2 वर्षांपूर्वी सर्व सरळसेवा @mpsc_office द्वारे घेऊ असे शासनाने 18 जुलै 2024 रोजी जाहीर केले होते. त्यानुसार आयोगाने या महिन्यात सरळसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम जाहीर करावा. @bhimanwar सर तुमच्याकडून अपेक्षा आहेत. मनावर घ्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षांची परीक्षा योजना अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी मोठ्या संभ्रमात असून त्यांच्या अभ्यासाचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून MPSC च्या परीक्षा पद्धती, ऑनलाइन (CBT), ऑफलाइन (OMR), नॉर्मलायझेशन, अभ्यासक्रम आणि परीक्षा प्रक्रियेबाबत विविध चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत सरळसेवा परीक्षांची निश्चित परीक्षा योजना जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
परीक्षेची पद्धत, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, गुणांचे वितरण, विषय, परीक्षा प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या बाबी स्पष्ट नसताना विद्यार्थ्यांनी नेमकी कोणत्या पद्धतीने तयारी करावी, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. हजारो विद्यार्थी पूर्णवेळ अभ्यास करत आहेत. अनेकांनी नोकरी, व्यवसाय आणि इतर संधी बाजूला ठेवून आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दिली आहेत. त्यामुळे आयोगाकडून होणारा प्रत्येक विलंब त्यांच्या भविष्यावर थेट परिणाम करणारा ठरत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सातत्याने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी भूमिका घेतली आहे. MPSC च्या सर्व परीक्षा पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थीहित जपणाऱ्या पद्धतीने होणे हीच आमची भूमिका आहे. त्याच अनुषंगाने सरळसेवा परीक्षांची परीक्षा योजना देखील कोणताही विलंब न करता तात्काळ जाहीर करण्यात यावी, ही आमची ठाम मागणी आहे.
आयोगाने परीक्षा योजना जाहीर करताना विद्यार्थ्यांमध्ये कोणताही संभ्रम राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, गुणांकन पद्धती, परीक्षा दिनदर्शिका आणि पुढील भरती प्रक्रियेबाबत स्पष्ट, सविस्तर आणि अधिकृत माहिती एकाच वेळी जाहीर करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना योग्य नियोजन करून अभ्यास करता येईल.
विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक ऊर्जा अमूल्य आहे. त्यांचा संयम पाहण्यापेक्षा त्यांच्या भविष्याचा विचार करणे ही आयोगाची जबाबदारी आहे.
म्हणूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आमचे स्पष्ट आवाहन आहे.
1. सरळसेवा भरती परीक्षांची परीक्षा योजना तात्काळ जाहीर करा.
2. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित विषयांमध्ये अनिश्चितता आणि विलंब टाळा.
3. हजारो विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका.
4. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ न करता, पारदर्शकता आणि वेळबद्धतेचे तत्त्व स्वीकारून त्वरित निर्णय घ्या.
विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा विश्वास कायम राहिला पाहिजे आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक भरती प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक व विश्वासार्ह झाली पाहिजे, हीच अपेक्षा.
@mpsc_office@degree_holders@Mpsc_Andolan@bhimanwar@CongressRojgar
#MPSC_ExamPlan_जाहीर_करा
सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@AbhiPawarBJP
सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@AbhiPawarBJP
सर्व विद्यार्थ्यांचा विरोध असताना कोणाच्या फायद्यासाठी ऑनलाइन परीक्षेचा इतका अट्टाहास?
सर्व व्यवस्था ही नागरिकांसाठी असते ना की स्वतःच्या फायद्यासाठी.
विद्यार्थ्यांचे आयुष्य देशोधडीला लावू नका. परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइनच झाल्या पाहिजेत. यावर कोणतीही तडजोड मान्य नाही. 😡
मुख्यमंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून संगणकाधारित (CBT) परीक्षा ऑगस्ट २०२७ पर्यंत स्थगित करण्याची सूचना दिली, हा महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा, विविध विद्यार्थी संघटनांच्या सातत्यपूर्ण लढ्याचा, राज्यभर उभारलेल्या आंदोलनांचा आणि काँग्रेस पक्षाने MPSC मुख्यालय, सीबीडी बेलापूर येथे सलग ९ दिवस चालविलेल्या ऐतिहासिक आंदोलनाचा पहिला मोठा विजय आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, विधान परिषद सदस्य सतेज (बंटी) पाटील यांनी हा विषय सातत्याने शासन, मुख्यमंत्री, MPSC आणि विधिमंडळात प्रभावीपणे मांडत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या या नेतृत्वाला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच महाविकास आघाडीच्या आमदारांनी संपूर्ण अधिवेशनभर भक्कम साथ देत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचला.
या लढ्याचे सर्वात मोठे श्रेय महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना, विविध विद्यार्थी संघटनांना आणि मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नांदेड, यवतमाळ, वर्धा यांसह राज्यभर आंदोलन उभारणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला जाते. या सामूहिक संघर्षामुळेच शासनाला विद्यार्थ्यांचा आवाज ऐकावा लागला.
हा केवळ परीक्षा पद्धतीचा प्रश्न नाही, तर लाखो मेहनती विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा लढा आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी आवाज उठवत आहेत. त्याच विद्यार्थी न्यायाच्या भूमिकेला बळ देणारा हा संघर्ष आहे.
मात्र ही बाब राज्यसेवा परीक्षा पद्धतीतील पूर्वीच्या अनुभवाचीही आठवण करून देते. विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर Objective परीक्षेचे दोन प्रयत्न वाढवून देण्यात आले; पण नंतर Descriptive पद्धत लागू करण्यात आली. आयोगाकडे पेपर तपासणीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पुढे Optional विषयही काढून टाकावे लागले.
त्यामुळे केवळ मुदतवाढ हा कायमस्वरूपी तोडगा नाही. आज २०२७ पर्यंत स्थगिती आणि उद्या पुन्हा ऑनलाइन परीक्षा रेटून नेण्याचा प्रयत्न होणार नाही, याची स्पष्ट हमी आवश्यक आहे.
आमची भूमिका स्पष्ट आहे. MPSCच्या सर्व भरती परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच व्हाव्यात. पारदर्शकता, वेळेत निकाल आणि पेपरफुटीमुक्त भरती प्रक्रिया हीच विद्यार्थ्यांवरील खरी न्यायाची भूमिका आहे.
आता MPSC ने विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करून ऑफलाइन (OMR) परीक्षा पद्धतीबाबत अधिकृत आणि कायमस्वरूपी निर्णय जाहीर करावा. अंतिम निर्णय होईपर्यंत काँग्रेसचा आणि विद्यार्थ्यांचा हा लढा सुरूच राहील.
लडेंगे, जितेंगे..... !
@RahulGandhi@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@DalviAaba@INCMaharashtra@bhimanwar@mpsc_office@degree_holders@Mpsc_Andolan@VastavKatta
#MPSC #OfflineExam #StudentJustice #RahulGandhi #Congress
सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत एक बैठक मुंबई येथे घेतली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेत लागले पाहिजेत. पण, सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसर्या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रमण हे तितकेच सुरळीत सुद्धा असले पाहिजे. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळावा. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने या सुधारणा राबवत संगणकआधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. त्यानुषंगाने आता पुढील निर्णय एमपीएससीने घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. एमपीएससीच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी प्रशंसाही केली.
#MPSC @mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अचानकपणे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहिर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम झाला आहे. विद्यार्थ्यांची ही भावना लक्षात घेता आज MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन MPSC परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच घेणेबाबतची आग्रही मागणी केली. यावर मा. मुख्यमंत्री महोदय सकारात्मक असून त्यांनी आयोगाला याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय जाहिर करेल असा विश्वास आहे. यावेळी श्री. राजेश पांडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
#devendrafadnvis #abhimanyupawar #mpsc
@Dev_Fadnavis
MPSC ची CBT परीक्षा रद्द करा... ऑफलाईन परीक्षा कायम ठेवा..!
बेलापूर येथील MPSC कार्यालयासमोर सुरू असलेल्या काँग्रेसच्या साखळी उपोषणाला भेट देत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला जाहीर पाठिंबा दिला.
एमपीएससीने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षांच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी आणि परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ व त्यांच्या न्याय्य मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री. धनंजय शिंदे व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. रामचंद्र दळवी यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन नवी मुंबईतील MPSC च्या मुख्य कार्यालयासमोर सुरू केले आहे.
सर्व नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या संवेदनशील मागणीला पाठिंबा देऊन उपोषणात सहभागी व्हावे.
@INCHarshsapkal@satejp@DalviAaba@Dhananjay4INC
यापुढच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याच्या #MPSC ने काढलेल्या परिपत्रकाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करुन हा निर्णय तातडीने मागे घेऊन या परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत सरकारने प्रयत्न करण्याची मागणी केली. तसंच नॉर्मलायझेशनचा मुद्दाही उपस्थित करुन विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ही पद्धत हटवण्याची मागणी केली. सरकारने #MPSC च्या माध्यमातून हा निर्णय बदलला नाही तर विद्यार्थ्यांचं अधिक मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी दिला.
#पावसाळी_अधिवेशन_२०२६
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न
मा. @mpsc_office@bhimanwar छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू असलेल्या आंदोलना कडे पाहून तरी जरा शहाणे व्हा आयोगाराव पावसात सुरू आहे हे आंदोलन तुम्ही जरा तरी विचार करा..... मंत्रालयातून आलेला आदेश तुम्हाला बंधनकारक नाही तुम्ही स्वायत्त आहात..…. ऑनलाइन रद्द ONLY ऑफलाईन जाहीर करा.
विद्यार्थ्यांचा #MPSC च्या ऑनलाईन परिक्षेला विरोध असताना सरकार एव्हढा हट्ट कुणासाठी करत आहे? विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन #MPSC ची ऑनलाईन परीक्षेचा निर्णय तातडीने रद्द करा.
@mpsc_office@bhimanwar
मा.@bhimanwar@mpsc_office ही परीक्षा 23 सप्टेंबर 2025 ला घेतली होती..अजून निकाल नाही याच कारण म्हणजे ऑनलाईन पेपर असून सुद्धा मुंबई मध्ये तुमच्यातील काही लोकांनी पेपर फोडला म्हणे बरोबर का? जे ऐकलं ते सत्य आहे का?8 महिन्यापासून निकाल नाही उमेदवार संख्या केवळ 1000-2000 तरीही अस का?
सेवाभरतीसाठी एक पूर्वपरीक्षा व तीत प्राप्त गुणांवर मुख्यपरीक्षेसाठी पात्रता हीच पद्धत #MPSC ने तूर्तास अवलंबणे बरे.'भिन्न सत्रांत ऑनलाईन पूर्वपरीक्षा व गुुणांंचे समानीकरण'या निर्णयाने आधीच असमाधानी असणारे उमेदवार आयोगाच्या दोन/तीन ऑनलाईन पूर्वपरीक्षांच्या सुुतोवाचाने अजूून विचलीत