मी आज नाही, अनेक वर्ष झाले पाहतोय, तुम्हीही पाहत असाल की सामाजिक आंदोलन असो, उत्सव असो किंवा मग इतर कुठला कार्यक्रम सगळ्यात जास्त तणाव पोलिसांवर येतो.
दिवसातले १२-१४ तास पोलिस उभे असतात. साधं पाणीसुद्धा पुरवले जात नाही. सगळ्यात तणावाची नोकरी.
त्यात हे असले शूज. काळ्या रंगाचे. चामड्याचे. हे शूज घालून १२-१४ तास मुंबईच्या गरमीत उभे राहायचे, किती अवघड आहे.
अनेक पोलिसांशी बोललो, पायाला फोड येतात. टाचा दुखतात. पोटऱ्या भरून येतात.
कॉन्स्टेबल बोलू शकत नाहीत. हे सगळ्यांना दिसते, अनेकदा विषय निघतो. पण निर्णय होत नाही ..
उत्तम स्पोर्ट शूज, आरामदायी आणि चांगले ventilation असलेले ही गरज आहे.
नाहीतर ही मंडळी साठी येईपर्यंत खरच सक्षम राहतील का ?
गृहमंत्री, डीजीपी आणि सीपी सरांनी यावर सहानुभूतीने विचार करावा.
@CMOMaharashtra@DGPMaharashtra
#Maharashtra #Police
Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025.
#RunForUnity#EktaDiwas
मुंबई पोलीस आता बालस्नेही पोलीस!
मुंबईत सर्वप्रथम मुंबई पोलीस दलातील @DcpZone4Mumbai मधील @WadalaTT_PS , @SionPS_Mumbai , @Bhoiwada_PS , @KalachowkiPS , @RAKMargPS , @AntophillPS आणि @MatungaPS पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्ष उभारण्यात आले आहेत. पीडित आणि विधीसंघर्षग्रस्त बालकांना सुरक्षित आणि विश्वासपूर्ण वातावरण देण्यासाठी हे कक्ष अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
हा सुंदर व आकर्षक कक्ष बाल न्याय मॉडेल नियम २०१६ च्या नियम ८ आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सजविण्यात आला आहे.
#बालस्नेही_मुंबई_पोलीस
दि. ८ व ९ मे २०२५ रोजी भरुचा हॉल, मुंबई पोलीस मुख्यालय येथे ‘सायबर क्राइम इन्वेस्टिगेशन आणि डिटेक्शन’ या विषयावर पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत V.C. व प्रत्यक्ष स्वरुपात सर्व पोलीस ठाण्यातील एकुण २१०० पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
#CyberSafeMumbai
ऑपरेशन सिंदूरची माहिती देताना कर्नल सोफिया कुरेशी
सोबत विंग कमांडर व्योमिका सिंह
Very Powerful image of United India 🔥🔥
ज्या कुणाला ही कल्पना सुचली त्यांना कडक सॅल्युट!!
As part of @CMOMaharashtra ’s 100 days programme, we’ve set up a child-friendly corner at @MatungaPS to ensure a safe space for interviewing victim children and children in conflict with law. This initiative, guided by @DcpZone4Mumbai, follows Rule 8 of the Juvenile Justice Model Rules 2016 and NCPCR guidelines.
#ChildFriendlyCorner
#EveryChildOurPriority
पहिला व्हिडीओ लातूरच्या अमोल शिंदेच्या आई-वडिलांचा आहे. दुसरा व्हिडीओ हरयाणाच्या नीलमच्या भावाचा आहे, दोघांनीही संसदेबाहेर कलर गॅस फोडले.
दोघेही बेरोजगारीमुळे, गरीबीमुळे त्रासलेत. अमोल पदवीधर आहे. त्याला पोलीसात भरती व्हायचं होतं. रोजंदारीवर कंन्स्ट्रक्शनचं काम करायचा. नीलम एमए, एमएड, नेट झालीय. तिलाही नोकरी नाहीए.
बेरोजगारी हे सगळ्यात मोठं संकट आहे. पोटाचा प्रश्न बिकट आहे. पण जातीधर्माच्या राड्यात आणि राजकारण्यांच्या नॅरेटिव्हमुळे खरे प्रश्न निवडणुकीत पुढंच येत नाहीत.
मग असे अमोल, नीलम चुकीच्या पद्धतीनं आंदोलनं करताना दिसतात.. दोन्ही व्हिडीओ नक्की बघा आणि ऐका..
#ParliamentAttack #AmolShinde #LokSabha
नक्षलवादातून समर्पण करुन आदिवासांसाठी अहोरात्र प्रामाणिक करणाऱ्या , कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारी सामान्य बाई तेलंगणाची कैबिनेट मंत्री होत आहे.
भारतीय राजकारणातील गेल्या काही वर्षातील मोटीव्हेशनला स्टोरी असेल 🥹♥️
महाराष्ट्र केसरीच्या मागच्या वर्षी झालेल्या वादानंतर सिकंदर म्हणाला होता की पुढची महाराष्ट्र केसरी स्पर्धा मी मारणार.
अवघ्या काहीसेकंदात पठ्ठ्याने यंदा मैदान मारले.
हमालाचा पोरगा महाराष्ट्र केसरी झाला.
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख 👍🙌
चौदा ऑगस्टच्या रात्री दिल्लीत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले भाषण.....
पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. पूर्ण किंवा शक्य तेवढी. मध्यरात्रीचे टोले पडल्यावर सर्व जग झोपलेले असताना भारताच्या नसानसात मात्र चैतन्य संचारेल. स्वातंत्र्यप्राप्ती होईल. जुन्याला सोडचिठ्ठी देऊन नव्या आयुष्यात पाऊल टाकतानाचे, एका युगाचा शेवट होत असतानाचे आणि पिचलेले राष्ट्र स्वतःचा उद्धार करतानाचे, असे क्षण इतिहासात खूप कमी वेळा येतात. या महत्त्वपूर्ण क्षणी आपण भारत, भारतवासीय आणि मानवतेच्या हितासाठी झटण्याची शपथ घेणे योग्य ठरेल.
इतिहासाच्या उषःकालात भारताने स्वतःच्या शोधास अनंतात प्रारंभ केला. या काळातील अनेक शतके या देशाचे कर्तृत्व, त्याचे यशापयश यांनी भरलेली आहेत. भलेबुरे दिवस येत जात राहिले पण या देशाने आपले स्वत्व शोधण्याचे ध्येय डोळ्यांपुढून हलू दिले नाही. ही शक्ती देणारे आदर्शही तो विसरला नाही. आज आम्ही दुर्भाग्याच्या एका कालखंडावर पडदा पाडतो आहोत. भारताला अखेर स्वत्वाची ओळख झाली आहे. आज आम्ही साजरा करत असलेला आनंदोत्सव म्हणजे आगामी काळात आणखी कीर्ति आणि विजय मिळविण्यासाठी टाकलेले केवळ एक पाऊल आहे. असा आनंदोत्सव साजरा करण्याची संधी यापुढेही मिळणार आहेत. ही संधी साधण्यासाठी आणि भविष्याचे आव्हान स्वीकारण्यासाठी आमच्यात तेवढे धाडस आणि बुद्धिकौशल्य आहे?
जवाहरलाल नेहरू यांच्या या ऐतिहासिक भाषणात त्यांनी भारताच्या भविष्यावर भाष्य केले... भूतकाळातील कटू आठवणी विसरून नवीन आशादायी तेजस्वी भारताची स्वप्ने पाहिली...
आणि 15 ऑगस्ट च्या पहिल्या घटकेला देशाने आनंद साजरा केला.
भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो.
@AjitPawarSpeaks आमच्या कडे पैसे नसल्या मुळे आम्ही या स्पर्धेत सहभागी होऊ शकलो नाही.
आम्ही rowing या खेळत 3 वर्षांपासून लगातार ऑल INDIA पोलीस स्पर्धेत GOLD मेडल प्राप्त केले आहे.
तरी देखील All INDIA POLICE SPORTS कंट्रोल बोर्ड ने महाराष्ट्र पोलीस ने आम्हाला या स्पर्धेला पाठवले नाही.