1. हृदयद्रावक घटना..! पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू, तर काही जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करतो.
#kondhawa#rip#PuneWallCollapse
श्री #शिवछत्रपती_महाराज यांची आज #जयंती. शिवजयंतीचा हा दिवस आपल्यासाठी कोणत्या सणापेक्षा कमी नाही. म्हणूनच हा दिवस आपण #शिवजन्मोत्सव म्हणून साजरा करतो. #शिवाजी_महाराज हे महाराष्ट्राचा मान आहेत, अभिमान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा. #शिवजयंती
या कठीण परिस्थितीत सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. देशाची #एकात्मता व #शांतता अबाधित राहण्यासाठी आपण सर्व एक आहोत हे दाखवून देण्याची ही वेळ आहे.
#जम्मू_काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये दशहतवाद्यांकडून सीआरपीएफच्या ताफ्यावर करण्यात आलेला आयईडी #बाँबहल्ला व #गोळीबार ही अतिशय संतापजनक बाब. अशा भ्याड हल्ल्याचा तीव्र #निषेध.