आम्ही दिलेल्या पुराव्यानुसार आणि सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानुसार पेपरफुटी झाल्याचं सिद्ध झाल्याने #MPSC ला औषध निरीक्षक पदाची परिक्षा रद्द करावी लागली. हा विद्यार्थ्यांच्या लढ्याचा विजय आहे. यासंदर्भात पुढील भूमिका ठरवण्यासाठी पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला आणि या पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून #MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा देण्याची आणि स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची या पदावर नेमणूक करण्याची मागणी केली. तसंच केवळ एकाच विद्यार्थ्याला फुटलेला पेपर मिळाला, हा एमपीएससीचा निष्कर्ष आम्हाला मान्य नाही, तर हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे. त्यासाठी अध्यक्षांचा राजीनामा आवश्यक असून तो न दिल्यास १ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी दिला.
यावेळी मा. आ. सुनील जी भुसारा, प्रमोद पाटील, ऋषिकेश गांगुर्डे, नितेश सूर्यवंशी, ॲड. संकेत बारस्कर यांच्यासह आमचे पदाधिकारी विकास लवांडे, पंकज नाना बाराडे, रविकांत वरपे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
#MPSC #पेपरफुटी #औषध_निरीक्षक #विद्यार्थ्यांचा_लढा
#विद्यार्थ्यांचा_विजय #MPSCअध्यक्ष #MPSCअध्यक्षांचाराजीनामा #पेपरफुटी_रॅकेट
एमपीएससीचे अध्यक्ष हे महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याचे मित्र आहेत. आरटीओ कमिशनर असताना त्यांनी काय काय गोंधळ घातलेत याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात आहे. मग असा गोंधळ घालणारा अधिकारी जर तुम्ही एमपीएससीचा अध्यक्ष बनवत असाल तर हे आम्हाला मान्य नाही. रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
#rohitpawar #mpsc #maharashtra #MarathiNews
ए डर जरुरी है! 🔥
काल राहुलजी गांधींनी विद्यार्थ्यांचा हा गंभीर मुद्दा हातात घेतला आणि आज MPSC कडून परीक्षा रद्द!
फार्मसी विद्यार्थ्यांची फरफट, MPSC परीक्षेतील अनियमितता आणि पेपरफुटीच्या गंभीर प्रश्नाबाबत आदरणीय राहुलजी गांधी यांचे विश्वासू सहकारी श्री. मनोज त्यागीजी यांच्यासोबत फार्मसीच्या विद्यार्थ्यांची भेट घडवून आणली. विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या, व्यथा आणि पुरव्या सह मागण्या स्पष्टपणे त्यांच्या समोर मांडल्या.
याच विद्यार्थ्यांपैकी कु. शरयू चोपडे यांनी पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात राहुलजी गांधींसोबत स्टेज शेअर करत फार्मसी विद्यार्थ्यांच्या भावना आणि MPSC विद्यार्थ्यांच्या व्यथा थेट राहुलजींपर्यंत पोहोचवल्या.
आणि आज…
औषध निरीक्षक (Drug Inspector) पेपरफुटी प्रकरणी सरकारला अखेर माघार घ्यावी लागली. MPSC कडून विनाअट परीक्षा रद्द करण्यात आली.
‘छात्रों की गूंज’च्या व्यासपीठावर फार्मसीच्या विद्यार्थिनींचा आवाज घुमला… ✊🏻📚📣
तो आवाज थेट राहुलजींपर्यंत पोहोचला आणि आज त्याचा परिणाम दिसून आला!
जोपर्यंत राहुलजी विद्यार्थ्यांच्या सोबत आहेत, तोपर्यंत विद्यार्थ्यांचा आवाज कुणीही दाबू शकणार नाही! 🔥
@RahulGandhi जी @manojtyagimrt ji
#छात्रोंकीगूंज #PharmacyStudents #DrugInspector #MPSC #PaperLeak #RahulGandhi
मा.@mpsc_office@bhimanwar औषध निरीक्षक परीक्षा रद्द झाली. प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्या उमेदवारांना पुन्हा नव्याने तयारी करावी लागणार आहे. त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास याची जबाबदारी कोणाची?
फक्त परीक्षा रद्द करून विषय संपत नाही.
पेपर नेमका कुठून बाहेर गेला? तो उमेदवारांपर्यंत कसा पोहोचला? यामागे कोण व्यक्ती/यंत्रणा होती? आणि दोषींवर नेमकी कोणती कारवाई होणार?
जर या प्रकरणात आयोगातील कोणाचीही भूमिका आढळली, तर त्याचीही निष्पक्ष चौकशी होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे.
दोषी कोणीही असो—उमेदवार असो, बाहेरील व्यक्ती असो किंवा व्यवस्थेतील कोणी असो—त्याला वाचवले जाऊ नये.
MPSC ही लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाची संस्था आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींची नावे आणि त्यांच्यावर केलेली कारवाई जनतेसमोर आणणे आवश्यक आहे.
परीक्षा रद्द करणे हा पहिला टप्पा आहे; आता दोषींना शिक्षा होणे गरजेचे आहे.
अन्यथा या प्रकरणाचा डाग MPSC च्या विश्वासार्हतेवर कायम राहील.#न्याय @satejp@VijayWadettiwar@INCHarshsapkal@CMOMaharashtra
आयोगाचा पेपर लीक होणे ही MPSC इतिहासातील दुर्दैवी घटना व गंभीर बाब असून आयोगाच्या विश्वासार्हतेला तडा पोहचविणारी घटना आहे. मागील 20 वर्षात अशी घटना कधीच घडली नाही. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी व सचिवांनी नैतिक जबाबदारी घेत तत्काळ राजीनामा द्यावा. सरकारने स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती अध्यक्ष व सचिव म्हणून निवडावी अन्यथा सरकार व MPSC ला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. ऑनलाईन परीक्षेचा घाट घालण्यासाठी तर हा पेपर फोडला नसेल ना? याचाही विचार व्हायला हवा.
@CMOMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis
पेपर रद्द करून प्रकरण संपत नाही!
आयोगाने चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, आम्ही दिलेल्या एजंटांच्या नावांवर काय कारवाई झाली ते सांगावे, आयोगातील सहभाग, राजकीय वरदहस्त आणि या पेपरलीक घोटाळ्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार?
जनतेला उत्तर द्यावे!
@INCHarshsapkal@bhimanwar
अगदी बरोबर. रोहित पवारांनी जाणीवपूर्वक संघर्षाचा रस्ता चालायचं ठरवलेलं दिसतं. महाराष्ट्राला संघर्ष करणारा आवडतो, सत्तेला शरण जो जात नाही त्याला महाराष्ट्र डोक्यावर घेतो. गेले काही दिवस ते हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत सातत्याने दिसत आहेत. हे सूचक आहे.
https://t.co/PhgX5zAB9Y
आयोगात इतक्या वर्षानंतर प्रथमच पेपरफुटी सिद्ध झाली आहे. पेपरफुटीची नैतिक जबाबदारी घेत MPSC चे अध्यक्ष, सर्व सदस्य यांनी राजीनामा द्यावा व आयोगाचे सचिव यांचे निलंबन अथवा बदली करावी ही सबंध महाराष्ट्रातील उमेदवारांची मागणी आहे.
@Dev_Fadnavis@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक 2025 च्या परीक्षेचा पेपर सुरु होण्यापूर्वीच एका उमेदवारास प्रश्नसंच मिळाल्याचे नमूद करून सदर जाहिरातीनुसार घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द केल्याचे जाहीर केले आहे.
अशा प्रकारे प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे आयोगाच्या गोपनीयतेवर व विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे भरतीप्रक्रिया रद्द करणे हा एक भाग झाला परंतु नेमकी प्रश्नपत्रिका कशी फुटली, फुटलेली प्रश्नपत्रिका एकाच विद्यार्थ्यापर्यंत मर्यादित राहिली की अनेकांना त्याचा लाभ झाला याची चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल हा जाहीर केला पाहिजे. तसेच आयोगातील कोणत्या यंत्रणाद्वारे ही प्रश्नपत्रिका फुटली याची सखोल चौकशी करून पेपरफुटी कायद्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. या विषयात लवकरच मी मा. मुख्यमंत्री यांना भेटून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार आहे.
📍MPSC ची प्रश्नपत्रिका कोणी फोडली?
📍फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा लाभ किती उमेदवारांनी घेतला ?
📍यात आयोगातील कोणी (विद्यमान/सेवानिवृत्त) सामील आहे का?
📍दोषींना पकडणार का ?
📍यांना काय शिक्षा होणार ?
✅अश्या खुप प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
@Dev_Fadnavis@bhimanwar@RRPSpeaks
@RRPSpeaks 💥Drugs inspector भरती रद्द
- धन्यवाद मा. रोहित दादा पवार साहेब @RRPSpeaks आपण सुरवाती पासून विद्यार्थ्यांच्या मागणीचा योग्य रीतीने पाठपुरावा केला आणि विद्यार्थ्यांची बाजू लावून धरली
कडक शिक्षा व्हायला पाहिजे जेणेकरून प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही
#पेपरलीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर MPSC ने आज रद्द केली. पेपरलीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुरव्यासकट समोर आणला, तपास यंत्रणांकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला, अखेर आज तपासात पेपरलीक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
आयोगाने पेपर रद्द केला असला तरी एका विद्यार्थ्याकडेच पेपर असल्याचे आयोगाचे स्पष्टीकरण कदापि मान्य करण्यासारखे नाही. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार राज्यभरात कार्यरत असलेल्या एजंटच्या रॅकेटमार्फत ४० -४० लाखाला पेपर विकला गेला ही वस्तुस्थिती आहे आणि आयोगाला देखील ही वस्तुस्थिती माहीत आहे.
आयोगाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न न करता चौकशी अहवाल सार्वजनिक करावा तसेच आम्ही ज्या एजंट लोकांची नावे दिली होती त्यांचे काय झाले? आयोगातून कोणी सहभागी आहे का? कोणाचा वरदहस्त आहे? हे देखील सांगावे. आयोगाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मात्र गप्प बसणार नाही.
आयोगाचा पेपर लीक होणे ही साधारण घटना नसून अत्यंत गंभीर बाब असून आयोगाच्या विश्वासार्हतेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी घेत तत्काळ राजीनामा द्यावा. सरकारने देखील स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करावी. सामान्य प्रशासन विभागाच्या मंत्र्यांनी देखील यावर सरकारतर्फे भूमिका मांडून राज्यातील जनतेला वस्तुस्थिती सांगावी.
@Dev_Fadnavis@mpsc_office
कॉकरोच जनता पार्टी के नेता आशुतोष रांका ने राजस्थान सरकार को दिया 48 घंटे का समय
◆ कहा, "48 घंटे के अंदर ऐक्शन लो, नहीं तो बड़ा आंदोलन करेंगे"
◆ CJP नेताओं ने जयपुर में स्कूल का दौरा करते हुए स्थानीय लोगों पर मारपीट करने का आरोप लगाया
#CockroachJantaParty | Cockroach Janta Party | Ashutosh Ranka | #AshutoshRanka | @AshutoshRanka