मुंबई पालिका नगरसेवकांना मराठी सक्ती करा
मराठी न बोलणाऱ्या नगरसेवकांचे प्रश्न रेकॉर्डवर घेऊ नका, नगरसेवकाला १०० गुणांची परीक्षा घ्या
-मराठी एकीकरण समितीची मागणी
मराठी भाषेच्या सन्मानासाठी मुंबई महानगरपालिकेकडे महत्त्वाची मागणी! 🚩*
दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी मराठी एकीकरण समिती,महाराष्ट्र राज्यच्या शिष्टमंडळाने मुंबई महानगरपालिका येथे भेट देऊन मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहातील कामकाजात *मराठी भाषेचा* अनिवार्य वापर करण्याबाबत महत्त्वाचे निवेदन सादर केले.
यावेळी मुंबई महानगरपालिका *आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे मॅडम, महापौर श्रीमती रितूताई तावडे, उपमहापौर श्री. संजय घाडी साहेब, भाजप सभागृह नेते श्री. गणेश खणकर साहेब तसेच सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्या श्रीमती किशोरीताई पेडणेकर* यांची भेट घेऊन संघटनेच्या मागण्या मांडण्यात आल्या.
निवेदनामध्ये महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणे *(राजभाषा) अधिनियम, २०२२* ची मुंबई महानगरपालिकेत काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार सभागृहातील अधिकृत कामकाज, चर्चा, ठराव, प्रस्ताव, प्रश्नोत्तरे, कार्यवाही आणि सार्वजनिक व्यवहार यामध्ये मराठी भाषेला प्राधान्य व आवश्यक त्या ठिकाणी अनिवार्य वापर सुनिश्चित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच, मराठी भाषा बोलता, वाचता किंवा लिहिता न येणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी *१०० गुणांची मराठी भाषा परीक्षा घेण्यात यावी.* या परीक्षेत आवश्यक गुण मिळवता न आल्यास संबंधित लोकप्रतिनिधींना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात यावे आणि आवश्यक भाषिक क्षमता प्राप्त होईपर्यंत सभागृहातील अधिकृत कामकाजासाठी मराठी भाषेच्या वापराबाबत निश्चित नियम लागू करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.
महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचे ज्ञान असणे ही जनतेच्या संवादासाठी आणि लोकशाहीच्या प्रभावी कार्यासाठी आवश्यक बाब आहे.
मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राची राजभाषा, सांस्कृतिक ओळख आणि अस्मिता आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात मराठी भाषेचा योग्य सन्मान आणि प्रभावी वापर सुनिश्चित व्हावा, यासाठी मराठी एकीकरण समितीचा हा प्रयत्न आहे.
@SaamanaOnline@lokmat@LoksattaLive@abpmajhatv@NDTVMarathi@pudharionline@News18_marathi@saamTVnews@SakalMediaNews@mataonline
*“आता या म्हातारपणात आवड-निवड नाही… सोय महत्त्वाची आहे.”*
एक ८५ वर्षांच्या आजोबांसोबत follow-up visit ला गेलो होतो. Doctor ना वेळ होता, म्हणून आम्ही बाहेर बसून गप्पा मारत होतो.
ते म्हणाले, “मी सध्या एका care center मध्ये राहतो. सकाळी उठतो, नाश्ता, औषधं, जेवण, थोडी विश्रांती, TV, room partner सोबत गप्पा... असा दिवस जातो.”
मी विचारलं - “तुम्हाला तिथे आवडतं का?”
ते हसले आणि म्हणाले,
“माझी मुलगी मला घरी एकटं ठेवायला घाबरते. तिचा संसार आहे. सतत माझ्याजवळ राहणं शक्य नाही. बायकोलाही वयामुळे त्रास होतो. म्हणून मुलीने हा निर्णय घेतला.”
“घराची आठवण येत नाही का?” मी विचारलं.
ते काही क्षण शांत राहिले आणि म्हणाले -
“आठवण येते... पण घरी पडलो आणि उठता आलं नाही तर? रात्री काही झालं तर? इथे कोणीतरी जवळ असतं. वेळेवर जेवण-औषध मिळतं. माझ्यासारखी माणसं आहेत बोलायला.”
आणि मग त्यांनी ते वाक्य म्हटलं जे कायम लक्षात राहील -
“आता या म्हातारपणात आवड-निवड नाही बघा... सोय महत्त्वाची असते.”
खरंच आहे.
तरुणपणी आपल्याला आवडीचं घर, आवडीचं जेवण हवं असतं.
पण वय झाल्यावर गणित बदलतं...
घर किती सुंदर आहे यापेक्षा - सुरक्षित आहे का? हे महत्त्वाचं.
जेवण किती आवडतं यापेक्षा - वेळेवर मिळतं का? हे महत्त्वाचं.
घर किती मोठं आहे यापेक्षा - बाथरूम पर्यंत सहज जाता येतं का? हे महत्त्वाचं.
Care Center मध्ये जाणं म्हणजे घर सोडणं नाही, तर परिस्थितीला समजून घेऊन जगण्याचं शहाणपण आहे.
मुलांनी आई-बाबांना तिथे ठेवलं म्हणजे सोडून दिलं असं नाही. ते सुरक्षित राहावेत म्हणून घेतलेला तो एक जबाबदार निर्णय असतो.
कारण म्हातारपणी माणूस फार काही मागत नाही.
वेळेवर औषध, वेळेवर जेवण, दोन शब्द बोलायला कोणीतरी आणि पडल्यावर उठवायला एक हात.
आवडी-निवडी संपत नाहीत, फक्त गरजा बदलतात. आणि त्या बदललेल्या गरजा समजून घेणं... हेच खरं Care आहे.
• Aadhar SeniorCare Services चा एक अनुभव
Manasi Kulkarni
Stand by What’s right
Leadership is tested when doing the right thing is not the easiest thing to do.
Positions change. Circumstances change. Principles must endure.
#TukaramMundhe#Leadership#Inspiration#public
लोकप्रतिनिधीच जर सरकारी नियम धाब्यावर बसवत असेल तर कायद्याचा खुटा सामन्य माणसाच्यातच का घालत असता? देवेंद्र फडणवीस तुमच्या नेत्यांना HSRP नंबर प्लेटचा नियम लागु नाही का???????
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@MTPHereToHelp या पडळकर च्या गाडीचे चलन फाडणार का ??
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू श्री. धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केला आहे.
यामध्ये इतर कैद्यांच्या नावावरून आणि वकिलांच्या सिमकार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधणे, दुपारच्या बंदीच्या काळात अधीक्षक कार्यालयात बसवून नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉल सुविधा पुरविणे, बराक क्र. ९ जवळील फोनजवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसणे आणि कारागृहातूनच बीडमधील परिस्थितीवर प्रभाव टाकून इतर आरोपींच्या मदतीने दहशत निर्माण करणे आदी मुद्दे नमूद आहेत.
न्यायप्रक्रियेचा हा थेट अपमान असून माझी मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की कृपया सदर आरोपीची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी. बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी.आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
पीडित देशमुख कुटुंबाला न्याय मिळणे याला आमचे प्राधान्य असून आम्ही यासाठी आग्रही आहोत.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
"माणसाचे दोन सर्वात मोठे गुरु – भूक आणि अपमान!"
जीवनात अनेक शिक्षक भेटतात. आई-वडील संस्कार देतात, गुरु ज्ञान
देतात, पुस्तके विचार देतात आणि अनुभव शहाणपण देतो. पण काही
असे गुरु असतात, जे कोणतीही फी घेत नाहीत, कोणताही वर्ग भरवत
नाहीत, तरी आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवून जातात.
ते म्हणजे भूक आणि अपमान.
भूक माणसाला कष्टाची किंमत शिकवते.
ज्याने भूक अनुभवली आहे, तो अन्नाचा एकही कण वाया घालवत नाही.
तो मेहनतीची किंमत ओळखतो. गरिबी आणि अभावातून आलेला
माणूस यश मिळाल्यावरही जमिनीवर राहतो, कारण त्याला संघर्षाची
जाणीव असते.
भूक फक्त पोटाची नसते.
स्वप्नांची भूक, यशाची भूक, स्वतःला सिद्ध करण्याची भूक, कुटुंबाला
सुख देण्याची भूक—हीच भूक माणसाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य
करायला प्रेरणा देते.
आणि दुसरा गुरु म्हणजे अपमान.
अपमान हा क्षणभर वेदना देतो, पण योग्य पद्धतीने स्वीकारला तर तो
आयुष्यभरासाठी प्रेरणा बनतो.
जेव्हा लोक आपल्याला कमी लेखतात, आपल्या क्षमतेवर शंका घेतात
किंवा आपल्याला नाकारतात, तेव्हा दोन पर्याय असतात—एकतर
खचून जाणे, किंवा त्या अपमानाला आपल्या यशाचे इंधन बनवणे.
इतिहास साक्षी आहे—अनेक महान व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात
अपमान सहन करावा लागला. पण त्यांनी सूडाने नव्हे, तर यशाने उत्तर
दिले. त्यांचे कार्यच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख बनले.
भूक माणसाला धावायला शिकवते.
अपमान माणसाला जिंकायला शिकवतो.
जो माणूस भूक आणि अपमान या दोन्हींचा सामना करतो, तो अधिक
मजबूत, अधिक संयमी आणि अधिक यशस्वी होतो. कारण त्याला
माहीत असते की परिस्थिती कायमची नसते, पण जिद्द कायम ठेवली
तर यश नक्की मिळते.
म्हणून आयुष्यात कधी भूक लागली किंवा अपमान झाला, तर त्याला
शाप समजू नका. त्याकडे तुमच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या गुरूप्रमाणे
पाहा.
कारण…
भूक मेहनतीची भाषा शिकवते,
आणि अपमान स्वतःची किंमत सिद्ध करण्याची ताकद देतो.
यश हे नेहमी टाळ्यांच्या आवाजातून जन्मत नाही; अनेकदा ते भूक,
संघर्ष, अश्रू आणि अपमानाच्या राखेतून फिनिक्स पक्ष्यासारखे उभे
राहते.
Food safety is not about status. It is about standards.
Wherever serious violations are found; FDA Maharashtra will act decisively to protect public health.
FDA suspends caterer licence at five top gymkhanas in city | Mumbai News - The Times of India https://t.co/49Zh4hYNa6
दररोज जिंकायचं असेल, तर दिवसाची सुरुवात स्वतःसाठी करा.
माझी सकाळ साधारण अशी असते…
• पहाटे लवकर ५ वाजता उठतो.फ्रेश होऊन ब्लॅक कॅाफी घेतो.
• त्यानंतर Walking ला जातो.
• Walking वरुन आल्यावर थंड पाण्याने अंघोळ करतो.
• सकाळी एक तास पुस्तक वाचन करतो.
• दिवसाची सुरुवात फोन किंवा सोशल मीडियाने नाही, तर स्वतःमध्ये गुंतवणूक करून करतो.
सकाळी ९ पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात.
९ वाजता ऑफिसचं काम सुरू होईपर्यंत मी माझ्या शरीरासाठी, मनासाठी आणि ज्ञानासाठी वेळ दिलेला असतो.
पूर्वी वाटायचं, “वेळच मिळत नाही.”
आता समजलं आहे, वेळ मिळत नसतो… तो काढावा लागतो.
सकाळची शिस्त म्हणजे फक्त लवकर उठणं नाही.
ती म्हणजे दिवसभरासाठी स्वतःला तयार करणं.
दररोज स्वतःवर थोडी गुंतवणूक करा.
बाकी जगाला वेळ देण्यासाठी पूर्ण आयुष्य पडलेलं आहे.