राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि महाराष्ट्र ���ाज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. @ChakankarSpeaks ताई यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
राज्य महिला आयोगाची अध्यक्ष या नात्याने गेल्या सव्वा दोन वर्षात,बालविवाह,विधवा प्रथा मानवी तस्करी,कौंटुबिंक हिंसाचार,महिला अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करत प्रत्येक जिल्ह्यात जनसुनावणी,ई सायबर सुरक्षा मोहिम,टोल फ्रि क्रमांकांच्या माध्यमातून तात्काळ दाखल घेत कारवाई,जनता दरबाराच्या माध्यमातून हजारो पिडीतांना न्याय,२२ हजार केसेसचा निकाल,भरोसा सेल,दामिनी पथक यांच्या माध्यमातून युवतींची सुरक्षा,नोकरदार महिलांना अंतर्गत कमिटीच्या माध्यमातून सुरक्षाचे आत्मबळ,वयात येताना मुलींसाठी "सॅनिटरी बॅंक" तृतीयपंथीयसाठी स्वतंत्र आरोग्य व्यवस्था,अशा एक ना अनेक उपक्रम आ��ोगाने राबविले.यामुळे ३० वर्षात माहित नसलेला आयोग सव्वा दोन वर्षात शहरी,ग्रामीण भागाबरोबरच वाड्यावस्त्यावर पोहचला,हि समाधानाची बाब...
कोठेही,कोणतीही घटना घडली की,आयोगाच्या अध्यक्षा कोठे आहेत असं विरोधक बोलतात तेव्हा खात्री पडते की काम उत्तम चालू आहे,कारण विरोधकांनाही विश्वास वाटतो की आयोगाने लक्ष घातले तर नक्की केस निकालात निघेल हि कामाची पावती .
इतकं यशस्वी झालेल्या आयोगाच्या वती���े एका ग्रामीण भागातील कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना,आयोगाकडे येणाऱ्या घटनांमध्ये कौटुंबिक हिसांचाराच्या घटना या सर्वाधिक प्रमाणात असतात आणि यामध्ये सासरी गेलेल्या लेकीच्या संसारात आई जेव्हा जास्त लक्ष घालते तेव्हा कौंटुबिक कलह निर्माण होतात तसंच सासरी गेलेली लेकही माहेरी जास्त लूडबूड करत��� तेव्हा माहेरी वाद निर्माण होतात त्यामुळे आईनेही लेकीच्या संसारात फार लुडबूड करू नये आणि लेकीनेही माहेरी फार लुडबूड करू असं वक्तव्य अतिशय जाणिवपुर्वक महाराष्ट्रभर दौरा करून,कौन्सिलींग केलेल्या केसेसमधून,आलेल्या अनुभवातून मी सांगितले.
यावर काहींनी अर्धवट ज्ञानाच्या वापर करून,अर्धवट माहितीच्या आधारे,अर्धवट ट्विट करून मुक्ताफळे उधळली (स्क्रिप्ट एकाच कार्यालयातून सगळ्यांना दिली असल्यामुळे एकच वाक्यरचना आहे) त्याखाली असलेल्या अश्लाघ्य व अश्लील कमेंट वाचण्यालायकही नव्हत्या,आपण दुसर्याला ज्ञान शिकविण्याच्या तोऱ्यात एका महिलेच्या अब्रुचे धिंडवडे काढतोय यातही यांना अघोरी समाधान.
ध चा म करत,मी न वापरलेले वाक्य माझ्या तोंडी देऊन माझी व संविधानिक पद असलेल्या आयोगाची जी गरिमा आहे त्यावर शिंतोडे उडविण्याचा जाहिर कार्यक्रम केला,याबद्ल जी मा��हानी व बदनामी झाली त्याविरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.
मात्र एक गोष्ट समजली नाही,मी संपुर्ण भाषणात कोणाचेही नाव घेतले नाही तरीसुद्धा ट्विट करणाऱ्या ज्ञानी लोकांनी कोणाचेतरी नाव लिहून भलं मोठं ट्विट लिहिले आहे..बहुतेक यांनीच ट्विटमधून बदनामी करण्याचा विडा उचलेला दिसतोय…..असो
आपल्या सहकाऱ्यांना खुश करण्यासाठी खोटे ट्विट करून आपल्या ढासळलेल्या बुद्धिमतेचे प्रदर्शन मांडले त्यांच्यासाठी हा खरा व्हिडीओ पोस्ट करत आहे.
#राज्य_महिला_आयोग
गेली तीन चार दिवसांपासूनच आजच्या जन्���दिवसासाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत, मी माझ्या आयुष्याची सामाजिक व राजकीय वाटचाल आपल्या सर्वांच्या पाठबळावर व वडीलधाऱ्यांच्या आशिर्वादाने पार करीत आहे. प्रवास संघर्षाचा असला तरी जोतिबा म्हणून लाभलेली पतीची साथ,कुटूंबातील पाठीराखे, माझी महाराष्ट्रातील भली मोठी संघटना, सर्वच पदाधिकारी आणि राजकीय वरिष्ठ मार्गदर्शक या सगळ्यांचेच शुभचिंतन यामुळे मी हा प्रवास लीलया पेलू शकते. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांचा नम्रपुर्वक स्विकार करते, आपले हे नाते दिवसेंदिवस वृध्दींगत होवो हिच प्रार्थना..!