माझ्या नेत्या मा पंकजताईं गोपीनाथराव मुंडे व खा प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांनी माझ्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहून शुभ आशीर्वाद देऊन माझ्या आयुष्यातील अविस्मर्णीय क्षणाचे साक्षीदार झाल्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे!
भारतीय जनता पार्टी (बीड जिल्हा) च्या जिल्हा पदाधिकारी मासिक बैठकीला आज उपस्थित राहून उपस्थित सर्व सहकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
या बैठकीला प्रामुख्याने ज्येष्ठ नेते बादाम बाबा पंडित, केशव दादा आंधळे, बाळदादा पवार, योगेश क्षीरसागर, शंकर देशमुख, माधव निर्मळ, सर्जेराव तांदळे, नवनाथ दादा शिराळे आणि पालशिंगणकर काका यांच्यासह जिल्ह्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षाचे संघटन मजबूत करण्यासोबतच जिल्ह्याच्या विविध विकासकामांवर आणि भविष्यातील नियोजनावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
सर्व कार्यकर्त्यांचा हाच उत्साह आणि एकजूट बीड जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी सदैव आमची ताकद राहील!
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@DrPritamMunde
#PankajaMunde #Beed #BJPBeed #BJPMaharashtra #TeamBJP #पंकजा_मुंडे #बीड
आज अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक अशा 'भालका तीर्थ' मंदिराचे दर्शन घेण्याचा योग आला.
हे तेच परम पावन स्थान आहे, जिथे प्रभू श्रीकृष्णांनी एका पिंपळाच्या वृक्षाखाली अवतारकार्याची सांगता करत महानिर्वाण केले.
#BhalkaTirth#Krishna#JaiShreeKrishna#Darshan
आज बदनापूर येथील साई मॉडर्न इंग्लिश स्कूलला स्नेह भेट दिली.
याप्रसंगी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या 'एक पेड माँ के नाम' या जागतिक आवाहनाला अनुसरून शालेय परिसरात वृक्षारोपण केले.
@narendramodi@Dev_Fadnavis@PMOIndia@BJP4India@BJP4Maharashtra
At the ongoing Climate Week 2026 in Mumbai, the Environment and Climate Change Department of the Government of Maharashtra has taken a historic step.
- Significant MoUs have been signed to combat climate change and promote the circular economy.
▪︎ Maha-rPET initiative: India’s first-of-its-kind agreement with Hindustan Coca-Cola Beverages. Through this, a statewide drive will be undertaken for the collection and recycling of PET bottles.
▪︎ Climate Trade LLP agreement: The State Climate Action Cell has entered into this technical partnership to strengthen climate resilience.
Awareness campaigns and collection centres will be established across multiple cities, including Mumbai, Pune, Nashik, Chhatrapati Sambhajinagar, and Beed. This initiative will certainly prove to be a major step towards a sustainable and green Maharashtra.
पर्यावरण समृद्धीकडे महाराष्ट्राची आश्वासक पाऊले!
📍मुंबई येथे सुरू असलेल्या 'क्लायमेट वीक-२०२६' मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. हवामान बदलाचा मुकाबला आणि 'चक्रीय अर्थव्यवस्थेला' (Circular Economy) चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले.
▪︎ महा-आरईपीटी (Maha-rPET) अभियान: हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेज कंपनीसोबत देशातील अशा प्रकारचा पहिलाच करार! याद्वारे पीईटी बाटल्यांचे संकलन आणि पुनर्वापर (Recycle) करण्यासाठी राज्यभर मोहीम राबवली जाईल.
▪︎ क्लायमेट ट्रेड एलएलपी करार: राज्य हवामान कृती कक्षाने हवामान प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा तांत्रिक करार केला आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड यांसह अनेक शहरांत जनजागृती आणि संकलन केंद्रे उभारली जाणार आहेत. शाश्वत आणि हरित महाराष्ट्रासाठी हा पुढाकार नक्कीच महत्वाचा ठरले.
@Dev_Fadnavis
#ClimateWeek2026 #Maharashtra #EnvironmentClimateChange #BeatTheHeat #Sustainability #MahaRPET #CircularEconomy #GreenMaharashtra #PankajaMunde
📍परळी.
बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी दाखल केलेल्या सर्व उमेदवारांनी आज परळी येथील यश:श्री निवासस्थानी माझी भेट घेतली. पक्षाने दाखवलेल्या विश्वासासाठी सर्वांनी याप्रसंगी आभार व्यक्त केले.
अंबाजोगाईचे नंदकिशोर काका मुंदडा, गेवराईच्या गीता भाभी पवार, धारूरचे रामचंद्र निर्मळ, बिडच्या डॉ.ज्योती घुमरे, माजलगावच्या डॉ.संध्या मेंडके, जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख आणि इतर पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. तद्नंतर सर्वांसोबत गोपीनाथगड येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या समाधीवर नतमस्तक होऊन दर्शन घेतले व सर्वांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4India
#BJP #भाजपा #Beed #Gevrai #Majlgaao #Dharur #Ambajogai
📍कवडगाव ता. वडवणी.
सातारा जिल्ह्यातील फलटण उप जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डाॅ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची आज कवडगाव ता. वडवणी येथे जाऊन भेट घेतली व आई-वडिलांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. डाॅ संपदा यांचा मृत्यू अतिशय वेदनादायी आहे, मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, संपदाला न्याय मिळवून देऊ अशा शब्दांत परिवाराला धीर दिला. यावेळी सातारा चे जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना फोन करून डाॅ संपदा च्या मृत्यू प्रकरणाची निःपक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले.
तसेच मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची निःपक्ष आणि लवकरात लवकर चौकशी करून डॉ.संपदा ला आणि कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करणार आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघांचे आमदार , भाजपचे ज्येष्ठ नेते आ.शिवाजीराव कर्डीले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या परिवाराच्या भेटीसाठी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सोबत जाते आहे. कर्डीले कुटुंबाचे आणि माझे खूप खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचे जाणे हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे.
धनगर समाज बांधवांच्या मागण्यांसाठी गेल्या अकरा दिवसापासून जालना येथे उपोषण करणारे श्री दिपक बोऱ्हाडे यांच्या उपोषण स्थळी आज भेट देऊन त्यांच्या तब्येतीची तसेच मागण्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
धनगर समाजाच्या मागण्यांविषयी सरकार सकारात्मक असून संविधानाच्या चौकटीत बसवून त्या सोडवाव्या लागतील, त्यासाठी मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच मार्ग काढू असा शब्द त्यांना दिला. दरम्यान, यावेळी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बोऱ्हाडे यांच्याशी मोबाईल वर संवाद साधून धनगर आरक्षणाच्या विषयावर चर्चेअंती मार्ग काढू असं सांगून तसे लेखी पत्र देण्याचा शब्द दिला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. बबनराव लोणीकर, आ. नारायण कुचे, आ. अर्जुन खोतकर, आ. संतोष दानवे, आ. हिकमत उढाण आदी यावेळी उपस्थित होते.
#जालना
@Dev_Fadnavis@girishdmahajan@BabanraoLonikar@miarjunkhotkar@SantoshDanveBJP@mla_ntkuche
लोकमत वृतपत्र समुहाच्या वतीने आपल्या नेत्या, राज्याच्या पर्यावरण, पशूसंवर्धन तथा वातावरणीय बदल मंत्री ना. @Pankajamunde ताईसाहेब यांना लंडन येथे ’कोहिनुर ऑफ इंडिया' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मा. पंकजाताईंचे या गौरवासाठी मनःपूर्वक अभिनंदन!
‘सत्ता हे सेवेचे साधन' मानून समाजातील गरजू, वंचित आणि निराधारांची मदत करण्याचा वारसा आपल्याला लाभला आहे, सेवेच्या या ठेव्याला सार्थ ठरवत ना. पंकजाताई मुंडे यांनी राज्याच्या मंत्री म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार मिळणे त्यांच्या परिश्रम आणि कर्तृत्वाची साक्ष देणारा आहे.
आपण आपल्या कार्य, कर्तृत्व आणि नेतृत्व गुणांतून राज्याच्या विकासात बहुमूल्य योगदान दिले आहे, ही परिक्रमा यापुढेही निरंतर सुरु राहील आणि आपले नेतृत्व नित नवे आयाम स्थापित करत राहील या विश्वासासह आपले पुनःश्च अभिनंदन पंकजाताई!
#PankajaMunde #KohinoorOfIndia
"सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा!"
आज ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे ध्वजवंदन करण्याचा गौरव लाभला. या वेळी उपस्थितांशी संवाद साधून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
चला, आपल्या देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी नेहमीच कटिबद्ध राहूया.
जालना जिल्हातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक यांची भेट घेऊन संवाद साधला व त्यांचा सन्मान केला. तसेच राष्ट्रीय गुणवत्ता प्राप्त खेळाडू आणि क्रीडा श्रेत्रातील विविध पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
#IndependenceDay #स्वतंत्रता_दिवस_2025 #जालना #Jalna
आज नियोजित कार्यक्रमासाठी पाटोदा तालुक्याकडे जाताना पुत्रदा एकादशीच्या मंगलदिनाच्या औचित्याने राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे सावरगाव घाट येथे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी ग्रामस्थांनी अत्यंत आपुलकीने स्वागत केले, त्यांच्याशी संवादही साधला.
#संत_भगवान_बाबा#भगवानबाबा#सावरगावघाट
📍रामटेक, मुंबई.
आमचे जेष्ठ बंधू खासदार श्रीमंत छत्रपती श्री.उदयनराजे भोसले महाराज यांनी आज रामटेक या माझ्या शासकीय निवासस्थानी प्रथमच सदिच्छा भेट दिली.
यावेळी रामटेकवर महाराजांचे हृदयपूर्वक स्वागत केले. यानंतर मुंडे साहेब आणि महाराजांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत कौटुंबिक संवाद साधला.
याप्रसंगी आ.सीमाताई हिरे या देखील शिष्टमंडळा समवेत उपस्थित होत्या..
@Chh_Udayanraje@MlaSeemaHiray
मा. ना. पंकजाताई मुंडे यांचा दौरा कार्यक्रम.
(परळी वैजनाथ)
सोमवार 2 जून 2025
सकाळी 11.30 वा.
स्थळ - वैद्यनाथ मंदिर
महाराष्ट्र शासन पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागाच्या वतीने नो प्लास्टिक उपक्रम
@Pankajamunde