या मुजोरी आणि निष्क्रियतेमुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे.आता निर्णय घ्या नाहीतर विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू @CMOMaharashtra
राज्य लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षांची जाहिरात 29 जुलै २५ नुसार नुसार वयोमर्यादा गणना एक नोव्हेंबर २०२५अशी आहे.
सात महिने उशिरा आलेल्या जाहिरातीमुळे वयवाढी चा मुद्दा निर्माण होऊन साधारण तीस ते पस्तीस हजार विद्यार्थी या परीक्षेला बसू शकणार नाही.
विद्यार्थ्यां��्या या नुकसानीला सर्वस्वी राज्य लोकसेवा आयोगाची यंत्रणा जबाबदार आहे.
सबब आमची राज्य सरकारला विनंती आहे,
२०२४ ला ज्या पद्धतीने जाहिरातीस उशीरा आल्याने राज्य सरकारने शा.नि. क्र. २०२४/प्र. क्र. ३९/४५५२(सेवा) दिनांक २० डिसेंबर २०२४ नुसार १ वर्ष वय सवलत दिली होती.
२०२५ ला पोलीस शिपाई पदासाठी सुद्धा एक वर्षाची वय वाढ सवलत दिलेली आहे.
याच धर्तीवर अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ पोलीस उप��िरीक्षक पदासाठी १ वर्ष वय सवलत देऊन राज्यातील यातील 35 हजार गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं असणा��्या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवावे.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @mpsc_office
#वयवाढमुद्दा #MPSC
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत.
१) शासनाने पोल��स शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी.
२) जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर ��०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा.
वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर वि��ार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा.
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (Group ‘B’) 2025 साठी 674 पदांची भरती प्रक्रिया विलंबाने जाहीर झाली असून परी���्षा 4 जानेवारी 2025 रोजी घेतली जात आहे. नेहमीच्या नियोजनापेक्षा वेगळ्या वेळापत्रकामुळे अनेक उमेदवार अडचणीत सापडले आहेत.
वयोमर्यादेसाठी 1 नोव्हेंबर 2025 ही तारीख ग्राह्य धरल्याने दीर्घकाळ सातत्याने तयारी करणारे हजारो विद्यार्थी केवळ तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरत आहेत. या अन्यायाविरोधात विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून शासनाकडे दाद मागत आहेत मात्र, अद्यापही ठोस निर्णय समोर आलेल�� नाही.
स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांनी आयुष्यातील महत्त्वाची वर्षे दिली आहेत. प्रशासकीय गोंधळाचा भार विद्यार्थ्यांवर टाकणे योग्य नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य खराब होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
सर्व पात्र उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी देत शासनाने तातडीने न्याय्य आणि सकारात्मक निर्णय घ्यावा. अशी मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करत आहोत.
@mpsc_office
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
#MPSC #PSI_वयवाढ
#PSI
#PSI एक वर्ष वयवाढ बाबत उमेदवार अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबां���ी सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही नम्र विनंती.
#PSI_Age_Relaxation @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी (PSI) एक वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे. ह्या परीक्षेसाठी सरकारकडून ७ महिने विलंब झाल्यामुळे ही स्वाभाविक मागणी आहे.. सरकारने तात्काळ विचार करावा अन्यथा आंदोलन उभ करू .. @CMOMaharashtra
राज्यभरातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी संयुक्त गट-ब (PSI) पदासाठी १ वर्ष वय सवलत देण्याची मागणी केली आहे. संयुक्त गट-ब परीक्षा २०२५ ची जाहिरात ७ महिने उशिराने प्रसिद��ध झाल्यामुळे अनेक उमेदवार वयोमर्यादेमुळे वंचित राहत आहेत. गेल्या ७ महिन्यांपासून विद्यार्थी शासनाकडे न्याय मागत असतानाही निर्णय होत नाही.
शासनाने २०२४ च्या परीक्षेसाठी १ वर्ष वय सवलत दिली होती तसेच नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीतही १ वर्षाची सवलत दिली आहे. त्याच धर्तीवर अंतिम संधी शिल्लक असलेल्या उमेदवारांच्या हिताचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही १ वर्ष वय सवलत द्यावी, ही विनंती.
@CMOMaharashtra @mpsc_office
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवती��े 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत.
१) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी.
२) जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा.
वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्या संयुक्त पूर्व परीक्षा (गट ‘ब’) २०२५ साठी एकूण ६७४ पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, त्यापैकी ३९२ पदे पोलीस उपनिरीक्षकांची आहेत.
साधारणतः ही जाहिरात डिसेंबर जानेवारी महिन्यात जा���ीर होते व परीक्षा मार्च महिन्यात घेतली जाते. मात्र यावर्षी ही जाहिरात २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली असून, परीक्षा २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.
या परीक्षेसाठी १ नोव्हेंबर २०२५ ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र या तारखेच्या अटीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मेहनत घेऊन या परीक्षेची तयारी करणारे हजारो विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरत आहेत.
ही बाब अत्यंत दुर्दैवी व अन्यायकारक आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून संबंधित विद्यार्थी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत, मात्र अद्याप याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही.
या पार्श्वभूमीवर माझी शासनाकडे विनंती आहे की, या विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ या परीक्षेसाठी दिला आहे. केवळ तांत्रिक कारणामुळे ��्यांच्या हातातून संधी हिरावून घेणे योग्य ठरणार नाही.
तरी न्याय्य भूमिका घेत सर्व पात्र उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
PSI वय वाढीसाठी विद्यार्थी गेल्या सात महिन्यापासून अहोरात्र काम करत आहेत.
मुळात जाहिरात येण्यासच उशीर झाला तसेच,
PSI पद सोडता खुल्या प्रवर्गाला एकही जागा य��� जाहिरातीमध्ये नाही (अपवाद ASO 1) यासाठी वयवाढ व्हायला हवी.
सरकारने तात्काळ दखल घेऊन शासन निर्णय निर्गमित करावा.
#वय_वाढ
सरळसेवा जाहिरात 4-5 वर्षातून एकदा येते त्यात समांतर आरक्षण 72% पेक्षा जास्त झालं आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना स्पर्धा करण दिवसेंदिवस अवघड होत चाललंय.
अशा राखीव जागा देऊन शासन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना वार्यावर सोडत आहे.
@cbawankule@Dev_Fadnavis
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1846 कार्यकारी सहायक भरतीतील 425 हून अधिक उमेदवार अनुपस्थित/अपात्र ठरले आहेत. BMC आयुक्तांनी यावर विशेष लक्ष देऊन पुढील गुणवत्ताधारक उमेदवारांची यादी तात्काळ प्रसिद्ध करावी व कागदपत्र तपासणी करावी. यासोबतच वैद्यकीय तपासणी झालेल्या उमेदवारांना त्वरित नियुक्ती द्यावी!
@mybmc@mieknathshinde
🔶अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांनो तयारीत रहा,हाक देताच हजर व्हा.
28 sep रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा त्याच दिवशी घेण्यावर ठाम असलेल्या @mpsc_office ला
मला एकच सांगायचे आहे राज्यसेवा syllabus मधील decision making, disaster management, natural calamities यात स्वतः आयोग फक्त नापासच नाही तर negative marking मध्ये आहे.
फक्त #UPSC चा syllabus copy paste करून moral, ethics ,principle अंमलात आणता येत नसतात.
मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागताना 31 जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीचा उल्लेख करताय व ज्यांची शेती,घर,जनावरे पुरात संपले त्याच हजारो मुलांना अतिसंकटात असताना परीक्षा द्यायला लावताय.
असंवेदनशील सरकार दुटप्पीपणा दाखवत निर्दयी बनलं आहे नक्कीच.
बरोबर ना ??
@maha_governor महोदय
कुठे आहात आपण ?
@CMOMaharashtra झोपले आहे काय ??
@mieknathshinde साहेब
@AjitPawarSpeaks दादा
आपण कधी मौन सोडणार???
🔶 मुलांनो आपण लढू तयार रहा.
आत्तापर्यंत अन्यायायाविरुद्ध माझ्यासोबत लढणारे माझे सर्व सहकारी, मित्र, निःस्वार्थीपणे मदत करणारे,व माझे सर्व #MPSC उमेदवार
तयारीत रहा
लढेंगे भी और जीतेंगे भी
@RahulGandhi@PawarSpeaks@NANA_PATOLE@Jayant_R_Patil@INCHarshsapkal@satejp@AbhiPawarBJP@vishwajeetkadam@OfficeofUT@OmRajenimbalkr@PuneCityPolice@CPPuneCity
राज्यभरात विशेषतः मराठवाड्यात आणि माझ्या मतदारसंघात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. वाचनालये बंद असून अभ्यासाच्या साहित्याचे देखील नुकसान झाले आहे. याखेरीज वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी वाहने देखील पोहचू शकत नाहीत अशी स्थिती आहे. याच परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवेची परीक्षा ही 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. परंतु अद्यापही म��ाठवाड्यातील विध्यार्थांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचता येईल अशी शक्यता नाही. त्यामुळे ही परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलावी आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर ती घेण्यात यावी अशी विध्यार्थांची मागणी आहे. माझी मुख्यमंत्री महोदय आणि शासनाला अशी विनंती आहे कि, कृपया आपण या गंभीर परिस्थितीचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्याच्या संदर्भाने निर्णय घ्यावा...
@CMOMaharastra @Dev_fadanvis