@AnujaDhakras21 पत्रकारांवर हल्ले करणे आणि लूटमारी करणे चूकच आहे...
पण ते खरेच आंदोलक होते का?की भाजपाने आणलेले भाड्याचे टट्टू होते हाही विचार करणे गरजेचे आहे! I can understand, आपण दोन्ही बाजू मांडत आहात...मग त्या बरोबर असोत वा चूक....त्याबद्दल काहीच दुमत नाही.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीत जमा होणारे दान, देणगी स्वरूपात येणारा निधी, दागदागिने यांचा कुठलाही धड हिशोब राखला जात नाहीये, आणि त्यात अपहार झाल्याची स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीनेच त्यांच्या प्राथमिक अहवालात याची पुष्टी केली, काही आरोपी पकडले गेले.
बातमी आलेल्या दिवसापासून यावर काही लिहावं असं वाटत होतं परंतू प्रकरण कसं पुढे सरकतंय आणि बातमीच्या ओळींमागे काय लपलंय ते जरा पहात होतो .
या विषयवार देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांचं प्रसिद्ध मौन बाळगलं आहे. श्री. नरेंद्र मोदीच काय पण भारतीय जनता पक्षाचे सरकारमध्ये मंत्री पदावर असलेली एकही व्यक्ती अवाक्षर काढत नाहीये. प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन जे सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झाले त्यांना या अपहाराविषयी काहीच वाटत नाही ? दुसऱ्या पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची पळवापळवी करता करता या सगळ्याची इतकी सवय झाली किंवा मन कोडगं झालंय की देवाच्या दारात झालेल्या भक्तांच्या दानाच्या पळवापळवीचं पण काही वाटणं बंद झालं आहे का ? का अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथेच २०२४ मध्ये भाजपला लोकांनी नाकारले म्हणून रामाला पुन्हा वनवासात ढकललं जात आहे?
अयोध्येत राममंदिर उभं राहिलं तेंव्हा या देशातील कोट्यवधी हिंदूंना परमोच्च आनंद झाला होता. आपल्या मर्यादापुरुषोत्तमाच्या जन्मस्थानाच्या जागी देऊळ पाडून, काही शतकांपूर्वी तिथे मस्जिद उभारली गेली. पुढे अनेक शतकं हिंदूंच्या मनाला या गोष्टीचा खेद होता. पुढे १९८० च्या दशकांत विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी रामजन्मभूमी आंदोलन उभं केलं. आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेसाठी देशातील हिंदू या आंदोलनाच्या मागे उभा राहिला. सामान्य हिंदू माणसांनी या आंदोलनाला आर्थिक बळ दिलं, करसेवकांनी सेवा दिली, इतकंच काय असंख्य करसेवकांचा जीव यांत गेला. शरयू नदीत तरंगणारी त्यांची शवं आज देखील स्मरणात आहेत.
हे आंदोलन कुठल्या एका संघटनेचं नव्हतं किंवा फक्त भारतीय जनता पक्षाचं नव्हतं (जरी त्यांचा तसा दावा असला तरी ), त्यात शिवसैनिक पण मोठ्या संख्येने सहभागी होते, इतकंच नाही तर अग्रेसर होते. पण हिंदू पुनुरुत्थानासाठी झालेल्या आंदोलनाचं श्रेय आपण घ्यावं असं त्यावेळच्या एकाही नेत्याला वाटलं नाही, अगदी बाळासाहेबांना पण वाटलं नाही.
पुढे सर्वोच्च न्यालयालयाने निवाडा दिला. मशिदीच्या जागी राम मंदिर उभारायचा मार्ग मोकळा झाला. पण मंदिरात जेंव्हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची वेळ आली तेंव्हा मात्र पंतप्रधानांनी एकट्याने त्याची पूजा केली. तेंव्हा गाभाऱ्यात मात्र इतर कोणीही नव्हतं. जर देवावर तुमचा विशेषाधिकार असेल तर त्याच देवाच्या हुंडीतल्या अपहाराबद्दल बोलण्याची, लोकांना आश्वस्त करण्याची तुमची जबाबदारी नाही का ?
मुळात अयोध्येतील राममंदिर हे या देशातील कोट्यवधी हिंदूंचं, साधू संतांचं आणि करसेवकांचं आहे. इथे देणगी म्हणून किंवा श्रद्धा म्हणून लोकं जेंव्हा पैसे किंवा दागिने, सोनं अर्पण करतात तेंव्हा त्या पैशाला कष्टाच्या घामाचा गंध असतो आणि श्रद्देचं कवच असतं. सोनं, दागिने अर्पण करताना असंख्य महिला भक्तांनी त्यांच्याकडे चालत आलेलं स्त्रीधन अर्पण केलेलं असू शकतं. जे काही आहे ते श्रीरामामुळे आहे या भावनेतून भक्तांनी दाखवलेली ही कृतज्ञता.
परंतु मला एक गोष्ट समजत नाही की या आपल्या सर्व देवी देवतांच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना करताना म्हणे त्यात प्राण फुंकले जातात आणि मग प्रतिष्ठापना झाल्याचे सांगतात. त्या आमच्या देवी देवतांच्या हातात तलवारी, धनुष्य बाण, गदा, चक्र वगैरे शस्त्रं जी असतात तेच या नराधमांचा बंदोबस्त का नाही करत ? की या प्राण असलेल्या भक्तांमधे दगड फुंकला आहे ? आपण श्रद्धेने दिलेले दान देवाला न जाता विश्वस्त आणि पुजाऱ्यांच्याच खिशात आणि घशात जातं हे पुन्हा एकदा या निमित्ताने भक्तांना समजलं असेल असं मी मानतो ! देवी देवतांची पूजा करा पण या विश्वस्तांची आणि या मार्गाने राजकारण करणाऱ्याची पूजा करू नका आणि कोणतही (दान ) या लोकांच्या पदरात टाकू नका !
भारतातील अनेक मंदिरांची हीच कथा आहे ! आधी परकीयांनी हजारो वर्ष इथली मंदिरं लुटली आता त्याचा बदला म्हणून की काय हिंदूच आपली मंदिरं लुटत आहेत का ? आणि तरीही देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री किंवा केंद्रातील एकही नेता त्यावर बोलायला तयार नाही ? का अयोध्येत ऐवढा आटापिटा करून निवडणुकीच्या तोंडावर ( उद्घाटन ) करून देखील ना अयोध्येत ना देशात कुठेच फायदा झाला नाही म्हणून याकडे दुर्लक्ष ? अर्थात नेहमी प्रमाणे यांत पण शहा - काटशहा यांचं राजकारण सुरु आहेच ! उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यावेळेस हा मुद्दा स्वपक्षातले योगींचे विरोधक नक्की उचलतील. मग यातून योगी आदित्यनाथ यांची आपोआपच कोंडी होईल, झालंच तर त्यांचं काहीसं नुकसान होईल आणि त्यांच्या पंतप्रधान पदाच्या महत्वकांक्षाना आपोआपच खीळ बसेल. ही एक शक्यता जरी असली तरी सध्या भारतीय जनता पक्षात 'पुढे कोण' यावरून जो सुप्त संघर्ष सुरु आहे त्याचे पडसाद कुठेही उमटताना दिसू शकतात . अगदी खासदार, आमदार फोडाफोडी पासून ते मंदिरां पर्यंत ! देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सध्या विरोधी पक्षांची घरं कशी फोडता येतील आणि लवकरात लवकर आपल्याला पंतप्रधानाच्या खुर्चीत कसं विराजमान होता येईल याची धुरकट स्वप्न पाहत बसलेत म्हणून रामाच्या गृहात काय घडतंय याला त्यांच्या लेखी काही किंमत असण्याचे कारणच नाही !
लोकांच्या श्रद्धेला जो तडा गेला आहे त्याचा हिशोब हिंदू जनतेला मिळाला पाहिजे. हे सगळं होत असताना ज्यांनी ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. पंतप्रधानांचे हेतू किमान या बाबतीत अजून तरी स्वच्छ आहेत असं मी मानतो, पण फक्त हेतू स्वच्छ असून उपयोग नाही तर तुमच्याकडून कृतीची अपेक्षा आहे. अन्यथा तुम्ही आणि तुमच्या पक्षाने पुन्हा एकदा सिंहासनाच्या मोहापायी रामाला वनवासात आणि राम भक्तांना शरयू नदीत ढकललंत असंच म्हणावं लागेल.
राज ठाकरे ।
ज्या खासदारांनी पक्ष बदलला आहे किंव्हा ज्या लोकप्रतिनिधींना निवडून आल्यावर पक्ष बदलायचा आहे त्यांनी public referendum अर्थात जनमत चाचणी करून घ्यावी म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल आपले लोकप्रतिनिधी ही हिम्मत दाखवतील का ?
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, 'आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं'. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय.
आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे !
खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे.
या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना 'मुंबई' हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय.
आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. 'मुंबई' नको 'बॉंबे'च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच !
आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं !
राज ठाकरे ।
दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, ‘दीपोत्सव’ सोहळा साजरा होतो. आज दीपोत्सवाचे उदघाट्न माझे बंधू आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय यांनी केलं... त्या सोहळ्याची क्षणचित्रं...
#दीपोत्सव२०२५
मागच्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक निवडणुकांपासूनच, राज्य निवडणूक आयोगाच्या पारदर्शीतेबद्दल लोकांच्या आणि राजकीय व्यवस्थेच्या मनावर शंकेचं सावट आहे.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका यातरी किमान पारदर्शी व्हाव्यात आणि निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे हे दिसलंच पाहिजे. पण आत्ता निवडणूक आयोगाच्या कारभारात काही त्रुटी आहेत…
या त्रुटी दूर व्हायलाच पाहिजेत... त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पारदर्शी व्हायला पाहिजेत असं वाटणाऱ्या सगळ्या नेत्यांचं शिष्टमंडळ गेले २ दिवस निवडणूक आयोगाला भेटत होतो. आम्ही आमचं आणि जनतेचं म्हणणं निवडणूक आयोगासमोर मांडलं. त्यानंतर आम्ही सर्वानी माध्यमांशी संवाद साधला. त्यातील मी मांडलेले मुद्दे….
निवडणूक आयोग केवळ निवडणूक घेतात आणि राजकीय पक्ष निवडणूका लढवतात, मग राजकीय पक्षांना जर निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवत नसेल तर पहिला घोळ इथे आहे
२०२४ साली ज्या निवडणुका झाल्या त्याआधीच्या यादीत मुलांच्या वयापेक्षा वडिलांचे वय कमी कसे?
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या मतदारयादीत अनेक मतदारांची नावं आहेत मात्र फोटो नाहीत.
राज्य निवडणूक आयेगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगावर ढकलली
जोपर्यंत मतदार याद्यांमध्ये पूर्णपणे सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका अशी मागणी आम्ही निवडणुक आयोगाकडे केली आहे. त्यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतं ते पाहू आणि आम्ही पुढचा निर्णय घेऊ
जेव्हा खोट्या यादीची बातमी माध्यमांवर येते नंतर संबंधित नावं मतदार यादीतून गायब होतात त्याबद्दल निवडणूक आयोगाला माहिती नाही. जी नावं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून गायब झाली त्याची माहिती आयोगाकडे नसेल तर ती नावं कोण काढतंय आणि नवी नावं कोण टाकतंय याचा तपास करावा लागेल
आपण कोणाला मतदान करतो हे गोपनिय असतं… मतदार कसे गोपनीय असतील? मतदान केंद्रावर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज निवडणूक आयोग बघू शकतं मग आम्ही का नाही बघू शकत?
या सगळ्या गोष्टींमध्ये निवडणूक आयोग लपाछपी का करतंय हेच मला कळत नाहीये.
२०२२च्या यादीत जाहीर केलेल्या यादीमध्ये मतदारांचे फोटो आहेत, मग आत्ता जाहीर केलेल्या यादीतून मतदारांचे फोटो का काढून टाकले? हा घोळ निवडणूक आयोग का करतंय?
या देशातील ही पहिली निवडणूक नाही, याआधीच्या कोणत्याही निवडणूकीच्या वेळेस असे मुद्दे आले नाहीत मग, हे या निवडणूकीच्या वेळीच का आले?
निवडणूक यादीत घोळ आहेत, ते घोळ आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठेवलेले आहेत. त्यावर निवडणूक आयोगाने कार्यवाही करून घोळ सोडवावेत इतकीच आमची इच्छा आहे.
या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्या तरीही महाराष्ट्रात शांतता होती. कोणीही जल्लोष केला नाही हे कसलं द्योतक आहे?
२०१९ साली याच विषयावर मी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळीही राज्यातील सर्व विरोधी पक्षांचे नेते पत्रकार परिषदेत सहभागी होते. त्यावेळी अजित पवारही तिथे उपस्थित होते. त्यांनीही आज यायला हवं होतं.
#निवडणूकआयोग #मतदारयादीघोळ
#ElectionCommission
#TransparencyInElection
#VoterListError
ठाकरे हा ब्रँड नाही विचार आहे.ब्रँड हा बेपारी लोक उभा करतात तर विचार हा संघर्षातून उभ्या झालेल्या चळवळीतून निर्माण होतो.पैसे ओतून ब्रँड तयार करता येतो पण चळवळ नाही.पैसे संपले की ब्रँड संपतो पण विचार नाही.तुमचा बेपारी ब्रँड संपणार पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही--जय महाराष्ट्र
ट्रम्प पासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न विचारणाते आम्हाला सल्ले देतात की प्रश्न विचारू नका .मग आमचाही सल्ला आहे ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये .जे बोलायचं आहे ते तुमचे आणि आमचे पक्ष प्रमुख बोलतील तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा
मराठी माणसासाठी पायही चाटू वेळ पडल्यास मराठी माणसासाठी पाय हीं छाटू आणि मराठी माणसाच्या नावावर स्वार्थ साधायचा प्रयत्न केलात तर अद्दल ही घडवू. ...राजसाहेब ठाकरे यांचं फेब्रुवरी 2017च्या भाषणातला अंश