मला ट्रोलिंग वगैरेचं काही वाटत नाही. मी त्याचं कधी भांडवलदेखील करत नाही. कारण ट्रोलर हे पापभिरू लाभार्थी असतात हे माझं पहिल्यापासूनचं ठाम मत आहे. त्यात ट्विटर हे माझं स्वतःला एक्स्प्रेस करायचं आवडतं माध्यम आहे. म्हणूनच ‘माणसानं उमदं असावं, पण उद्दाम नसावं’, असं असलं तरी मला ट्विटरवर उद्दामपणे अनेकांचा अहंगंड तपासण्याची आणि स्वतःचा व्यासंगी इझम् मांडण्याची खाज आहे. नाईलाज आहे! 😎
ता.क.- ट्विटरवरचा सोशल आशिष जाधव आणि पत्रकारितेला संपादक-पत्रकार आशिष जाधव ह्या दोन भिन्न बाबी आहेत; त्यांचा एकमेकांशी काहीयेक संबंध नाही. ऊलट न्यूजमॅन म्हणून फार पॅशनेटली पत्रकारिता करत असल्याने ट्विटरवर मोकळाढाकळा एक्स्प्रेस होतो, तो तेवढाच काळ काय तो बातम्यांशिवायचा स्वतःचा असतो.
शेकडो वर्षांपासून अनेकानेक आक्रमणं आली तरी
आम्ही इथेच आहोत
न् पुढेही राहू..!
आता तुझा इतिहास बघ-
थोडं संकट आलं की ढुंगणाला पाय लावून पळणारे तुम्ही
आज मुंबईत असला म्हणून
उद्याही असाल ह्याची खात्री काय ?!
म्हणून म्हणतो -
Mumbai IS..WAS..and WILL ALWAYS be a Marathi City..💪