@mpsc_office महोदय आपण पेपर फुटीची चौकशी करावयाचे सोडून तक्रारदारास धमकावत होता... परीक्षा पारदर्शक घेण्यापासून निकाल पारदर्शक देण्यासाठी आयोग बांधील आहे. असंख्य परीक्षार्थी नैराश्यात आहेत आणि त्यांचे प्रश्न अनुत्तरित आहेत. आपण नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा.
@AbhiPawarBJP तुमचे सरकार आहे, आरोपी सापडलेत .MPSC सचिव आणि अध्यक्ष ह्यांचा राजीनामा अजूनपर्यंत का घेतला नाही. ह्याचा आर्थ तुमचं काहीतरी साठलोट आहे त्यांच्याबरोबर .
महाराष्ट्र के छात्रों ने एक लड़ाई जीत ली है।
MPSC की ड्रग इंस्पेक्टर परीक्षा और पूरी भर्ती प्रक्रिया रद्द हुई - यह सरकार की मेहरबानी नहीं, उन छात्रों की जीत है जो मार्च में ड्रग इंस्पेक्टर परीक्षा के पेपर लीक के बाद से डटे रहे।
दबाव झेला, तानें सुने, महीनों इंतज़ार किया - पर आवाज़ उठाना नहीं छोड़ा। आप सब पर गर्व है।
पर याद रखिए - एक परीक्षा रद्द होना जीत है, न्याय नहीं। जब तक लीक कराने वालों को सज़ा नहीं मिलती, यह लड़ाई अधूरी है।
आगे और लड़ाइयां हैं। और हर एक में मैं आपके साथ हूं।
हमें इस पूरे system को ठीक करना है - ताकि हर बच्चे के लिए शिक्षा बेहतर हो, और मेहनत का दाम हर किसी को मिले।
#ChhatronKiGoonj
१९९७ मध्ये पेपर घोटाळा झाला तेंव्हा तत्कालीन MPSC च्या अध्यक्षांना जबाबदार धरुन त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. आता ३० वर्षांनी पुन्हा MPSC ला पेपरफुटीचा डाग लागला असून आताही १९९७ चाच न्याय विद्यमान अध्यक्षांना का लावला जाऊ नये? याबाबत काय करायचं ते सरकारने ठरवावं, पण आम्ही १ तारखेला आयोगाच्या भेटीसाठी जाऊ तेंव्हा निष्कलंक आणि स्वच्छ चारित्र्याच्या नवीन अध्यक्षांसोबत आमची भेट होईल, अशी अपेक्षा आहे.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
@mpsc_office 10 वर्षातून फक्त एकदा परीक्षा होते, जागा किती? 151 ...40000 लोक पेपर देतात आणि पेपर फुटतो. आता ह्या सर्व जणांचा वेळ, एक्साम सेंटर मधे यायचे आणि जायचे पैसे, परीक्षा फी चे पैसे परत करणार का तुम्ही???
@mpsc_office@bhimanwar अध्यक्ष आणि सचिव साहेबांनी नैतिकता जपून ....अहवाल सादर करावा आणि राजीनामा द्यावा ...याआधी पण पेपर फुटले असतील का ? आयोगातील कोणती व्यक्ती यात सामील होती का ? सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
MPSC चा पेपर फुटणे ही सर्वसाधारण बाब नाही .
@Dev_Fadnavis
MPSC औषध निरीक्षक परीक्षा हा केवळ एका पेपरचा प्रश्न नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे..!
आज MPSC औषध निरीक्षक परीक्षेबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. परीक्षेपूर्वी काही उमेदवारांकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा प्रकार समोर येत आहे. जर हे सत्य असेल, तर हा केवळ पेपरफुटीचा विषय नाही, तर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाला हादरा देणारा प्रकार आहे.
एका प्रश्नपत्रिकेची किंमत काही पानांची नसते. तिच्यामागे हजारो विद्यार्थ्यांची अनेक वर्षांची मेहनत, पालकांचे कष्ट, त्याग आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने असतात. काही मोजक्या लोकांच्या गैरप्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
आमचा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही. आमचा लढा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि MPSC वरील जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी आहे.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी झालीच पाहिजे. आमच्याकडे उपलब्ध असलेली माहिती आणि पुरावे संबंधित यंत्रणेकडे सादर करण्यास आम्ही तयार आहोत. दोषी कोणताही असो, त्याला कोणतेही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण न देता कठोर कारवाई झाली पाहिजे.
विद्यार्थी कोणतीही सहानुभूती मागत नाहीत ते फक्त त्यांच्या कष्टाचा न्याय मागत आहेत.
MPSC वरील विश्वास टिकवायचा असेल, तर सत्य बाहेर आलेच पाहिजे. सर्व. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे..!
#MPSC #DrugInspector #JusticeForStudents #FairExamination #PaperLeak
MPSC पेपर फुटीची जबाबदारी कोणाची?
MPSC अध्यक्ष व सचिव राजीनामा देणार का?
MPSC मार्फत घेण्यात आलेला "औषध निरीक्षक" / Drug Inspector पदाचा पेपर फुटला या बातम्या समोर येत आहेत, एक तर MPSC चा पेपर बाहेरील व्यक्ती फोडूच शकत नाही पण हा पेपर फुटला कसा? MPSC सचिव एकदा म्हणतात अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करू आणि पुन्हा म्हणतात चौकशी करू.
मागील वीस वर्षात कधीच MPSC चा पेपर फुटला नाही मग तो आत्ताच कसा फुटला? वेळोवेळी MPSC ऑफलाईन पेपर ची पारदर्शकता दाखवून ऑनलाइन परीक्षेला विरोध केला म्हणून हे तर सिद्ध करायचं नाही ना की MPSC चाही पेपर फुटतो म्हणून आम्ही ऑनलाईन कडे वळलो.
MPSC चा पेपर फुटला हे जर सिद्ध झाले तर मात्र MPSC सचिव व MPSC अध्यक्ष यांना राजीनामा द्यावाच लागेल.
मागील वीस वर्षात कधीच पेपर फुटला नाही मात्र हा पेपर जर फुटला असेल तर विद्यमान अध्यक्ष व सचिव यांच्या कृपेनेच हा पेपर फुटला असावा ही शंका नाकारता येणार नाही.
@Dev_Fadnavis साहेब, @maha_governor साहेब जर हा पेपर फुटला असेल तर आपण यांना पाठीशी घालू नये. MPSC अध्यक्ष व सचिव यांना हटवून MPSC ऑनलाईन चा घाट बंद करा आणि पारदर्शकपणे परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यासाठी लायक अध्यक्ष व सचिव निवडा.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@RRPSpeaks@RealBacchuKadu@satejp@AbhiPawarBJP@DrSEShinde@uddhavthackeray@abpmajhatv@TV9Marathi@ibn_lokmat@SakalMediaNews@abhijeet_dipke@mpsc_office
@Dhananjay4INC अवघड परिस्थिती आहे.... देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावे काय चालू आहे ..MPSC आमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाया घालवत आहे... तुम्हाला paper फोडायचे आहे तर, जागांचा लिलाव करा.... आणि आमचे फॉर्म fees आणि documents che paise माघारी द्या.... एवढे अकाऊंटेबल रहा....