#MPSC पेपरफुटी प्रकरण हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असून या प्रकरणाच्या चौकशीकडे हजारो विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय. याबाबत मुंबईत CID कार्यालयाला भेट देऊन तपास अधिकारी मंगेश देसाई साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि या प्रकरणी तपासात झालेल्या प्रगतीची संपूर्ण माहिती घेतली. याप्रसंगी सलील जी देशमुख, मा. आ. मिलिंद अण्णा कांबळे, रविकांत वर्पे , युवकचे प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुशील बोर्डे, युवक शहराध्यक्ष प्रतिक नांदगावकर, प्रमोद पाटील यांच्यासह विद्यार्थी, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते!
#MPSC #पेपरफुटी #CID #विद्यार्थी #Paperleak
आज ड्रग इन्स्पेक्टर पेपर संदर्भात काही महत्त्वपूर्ण साक्षी पोलीस यंत्रणांकडे नोंदवल्या जाणार असून राज्यभरातील विद्यार्थ्यांचे त्याकडे लक्ष आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणी पारदर्शक तपास महत्त्वाचा आहे. चार दिवसांपूर्वी आयोगाची भेट घेतली असता विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासाठी लिंक जाहीर करण्याचा त्यांनी शब्द दिला होता, अद्यापही लिंक उपलब्ध केलेली नाही, या दिरंगाईचे कारण काय?
आज अत्यंत महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांकडे येणार आहेत, त्यामुळे आयोगाने आता तरी दिरंगाई न करता आजच्या आज FIR नोंद करून घ्यावा! प्रकरणाचे गांभीर्य पोलिसांनीदेखील विसरू नये!
#DrugInspectorExam #पेपरफुटी #MPSC #StudentsJustice #स्पर्धापरीक्षा #PaperLeak
भाग मिका भाग…? की सत्यापासून पळ?
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, चौकशीसाठी बोलावण्यात आलेले पाटील आणि एका परीक्षार्थी विद्यार्थ्याशी संपर्क होत नसल्याची माहिती समोर आली आहे. जर ही माहिती अचूक असेल, तर ती अनेक गंभीर प्रश्न निर्माण करते. चौकशी सुरू असताना संबंधितांनी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणे अपेक्षित आहे. सत्य काय आहे, हे निष्पक्ष चौकशीतूनच स्पष्ट होईल.
दुसरीकडे, Drug Inspector भरती प्रक्रियेतही गंभीर प्रश्न अनुत्तरित आहेत.
- चाळणी परीक्षा – 22 मार्च 2026
- निकाल – 12 जून 2026
- मुलाखती – 1 जुलै ते 17 जुलै 2026
- Provisional General Merit List जाहीर
एवढी प्रक्रिया पूर्ण होऊनही आजपर्यंत उमेदवारांची Individual Marksheet MPSC प्रोफाइलवर उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, MPSC गट-ब पूर्व परीक्षा (14 जून 2026) चा निकाल लागल्यानंतर उमेदवारांचे वैयक्तिक गुण त्यांच्या प्रोफाइलवर उपलब्ध झाले. मग Drug Inspector भरतीत वेगळा निकष का?
हजारो उमेदवारांच्या मनात आता एकच प्रश्न आहे—भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे का?
आमच्या मागण्या स्पष्ट आहेत :
- चौकशी पूर्ण होईपर्यंत Drug - Inspector भरतीचा अंतिम निकाल जाहीर करू नये.
- सर्व उमेदवारांची Individual Marksheet तातडीने MPSC प्रोफाइलवर उपलब्ध करून द्यावी.
- संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे.
आमचा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही; तो हजारो प्रामाणिक उमेदवारांच्या न्यायासाठी, पारदर्शकतेसाठी आणि विश्वासासाठी आहे.
#MPSC #DrugInspector #Transparency #IndividualMarksheet #JusticeForCandidates #FairInvestigation
MPSC FDA Paper Leak Mahebub Shaikh: तीन विद्यार्थ्यांची उदाहरणे
1) पायल लांडे
FDA Chemical Analyst – 72 गुण | Rank 10210
Drugs Inspector – Rank 31
2) ऋतुजा अमृत पाटील
DMER Pharmacist Group C – 94 गुण | Rank 21222
Drugs Inspector – 155 गुण | Rank 7
3) सागर रामलिंग थिटे
DMER Pharmacist Group C – 94 गुण | Rank 21160
Drugs Inspector – 150 गुण | Rank 14
यातील पायल लांडे यांचे पती फोटो मधे आहेत का ?
औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीसंदर्भात बनावट तक्रार असल्याचे जे पत्र आयोगातील ‘सूत्राच्या’ हवाल्याने सध्या व्हायरल केलं जात आहे, ते आयोगाच्या ‘सुत्रांनी’ व्यवस्थित वाचलेलं दिसत नाही किंवा ज्यांनी लिहून घेतलं त्यांचा अभ्यास फारच कच्चा दिसतो….
१) “आयोगाचा पेपर असल्याचे चेष्टेने म्हटलं’’, याचा अर्थ स्क्रीनशॉट खरे आहेत. आयोगाकडे / FDA कडे चेष्टेत कुणी तक्रार करतं का?
२) “तपास केल्यानंतर पेपर #MPSC चा नसल्याचे निदर्शनास आले,’’ चेष्टेत सांगितले होते तर तपास का केला?
३)‘‘ती प्रश्नपत्रिका इतर टेस्ट सिरीजची होती,”याचा अर्थ व्हॉट्सअप प्रश्नपत्रिका आली होती आणि टेस्ट सिरीजचे ९० प्रश्न जसेच्या तसे आले असतील तर आता ही टेस्ट सिरीज कोणती?
४) “२२ मार्च २०२६ रोजी परीक्षा झाल्यानंतर सदर प्रश्न टाइप करून २० मार्च २०२६ रोजी पाठवले होते’’, याचा अर्थ काय?
५) आधीचे नाव / सही आणि आताच्या पत्रातील नाव / सही वेगळी कशी?
दबाव टाकून धमकावून विद्यार्थ्यांकडून लिहून घेतलं पण सत्य हे कधीच झाकत नाही आणि ते झाकण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याच्याकडून अनेक चुका होऊन तो आणखी उघडा पडतो, असंच काहीसं औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला नसल्याच्या खुलाशाबाबत झालं आहे...तरुणाई हुशार आहे, कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, सत्य तर समोर आणूच..!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#औषध_निरीक्षक_पेपरफुटी #MPSC #PaperLeak #StudentsDemandJustice #विद्यार्थ्यांना_न्याय_द्या
नंदुरबार मधील कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील याच्याकडे पेपर सेट करण्याची जवाबदारी सोपवण्यात आली होती व त्याच्याकडूनच MPSC च्या औषध निरीक्षकाचा पेपर एक दिवस अगोदर फोडण्यात आला.
प्रश्नपत्रिकेतील 90% प्रश्न हे त्याच्या अकॅडमी मधून अगोदरच देण्यात आले होते.
तो कश्याप्रकारे फोडण्यात आला ते पहा 👇👇
#RohitPawar
#PravinPatil
#MPSC
औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्यासंदर्भात MPSC चे सचिव यांची स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसोबत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि या पेपरफुटीच्या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष तसेच फॉरेन्सिक तपासणी कालबद्ध मर्यादेत करण्याची आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत या भरती प्रक्रियेतील नियुक्त्यांना स्थगिती देण्याची मागणी केली.
यासंदर्भात पोलिसांच्या माध्यमातून चौकशी करण्याचं, तसंच विद्यार्थ्यांना त्यांची तक्रार नोंदविण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. अपेक्षा आहे की, दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ही चौकशी होईल, जेणेकरून कोणत्याही प्रामाणिक विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही. पारदर्शक चौकशी वेळेत न केल्यास मात्र विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही.
@mpsc_office
#औषध_निरीक्षक #MPSC #पेपरफुटी
MPSC च्या ड्रग इन्स्पेक्टर भरतीचा पेपर परीक्षेआधीच सोशल मीडियावर फुटल्याचे पुरावे फिरत आहेत! एकीकडे नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला, तरी महाराष्ट्रातल्या महायुती सरकारला जाग येत नाहीये. यांनी राज्याच्या शिक्षण व्यवस्थेची,परीक्षांची पार वाट लावून टाकलीये.
हा विद्यार्थ्यांचा विश्वासघात आहे! वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या पोरांच्या स्वप्नांचा रोज कचरा करायचा आणि भ्रष्ट दलालांचे खिसे भरायचे, हाच तुमचा धंदा उरलाय का? ड्रग इन्स्पेक्टर बनण्याआधीच या संपूर्ण सिस्टीममध्ये भ्रष्टाचाराचा भुसा भरला गेलाय!
महायुती सरकारला फक्त विरोधकांचे पक्ष फोडायला आणि खोके गोळा करायला जमते, पोरांचे पेपर फुटताना मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसतात!
या पेपर फुटीची उच्चस्तरीय चौकशी करून त्या दलालांना आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या राजकीय शक्तीवर कारवाई करा! महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भविष्याशी असा खेळ थांबवा.
#MPSC #paperleak #FDA
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुमच्या कारकिर्दीत अपयशाचा उच्चांक गाठतोय.
कमिशनखोरी थांबवा आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याकडे लक्ष द्या !
महाराष्ट्राचं भविष्य उज्वल असावं असं तुम्हाला वाटत असेल तर, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करा किंवा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा तरी द्या !
MPSC औषध निरीक्षक परीक्षेबाबत समोर येत असलेल्या बातम्या अत्यंत गंभीर आहेत. सरकारने तातडीने स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी जाहीर करावी.
जर पेपरफुटी सिद्ध झाली, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत करणाऱ्या कोणालाही अभय मिळता कामा नये.
MPSC ची विश्वासार्हता वाचवणे आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थ्याला न्याय मिळवून देणे हीच आजची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
@bhimanwar@mpsc_office #JusticeForStudents
Hon’ble PM @narendramodi Ji, thousands of hardworking pharmacy graduates in Maharashtra are facing severe injustice due to the paper leak in the MPSC Drug Inspector Exam (22 March).
65–70 questions matched a leaked set circulated 2 days prior to the exam.
MPSC औषध निरीक्षक परीक्षा हा केवळ एका पेपरचा प्रश्न नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे..!
आज MPSC औषध निरीक्षक परीक्षेबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. परीक्षेपूर्वी काही उमेदवारांकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा प्रकार समोर येत आहे. जर हे सत्य असेल, तर हा केवळ पेपरफुटीचा विषय नाही, तर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाला हादरा देणारा प्रकार आहे.
एका प्रश्नपत्रिकेची किंमत काही पानांची नसते. तिच्यामागे हजारो विद्यार्थ्यांची अनेक वर्षांची मेहनत, पालकांचे कष्ट, त्याग आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने असतात. काही मोजक्या लोकांच्या गैरप्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
आमचा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही. आमचा लढा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि MPSC वरील जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी आहे.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी झालीच पाहिजे. आमच्याकडे उपलब्ध असलेली माहिती आणि पुरावे संबंधित यंत्रणेकडे सादर करण्यास आम्ही तयार आहोत. दोषी कोणताही असो, त्याला कोणतेही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण न देता कठोर कारवाई झाली पाहिजे.
विद्यार्थी कोणतीही सहानुभूती मागत नाहीत ते फक्त त्यांच्या कष्टाचा न्याय मागत आहेत.
MPSC वरील विश्वास टिकवायचा असेल, तर सत्य बाहेर आलेच पाहिजे. सर्व. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे..!
#MPSC #DrugInspector #JusticeForStudents #FairExamination #PaperLeak
MPSC पेपर फुटीची जबाबदारी कोणाची?
MPSC अध्यक्ष व सचिव राजीनामा देणार का?
MPSC मार्फत घेण्यात आलेला "औषध निरीक्षक" / Drug Inspector पदाचा पेपर फुटला या बातम्या समोर येत आहेत, एक तर MPSC चा पेपर बाहेरील व्यक्ती फोडूच शकत नाही पण हा पेपर फुटला कसा? MPSC सचिव एकदा म्हणतात अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करू आणि पुन्हा म्हणतात चौकशी करू.
मागील वीस वर्षात कधीच MPSC चा पेपर फुटला नाही मग तो आत्ताच कसा फुटला? वेळोवेळी MPSC ऑफलाईन पेपर ची पारदर्शकता दाखवून ऑनलाइन परीक्षेला विरोध केला म्हणून हे तर सिद्ध करायचं नाही ना की MPSC चाही पेपर फुटतो म्हणून आम्ही ऑनलाईन कडे वळलो.
MPSC चा पेपर फुटला हे जर सिद्ध झाले तर मात्र MPSC सचिव व MPSC अध्यक्ष यांना राजीनामा द्यावाच लागेल.
मागील वीस वर्षात कधीच पेपर फुटला नाही मात्र हा पेपर जर फुटला असेल तर विद्यमान अध्यक्ष व सचिव यांच्या कृपेनेच हा पेपर फुटला असावा ही शंका नाकारता येणार नाही.
@Dev_Fadnavis साहेब, @maha_governor साहेब जर हा पेपर फुटला असेल तर आपण यांना पाठीशी घालू नये. MPSC अध्यक्ष व सचिव यांना हटवून MPSC ऑनलाईन चा घाट बंद करा आणि पारदर्शकपणे परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यासाठी लायक अध्यक्ष व सचिव निवडा.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@RRPSpeaks@RealBacchuKadu@satejp@AbhiPawarBJP@DrSEShinde@uddhavthackeray@abpmajhatv@TV9Marathi@ibn_lokmat@SakalMediaNews@abhijeet_dipke@mpsc_office
औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी आणि MPSC संदर्भात सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत धक्कादायक माहिती देण्यात येईल….
स्थळ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय, मुंबई.
22 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात उद्या (सोमवार, 27 जुलै 2026) मुंबई येथे सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे.
स्थळ - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) पक्ष कार्यालय, मुंबई
वेळ : सकाळी 11 वाजता