MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीने आयोगाची सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल झाली आहे.
जुने संशयित पेपर रद्द करून, सर्वोच्च सुरक्षिततेसह न्यायालयीन देखरेखीखाली नव्याने पेपर सेट करूनच आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात यावी!
@mpsc_office@CMOMaharashtra#MPSC#MPSCMain2026#Paper_leak
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपरच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार?
MPSC अध्यक्ष भीमनवार यांच्या म्हणण्यानुसार औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर परीक्षेच्या दोन महिने आधीच सेट झाला होता. मग ३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ चे पेपर नेमके कधी आणि कुणाच्या काळात सेट झाले, हा विद्यार्थ्यांचा रास्त सवाल आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ चे पेपर निलंबित अवर सचिव अभिजित लेंडवे यांच्या वादग्रस्त कार्यकाळात सेट झाले असण्याची दाट शक्यता आहे. मग या पेपरच्या सुरक्षिततेची हमी आयोग कशी देणार?
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर सीलबंद अवस्थेत परीक्षा केंद्रावर पोहोचला, तरीही पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. त्यानंतर निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे.
मग आगामी राज्यसेवा परीक्षेचे पेपर खरंच सुरक्षित आहेत का? विद्यार्थ्यांच्या मनातील ही शंका दूर करण्याची जबाबदारी आयोगाची आहे. घाईघाईने परीक्षा घेऊन हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याऐवजी संपूर्ण पारदर्शकता आवश्यक आहे.
जुने पेपर रद्द करा, न्यायालयीन देखरेखीखाली नव्याने पेपर सेट करा आणि त्यानंतरच राज्यसेवा मुख्य परीक्षा घ्या.
विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रयोग आता बस्स झाले!
#MPSC #StopPaperLeak
MPSC परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पुन्हा एकदा राज्यपाल महोदयांसमोर पत्राद्वारे ठेवल्या आहेत.
सातत्याने होणारी पेपरफुटी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास ह्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीला सरकारकडून विद्यार्थ्यांना फक्त खोटी आश्वासने मिळत आहेत!
@Dhananjay4INC पेपरफुटीची चौकशी सुरू असताना, आयोगातील 3 अधिकारी अटकेत असताना आणि आयोगाची विद्यमान यंत्रणा तशीच कार्यरत असताना, तसेच V. राधा सुधारणा समितीचे काम सुरू असताना राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्याची एवढी घाई का?
विद्यार्थ्यांच्या मनातील ही अस्वस्थता दुर्लक्षित करून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ घाईघाईने घेणे योग्य ठरणार नाही.
पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली चौकशी पूर्ण होण्यापूर्वी परीक्षा घेतली आणि पुन्हा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, तर त्याचा सर्वाधिक फटका प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना बसेल. त्याचबरोबर राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मधील गुणदान व उत्तरपत्रिका तपासणीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांवर आयोगाने स्पष्ट, पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या समाधानकारक भूमिका मांडणे आवश्यक आहे.
२०२६ ची परीक्षा घेण्यापूर्वी :
▪️ चौकशीचा निष्कर्ष स्पष्ट करावा
▪️ प्रश्नपत्रिका निर्मिती व सुरक्षिततेची नवी व्यवस्था जाहीर करावी
▪️ उत्तरपत्रिका तपासणीची पारदर्शक कार्यपद्धती स्पष्ट करावी
▪️ संपूर्ण परीक्षा प्रक्रिया संशयरहित असल्याचा विश्वास विद्यार्थ्यांना द्यावा.
परीक्षा काही दिवस उशिरा झाली तरी चालेल; पण विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष आणि भविष्य पुन्हा अनिश्चिततेत जाऊ नये. सरकार आणि MPSC यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा गांभीर्याने विचार करून स्पष्ट निर्णय जाहीर करावा.
@CMOMaharashtra@mpsc_office@bhimanwar@INCMaharashtra@INCMumbai
#MPSC #Rajyaseva2026 #RojgarNyay
आधी विद्यार्थ्यांच्या मागणीचं काय केलं ते सांगा आणि मगच भरती प्रक्रिया राबवा.
MPSC ही केवळ एक परीक्षा नाही; ती लाखो तरुणांच्या मेहनती, स्वप्नांची आणि भविष्याची आशा आहे. पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि भरती प्रक्रियेबाबत निर्माण झालेले प्रश्न विद्यार्थ्यांचा विश्वास ढासळवत आहेत. त्यामुळे पेपरफुटी व गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाने काय प्रतिबंधात्मक उपाय केले? विद्यार्थ्यांनी मांडलेल्या तक्रारी व आक्षेपांवर सरकारकडून काय कारवाई झाली? या गैरप्रकारांचा प्रशासकीय पातळीवरील जबाबदारी निश्चित करण्यासाठी काय पाऊल ऊचलण्यात आले ? आयोगावरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी सरकारने कोणता कृती आराखडा आखला आहे? याची उत्तरे आधी सरकारने द्यावित आणि मगच भरती प्रक्रिया राबवावी.
@CMOMaharashtra@mpsc_office
@satejp पेपरफुटीची चौकशी सुरू असताना, आयोगातील 3 अधिकारी अटकेत असताना आणि आयोगाची विद्यमान यंत्रणा तशीच कार्यरत असताना, तसेच V. राधा सुधारणा समितीचे काम सुरू असताना राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्याची एवढी घाई का?
हा आहे खरा विवेक मांडणारा म्हणून याचे म्हणणे ऐकून आनंद होतो व हा आपसूकच विवेकानंद होतो. MPSC करणाऱ्या मुलांचे प्रश्न समजून घेणे सरकारसाठी कठीण नाही. एका विवेकानंद पाटील ला मुख्यमंत्र्यांनी बोलवावे आणि तथ्यांवर काम करावे प्रश्न सुटतील. खालील भाषण ऐका @Dev_Fadnavis
https://t.co/W8vachvFpI
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे तडजोड अजिबात नाही!
पेपरफुटीची आधी चौकशी, राधा समितीनुसार कडक सुरक्षाव्यवस्था आणि नव्या प्रश्नपत्रिका तयार करा.
परीक्षा थोडी लांबली तरी चालेल, पण राज्यसेवा मुख्य २०२६ शंकेच्या वातावरणात नको, तर पूर्णपणे निष्पक्षच हवी!
#MPSCMain2026
@AsimSarode@Dev_Fadnavis पेपरफुटीची चौकशी सुरू असताना, आयोगातील 3 अधिकारी अटकेत असताना आणि आयोगाची विद्यमान यंत्रणा तशीच कार्यरत असताना, तसेच V. राधा सुधारणा समितीचे काम सुरू असताना राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्याची एवढी घाई का?
@Dev_Fadnavis@narendramodi पेपरफुटीची चौकशी सुरू असताना, आयोगातील 3 अधिकारी अटकेत असताना आणि आयोगाची विद्यमान यंत्रणा तशीच कार्यरत असताना, तसेच V. राधा सुधारणा समितीचे काम सुरू असताना राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्याची एवढी घाई का?
साहेब राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026... 3 ऑक्टोबर पासून सुरू होते आहे.... आमच्यावर अन्याय सुरू व्हायला फक्त सहा दिवस बाकी आहेत... या मुद्द्याला विशेष लक्ष द्यावे...
@vishwajeetkadam
@RahulAsks पेपरफुटीची चौकशी सुरू असताना, आयोगातील 3 अधिकारी अटकेत असताना आणि आयोगाची विद्यमान यंत्रणा तशीच कार्यरत असताना, तसेच V. राधा सुधारणा समितीचे काम सुरू असताना राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्याची एवढी घाई का?
गेल्या काही दिवसांपासून MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आणि त्यांच्या प्रश्नांमध्ये मी सातत्याने सहभागी आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या मनातील अस्वस्थता जवळून पाहतोय.
संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत सहभागी होण्यासाठी मोठ्या आशेने MPSC ची तयारी करत असतात. या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे.
परवा पुण्यात विद्यार्थ्यांचा मोर्चा झाला. त्या मोर्चामध्येसुद्धा मी सहभागी झालो. काल पुन्हा विद्यार्थ्यांनी माझी भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. याचा अर्थ स्पष्ट आहे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत.
सरकारने आता या विषयाकडे गांभीर्याने पाहून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. सरकारने एक पाऊल पुढे येत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधावा, ही आमची अपेक्षा आहे.
माझी भूमिका स्पष्ट आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारसोबत समन्वय साधण्याची आमची तयारी आहे. मात्र, संवाद आणि समन्वयातूनही प्रश्न सुटले नाहीत, तर वेळप्रसंगी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरची लढाई लढायलाही आम्ही तयार आहोत.
@mpsc_office@CMOMaharashtra
25 ऑगस्टच्या MPSC परिपत्रकात आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यात पेपरफुटी एकाच विद्यार्थ्यापुरती सीमित असल्याचं सांगण्यात आलं होतं.
जर ही माहिती खोटी निघाली असेल, तर दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई होणार का? न्याय हवाच!
@DGPMaharashtra#MPSC#ExamScam#DrugInspector#Mpscpaperleak
२०२६ ची परीक्षा आताच घेण्यात आली तर लेंडवे लाभार्थ्यांना त्याचा फायदा होणार ही शक्यता नाकारता येत नाही, आम्हाला परीक्षा ही पारदर्शक आणि विश्वासार्ह वातावरणात व्हावी ही माफक अपेक्षा आहे.
@rautsanjay61@NANA_PATOLE@vishwajeetkadam
We also need your voice plzzz sir