@Shaikh_Mohsin12 भाई ते महाराष्ट्र भाजपाच्या IT cell अध्यक्षांना तेवढे शोधा... लोकांना नावसुद्धा माहिती नाही त्यांच. उगाच पद घेऊन बसतात. काम करणारे राहिले बाजूला.
होय… MH 12 च; पुण्याची ओळख कायम !
📍नवी दिल्ली
पुणे आरटीओमध्ये नवीन वाहन नोंदणीसाठी सध्या MH 12 ZZ ही शेवटची मालिका सुरू असून, विद्यमान नोंदणी मालिका संपत आल्याने पुढील पर्यायी मालिकांबाबत प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचा आरटीओ कोड MH 12 बदलला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. पुणेकरांच्या भावना आणि शहराची ओळख लक्षात घेता हा विषय अत्यंत महत्त्वाचा होता.
ही बाब गांभीर्याने लक्षात घेत आज केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन, पुण्याची ओळख बनलेला MH 12 हा कोड कोणत्याही परिस्थितीत बदलू नये आणि त्याच कोडअंतर्गत पुढील पर्यायी वाहन नोंदणी मालिका सुरू करण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावा, अशी आग्रहाची विनंती केली.
मा. नितीनजी गडकरी यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत MH 12 हा कोड कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही दिली. त्यामुळे पुण्याची ओळख जपणारा MH 12 हा कोड कायम राहण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
#MH12 #Pune #PuneRTO #पुणे
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@nitin_gadkari@blsanthosh@BJP4India@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra