राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री मा. कु.@iAditiTatkare यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उदंड व आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
#happybday#adititatkare#poonamvishalvidhate
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील.
@SunetraA_Pawar
महाळुंगे येथे भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. शंकरभाऊ मांडेकर यांच्या स्वखर्चातून तब्बल ₹1.50 कोटींच्या निधीतून महाळुंगे–नांदे रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या शुभहस्ते संपन्न झाले…!
जनसेवा, जनहित आणि जनकार्याची भावना सदैव जपणं हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कायम भूमिका राहिली आहे. याच भावनेतून आयोजित जिल्हानिहाय आढावा बैठकीत पुणे जिल्ह्यातील पुणे ग्रामीण, पुणे शहर व पिंपरी चिंचवडमधील पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्ट���कोनातून सर्वसामान्य नागरिकांना स्थानिक पातळीवर सतावणाऱ्या समस्या व प्रलंबित प्रश्न तसंच जनसंपर्कातून त्यावरील उपाययोजना आणि त्या माध्यमातून नवीन लोकांना पक्षाशी जोडणं, पक्ष संघटन आणखी बळकट करणं यावर विचारविनिमय झाला. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक त्या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण सूचना केल्या, मार्गदर्शन केलं.
📍मुंबई
@mahancpspeaks
चिंचवडकरांचे प्रश्न आता जलद मार्गी लागणार.. उद्या १५ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार चिंचवडकरांची थेट भेट घेणार.. त्यांचे अडलेले प्��श्न सोडवणार..!
चिंचवडकरांनो, तुमच्या मदतीला दूरध्वनी क्र. ७८८८५��६९०४ आहेच.. यावर कॉल करा आणि आपल्या अडचणी सांगा, तोडगा निघेल नक्की..!
#जनसंवाद
आज पुण्यातील पाषाण-सोमेश्वरवाडी-सुतारवाडी परिसरातील विविध विकासकामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला. यामध्ये संत तुकाराम माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन, पिण्याच्या पाण्याच्या दोन टाक्यांचं उद्घाटन आणि पाषाण वैकुंठ स्मशानभूमीचं लोकार्पण (APC प्रणाली व गॅस दाहिनी) आदींचा समावेश आहे.
श्रीगणरायांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर या भागात अनेक विकासकामं सुरू झाली आहेत. पुणे शहर वेगानं विस्तारत असून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन मूलभूत सोयीसुविधा पुरवणं हीच खरी लोकसेवा आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या टाळण्यासाठी दोन मोठ्या टाक्यांची सोय करण्यात आली आहे. आमच्या भगिनी- मायमाऊलींना टँकरसाठी दगदग करावी लागू नये, याकरिता आम्ही प्रयत्नशील आहो���.
पाषाण-सोमेश्वरवाडी-सुतारवाडी परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी संत तुकाराम विद्यालयाची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. 'जेवढं ज्ञान संपादन कराल, तेवढं मोठं होता येतं ”' हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना दिला.
विकासकामं करताना पर्यावरणाचा समतोल राखणं तितकंच महत्त्वाचं आहे. राम नदीचं पुनर्जीवन व परिसराचा नैसर्गिक वारसा जपणं यासाठी ��म्ही प्रयत्नशील आहोत. अतिक्रमण नष्ट करून पर्यावरणपूरक विकास साधला जाईल. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर आमचा भर आहे. शहरातील रस्ते रुंद करण्याची कामं, पाणीपुरवठा, स्मशानभूमी सुविधा यांसह सर्व क्षेत्रांतील विकासकामांना निधीची कमतरता भासू देणार नाही, असा शब्द कार्यक्रमाच्या निमित्तानं दिला.
या सर्व कामांमुळे पाषाण-सोमेश्वरवाडी-सुतारवाडी परिसर अधिक सुज��ाम-सुफलाम व सुसंस्कृत होईल. सौ. सुषमा निम्हण आणि प्रा. श्री. प्रमोद निम्हण यांनी सेवेतून विकासाचा वसा पुढे चालवला आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देतो.
भोर-राजगड-मुळशी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त, प्रकृती अभियानांतर्गत म्हाळुंगे टेकडी (पुणे) येथे वृक्षारोपण तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेत, प्रेमाने वृक्षारोपण करून हरित शुभेच्छा ��िल्या
#poonamvishalvidhate #baner
९ ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिन. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून ब्रिटीश राजवटीला नेस्तनाबूत करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘चले जाव, भारत छोडो’ अशी हाक देणाऱ्या क्रांतिवीरांना विनम्र अभिवादन!
#AugustKrantiDin
माझ्या सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रूपालीताई चाकणकर यांनी शुभेच्छा दिल्या. ही प्रेरणा मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. ताई��च्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार!
#रूपालीताईचाकणकर #महिला_आयोग #PoonamVishalVidhate
बाणेर📍
बाणेर, बा��ेवाडी, सुस आणि महाळुंगे परिसरातील सर्व महिलांसाठी वामा वुमन्स क्लबच्या वतीने भव्य मंगळागौर स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवत महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. झिम्मा, फुगडी, गीतं, पारंपरिक खेळ आणि नृत्याच्या सादरीकरणातून आपल्या परंपरेची उजळणी झाली व वातावरण आनंदमय झाले.
या कार्यक्रमासाठी वामा वुमन्स क्लबच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी महि���ा काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या कार्याध्यक्ष सौ. पूनम विशाल विधाते यांनी खास निमंत्रण देऊन महिलांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम एकत्रित आनंद, मैत्रीभाव आणि नारीशक्तीचा सुंदर संगम ठरला.