मी देखील पुण्यामध्ये राहत असल्यामुळे, येथे गणेशोत्सव कसा साजरा झाला पाहिजे याबद्दल माझेही एक मत आहे. अर्थात, माझी बुद्धी अत्यंत अल्प असल्यामुळे मी येथे कोणालाही 'असेच करा' असे सांगत नाहीये, तर फक्त मला जे काही मनापासून वाटत आहे ते इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
सध्या गणेशोत्सवात डीजे किंवा ढोल-ताशा असले पाहिजेत की नाहीत, हा मुद्दा बराच गाजत आहे.
परंतु, माझे वैयक्तिक मत असेच आहे की डीजे पूर्णपणे काढून टाकले पाहिजेत आणि ढोल-ताशा देखील अत्यंत मर्यादित स्वरूपातच असायला हवेत.
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला, तो यासाठी की लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील समन्वय वाढावा आणि देशभक्तीचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता यावेत. परंतु, ज्या वेळी दर पन्नास मीटरवर एक मंडळ आपला गणपती बसवते, तेव्हा 'एकी'पेक्षा 'चढाओढ' जास्त महत्त्वाची झाली आहे, असेच खेदाने वाटते.
पूर्ण पुण्यामध्ये अत्यंत योग्य नियोजन करून सार्वजनिक गणपती असावेत. उदाहरणार्थ, प्रत्येक विभागासाठी एकच गणपती असावा. मानाचे पाच गणपती आणि दगडूशेठ हलवाई गणपती वगळता, उर्वरित पुण्यामध्ये प्रत्येक विभागाप्रमाणे एक किंवा जास्तीत जास्त दोन सार्वजनिक गणपती असावेत. जसे 'पुणे ४११००१' हा पिनकोड जिथे आहे तिथे एक गणपती, या पद्धतीने प्रत्येक पिनकोड एरियासाठी एक किंवा दोन गणपती.
यामुळे काय होईल?
1. लोकांची गर्दी आपोआप विभागली जाईल.
2. प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर मंडप उभारल्यामुळे जी वाहतुकीची अडचण होते, ती जवळपास संपुष्टात येईल.
3. गणपती विसर्जनाच्या वेळी लागणारा २४ ते ३० तासांचा वेळ कमी होईल आणि मिरवणूक लवकर पूर्ण होईल. त्यामुळे त्यात काही ढोल-ताशा पथके असली तरीही, त्यातून होणारा त्रास प्रचंड प्रमाणात कमी होईल.
4. सध्या जेवढी गणेश मंडळे आहेत आणि त्यातून वर्गणीच्या स्वरूपात जो पैसा गोळा होतो, तो केवळ त्या छोट्या-छोट्या मंडळांवरच खर्च होतो. जर प्रत्येक विभागाचा एक किंवा दोनच गणपती असतील, तर गणपतीची आरास आणि देखावे अत्यंत उत्तम व भव्य स्वरूपात करता येतील. गणपतींची संख्या कमी असल्यामुळे, मंडळांना त्यांच्या सजावटीसाठी आणि एकूणच देखाव्यासाठी अत्यंत भव्य पद्धतीने नियोजन करता येईल.
सध्या अनेक छोटी गणेश मंडळे आहेत, जिथे काहीच देखावा नसतो किंवा केवळ एक साधा मंडप टाकून गणपतीची मूर्ती बसवली जाते. त्यापेक्षा, एकाच गणपतीचा उत्सव अत्यंत भव्य आणि दिमाखदार पद्धतीने साजरा करता येईल. शिवाय, उरलेला निधी त्या विभागातील स्वच्छता आणि इतर सार्वजनिक सोयी-सुविधांवर खर्च करता येईल. पूर्ण पुण्यामध्ये एका गणेश मंडळापासून दुसऱ्या गणेश मंडळापर्यंत अत्यंत सुंदर कॉरिडोर्स तयार करता येऊ शकतील.
डीजे वगैरे गोष्टींवर सध्या प्रत्येक छोटे मंडळ जो खर्च करते, त्याऐवजी या मोठ्या रकमेचा वापर आपल्याच बांधवांसाठी आणि त्या-त्या भागाच्या सुशोभीकरणासाठी करता येऊ शकतो.
माझ्या मते, खऱ्या अर्थाने आपल्यात 'एकी' उरलेली नसल्यामुळेच इतकी जास्त गणेश मंडळे तयार झाली आहेत.
डीजे किंवा ढोल-ताशाचे सतत २४ तास होणारे आवाज (रात्री बारानंतर ते बंद केले जातात याची मला कल्पना आहे) कोणत्याही वृद्ध व्यक्तीसाठी, लहान बालकांसाठी किंवा ज्या घरात आजारी व रुग्ण व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी नक्कीच त्रासदायक ठरतात. जो गणपती विघ्नहर्ता आहे, त्या गणेशाची पूजा करताना आपल्यामुळे बाकी कोणासाठीही विघ्न निर्माण होऊ नये, अशी स्वाभाविक इच्छा असणे हे प्रत्येक गणेश भक्ताचे ध्येय असले पाहिजे.
"तुम्ही कानात बोळे घालून बसा किंवा एक दिवसासाठी पुणे सोडून बाहेर जा," असे सल्ले केवळ सामाजिक भान नसलेले लोकच देऊ शकतात.
प्रत्येकाने फक्त असे इमॅजिन करून बघावे की, आपल्या घरात हृदयविकार असलेले ७०-७५ वर्षांचे आजोबा/आजी आहेत किंवा चार-पाच महिन्यांचे बाळ आहे, आणि आपल्या घराबाहेर कोणी सतत दहा-बारा तास असा दणदणाट केला, तर आपल्याला खरोखर कसे वाटेल?
अर्थात, हे फक्त माझे विचार आहेत. मी अत्यंत क्षुल्लक व्यक्ती असल्यामुळे माझ्या विचारांची किंमत देखील तशी क्षुल्लक आणि कवडीमोलच आहे. त्यामुळे अशा गोष्टी कधी प्रत्यक्षात कृतीत येतील, अशी मला अजिबात अपेक्षा नाही.
मी स्वतःला 'गणेशभक्त' म्हणवून घेणार नाही, कारण ती एक खूप महानतेची आणि गर्वाची गोष्ट ठरेल. मी एक अतिसामान्य मनुष्य आहे, जो केवळ आणि केवळ गणेशाच्या कृपेने आपले आयुष्य जगत आहे असेच मानतो. त्यामुळे मी नास्तिक तर नक्कीच नाही, किंवा डाव्या विचारांचा देखील अजिबात नाही.
फक्त जनतेमध्ये 'एकी' कशामुळे तयार होऊ शकते, असे माझ्या अविकसित आणि अल्प बुद्धीला वाटले, ते मी येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
बाकी सर्व जे काही आहे ते श्री गणेशाच्या इच्छेनेच होईल, यात शंकाच नाही! 🙏🙏
मयूर
This clip is from the 2026 Asian U23 Athletics Championships, held at the Sport Development Center Stadium in Ordos, Inner Mongolia, China, from 9–12 July 2026.
Shravani Sangle, a 20-year-old sprinter from Maharashtra ran the final leg for India in the mixed 4×400 m
China led going into the closing metres, & Shravani came from behind to pass China’s anchor just 0.10 seconds ahead.
I was holding my breath watching that final lap. It didn’t look even conceivable that she would be able to catch up.
But Shravan wasn’t willing to see finishing second to a powerhouse like China as inevitable & acceptable.
She didn’t see the yawning gap as an impossibility.
She was practising the art of the possible…
Giving up wasn’t acceptable.
Shravani is my #MondayMotivation
You really want to fight the information war? But then why don't we follow such positive channels by the lakhs??? The left follows negative channels immediately. Let's do this.
Checked the books out. This is a really good collection. Anyone interested in studying Dharma would be benefitted by this. Sharing for wider reach. Good gesture @da_vyas