MIDC सरळसेवा भरती 2023 चा निकाल 08 ऑक्टोबर 2025 रोजी लागला… पण अंतिम निवड यादी नाही, प्रतीक्षा यादी नाही, कागदपत्र पडताळणी नाही.
उमेदवारांची महिनोंमहिने दिशाभूल करून “आचारसंहिता”चं खोटं कारण पुढे केलं जात आहे.
मात्र इतर विभागांनी त्याच काळात भरती प्रक्रिया पूर्ण केली!
मग MIDC का थांबली? कोण जबाबदार?
@samant_uday जी,
हजारो उमेदवारांचा संयम आता संपत आहे. कृपया तातडीने पुढील निर्देश द्यावेत:
✔️ अंतिम निवड यादी
✔️ प्रतीक्षा यादी
✔️ कागदपत्र पडताळणी वेळापत्रक
तत्काळ जाहीर करणे बंधनकारक आहे.
ही केवळ मागणी नाही,
हा न्यायाचा लढा आहे.
#MIDC #MIDCRecruitment2023 #JusticeForAspirants
@samant_uday साहेब, लवकरात लवकर MIDC चा निकाल जाहीर करा!
परीक्षेला दोन महिने उलटून गेले तरी अजून निकाल लागलेला नाही.
हजारो विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि भविष्य याच निकालावर अवलंबून आहे.
@midc_india ने परीक्षा घ्यायला दोन वर्ष लावली आता कमीत कमी निकाल तरी वेळेवर लाऊन विद्यार्थ्यांचा रोष कमी करावा, प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनी #Mail, कॉल, निवेदन हेच काम करत बसायचं का....?
#MIDC_Result@samant_uday
MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या विविध पदांसाठी घेतलेल्या भरती परीक्षेला सध्या दीड ते दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र, अजूनपर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही.
ही परीक्षा देणाऱ्या हजारो उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि अनिश्चिततेचं वातावरण आहे. उमेदवारांनी मेहनत घेऊन अभ्यास करून परीक्षा दिली आहे, त्यांचे भविष्य या निकालावर अवलंबून आहे. परंतु निकालाच्या विलंबामुळे उमेदवारांना मानसिक त्रास होत आहे तसेच त्यांच्या शैक्षणिक आणि करिअर नियोजनावरही परिणाम होत आहे.
सरकारने पारदर्शकता आणि जबाबदारीचे भान ठेवून त्वरित निकाल जाहीर करावा, हीच उमेदवारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची एकमुखी मागणी आहे.
@midc_india आणि विभागाचे मंत्री मा. उदय सामंत @samant_uday यांच्याकडे आमची नम्र विनंती आहे की –
उमेदवारांच्या भविष्याचा विचार करून निकाल जाहीर करण्यात विलंब होऊ नये.
निकाल जाहीर करण्यासाठी ठोस दिनांक देण्यात यावा.
संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून उमेदवारांचा विश्वास जपावा.
उमेदवारांचा संयम संपत चालला आहे. तातडीने निकाल जाहीर करावा हीच अपेक्षा.
#MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध पदांच्या भरती परीक्षेला दीड-दोन महिने झाले आहेत परंतु अजून निकाल लागलेला नाही. @midc_india आणि विभागाचे मंत्री महोदय मा. उदय सामंत @samant_uday आपल्याला नम्र विनंती आहे, MIDC भरतीचा निकाल लवकर जाहीर करावा.
2 वर्षे उलटून MIDC परीक्षा नाही.
900-1000 Rs Exam Fee घेण्याच्या तारखा निश्चित असतात.
हजारो रु Exam Fee भरून, 2 वर्षे घराबाहेर रूम करून, सतत अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून, क्लासेस चे पैसे भरून, विद्यार्थी मात्र बेरोजगार बसलेला आहे .
याला जिम्मेदार कोण ?
लवकर MIDC तारखा जाहीर करा.
MIDC ने पदभरती जाहीर करून जवळपास २ वर्ष होत आले तरी परीक्षा दिनांक सुद्धा जाहिर केली नाही. विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तात्काळ परीक्षा TCS Ion केंद्रावर आयोजित करुन उर्वरित सर्व संवर्गाचे वेळापत्रक जाहिर करा! @samant_uday@naikindranil@Dev_Fadnavis@midc_india
आदरणीय देवेंद्रजी,
MIDC सरळसेवा भरती 2023
जाहिरात प्रसिद्ध होऊन 18 महिने झालेत अजूनही परीक्षा घोषित झालेली नाही.
तातडीने परीक्षेच्या तारखा घोषित करून उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@samant_uday
आदरणीय देवेंद्रजी,
MIDC सरळसेवा भरती 2023
गेल्या दोन वर्षापासून ही भरती प्रक्रिया प्रलंबीत असून तातडीने या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्याची गरज आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
२० महिने झाले जाहिरात येऊन अजून @midc_india ला वेळापत्रक जाहीर करता आलेलं नाही. अधिवेशनात देखील याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता परंतु अद्याप कोणतीच कृती होताना दिसत नाही. @samant_uday साहेब कृपया आपण याकडे लक्ष द्या.
#Midcrecruitment2023
प्रति,
मा. उदय सामंत,
उद्योग मंत्री,
महाराष्ट्र राज्य
महोदय,
आपल्या उद्योग खात्याच्या अंतर्गत असलेल्या MIDC भरतीला २० महिने उलटून गेले, तरीही वेळापत्रक जाहीर न करणे ही केवळ उदासीनता नाही, तर गेले अनेक वर्षे या भरतीसाठी अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींचा केलेला विश्वासघात आहे.
अधिवेशनात प्रश्न विचारल्यानंतरही तुम्ही निष्क्रियच राहिलात. ही मंत्रीपदाची बेफिकिरी आहे की अकार्यक्षमता?
तुमच्या अकार्यक्षमतेमुळे हजारो विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत.
जर तुमच्याकडे जबाबदारी पार पाडण्याची क्षमता नसेल, जबाबदारी पार पडू शकत नसाल तर कृपया राजीनामा द्या.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@INCHarshsapkal@samant_uday@midc_india@Mpsc_Andolan
@aspirants2910@Dev_Fadnavis@iambadasdanve@RRPSpeaks@samant_uday@suvishelke@Dhananjay4INC MIDC जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 20 महिने उलटून गेले अद्यापही महामंडळाने परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही पुढील प्रक्रियेबद्दल हजारो विद्यार्थी अनिश्चिततेच्या स्थितीत अपेक्षित परीक्षेची वाट बघत आहेत.सदर भरती प्रक्रिया संदर्भात तात्काळ वेळापत्रक जाहीर करण्यात यावं
त्यामुळे सदर भरती प्रक्रिया संदर्भात तात्काळ वेळापत्रक जाहीर करण्यात यावं आणि परीक्षा TCS ION च्या मान्यताप्राप्त परीक्षा केंद्रावर घेण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, छत्रपती संभाजी नगर यांच्यावतीने आमदार Rohit Rajendra Pawar दादा यांना करण्यात आली#midc_exam