यापुढच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याच्या #MPSC ने काढलेल्या परिपत्रकाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करुन हा निर्णय तातडीने मागे घेऊन या परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत सरकारने प्रयत्न करण्याची मागणी केली. तसंच नॉर्मलायझेशनचा मुद्दाही उपस्थित करुन विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ही पद्धत हटवण्याची मागणी केली. सरकारने #MPSC च्या माध्यमातून हा निर्णय बदलला नाही तर विद्यार्थ्यांचं अधिक मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी दिला.
#पावसाळी_अधिवेशन_२०२६
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४
आमची सरकारला आणि आयोगाला नम्र विनंती आहे की,
विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ नोटीफिकेशनच्या दिवसापासून कमीत कमी ४५ दिवस पुढे ढकला.
Combine परीक्षेसाठी सर्व संवर्गाच्या जागा सरकारने आयोगाला पाठवाव्या आणि जाहिरातीत जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत.
हे सर्व निर्णय तातडीने घ्या नाहीतर आम्ही पक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरू.
#MPSC
#Postpone_MPSC_Mains_2024
#Last_Objective_Exam
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
मा.@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा खेळखंडोबा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक,तहसीलदार,मुख्याधिकारी
होण्याचा अधिकार नाही काय?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केले.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D
व इतर category साठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट- ब व गट -क जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे चक्क 9 महिने जाहिरात
उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले.परिणामी त्यांना परीक्षेचा form भरता येत नाही.
@Dev_Fadnavis महोदय ,
ह्या age bar candidates च काय करणार आहात ? त्यांच्या नुकसानीस
फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून
काय साध्य केले ?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 209 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क
शून्य जागा ????
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात
हरवल्या की काय ????
👉 1000 रुपये फीस च्या नावाखाली लुटले,form भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
माहित होते ना आचारसंहिता लागणार आहे.
मग ह्यांचा विचार का केला नाही ?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर नाहीत.
👉ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांना नियुक्त्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासनांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही ?
👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय
काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता,आहे व असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
मा. @mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा महाघोटाळा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी होण्याचा अधिकार नाही का?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केली.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D व इतर प्रवर्गासाठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट - ब व गट - क साठी जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले. परिणामी त्यांना परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही.
@Dev_Fadnavis महोदय,
ह्या वय उलटून गेलेल्या उमेदवारांचं काय करणार आहात? त्यांच्या नुकसानाला फक्त आणि फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून काय साध्य केले?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 206 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क शून्य जागा???
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात कुठे हरवल्या आहेत???
👉 1000 रुपये फीच्या नावाखाली लुटले, अर्ज भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
आचारसंहिता लागणार आहे माहित असतानाही या गोष्टी का विचारात घेतल्या नाहीत?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.
👉 ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही?
👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता, आहे आणि असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
आदरणीय साहेब,
आपण नेहमीच युवांसाठी प्रेरणास्रोत आहात, स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत युवांना न्याय देण्यासाठी आपण करत असलेल्या पाठपुराव्याबद्दल स्पर्धा परीक्षार्थी युवांच्या वतीने आपले आभार…!
#MPSC
राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काही दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी केली.
मा. अजित पवारजी
अर्थ खात्याच्या अखत्यारीतील
लेखा व कोषागार विभागात रिक्त असलेल्या ६१७ जागांच्या भरतीची जाहिरात आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन लाखो उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती!
@AjitPawarSpeaks
2 वर्षात लिपिक पदाच्या 12k जागा भरणार हे जाहीर केलेल आहे 23 मध्ये 7K जागा आल्या परंतु 24साठी अजून 5k जागा आयोगाकडे आलेल्या नाहीत.तसेच PSI सुधारित मागणीपत्र सुद्धा आयोगकडे नाही.
जलसंपदा आणि मुद्रांक च मागणीपत्र आलाच पाहिजे.
#परिपूर्णCOMBINEजाहिरात2024@MahaDGIPR@CMOMaharashtra
#राज्यसेवा, #कृषीच्या जागा, #combine परीक्षा घेणे तसेच जागावाढ यासंदर्भात आयोगाच्या स्तरावर हालचाली सुरू असल्या तरी पुढील महिन्यात आचारसंहिता केंव्हाही घोषित होण्याची शक्यता असल्याने यासंदर्भात त्वरित निर्णय होणे अपेक्षित आहे.
#combine संदर्भात शासनाने रिक्त जागांचे मागणीपत्रक न पाठवल्याने जाहिरात प्रसिद्ध होऊ शकत नाही, शासनाने रिक्त जागांचे मागणीपत्रक आयोगाला पाठवणे गरजेचे असताना शासन मात्र दुर्लक्ष करत आहे.
यासंदर्भात शासन आणि आयोगाने समन्वय साधून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा पुन्हा एकदा ......, याची सरकारने गंभीर दखल घ्यावी, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
#MaharashtraGovernment | #MPSC |
शासनाला प्रत्येक गोष्ट उमेदवाराने बोलल्या नंतर करायच अस ठरल आहे का?
लेखा कोषागार भरती नेमकी कुठं अडली का कोणी अडवली?याच उत्तर काही मिळत नाही या महिन्यात लेखा कोषागार जाहिरात प्रसिद्ध झाली च पाहिजे हे शासनाने लक्ष्यात ठेवावे.
#लेखाकोषागारजाहिरात@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
शिक्षकांचा वनवास कधी संपेल...
राज्यात नुकतीच शिक्षक भरती झाली असली तरी नवनियुक्त शिक्षकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिक्षणसेवक पद रद्द करण्याच्या त्यांच्या मागणीकडे सरकार सपशेल दुर्लक्ष करत आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांना 16 हजार मानधनावर काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर काही जिल्ह्यात सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्याचे वेतनच शिक्षकांना दिले नाही. यासह अन्य शासकीय कामे दिल्याने जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता कशी वाढणार हाही प्रश्न अनुत्तरित आहे. काही ठिकाणी तर अजूनही उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. तर टप्पा 2 शिक्षक भरती करण्याचे सरकार नावच घेत नाहीये. त्यामुळे शिक्षकांचा वनवास कधी संपेल असा प्रश्न अनेक शिक्षक फोन तथा प्रत्यक्ष भेटी घेत विचारत आहे. भावी पिढी घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना तरी सरकारने असे झुलवत ठेवू नये ही माफक अपेक्षा!
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द
सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार
सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील
विविध स्तरांवरुन आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय
#MyBMCUpdates
BMC लिपिक भरती २०२४
बृहन्मुंबई महानगरपालिक
जनसंपर्क विभाग
_वार्तापत्र / दिनांक १० सप्टेंबर २०२४_
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द
सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणर
*सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील*
*विविध स्तरांवरुन आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय*
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या भरतीसाठी 'माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण’ ही शैक्षणिक अर्हता लागू होती. तथापि, त्यातील 'प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध स्तरांवरुन करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 'प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर, सदर शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरु करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करुन, ‘कार्यकारी सहायक’ पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध होवून येत्या पंधरा दिवसांच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरु केली जाणार आहे. विशेष म्हणजे, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या जागांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यास प्रारंभ करण्यात आला होता. तर दिनांक ९ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती.
दरम्यान, या पदासाठी निश्चित केलेल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये -
‘‘उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा'
आणि
'उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा'
या शैक्षणिक अर्हतेतील 'प्रथम प्रयत्नात’ ही अट काढून टाकण्यात यावी, अशी सूचना व मागणी विविध स्तरांवरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्या सर्वांचा विचार करुन सदर अर्हतेतील 'प्रथम प्रयत्नात’ ही अट काढून टाकावी तसेच शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर हाती घ्यावी, सुधारित अर्हतेसह पद भरतीची प्रक्रिया नव्याने राबवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.
या निर्देशानुसार, महानगरपालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. शैक्षणिक अर्हतेची अट सुधारित करुन त्यास मान्यता प्राप्त करणे, सुधारित अर्हता समाविष्ट करुन त्यानुसार पद भरतीची जाहिरात नव्याने प्रसिद्ध करणे, तसेच सुधारित अर्हतेनुसार पद भरतीच्या ऑनलाईन प्रक्रियेत देखील उचित तांत्रिक बदल करणे, ही सर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कार्यवाही येत्या पंधरा दिवसांच्या आत पूर्ण करुन पद भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येईल.
असे असले तरी, या सर्व बदलांमुळे आतापर्यंतच्या भरती प्रक्रियेत अर्ज केलेल्या उमेदवारांनी साशंकता बाळगण्याची आवश्यकता नाही. नव्याने सुरु होणाऱया कार्यकारी सहायक पद भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची देखील आवश्यकता नाही. कारण त्यांचे अर्ज पद भरतीच्या नवीन प्रक्रियेमध्ये देखील ग्राह्य धरले जातील, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.
***
(जसंवि/३४७)
#BMC लिपिक भरती २०२४ : अत्यंत महत्त्वाचे अपडेट.
बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त मा. भूषण गगराणी जी व सहकाऱ्यांशी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी परिपत्रक निघावे यासाठी सकाळपासून पाठपुरावा सुरु आहे.
महानगर पालिकेने दहावी व पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होण्याबाबतची अट रद्द करण्याची मागणी मान्य केली आहे. अर्ज करण्यासाठी १० दिवसांची वेळ वाढवून मिळणार आहे. याबाबत परिपत्रक आज संध्याकाळ पर्यंत येणे अपेक्षीत आहे.
या यशस्वी लढाईत खंबीरपणे साथ देऊन अत्यंत सक्रियपणे सहभागी झाल्याबद्दल मा. आदित्य ठाकरे जी, मा. प्रीती शर्मा मेनन ताई, मा. अंजली दमानिया ताई, सर्व विद्यार्थी, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते + पदाधिकारी, सर्व सामाजिक व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी आणि समर्थक या सर्वांचे सामूहिक प्रयत्न करून मिळालेल्या ऐतिहासिक यशासाठी हार्दिक अभिनंदन 💐
लढे है, जिते है !!! 🇮🇳
@mybmc@AUThackeray@PreetiSMenon@anjali_damania@RealBacchuKadu@AAPMumbai@AAPMaharashtra
#BMC_लिपिक_भरती #BMC #DhananjayShinde