रितेश देशमुख हा अतिशय उथळ व्यक्ती आहे.
शिवरायांच्या इतिहासाचे एकही पान याने वाचलेले नाही.
वाघनखे, आणि झालेली झटापट ही काही क्षणात झाली होती. वेळ महत्त्वाची असते. खूपच वायफळपणा चाल�� आहे.
किंबहुना हा छत्रपतींच्या उत्तुंग कार्याचा सरळ सरळ अपमान आहे.
मराठी चित्रपटसृष्टी मधील "हैदोस" की 'मनाचे श्लोक' ?
मनाचे श्लोक या नावाचा नवीन मराठी चित्रपट येत आहे. पहिला का त्याचा ट्रेलर? थिल्लरपणा . आणि त्याला नाव मनाचे श्लोक 🙄
आपल्या संत साहित्याचा गौरव हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले 'मनाचे श्लोक' हे केवळ काव्य नाही, तर ते नीतिमूल्य, संयम आणि अध���यात्माची शिकवण देणारे महान वाङ्मय आहे. जवळपास सर्व वेद-वेदांताचा सार 205 श्लोकांमध्ये सामावणारे हे विचारधन आहे.
'मनाचे श्लोक' हे लहान मुलांसाठीही संस्कारांची गुरुकिल्ली आहेत. ज्ञानेश्वरी किंवा तुकारामांची गाथा लहान वयात समजून घेणे कठीण असले, तरी 'मनाचे श्लोक' सहज पाठ होतात आणि त्यांचा अर्थ मुलां��ा लवकर समजू शकतो. लहानपणापासूनच मन निरोगी आणि सुसंस्कारित बनवण्याचे हे एक सोपे आणि शक्तिशाली माध्यम आहे.
हेच 'मनाचे श्लोक' आज मराठी चित्रपटसृष्टीने थिल्लर आणि बटबटीत चित्रपटांसाठी वापरले आहेत. ही केवळ नावाची चोरी नाही, तर ते आपल्या संत परंपरेचा, संस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. या महान कार्याचा गौरव करण्याऐवजी त्याचे वाटोळे करण्याचे ठरवले आहे, हे दुर्दैव आहे.
यापुढे ही विकृती थांबली पाहिजे. उद्या हे लोक ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा किंवा दासबोध यांसारख्या महान ग्रंथांची नावे आपल्या फालतू चित्रपटांसाठी वापरतील का? हा प्रश्न प्रत्येक सुजाण मराठी माणसाने स्वतःला विचारला पाहिजे.
काही ठराविक जातीवादी राजकारण्यांच्या पाठिंब्यामुळे आणि त्यांच्याकडून मिळालेल्या फुशीमुळेच ही हिंमत होत आहे, हे स्पष्ट आहे.
हे थांबवण्याची वेळ आली आहे! आपण सर्वांन��� मिळून या प्रवृत्तीचा कठोर निषेध केला पाहिजे. अशा चित्रपटांना पूर्णपणे बहिष्कार घाला. ही केवळ एका चित्रपटाची गोष्ट नाही, तर आपल्या संत परंपरेच्या सन्मानाची लढाई आहे.
मी तरी या नावाचा वापर अशा थिल्लर चित्रपटासाठी करण्याबाबत पूर्णपणे निषेध करतो आहे.
ज्यांना बरोबर वाटेल त्यांनी त्यांनी देखील याचा निषेध करावा. 🙏🙏
#मनाचे_श्लोक
#मराठी_संस्कृती
@PMCPune सदर फोटो हा सिंहगड रोड हिंगणे चौक सिग्नल वरील आहे जो रस्ता हिंगणे मध्ये जातो तो पुलाच्या कामामुळे बंद होता तो चालू करावा कारण त्या ठराविक भागामधील काम झालं असावं
@PMCPune@PuneCityTraffic हा फोटो हिंगणे येथे देवी मंदिर आहे तिथला आहे इथे जो मांडव घातला आहे त्या मागे सिग्नल चा खांब आहे आधीच इथे खूप ट्रॅफिक जॅम होत त्यात कधीतरी हा सिग्नल चालू असतो आता ह्यामुळे सिग्नल चालू आहे की बंद हे कसं कळेल ह्याचा बंदोबस्त करा..
नवीन बस खरेदी करताय चांगली गोष्ट आहे पण ���सस्थानक आणि तेथील परिसर सुद्धा चांगला ठेवावा ही अपेक्षा आहे परवा एका वृत्तवाहिनीने स्वारगेट येथील विश्राम कक्ष (वाहक आणि चालक) येथील पाहणी केली काय भयानक अवस्था आहे झोपडी परवडली इतकी वाईट परिस्थिती आहे हे तर शहरातलं उदाहरण आहे ग्रामीण
वनराज आंदेकर च्या खूनानंतर पुण्यातील ही चौथी घटना...एकमेकांचा काटा काढण्यासाठी गुन्हेगार
कोयते, पिस्तूल घेऊन रस्त्यावर उतरत आहेत.. शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे सिसीटीव्ही फुटेज..
@AjitPawarSpeaks@PuneCityPolice@CPPuneCity
@mohol_murlidhar माझ्या आईसाठी लाडक��� बहिण योजनेसाठी आधार लिंक नव्हत म्हणून एसबीआय बँकेने काहीही गरज नसताना प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरायला लावला आणि त्याचे ५००रुपये कट होईल अस�� सांगण्यात आले ही निव्वळ फसवणूक आहे
@mieknathshinde@CMOMaharashtra माझ्या आईसाठी लाडकी बहिण योजनेसाठी आधार लिंक नव्हत म्हणून एसबीआय बँकेत काहीही गरज नसताना प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरायला लावला आणि त्याचे ५००रुपये कट होईल असे सांगण्यात आले मुळात या योजनेसाठी प्रधानमंत्री आवास चा
मुळात त्यांची बदली का केली?? खरतर बडतर्फ(लाल शेरा) मारून त्यांची हकालपट्टी करायला हवी होती इथे पोर दिवस रात्र एक करून या परीक्षा देतात आणि हिला खोटे प्रमाणपत्र देऊन एमपीएससी करता येत?
हे भयंकर आहे..वाचा..विचार करा.. त्यावर बोला..
या आहेत 'पुजा खेडकर'
देशात दिवस रात्र एक करत, सुखाची आहुती देत अभ्यास करुन युपीएससी देणाऱ्या मुलांना डावलून आपला नंबर लागावा यासाठी स्वतःला अंधत्व असल्याचं खोटं सर्टिफिकेट(PWD) दिलं.
- हेचं अंशतः अंधत्व दाखवल्यामुळेच पुजा कमी मार्क असून सुद्धा युपीएससी पास झाल्या
- ओबीसी कोट्यातून परिक्षा दिली. त्यासाठी ��्रिमीलेअर सर्टिफिकेट लागतं. त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा असते. इथे पुजाच्या वडिलांचं उत्पन्न ४० कोटी इतकं आहे. मग ओबीसीमध्ये पण त्या बसतात का?
- ६ वेळा वेगवेगळी कारणं सांगत वैद्यकिय चाचण्यांनाही आपलं बिंग फुटेल या भितीने गैरहजर राहिल्या.
- दिल्लीच्या AIMS मध्ये सुद्धा वेद्यकिय चाचणीला दांडी मारली
- वैद्यकिय चौकशीत एमआयआर करण्याला पण त्यांनी नकार दिला - मग स्वतःच एका खाजगी एमआयआर सेंटरम���ून एक रिपोर्ट मॅनेज(?) करुन सादर केला.
- युपीएससीने त्यावर हरकत घेत पुजा यांची निवड अवैध ठरवत आव्हान दिलं.
-त्यानंतर कॅटने खेडेकरांच्या विरोधात निकाल देत अंधत्व खोटं असल्याचं सांगितलं.
मात्र आपल्या गोड प्रशासनााने त्याचं सर्टिफिकेट ग्राह्य धरत त्यांची नियुक्ती वैध ठरवली. एमपीएससी पास होऊन सुद्धा पोरांना नियुक्ती �� दिल्यामुळे राज्यात आत्महत्या झाल्यायेत. पण इथे खोटं सर्टिफीकेट देऊन पुजा खेडेकरांना सनदी अधिकारी केलं.
- सुरुवातीला प्रशिक्षणार्थी म्हणून पुजा यांना भंडाऱ्यात पाठवण्यात आलं होतं. पण नंतर 'वरुन' चक्र फिरली आणि थेट पुणे हे ठिकाण मिळालं.
या बाईंना पदाची इतकी मग्रुरी चढली की यांनी स्वतः ट्रेनी असताना स्वतःचे बॉस आणि जिल्हाधिकार्यांच्या नाकी नऊ आणले
- नियमबाह्यपणे स्वतःच्या ऑडीवर सरक��री लाल दिवा, भारत सरकारचं स्टिकर लावलं.
- सरकारी वाहन, निवासस्थान, दालन आणि शिपायाची मागणी केली
- त्यासाठी त्या प्रशिक्षणार्थी म्हणून पात्र नसताना सुद्धा हे सगळं पुजा खेडेकरांना देण्यात आलं
- वास्तविक जिल्हाधिकाऱ्यांसोबत काम करत त्यांचं कामकाज शिकणँ हे प्रशिक्षणार्थीचं काम असतं.
- बरं या बाईंना स्वतंत्र दालन दिल्यावर त्याला अटॅच बाथरुम नाही म्हणून त्यांनी ते नाकारलं
- यानंतर बाथरुम अटॅच असलेलं एक निवासस्थान देण्यात आलं. त���थली सुद्धा इलेक्ट्रिक फिटींग नव्याने करुन देण्याची मागणी पुजा बाईंनी केली.
- २ दिवस जिल्हाधिकारी मंत्रालयात गेल्यानंतर एकप्रकारे इंटर्न असणाऱ्या पुजा खेडेकरांनी परवानगीशिवाय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमधील सोफा, टेबल, खुर्च्या सगळं साहित्य कर्मचाऱ्यांकडून काढून घेतलं.
- स्वतःच्या नावाची पाटी लावली, लेटर हेड, व्हिजीटींग कार्ड, राष्ट्रध्वज, इंटरकॉम देण्याचे आदेश स्वतःच दिले.शेवटी या नखऱ्यांना कंटाळून जिल्हाधिकाऱ्यांनीच त्यांची तक्रार केली . आणि आता बाईंची बदली वाशिमला करण्यात आली. वास्तविक बडतर्फी कारवाई इथे अपेक्षित असताना फक्त बदली करण्यात आली.
अपंगांच्याही वाट्याचं लाटणारे , मागासवर्गीयांचा, गरजवंतांचा हक्क डावलून केवळ बाप मोठा आहे म्हणून IAS ऑफिसर बनणार का?