@OPPOIndia what is this?
My Oppo Reno 14 suddenly showing ads in 'My Flies'. Why to show ads in such premium phone when there were no ads in files before this?
Will this lead to more ads in system apps?
Highly disappointed!
@GyanTherapy@Dhananjay_Tech
चिंचपोकळीचा चिंतामणी. या मंडळाने अदानीकडून पैसे घेतले म्हणून लोकं उगाच त्यांना नावं ठेवत आहेत.
फार पूर्वीपासूनच स्थानिक नेते आणि परिसरातील गुजर-मारवाडी दुकानदार यांच्या उपकारावर दक्षिण मुंबईतील बहुतांश गणपती मंडळ चालत आले आहेत.
हा 'प्रोटेक्शन मणी' चा भाग असतो. तुम्ही आम्हाला धंदा करू द्या, आम्ही तुम्हाला सण साजरा करायला रसद पुरवतो. तुम्ही आमच्या धंद्यात उतरायचं नाही, आम्ही तुमच्या सणात अडथळे आणणार नाही. इतकं साधं गणित यामागे असतं.
मराठी लोकांनी दिलेल्या २०१, २५१ आणि ५०१ रुपयांच्या वर्गणीवर मंडळ चालत नाही. मंडळ चालवण्यासाठी, एखादा सण भव्यदिव्य करण्यासाठी काहीएक तडजोड करावी लागते. यामध्ये नवीन काही नाही. आपल्या मराठमोळ्या बाप्पाला धंदेवाल्यांचा आशीर्वाद लागतो. लालबागवाल्यांना अंबानीचा आशीर्वाद मिळाला, तर चिंचपोकळीवाल्यांना अदानीचा.
आता सुद्धा अनेक मंडळ धडपडत आहेत. लोढा, गोदरेज, ओबेरॉय या मुंबईत स्थित बिल्डरांच्या गेट बाहेर "जाहिरात पार्टनर व्��ा", म्हणून विनवण्या करत उभे आहेत. कदाचित पुढच्यावर्षी त्यांच्या बाप्पाला बिल्डर पावेल.
कारण जाहिराती शिवाय बाप्पा लोकप्रिय होत नाही आणि लोकप्रिय बाप्पा जाहिराती शिवाय किती काळ 'लोकप्रिय' राहील याची शाश्वती नाही.
भारतात आंदोलन पहिल्यांदा होतंय अशातला भाग नाही, यापेक्षा प्रचंड मोठी मोठी आंदोलने झाली आहेत, सत्ताधाऱ्यांनी गोळीबार केलेले आहेत. भाजप-काँग्रेस दोघांचे हात रक्ताने माखलेले आहेत. त्यामुळे दिल्लीत कोणत्या काँग्रेस नेत्याला अ��क झाली, फरफटत नेले याबद्दल आम्हाला तसूभर पण सहानुभूती नाही.
संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या लढ्यात १०८ हुतात्म्यांची हत्या केलेल्या काँग्रेसने आजपर्यंत महाराष्ट्राची माफी मागितलेली नाही. अंधभक्त फक्त भाजप मध्ये नसून काँग्रेस मध्ये पण प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत जे सत्ता नसल्यामुळे दिसून येत नाहीत.
सांगण एवढंच आहे की मराठी माणसाने गाफील राहू नये, भाजपला पर्याय काँग्रेस आणि काँग्रेसला पर्याय भाजप या दिल्लीच्या विळख्यात अडकू नका. उद्या समजा काँग्रेसची सत्ता आली तर आज तुम्ही ज्यांना शिव्या घालताय तेच लोक उद्या काँग्रेस मध्ये दिसतील आणि हीच दिल्लीची व्यवस्था आहे आणि त्यांना घ्यावच लागत, तत्वांची मांडणी फक्त विरोधी पक्षात केली जाते, सत्ताधारी पक्षात नाही.
काल काँग्रेसच्या दरवाजाने महाराष्ट्रात शिरलेले परप्रांतीय आज मराठीद्वेषी भाजपच्या जोरावर महाराष्ट्रात पाय पसरत आहेत, उद्या भाजप पायउतार झाल्यावर हेच परप्��ांतीय भैय्ये काँग्रेसच्या आश्रयाला जातील तेव्हा फक्त सूर बदलेल "आपण सगळे भारतीय आहोत, सर्वधर्म समभाव आहोत" मराठीचा हट्ट योग्य नाही वगैरे वगैरे जे आधी काँग्रेसने केलं देखील आहे जेव्हा काँग्रेस सरकारने २००८ साली अनेक मराठी मुला बाळांवर खटले दाखल केले होते त्यातील बहुतांश आजही सुरू आहेत.
तमिळनाडू कडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते लोक किती एकी ठेवून असतात याचे कौतुक आपण करतो पण त्यांच्या ��की मागे एक महत्वाचा निश्चय आहे "तमिळनाडू बाहेरील कोणत्याही राजकीय शक्तीला राज्यात स्थान नाही" मग ती काँग्रेस असो किंवा भाजप. तिथून पुढे त्यांच्या विचारधारा सुरू होतात त्याउलट आपल्याकडे काय चाललंय ? तर एकदा अटल असे म्हणाले होते, तर एकदा पटेल तसे म्हणाले तर एकदा नेहरू असे म्हणाले होते.
मुळात अटल, पटेल, नेहरू, गांधी काय सांगून गेले यावरून महाराष्ट्राची दिशा ठरत नाही किंवा महाराष्ट्राचे राजकारण ठरणार नाही, छत्��पती काय सांगून गेले, फुले शाहू आंबेडकर काय सांगून गेले, आचार्य अत्रे, श्रीपाद अमृत डांगे, वीर सावरकर, अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे काय सांगून गेले यावर चर्चा अपेक्षित आहे, मतभेद झाले तरी मार्ग त्यातून मिळवावा पण परकीय शक्तींना नाहक पितृतुल्य स्थान देऊन आपण आपल्या प्रांताची राजकीय विचारधारा गहाण ठेवतो आहोत ज्यातून मराठी माणसाने बाहेर पडले पाहिजे.
आज भारतभर NEET चे आंदोलन सुरू आहे जे गरजेचे आहेच, खरतर NEET ची महाराष्ट्राला गरज नाही, भारत संघराज्यात सर्वाधिक वैद्यकीय जागा या महाराष्ट्रात आहेत पण NEET च्या माध्यमातून या जागा परप्रांतीय विद्यार्थ्यांमध्ये विभागल्या जात आहेत आणि आमच्या मराठी तरुण तरुणीचा संघर्ष वाढत आहे अर्थात ब्रिटिशकालीन केंद्रीय व्यवस्थेकडे आपले शिक्षण हक्क, स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य, न्याय अधिकार सर्वच गहाण पडले आहे त्यातून स्वायत्त महाराष्ट्र हेच आपले अंतिम ध्येय आहे. दिल्लीचा तख���त राखण्याच्या बढाया मारण्यात महाराष्ट्राचे हिंदीकरण कधी झाले हे कळलच नाही, असो.
सध्या NEET आंदोलनावर लक्ष देऊ, पण यातही खटकलेली गोष्ट निदर्शनात येत आहे की महाराष्ट्रातील NEET संबंधीचे केले जाणारे आंदोलनं हे हिंदीतून का होत आहेत ? मान्य आहे की सगळे उत्साही आहेत पण मुंबईतील आंदोलन हिंदीत होत आहे हे कशाच द्योतक आहे ? काही आंदोलकांकडून सर्रासपणे Bombay शब्द वापरले जात आहेत, गाणी हिंदी, घोषणा हिंदीत ? त्यावर अनेक जण म��हणत आहेत जाऊदे ही वेळ नाही बोलायची, ही वेळ नाही म्हणजे ? या महाराष्ट्रासाठी गोळ्या झेलल्या आहेत मराठी माणसाने, कुठल्याही वातावरणात आणि कुठल्याही परिस्थितीत मराठी सोडणार नाही म्हणजे नाहीच ही भावना आम्ही राजकारणात लक्ष घालण्यापूर्वी आमच्या मनात रुजवून ठेवलेली आहेत.
येत्या २६ तारखेला मनसे शिवसेना आयोजित संयुक्त मोर्चा होणार असल्याचे दोन्ही पक्षांनी जाहीर केले आहे, याबद्दल त्यांचे आ���ारच पण अपेक्षा एवढीच आहे की मोर्चातील सर्व घोषणा, घोषवाक्य हे १००% मराठीतच असावे, कारण मराठीची अपेक्षा फक्त यांच्याकडूनच राहिलेली आहे (राजकीय स्पेस मध्ये). आजच्या पत्रकार परिषदेत उद्धवसाहेबांच्या वक्तव्या नुसार काँग्रेस देखील या आंदोलनात सहभागी होणार आहे, आम्हाला मान्य नसलं तरी ठीक आहे कारण हा लढा विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आहे तुर्तास त्यावर लक्ष देऊ पण काँग्रेस सहभागी होणार अस���ल तर हा मोर्चा हिंदिमय होऊ नये याची खबरदारी उद्धवसाहेबांनी घ्यायला हवी एवढीच ��पेक्षा!
#मराठीहितसर्वोपरी
#NoCongress #NoBJP
कर्नाटकात राहणाऱ्यांना कन्नडिगा म्हणतात
तामिळनाडू मध्ये तामिळ राहतात
आंध्रामध्ये तेलुगू राहतात
केरळ मध्ये मल्याळी राहतात
मग महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन कसे?
मराठी म्हटले पाहिजे.
मुळात महाराष्ट्रीयन हा शब्दप्रयोग भारतीय नाही आहे.
“अमेरिकन” सारखा इंग्राजळलेला आहे.
आणि ही देवाण घेव��ण आहे असे या खोपडी असलेल्या राष्ट्रभाषा वाल्याचेतज्ञ मत आहे.
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने ���क उमदा नेता गमावला.
अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळात��ल, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.
१९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झु���ू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करती��.
प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.
अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वत�� भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.
अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कम��� उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.
राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे.
मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र न��निर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।
The wait is OVER! 🔥
It's happening! Ahilyanagar's first-ever Digital Mahakumbh is coming this November!
Get ready to meet creators, influencers, and digital innovators.
🗓️ Date: 8th November 📍 Venue: Mauli Sabhagruha, Savedi
Register and you could WIN a brand new iPhone 17📱
@marathistock@iamprakashpatil मांजरेकर सुनील तावडेंना पोटाच्या घरा��रून बोलताना दाखवले आहे... जे की मांजरेकर चे पोट इतके मोठे आहे आणि दिसत आहे काही सिन मध्ये... दिग्दर्शक लेखकांना एवढं साधं समजू नये का... अनेक गोष्टी अतर्क्य आहेत
@ChuckDeo@marathistock मांजरेकर सुनील तावडेंना पोटाच्या घरावरून बोलताना दाखवले आहे... जे की मांजरेकर चे पोट इतके मोठे आहे आणि दिसत आहे काही सिन मध्ये... दिग्दर्शक लेखकांना एवढं साधं समजू नये का... अनेक गोष्टी अतर्क्य आहेत
कधीतरी माझ्या ऑफिसमध्ये घडणाऱ्या किस्यांवर आधारित पुस्तक लिहावं लागणार आहे. अतिशय डेंजर किस्से घडतात. ऐकून येडे व्हाल! पण ग्राहक असल्याने उघडपणे लिहणं बरोबर नाही. कथा स्वरूपात लिहायला पाहिजे. 😂😂😂