दिवंगत नेते विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या काळात पण राजकारण होतेच कि,
मतभेद असतील जरूर पण मनभेद कधीच नव्हते.
सध्याच्या राजकारणाची घसरलेली पातळी पाहून सामान्य जनता अस्वस्थ आहे एवढं मात्र नक्की.😔
#मी_अराजकीय
सोशल मीडिया वर मनातील हळव्या भावना बोलून दाखविणारे (झोप न येणे, दुःख, ब्रेकअप, एकटेपणा, निराशा) हे प्रत्यक्षात किती एकटे असतील विचार करा.
अश्या लोकांना ऑनलाईन हजारो followers यांच्यासोबत त्यांच्या मनातील गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात मात्र प्रत्यक्षात त्यांचे ऐकून घेणारे कोणीच नाही.
"प्रत्यक्षात नाती निर्माण करू शकणे ही क्षमता आपल्याशी नाही, ती शिकण्याची गरज आहे" एवढे तरी या लोकांना कळावे ही अपेक्षा.
#मराठी #म #महाराष्ट्र #मानसिक
निटूर-लातूर रस्त्यावर बंद असलेल्या लोदगा टोल नाक्यावर या अश्या लोकांकडून जबरदस्तीची अवैध टोल वसुली चालू आहे. प्रशासनाला हे दिसत नाही का?
इज्जतीला घाबरून आणि कसलाही वाद नको म्हणून लोक पैसे देत आहेत. @LaturPolice@LaturDm@OmRajenimbalkr@sambhajipatil77
ज्याची लाज वाटायला हवी त्याचा अभिमान बाळगत आहेत योगी.😂
मजूर म्हणून जाण्याऐवजी सुशिक्षित इंजीनियर डॉक्टर बनून गेली असती पोर तर अभिमान वाटला असता…पण शिक्षण क्षेत्रात क्रांती करणे यांच्या अजेंड्यात बसत नाही.
तुमचं नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, घरचा पत्ता सर्वकाही हॅकर्स पर्यंत पोहोचलय!
कधी? कसं? हे बघायचंय?
तुमचा कोणता डाटा लीक झालाय, कोणी केला? हे आता एका क्लिक मध्ये चेक करा!
🧵
भावपुर्ण श्रध्दांजली...!!!💐💐💐
किती सरळ, साधं सोपं आहे ना ? आजकाल जगाच्या कानाकोप-यात काहीही घडो, काही सेकंदात सगळ्या जगभरात बातमी पोहचते.
जगातील सगळं कसं वेगात चाललंय. माणसं देखील तेवढ्याच वेगात धावत आहेत. कोणाला थांबायला वेळच नाहीय.
तसंच झालंय मृत्यूचं देखील. तोही अगदी वेगात येतोय. अगदी दोन तासापुर्वी संभाषण झालेल्या माणसाला आपण व्हॉटसअॕपवर भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करतो...
किती सोप्पं आहे ना...
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर, साडेचार-साडेचार अक्षरांचे दोन शब्द आणि एक डिजीटल पुष्पगुच्छ देऊन आपण मोकळे व्हायचं...
पण खरंच ज्या घरातला कमवता बाप , प्रेम करणारी आई, वयात आलेला भाऊ, लहान लहान लेकरं असलेली बहीण अशी कितीतरी नाती उघड्यावर टाकुन कोणीतरी निघुन गेलेलं असतं.
माणसं "श्रध्दांजली" अर्पण करुन मोकळी होतात. काहीजण यथाशक्ति आर्थिक मदतही करतात. काहीजण दहावे तेराव्याला येतात, पोकळ आश्वासनं देतात, तर काहीजण फुशारकी मिरवत मदतीचा आव आणतात.
जिचा तरुण कमावता नवरा मरतो आणि ज्या लेकरांचा आयुष्य सुरु होण्याआधीच बाप मरतो, त्यांचं दुःख काय असेल...???
दररोज घरी येताना घामानं भिजलेला बाप, हातात त्या चिमण्यांसाठी खाऊ घेऊन येतो ना-तेव्हा कोंबडीच्या पंखाखाली ऊब घ्यावी, तशी ती पिल्लं बापाला बिलगतात.
पण आज तोच बाप अग्नित विलिन झालाय, त्या लेकरांनी काय टाहो फोडावा...??? पाठीवर लाडाचा धपाटा कोणाचा खावा? काय यातना होत असतील त्या लेकरांना?
आपलं बरंय, आपण फक्त "डिजिटल भावपुर्ण श्रध्दांजली" अर्पण करुन मोकळे व्हायचं.
काय वाटत असेल त्या अर्धांगिनीला, जिचा साथीदार अर्ध्यावर डाव मांडुन निघुन गेला. बँक कुठं आणि कशी असते हे तिनं कधीच पाहीलेलं नसतं. व्यवहार माहीत नाही..हे जग काय माहीत नाही आणि आज अचानक तिला सोडून, या बाहेरच्या जगात पोरकं करुन, जेव्हा तिचा सोबती जातो ना, तिचं दुःख तिलाच माहीत.
आपण मात्र 'भावपुर्ण श्रध्दांजली" अर्पण करुन मोकळे व्हायचं.
ज्या आईबापाची म्हातारपणी काठी बनावी, त्याच तरण्याबांड पोराचा बाप, जेव्हा खांदेकरी होतो ना, तेव्हा त्या बापाला जिवंत मरणयातना काय असतात, हे कळतं.
नऊ महिने पोटात वाढवुन, जग पाहील्यावर तळहाताचा पाळणा आणि नेत्रांचा दिवा करणारी माऊली, जेव्हा आपल्या बाळाचं प्रेत पाहुन हंबरडा फोडते ना...तेंव्हा तो पांडुरंग ही हेलावत असेल...
आपण दहावा तेरावा करुन मोकळं व्हायचं. आपलं काम सोप्पं आहे बुवा, "भावपुर्ण श्रध्दांजली" 💐
भाऊबीजेला माझा दादा येईल, अशी चातकासारखी वाट पाहणारी ताई, रक्षाबंधन जवळ आलं की माझा भाऊ माझ्याकडे येईल, या वेड्या आशेवर जगणारी सासुरवासीण, जेव्हा आपल्या पाठीराख्याच्या मृत्यूची बातमी ऐकत असेल, तर तिचं काळीज कसं फडफड करत असेल याची कल्पना न केलेलीच बरी.आता माझा दादा...माझा भाऊ...सणासुदीला येईल कि ?? येणारा सण तिच्यासाठी कसा असेल...
पण, आपलं बरं आहे हो....आपण "भावपुर्ण श्रध्दांजली" अर्पण करुन मोकळं व्हायचं...
दररोज भेटणारा मित्र . तासनतास फक्त गप्पा कधीतरी मनमुराद हसी-मजाक, तर कधी जाणीवपुर्वक असणारा रुसवाफुगवा. हातात घेतलेला हात.खांद्यावर डोकं ठेऊन मनसोक्त अश्रुंना मोकळी करुन दिलेली वाट. तर कधी भक्कम पाठीशी उभा राहणारा मित्र, जेव्हा सोडुन जातो, त्यानंतर त्या मित्रांची किंवा मैत्रीणींची अवस्था, उद्या माझा सखा भेटेल का ? स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारल्यावर, आंतरमनातली भावना काय असते, हे त्यालाच कळतं, ज्याचा मित्र निघुन गेलाय कैलासाच्या प्रवासाला.....
आपलं काय एकदम सोप्पं आहे..."भावपुर्ण श्रध्दांजली" ....💐खरंच आपलं सोप्पं आहे.....
पण ज्याचं प्रेत जळतं,
त्या घरातल्यांनाच कळतं...
दुःख काय आणि कसं असतं
आपली स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या...!!!
भारत की सबसे बडी रॅली तो महाराष्ट्र मे मराठा आरक्षण योद्धा श्री मनोज दादा जरांगे की होती है..महाराष्ट्र मे इस वक्त का सबसे बडा कोई नेता है तो वो मनोज दादा है..ये आपको कोई मीडिया नहीं दिखायेगा..लेकीन ये हकीकत हैं..आज हर पार्टी के नेता उन्हे मिलने की शिकस्त कर रहे हैं..
#मराठा
आपण अनेकवेळा शिक्षकभरती व्हावी मुलांना शिक्षक मिळावेत म्हणून योग्य तो पाठपुरावा केला म्हणून आमचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा असून निवडून येत मोठी जबाबदारी स्वीकारून नेतृत्व करावे ही अपेक्षा @RRPSpeaks@RohitPawarOffic