हिंजवडी परिसरात बेदरकार वाहनाने आणखी एका तरुणीचा बळी घेतला. लक्ष्मी चौकात अवजड वाहनांखाली चिरडून लोक मरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे.या भागातील बांधकाम व्यावसायिकांची डंपर, मिक्सर अशी अवजड वाहने या भागातून सतत ये जा करीत असतात. त्यांचा वेग, वेळा यांचे योग्य नियोजन करण्याबाबत सातत्याने या भागातील नागरीक पाठपुरावा करीत आहेत. परंतु त्यांची दखल घेतली जात नाही, हे अतिशय दुःखद, दुर्दैवी आणि संतापजनक आहे. शासन व प्रशासनाच्या या दुर्लक्षाची किंमत नागरीकांना आपले प्राण गमावून द्यावी लागतेय ही अतिशय खेदजनक आहे. शासनाने आता तरी याची गांभीर्याने दखल घेऊन या भागातील वाहतूकीचे नियमन करावे. यासोबतच केवळ वाहनचालकांवर कारवाई करुन भागणार नाही तर ज्या बांधकाम व्यावसायिकांनी ही वाहने मागविली त्यांच्यावरही कठोरात कठोर कारवाई करावी.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@midc_india@OfficialPMRDA@PCcityPolice