मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
विद्यार्थ्यांचा #MPSC च्या ऑनलाईन परिक्षेला विरोध असताना सरकार एव्हढा हट्ट कुणासाठी करत आहे? विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन #MPSC ची ऑनलाईन परीक्षेचा निर्णय तातडीने रद्द करा.
@mpsc_office@bhimanwar
दिनांक 25 जून 2026 रोजीच्या गट-क पदासाठीच्या जाहिरातीत परीक्षा ऑनलाईन असल्याचं समजलं. पण 2025 पूर्वी ऑनलाइन भरती परीक्षांमध्ये झालेला गोंधळ, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळेच विविध पदांच्या परीक्षा #MPSC कडे वर्ग करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत आज पुन्हा MPSC नेच ऑनलाइन परीक्षांचा निर्णय घेणं म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टा करण्यासारखं आहे. ऑनलाइन परीक्षांमुळं दूरची परीक्षा केंद्रं, आर्थिक व मानसिक ताण, Normalization संदर्भातील प्रश्न तसेच प्रक्रियेत फेरफार होण्याबाबत निर्माण होणारा अविश्वास कायम राहतो. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करून गट-क व इतर सर्व भरती परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. त्यामुळं MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता त्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत असू..!
@Dev_Fadnavis@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
एमपीएससी लिपिक टंकलेखक 2023 भरतीला दोन वर्षांहून अधिक काळ लोटूनही आयोग आजपर्यंत ना तात्पुरती यादी जाहीर करू शकला नाही. हजारो विद्यार्थ्यांनी घरदार सोडून, नोकऱ्यांचे पर्याय टाळून, फक्त या भरतीवर विश्वास ठेवून अभ्यास केला, पण आयोगाच्या संथ, बेफिकीर आणि बेशिस्त कारभारामुळे आज त्याच विद्यार्थ्यांची स्वप्नं चुरगाळली जात आहेत. फक्त उडवा-उडवीची उत्तरं देणं, वेळकाढूपणा करणं आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळ करणं हाच आज आयोगाचा 'नवा कार्यधर्म' झालाय का?
दोन वर्षं होऊन गेली, पण अजूनही यादी नाही, स्पष्टता नाही, जबाबदारी नाही... हे बघून संताप अनावर होतोय! आम्ही सरकारलाही थेट सांगतो ही फक्त भरती नाही, हे विद्यार्थ्यांच्या भविष्याचं युद्ध आहे! तात्काळ ही भरती प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरणार नाही, आणि त्या आंदोलनातून होणाऱ्या पूर्ण परिणामाची जबाबदारी आयोग आणि शासनाची असेल!
@Dev_Fadnavis@Drsuvarnas@Mpsc_Andolan
प्रति,
आदरणीय देवेंद्रजी,
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,
विषय :- राज्यसेवा परीक्षा 2024 मधील 35 कॅडरच्या सर्व रिक्त जागांची भरती. करण्याबाबत,
जुन्या अभ्यासक्रमानुसार होणारी शेवटची परीक्षा असल्याने 100% रिक्त जागांची भरती करण्यासाठी सर्व बेरोजगार भावी अधिकाऱ्यांचा आवाज ऐकून सरकारने रिक्त जागांचे अतिरीक्त मागणीपत्रक 2024 साठी लोकसेवा आयोगाकडे पाठवावे ही नम्र विनंती.
एमपीएससी 2024 गट ब 1500
गट क 5000 एवढ्या जागांची जाहिरात आली पाहिजे.
राज्यसेवा सुद्धा 600+ आली पाहिजे.
मा. महायुती सरकार ला राज्यात ज्या प्रमाणे भरघोस मते पडली त्याप्रमाणे एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना सुद्धा भरघोस जागा काढाव्या.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks
#राज्यसेवा_2024 परीक्षेमध्ये #DySP, #तहसीलदार यांसारखी महत्वाची अनेक पदे रिक्त असूनही जाहिरातीत या पदांचा समावेश नसणे हे अत्यंत खेदजनक आहे. #उपजिल्हाधिकारी पदाच्याही केवळ 7 जागा आहेत.'कम्बाईन गट ब आणि गट क' परीक्षेतही #PSI पदाच्या फक्त 216 जागांचा समावेश आहे.
शासनाने पदभरतीबाबत संवेदनशीलपणे आणि सकारात्मकपणे विचार करायला हवा. राज्यसेवेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 पदाच्या जागांसह #combine मधील PSI, STI, ASO, SR तसेच क्लर्क या सर्व जागांमध्ये भरघोस वाढ करावी. विद्यार्थ्याना गृहीत धरू नये, ही विनंती वजा इशारा!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#combine_2024_जागावाढ
#राज्यसेवा_जागावाढ_2024
#संयुक्त_2024_जागावाढ
#MPSC #Studentsrights
"गट 'क' लिपिक टंकलेखक तसेच कर सहायक पदासाठी जाहिरात जानेवारी २०२३ मध्ये निघाली होती. यानंतर एप्रिल २०२३ मध्ये पूर्व परीक्षा झाली आणि तब्बल ८ महिन्यांनंतर डिसेंबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षेचा निकाल देखील उशिराने लागला. १ ते १३ जुलै २०२४ दरम्यान स्किल टेस्ट पार पडली. स्किल टेस्ट होऊन बरेच दिवस उलटले आहेत.
@mpsc_office विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकरात लवकर स्किल टेस्टचा निकाल जाहीर करावा ही विनंती!
#MPSC #ClerkTypistResult #SkillTest #StudentsRights #MPSCUpdates
@mieknathshinde@NanaPatole@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
मा. @mpsc_office ला विनंती आहे की, गट क 2023 ची स्किल टेस्ट होऊन 80 दिवस होत आले तरी निकाल जाहीर केला नाही. येत्या 30 तारखेला MAT मध्ये सुनावणी आहे . या सुनावणीनंतर निकाल जाहीर करण्यात यावा. 2 वर्षे होत आले जाहिरात प्रसिद्ध होऊन .
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
नितीश सबके है, हे अधोरेखीत करत नितीश कुमारांनी 1929 जागांची जाहिरात काढली, अजून जाहिरात 2000+ जाण्याची शक्यता आहे.
बिहार सारखे मागास, अविकसित, कमी बजेट असलेले राज्य एवढ्या जागा काढते, राजस्थान, उत्तराखंड किती तरी राज्ये दरवर्षी मोठी जाहिरात काढतात.
तर देशातील नंबर 1, भारताचे 20% बजेट मिळवून देणारे, 1 ट्रिलियन इकॉनॉमी तत्सम the great state of Maharashtra मध्ये राज्यसेवा जाहिरात 1500+ तरी असायला हवी.
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब MPSC राज्यसेवा 1500+, Combine 15,000+ जाहिरात काढावी ही विनंती.🙏🙏
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE@VijayWadettiwar@BaliramDoleyINC
*लेखा व कोषागारे* विभागामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदाच्या ३१/१२/२०२३ अखेर सुमारे ६१७ जागा रिक्त असून या भरण्यासंबधीची कार्यवाही गेली १० महिने प्रलंबित आहे. विभागाने दि. १९/१०/२०२३ पर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्याचे जाहीर केले होते परंतु आजपर्यंत जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. येणारी जाहिरात ही ६ प्रशासकिय विभाग मिळून एकच जाहिरात येणार आहे म्हणून संबंधीत प्रशासकिय विभागांनी त्यांची कार्यवाही लवकर पूर्ण होने खूप गरजेचे आहे. त्यामधील कोकण, अमरावती, पुणे विभागांनी त्यांची कार्यवाही पूर्ण करून फायनल कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केले परंतु बाकी प्रशासकिय विभाग जसे नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या विभागांचे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाले नाही त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध होत नाही अशी माहिती आहे. संबंधीत विभागाने जलद कार्यवाही करून राहिलेले कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करून तात्काळ जाहिरात प्रसिध्द होणे गरजेचे आहे.
कोरोना महामारी, सरळसेवा पदभरतींमध्ये लागणारा दीर्घ वेळ, इत्यादी कारणांमुळे राज्याच्या सर्व भागातील एक मोठा सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. वरील प्रक्रियेत तारीख ठरवताना महाराष्ट्रात येणारी आगामी विधानसभा निवडणुक आणि त्यासाठी लागणारी आचारसंहिता आदीच्या तारखा या सर्व गोष्टींची दखल घेणे गरजेचे आहे. आपल्याला विनंती आहे की सदर पदभरती जाहिरात विनाविलंब वेळापत्रकासह तात्काळ प्रसिध्द करण्याचे आदेश आपण लेखा कोषागार विभागास देऊन हजारो बेरोजगार युवकांना दिलासा द्यावा हि विनंती.
@AjitPawarSpeaks