@CJP_for_India आप युवा पिढीने ऐसें प्रश्न उठाने चाहिए कि, जिस जिस विषय में नागरिकों के उपर अन्याय हो रहा है I उदा. डेव्हलपमेंट, स्कूल-कॉलेज ऍडमिशन, सरकारी दप्तरो में लोगों को आनेवाली परेशा��ी, सरकारी अस्पताल में परेशानी इ.
"केलेल्या कारवाईबद्दल धन्यवाद. परंतु, माझी नमूद केलेली मुख्य समस्या पेनिनसुला कॉर्पोरेट पार्कच्या दुसऱ्या गेटमधून पीक अव्हर्सला (सकाळी ८:३०-१२:०० आणि संध्याकाळी ६:००-८:००) गाड्या सोडणे ही आहे.
यामुळेच मुख्य रस्त्यावर कोंडी होऊन अनावश्यक हॉर्नचा त्रास होतो. तरी वरळी वाहतूक विभागाने या वेळेत सतर्क राहावे आणि पेनिनसुला प्रशासनाला पीक अव्हर्समध्ये गाड्यांचे नियोजन दुसऱ्या गेटऐवजी मुख्य गेटवरूनच करण्यास सक्त ताकीद द्यावी, ही विनंती.
आपल्याकडून सातत्यपूर्ण देखरेखीची अपेक्षा आहे. धन्यवाद!"
"लोअर परेल येथ���ल पेनिनसुला कॉर्पोरेट पार्कच्या दुसऱ्या गेटमुळे ग. क.मार्गावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. पीक अव्हर्समध्ये (सकाळी व संध्याकाळी) परिस्थिती अत्यंत बिकट असते आणि सततच्या हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतोय. कृपया यावर तातडीने कारवाई करावी.
@MTPHereToHelp @CPMumbaiPolice @mybmc @MunCorpMumbai #TrafficJam #MumbaiTraffic
"प्रति,
@CPMumbaiPolice@JointCPTraffic@MTPHereToHelp@mybmc @MunCorpMumbai @IpsChaudhary
दिनांक २८/०४/२०२६ रोजी आप���्या ट्रॅफिक हेल्पलाइनवर तक्रार करून सुद्धा आजही तेच उत्तर मिळत आहे की 'दादर विभागाला कळविले आहे'. परंतु प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती जैसे थे आहे. पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्कच्या दुसऱ्या गेटमुळे लोअर परेल, ग. क. मार्गावर आजही प्रचंड वाहतूक कोंडी आणि हॉर्नचा आवाज सुरूच आहे.
केवळ 'कळविले आहे' या उत्तराने कोंडी सुटणार नाही, कृपया तातडीने प्रत्यक्ष कारवाई करून रहिवाशांना दिलासा द्यावा.
#MumbaiTraffic #TrafficJam #LowerParel #NoisePollution #MumbaiPolice #MTPHelp #RoadSafety #PeninsulaBusinessPark #BMC #CitizenProblem #ActionNeeded #DadarTraffic"
साहेब आपण सांगितल्याप्रमाणे मार्शलची सेवा उपलब्ध नसल्यामुळे आपण मुकादम तैनात करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याबद्दल धन्यवाद.
परंतु, काल रात्रीचा फोटो पाहता हे स्पष्ट होते की, सर्वात जास्त कचरा संध्याकाळी ६:०० ते रात्री ११:१५ या दरम्यान टाकला जातोय. बॅनर लावूनही लोक जुमानत नाहीत.
माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की, कनिष्ठ पर्यवेक्षकांना सूचना देऊन दुपारच्या मुकादमाची वेळ थोडी पुढे ढकलून त्यांना संध्याकाळच्या या संवेदनशील वेळेत तिथे उभे करावे. यामुळे प्रत्यक्ष कचरा टाक��ाऱ्यांवर वचक बसेल आणि आपली मेहनत वाया जाणार नाही. तसेच आपण बॅनरवर जी गाडीची वेळ दिली आहे त्यावेळेत गाडी, एक १५ मिनिटांसाठी तरी उपलब्ध करावी जेणेकरून लोकांचा समज होईल कि, पालिका दिलेल्या वेळेनुसार इथे गाडी उभी करत आहेत, तर आपण कचरा गाडीत टाकायला हवा ही मानसिकता तयार होईल व पालिकेच्या धोरणानुसार ��चरा मुक्त शहर होईल.
सहकार्याबद्दल धन्यवाद!🙏
विषय: कचराकुंडी हटवण्याबाबत तक्रार.
गणपतराव कदम मार्ग, इलेक्ट्रिक पोल नं. F60 येथील कचराकुंडीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही कचराकुंडी येथून कायमस्वरूपी हटवण्यात यावी ही विनंती.@mybmc@aboli_khadye #BMC#GSouthWard
@AshwiniBhide ग. क. मार्ग, लोअर परेल, पोल नं. F60 येथे आज सकाळी (दि. ०९. ०४. २०२६) रोजी महानगरपालिकेकडून बॅनर लावण्यात आला होता, परंतु त्या बॅनरला न जुमानता लोकांनी कचरा टाकला आहे. "नुसते बॅनर नकोत, आ��ा 'अॅक्शन' हवी! सायंकाळी ५ ते रात्री १२ या वेळेत @WardGSouth ने तिथे मार्शल तैनात करावेत. स्वच्छतेच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक दंड व्हायलाच हवा.
@s_juwle3@mybmc प्रत्येक वार्ड मध्ये महानगरपालिकेने अनधिकृत दुकानावर कारवाई करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. परंतु लोकांच्या जीवाची पर्वा कोणालाही नाही आहे. आपल्या महापौर मॅडमनी मोहीम चालू केली होती, पण पुढे काय? अजून फूटपाथ रिकाम्या झाल्या का? असा संतप्त सवाल नागरिकांना पडला आहे.
@mybmc@aboli_khadye@mybmcWardGS तरी माझी आपणास विनंती आहे कि, आपण आठवडाभरासाठी कचराकुंडीच्या जागेजवळ मार्शलची नेमणूक करावी अथवा सी. सी. टीव्ही चे नियोजन करावे. तेव्हांचं इथे कचरा टाकणे बंद होईल. जोपर्यंत आपणा��डून ठोस कारवाई केली जात नाही तोपर्यंत या जागेवर कचऱ्याचा ढीग पडतच राहणार.
@mybmc@aboli_khadye@mybmcWardGS मा. श्री. परमार साहेबांनी दुपारी कचराकुं��ी साफ असलेल्याचा फोटो काढला होता. तो मला सायंकाळी 6:57 वाजता पाठवला. मी रात्री 8:29 ला त्या जागेची पाहणी केली तेव्हा तिकडे पुन्हा कचरा टाकल्याचे माझ्या निदर्शनास आले. मी ताबडतोब याची माहिती श्री. परमार साहेबांना फोटो काढून पाठवली.
@mybmc@aboli_khadye@mybmcWardGS "धन्यवाद! माझी विनंती आहे की केवळ कचरा उचलून ही तक्रार बंद (Close) करू नये. BMC च्या 'डस्टबिन फ्री' धोरणानुसार ही कचराकुंडी पोल F60 येथून कायमस्वरूपी हटवण्यात यावी.रहिवाशांच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. RTI (92107) आणि CM हेल्पलाईन(0723186353)वर आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत."
@vkrntchavan धन्यवाद! रहिवाशांच्या आरोग्याचा हा प्रश्न खरोखरच गंभीर आहे. आम्ही RTI (९२१०७) आणि मुख्यमंत्री ह��ल्पलाईनवर (०७२३१८६३५३) तक्रार करूनही G-South वॉर्ड फक्त 'कचरा उचलतो' असे सांगून टाळाटाळ करत आहे. आपले सहकार्य मोलाचे आहे."
@TawdeRitu
नमस्कार मॅडम, गेली कित्येक पत्रक व ऑनलाईन तक्रार करून सुद्धा या कचऱ्याच्या संदर्भात कोणतेही अधिका���ी दखल घेत नाही. ग. क. मार्ग, लोअर परेल, पेनीनसुला कॉर्पोरेट पार्क समोर, इलेक्ट्रिक पोल नं. F-60 येथे हा कचऱ्याचा ढीग असतो त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण
@mybmc नमस्कार, ग. क. मार्गांवर इलेक्ट्���िक पोल नं ६० जवळ रोज संध्याकाळी ते रात्री पर्यंत हा एवढा कचरा जमा होत असतो. दुसऱ्या दिवशी bmc कर्मचारी सगळ्या बिल्डिंगच्या कचऱ्याचे डबे इथे आणून ठेवतात. त्यामुळे रुस्तम बिल्डिंग मधील रहिवाशांना दुर्गंधी सहन करावी लागते. यावर उपाय काढावा.
@mybmc नमस्कार, ग. क. मार्गांवर इलेक्ट्रिक पोल नं ६० जवळ रोज संध्याकाळी ते रात्री पर्यंत हा एवढा कचरा जमा होत असतो. दुसऱ्या दिवशी bmc कर्मचारी सगळ्या बिल्डिंगच्या कचऱ्याचे डबे इथे आणून ठेवतात. त्यामुळे रुस्तम बिल्डिंग मधील रहिवाशांना दुर्गंधी सहन करावी लागते. यावर उपाय काढावा.