हा पुण्याचा अर्णव पापारकर. 17-18 वर्षांचा हा पोरगा विम्बल्डनच्या ज्युनियर चॅम्पियनशीप स्पर्धेत सेमीफायनल पर्यंत पोहोचला. तब्बल 36 वर्षांनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला. 1990 मध्ये लिअँडर पेसने अशी कामगिरी केली होती. #arnavpaparkar#tennis#wimbeldon#pune
#BisonKaalamadan या तामिळ चित्रपटातला हा एक ताकदीचा प्रसंग. लहानपणापासून जातीयवादाचे चटके, मार खाऊन एका खेड्यातला मुलगा आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू बनतो. आपल्या कर्तृत्वाने, अपार कष्टाने तो स्वतःला घडवतो.
भारत सरकार त्याला अर्जुन पुरस्कार प्रदान करते. तो मुलगा आपल्या बाबांच्या हाती अर्जुन पुरस्कार ठेवतो. पाठीमागे कायदेतज्ज्ञ, घटनाकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तसबीर आहे. चित्रपटाची ही एक फ्रेम एक वास्तव सांगून जाते. शिका-संघटीत व्हा- संघर्ष करा.