माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील राजहंस चौक ते आंबेडकर चौक हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून येथून वाहने भरधाव वेगाने जातात. या रस्त्यावरून विद्यार्थी, कामगार तसेच स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात पायी ये-जा करतात. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत असून ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या मार्गावरील वाढती वर्दळ लक्षात घेता बारामती-नीरा रस्ता, माळेगावहून साखर कारखान्याकडे जाणारा मार्ग तसेच पॉलिटेक्निक कॉलेज परिसरात तातडीने स्पीड ब्रेकर बसविणे अत्यंत आवश्यक आहे.
माझी सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात.
@Shivendraraje11
@cbawankule सामान्य नागरिकांना इतका विलंब सहन करावा लागणे योग्य नाही. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन प्रलंबित मोजणीची कार्यवाही लवकर पूर्ण करावी, ही नम्र विनंती
माळेगाव येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनात एक भावूक दृश्य पाहायला मिळालं. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी होणाऱ्या भाषणाकडे माणसांसोबतच झाडावर बसलेली एक खारुताईही जणू लक्ष देऊन ऐकत होती. शेतकऱ्यांचा आवाज इतका प्रामाणिक होता की तो निसर्गालाही स्पर्शून गेला
@supriya_sule करोडोंची दौलत असूनही पाय जमिनीवर कसे ठेवावे, हे शिकवणारा जगातला एकमेव उद्योजक हरपला! उद्योजकांमध्ये पैशांच्या व्यतिरिक्त माणुसकीही असते, हे सांगणारा सर्वश्रेष्ठ उद्योजक...
करोडोंची दौलत असूनही पाय जमिनीवर कसे ठेवावे, हे शिकवणारा जगातला एकमेव उद्योजक हरपला! उद्योजकांमध्ये पैशांच्या व्यतिरिक्त माणुसकीही असते, हे सांगणारा सर्वश्रेष्ठ उद्योजक...
@RNTata2000
यांना भावपूर्ण श्रद्धांजली