@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar समृद्धी महामार्गावर दोन तासांपासून टायर फुटल्याने हेल्प मागितली आहे. पण इथे दोन तासाने आलेल्या माणसाने आम्ही फक्त बॅरिकेटिंग लावणार बाकी आम्ही काहीच मदत करू शकत नाही असे म्हणत आहेत? मग कोण मदत करणार कळवा.
@CPMumbaiPolice@MumbaiPolice आपल्या वेबसाईटवर आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे जनतेसाठी मोबाईल क्रमांक दिले खरे, फक्त एकदा चेक करा, या क्रमांकावरील फोन अधिकारी उचलतात का? आणि उचलले तर वरिष्ठ पोलीस उपलब्ध असतात का ?
उगाच जनतेची फसवणूक कश्याला करीत आहात.?
या मार्गावर सर्वोदय ते साकीनाका दुतर्फा पार्किंग ने रस्ते जाम असतात, प्रत्येक गाडी ३००० रु हप्ता द्यावा लागतो असे चालक सांगतात. हे सर्व बंद करून हा रस्ता वाहतुकीसाठी रिकामा करणे ही कामे वाहतूक पोलिसानी करावी फक्त आता पुरती नाही कायमस्वरूपी असावी
@CPMumbaiPolice@DGPMaharashtra@MumbaiPolice@MTPHereToHelp
हा घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर असल्फा मेट्रो स्थानकाच्या खालील फोटो आहे. असे वीस पंचवीस पोलीस एकाच ठिकाणी उभे राहून कारवाया करणे, झुंडीने वाहनचालकांवर तुटून पडणे योग्य आहे का?
@Adani_Elec_Mum
गेले पाच सहा दिवस रोज रात्री घाटकोपर पश्चिम येथील पारशीवाडी, भटवाडी इत्यादी परिसरात रोज रात्री लाईट जाते आणि मध्य रात्री येते, दुपारी जाते संध्याकाळी येते,आपले डिपार्टमेंट करते काय? कस्टमर केयर ला एआय सिस्टम लावली आहे ती पुढे जातच नाही, ग्राहकांना मूर्ख समजता का?
@mybmc@mybmcWardN@AshwiniBhide
पालिका एन विभागाने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून उलट अर्ध्या रस्त्यावर बॅरिकेटिंग केले आहे, त्यांच्या कार्यालयासमोर…असे निर्णय घेणारे अधिकारी नक्की इंजिनियर आहेत का? याचा आढावा घ्यावा आणि याचे पैसे त्यांच्या पगारातून कापावे..
किती ही अडवा, षडयंत्र रचा….
आम्ही विषय तडीस नेणार…
आज हे रस्ता नामकरण रोखण्यासाठी पालिका अधिकारी, पोलीस आणि मुख्य म्हणजे निष्क्रिय लोकप्रतिनिधी यांनी खूप प्रयत्न केले…
पण नामकरण सोहळा पार पाडलाच…
घाटकोपर ची जनता आहे…@mybmcWardN@mybmc@CMOMaharashtra
घाटकोपर अंधेरी गटार रस्त्यावर आज पालिका आणि लोकप्रतिनिधींनी कसा चुना लावला हा व्हिडिओ नक्की बघा…आणि जास्तीत जास्त शेयर करून या अनोख्या आंदोलनात आपला सहभाग द्या…चला जनतेची ताकद दाखवू या…
@mybmc@mybmcWardN@AshwiniBhide@CMOMaharashtra
भारतातील सर्वात मोठा अस्वच्छ रस्ता नामकरण सोहळा
घाटकोपर अंधेरी ‘गटार रस्ता’नामकरण सोहळा
उद्घाटक : मुंबई मनपा प्रतिकात्मक अधिकारी
मुंबईचे चे प्रतीकात्मक लोकप्रतिनिधी
रविवार दि १२ एप्रिल २०२६
सकाळी ११.०० वाजता
@mybmc@mybmcWardN@CMOMaharashtra@AshwiniBhide@TawdeRitu
@MTPHereToHelp@MumbaiPolice@CPMumbaiPolice गेले अनेक महिने आम्ही या इतक्याश्या जागेच्या अयोग्य नियोजन मुळे वाहतूक कोंडीचा त्रासाला प्रचंड त्रस्त झालोय, वाहतूक पोलिसांकडून काही होणार नसेल तर आंदोलन हा एकमेव पर्याय सामन्य नागरिकांकडे आहे, जिव जाईल एखाद्याचा..तेव्हा जाग येईल का
@PratapSarnaik एसटी च्या बसेस रस्त्यात बंद पडली, इतर गाड्यात रिझर्व्हेशन चे प्रवासी कोंबून भरत आहेत , पर्यायी बस उपलब्धत नाही, लोणवल्यात प्रवासी थांबून आहेत , अधिकारी उद्दाम आहेत , चालक वाहक उत्तर देत नाहीये..एसटी चा प्रवास सुरक्षीत प्रवास ऐवज तापदायक झालाय…
@MumbaiPolice मुंबई मध्ये करण्यात येणाऱ्या मॉक ड्रिल या नागरिकांमध्ये पॅनिक तयार करतात, जसा पवई चा व्हिडिओ करतो आहे, यासाठी आपल्याला अश्या मॉक ड्रिल झाल्यावर तत्काळ त्याची माहिती मॉक ड्रिल होती म्हणून समोर यावेत ही विनंती…दोन दिवसांपासून पवईचा व्हिडिओ फिरतोय
@bankofbaroda अतिशय वाईट सेवा देणारी आपली बँक आहे. आज या शाखेत अतिशय वाईट अनुभव आला एकतर इथला स्टार उद्धट आहे, त्यांना ग्राहकांची गरज नाही.तुमचा आशिष नावाचा स्टाफ याला धड मराठी कळत नाही , सयाजीराव गायकवाडांनी सुरू केलेल्या या बँकेची अशी अवस्था वाईट आहे.