हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार.
मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो.
राज ठाकरे ।
@Dev_Fadnavis साहेब @AjitPawarSpeaks साहेब @mieknathshinde साहेब,
साहित्यरत्न, भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचा उल्लेख अट्टल दारूडा, नालायक असा करून अमोल मिटकरी सिकेपी समाजाच्या दैवताचा आणी महाराष्ट्राच्या भूषणाचा अपमान करत आहे. याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे.
सस्नेह जय महाराष्ट्र,
कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता, महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला , गुप्तपणे राहत आहेत. मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात. बरं असं पण नाही की महाराष्ट्रा बाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्रद्वेषी आहेत. आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच. पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही !
कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार, आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत, हे का घडतं ? कारण याच नाही एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलं आहे. यांना थोडीफार आमिषं दाखवा की हे करतात मतदान आम्हाला ! मी गेली अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलं आहे.
आणि अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठवावेसे वाटतात, कारण तेंव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाजावर जाऊन टकटक करतो !
अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्वाचा आहे, त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच ! 'लाडकी बहीण'च्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की, ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का ? मंत्रिपदं महाराष्ट्राची उपभोगणार परंतू त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार ! तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात ? तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहित नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाभ....
हिंदू म्हणून आज आपण एकत्र आलं पाहिजे हे ठीक आहे, पण हिंदू म्हणून एकत्र येताना, प्रत्येक राज्यात तिथली भाषा, तिथली स्थानिक माणसं , तिथली संस्कृती यांना चिरडण्याचा प्रयत्न होता कामा नये. हिंदूत्व आम्ही देखील पुजतो परंतू हिंदूना एकत्र आणायच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लगणार नाही हे देखील आपण पाहिले पाहिजे !
मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपीना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका.
मी नेहमी म्हणतो की पोलिसांवर माझा विश्वास आहे, त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरावं. बाकी सरकारने पण हे असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी.
राज ठाकरे ।
मुंबईसारख्या ठिकाणी एका परप्रांतीय ३२ वर्षीय तरुणांनी गावाकडची शेती १५ लाख रुपयाला विकुन वाशी या ठिकाणी ३वडापाव ची स्टॉल आणि पाणीपुरी चे २ स्टॉल टाकले ( हप्ता कोणाला किती देतो माहीत नाही ) पण याचा प्रत्येक स्टॉल चा निव्वळ नफा रोज २५००/- आहे.
#मराठी_तरुणांनो_रोजगार_निर्माण_करा
@TMCaTweetAway flowing dirty gutter at NKT collage is affecting the health of Kharkar Lane residents and causing accidents for two wheelers. Action from TMC is expected on priority.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, ही संधी ५ वर्षातून एकदाच येते, आता तुमच्या भावना मतपेटीतून व्यक्त करा.. अघोरी राजकारण वठणीवर आणा !
#लोकसभा_निवडणूक#मतदार#राजकारण
@RailwaySeva we are travelling on 12962 towards Mumbai on A1 coach. Pnr 8407565433.
There is no water in the toilets of thos Ac coach. @RailMinIndia this is unacceptable and ridiculous. Hope to solve the issue before ratlam.
@Olacabs can you arrange a quick translation software based audio system in the cabs so that we can understand the continuous telephonic talks of your drivers with their gfs and families. Khane ko kya banayi, so reli thi kya, thane ka dropva hai vagaire samaz me aata hai basss.
This is how and everywhere these traffic cops behave in Thane City. Having a license less driver on towing van with him to lift legally parked vehicles of licenced drivers can we expect some action on this police on duty Hon @Dev_Fadnavis Saheb through @ThaneCityPolice
@RailwaySeva I am traveling by 12961 Avantica to Indore PNR 8850338097. Since starting point there is no water to toilets and wash basins. No one attended in spite of several complaints causing tremendous unhygienic conditions and bad smell at the Ac Couch..Sad state of service.
आनंद आणी उत्साह घेऊन आलेली दिवाळी आपल्याला व आपल्या परिवाराला सुखसमृद्धी, समाधान, भरभराट आणि अमाप यश देवो हीच आई एकविरेचरणी प्रार्थना
शुभ दीपावली
- समीर जयंत गुप्ते
🪔 🪔 🪔 🪔 🪔 🪔🪔🪔
A grand event exhibiting food and culture of Gujarat. Join us for the dandiya nights everyday throughout the fest.
16,17,18 September 2022 at CKP Halls, Kharkar Lane, Thane west. Maharshtra.
#Gujarati_food#gujaratiNews#Gujarat
आज मनसे चे युवानेते श्री अमितजी ठाकरे मनविसे महासंपर्क दौऱ्या निमित्त ठाणे येथे उपस्थित होते. त्यांचे विचार ऐकत शेकडो तरूण तरूणींचे भारावून जाणे हे त्यांची लोकप्रियता दर्शवत होते. एक उमदे नेतृत्व,अतिशय विनम्र व्यक्तिमत्त्व असलेले अमीतजी ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.