एक स्वयंघोषित नेता आणि काहीशे आंदोलकांच्या अतिरेकी वागण्याने हजारो प्रामाणिक संपकरी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल जनतेची उरली सुरली सहानुभूतीही संपली असेल तर आश्चर्य वाटायला नको..
#STProtest#SharadPawar#MaharashtraNews
30 लाख बिनव्याजी वाहनकर्ज,
मुंबईत म्हाडाचं घर,
5 कोटी आमदार निधी,
जवा बघतुया या सगळ्याकडं, तवा आमदार व्हावंसं वाटतंय...
#maharashtranews#homelessmla#cm
तुम्हाला फार फार तर घरपट्टी कमी करून मिळेल, घरं(न मागता, गरज नसताना)आमदारांनाच मिळतील!
तुमचं फक्त मत महत्त्वाचं (मतपेटीतलं!)
इतर 'मतां'नी त्यांना फरक पडत नाही...
#MaharashtraAssembly#home#homelessmla
संपकरी एसटी कर्मचऱ्यांसाठी मोठी बातमी -
एसटीचं विलीनीकरण करता येणार नाही असा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सांगतोय. हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर झालाय. एसटी कर्मचऱ्यांच्या इतर सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक. पण विलीनीकरणाचा कायदेशीर मार्ग बंद झालाय.
#एसटी#Maharashtra#protest
कृषीपंपांच्या 45 हजार कोटीच्या थकीत वीजबिलांची वसुली महावितरण करतंय. पण शेतकरी ही वीजबिले भरत का नाहीय? महावितरणने आकारलेली वीजबिले योग्य आहेत का? शेतकऱ्यांसमोर पर्याय काय? यावरचा माझा व्हिडिओ ब्लॉग नक्की बघा आणि मतं कळवा
#mseb#Maharashtra#electricity
https://t.co/EBgGC2q85L
राज्यातल्या शाळा सुरू आणि एसटी मात्र अडीच महिने झालं बंद. ग्रामीण भागातील 99% विद्यार्थी त्यातही 100% मुली सर्वस्वी एसटीवर अवलंबून आहेत. अशावेळी सरकारने न्यायप्रविष्ट प्रकरण म्हणून एसटीबाबत निर्णय न घेणं, त्यांच्या मागण्यांचे भिजत घोंगड ठेवणे हे कुणालाच परवडणारं नाहीय..
#एसटी
378 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घेतल्यानंतरच आपलं आंदोलन संपवलं..
13 महिन्याच्या आंदोलनात 600हुन अधिक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला..
पण कृषी कायदे रद्द होईपर्यंत कुणी मागे हटलं नाही हे विशेष...
#FarmersProtest#protest#Delhi
#महाराष्ट्राच्या#विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या जिल्ह्यातील विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा #झी24तास गौरव करतंय आणि त्या त्या जिल्ह्याच्या आणि पर्यायाने राज्याच्या विकासासाठी त्यांची मतं आम्ही जाणून घेतोय.
तेव्हा नक्की बघा #कोल्हापूर मधील आमचा खास कार्यक्रम, गुरुवारी दु.3 वाजता
मुंबईत काम करत असले तरी गावची नाळ तुटत नाही.. गाव तर इथं आणता येत नाही, पण गावाचा अंश जवळ रहावा यासाठी कामाच्या डेस्कवरचं 'माझं गाव'!!💐😊🌾
#zee24taas#gaav#love