आमचे नेते सर्वसामान्यांचा बुलंद आवाज भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐😇 @meNeeleshNRane@shirvalkarannd
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि कृषी विभागाने संयुक्त पाहणी केल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात अशी कोणतीही पाहणी झालेली नाही. सभागृहात चुकीची माहिती देण्यात आल्याबाबत संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. तसेच, कृषी विद्यापीठाची नेमकं काय करतोय, त्यांनी श्वेतपत्रिका काढा.
— मा. निलेश राणे, आमदार
#Shivsena #EknathShinde
चार अक्षरे स्वाभिमानाची, साठ वर्षे शिवसेनेची🚩🚩🚩
शिवसेना हिरक महोत्सवी वर्धापन दिनाच्या सर्व कडवट शिवसैनिकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
हिंदुत्वाच्या परंपरेचा सण साजरा करण्यासाठी भेटूयात...
आज १९ जून २०२६, सायंकाळी ५ वाजता,
नेस्को एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव, मुंबई.
#Shivsena #EknathShinde #vardhapandin
६० वर्षे
जाज्वल्य हिंदुत्वाच्या अभिमानाची
मराठी माणसाच्या स्वाभिमानाची
महाराष्ट्र धर्म रक्षणाची
शिवसेनेच्या गौरवशाली वाटचालीची ...
शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन!
दिनांक - १९ जून, २०२६
वेळ - सायंकाळी ५.०० वाजता
ठिकाण - हॉल नंबर ५, नेस्को एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव (पू.), मुंबई
#Shivsena #EknathShinde #vardhapandin
नियम धाब्यावर बसवून रात्री ४ वाजे पर्यंत दर बुधवार शुक्रवार शनिवार मोठ्या आवाजात सुरू असणाऱ्या ‘Mitron’ पब turbhe ला स्पेशल परमिशन दिली गेली आहे का?
यावर कार्यवाही कधी होणार ?
•सदर विषयी लवकरच कायदा उल्लंघन संबंधी गृह विभागात तक्रार करणार
@CMOMaharashtra@Navimumpolice
आज कुडाळ येथे माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित राहून आपणा सर्वांच्या मनापासून दिलेल्या शुभेच्छा स्वीकारताना खूप आनंद आणि समाधान वाटले. 🙏
याप्रसंगी कोकणचे भाग्यविधाते तथा खासदार सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब, आई सौ. नीलम राणे, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेशजी राणे साहेब यांची उपस्थिती लाभली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी, निस्सीम प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो.
काल आपण सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो.
आपल्या सर्वांचा स्नेह व आशीर्वाद सदैव पाठीशी राहो 🙏
आपला
निलेश नारायणराव राणे
आमदार, कुडाळ-मालवण विधानसभा.
मंत्री गणेश नाईक हे वनमंत्री आहेत,
मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे ज्यामुळे जनावरांचा त्रास होतो, कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास या जनावरांच्या त्रासामुळे सोडलेली आहे.
अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नाही, फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ला पैसे नाहीत, साधनसामुग्री नाही, DFO दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे त्यांचा उपयोग ग्रामीण भागाला होत नाही.
लाकूडतोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालते की ती वनमंत्र्यांच्या परवानगीने चालली आहे का असा प्रश्न पडायला लागलाय.
वन राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे??
जसे नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता जंगल पोखरले जात आहेत.
अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी देत नाही ज्यामुळे ग्रामीण भाग विकासाच्या योजनांपासून वंचित राहतो.
वरील सगळे विषय गंभीर आहेत पण सध्या वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत.
राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. हा अपघात केवळ एका व्यक्तीचा नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा मोठा धक्का आहे.
स्पष्टवक्ता, निर्णयक्षम आणि सामान्य माणसाच्या दुःखाशी नाळ जोडणारा असा एक दिलदार नेता महाराष्ट्राने गमावला आहे. त्यांच्या कर्तृत्वाने, नेतृत्वाने आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीने त्यांनी कायम जनमानसात स्थान मिळवले.
या दुःखद प्रसंगी परमेश्वर त्यांच्या परिवाराला हे असह्य दुःख पेलण्याची ताकद देवो, ही प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
🚩 महायुतीचा जनसंवाद – विश्वास, विकास आणि विजयाचा निर्धार! 🚩
शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी शिवडी, वरळी, सायन कोळीवाडा विधानसभेतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वार्डनिहाय सदिच्छा भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला.
या भेटीदरम्यान नागरिकांच्या समस्या, अपेक्षा व विकासाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करत
➡️ महायुती सरकारने केलेली विकासकामे.
➡️ रोजगार, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय व सुरक्षित भविष्याचा रोडमॅप.
➡️ मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीची ठाम भूमिका.
यांची माहिती नागरिकांना दिली.
यावेळी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री मा. श्री. भरतशेठ गोगावले, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. आशिषजी शेलार, माजी मंत्री व आमदार श्री. दीपकजी केसरकर, राज्यसभा खासदार श्री. मिलिंद देवरा, आमदार श्री. प्रसाद लाड, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा व आमदार सौ. चित्राताई वाघ, शिवसेना उपनेते डॉ. राजू वाघमारे, प्रवक्त्या सौ. शायना एनसी, शिवसेना सचिव श्री. सुशांत शेलार तसेच शिवडी, वरळी, सायन कोळीवाडा विधानसभेतील महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
💬 “विकासासाठी, सुरक्षिततेसाठी आणि सक्षम मुंबईसाठी महायुतीला मतदान करा” असे आवाहन यावेळी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी नागरिकांना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे हे आपल्या संचालक मंडळासह शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेला सहकार क्षेत्रात सर्वोत्तम बनविण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. ही बँक गेली अनेक वर्षे आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे राज्यात अव्वल राहिली आहे. राज्यस्थरावरील विविध पूरस्कार हे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने मिळवले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, शेती पूरक संस्था, सहकारी संस्था यांच्या हिताच्या दृष्टीने जिल्हा बँक कार्यरत आहे.
आता सगळं चांगलं चालू असताना महायुतीमध्ये चांगलं वातावरण राहो यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. वैयक्तिक अजेंडा यामध्ये येता कामा नये, बसून चर्चेमधून मार्ग निघू शकतो पण टीका करायची काही गरज नाही.
जवळपास 24 तास होत आले तरी अजून कालच्या मालवण प्रकरणावर पोलिसांनी किंवा निवडणूक आयोगाने कसलीही भूमिका घेतलेली नाही.
एफ आय आर देखील झालेली नाही.
त्यावर संबंधित आरोपी सांगत आहेत की त्या बागेत त्यांच्या व्यवसायाचे पैसे होते,
जर व्यवसायाचे पैसे होते तर तिथेच ते पैसे कुठून आले हे पटकन सांगायला पाहिजे होतं,
त्या व्यक्तीचं नाव आणि झालेला व्यवहार हा जागेवर सांगायला हवा होता, इन्कम टॅक्स एन्ट्री, जीएसटी नंबर या सगळ्या बाबत खुलासे करावे लागणार. नुसतं तो पैसा व्यवसायातला होता सांगून होणार नाही पुरावे सादर करावे लागतील.
🙏🏻
कोकणामध्ये पावसाचा हंगाम संपल्यानंतर ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने शेती आणि बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने भात, आंबा आणि नाचणी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आणि बागायतदार वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
एका बाजूने पावसाने रडवले तर दुसरीकडे हत्तीच्या वावरामुळे शेतीचं नुकसान झालं आहे.
भात पीक कुजून गेलं, कापणी करून वाळत घातलेल्या भातालाही कोंब फुटू लागला, काही ठिकाणी धानाची पेंडी पाण्यामध्ये तरंगत आहेत यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
आम्ही अधिकृतपणे सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही व्यथा कळवणार आहे. भेटीसाठी वेळ ही मागणार आहे कारण कोकणातल्या शेतीबद्दल आणि झालेल्या नुकसानी बद्दल जास्त काही मीडियावर येत नाही पण आमचा सरकारवर विश्वास आहे की या अडचणीच्या काळात आमच्या शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना दिलासा मिळेल.