MPSC परीक्षांच्या स्वरूपात अचानक करण्यात आलेल्या बदलांमुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.
एकीकडे युवकांना रोजगाराच्या संधी मर्यादित होत असताना, दुसरीकडे MPSC सारख्या स्वायत्त संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित निर्णय पुरेशा संवादाशिवाय घेतले जात असतील, तर ही चिंतेची बाब आहे.
TCS/IBPS यांच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकतेबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे अशा सर्व परीक्षा थेट MPSC मार्फत पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने घेतल्या जाव्यात, अशी विद्यार्थ्यांची सातत्याची मागणी होती. मात्र, आता MPSC देखील या परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेणार असल्याचे जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. या प्रक्रियेचा वापर झाल्यास परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असे महत्त्वाचे निर्णय घेताना विद्यार्थी प्रतिनिधी, तज्ज्ञ आणि संबंधित घटकांशी व्यापक चर्चा होणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राहील, पारदर्शकता सुनिश्चित होईल आणि गुणवत्तेला न्याय मिळेल, अशा पद्धतीने निर्णय घेतले जावेत, हीच अपेक्षा.
@Dev_Fadnavis@mpsc_office
मा.@mpsc_office@bhimanwar चांगल काम करता करता अचानक हे ONLINE परीक्षा कश्याला? सरळसेवा साठी संख्या कमी असते तिथं ठीक होत पण स्पर्धा परीक्षेत का?नॉर्मलायझेशन मुळे तर सगळी वाट लागली म्हणून तुमच्याकडे सर्व पद आले तर तुम्ही तिकडेच निघाले.4 लाख विद्यार्थी आणि ऑनलाइन परीक्षा चुकीच आहे
एकाच परीक्षेतून 1 उमेदवार 2 किंवा 3 पदावर एकाच परीक्षेतून आयोगाने पुन्हा एकदा शिफारस केला आहे .
गट ब बाबत MAT ने दिलेला निर्णय 23 /24 लागू केला परंतु गट क लागू केले नाही.
लिपिक आणि कर सहायक मध्ये 76 उमेदवार रिपीट आहेत.#1E1P1P@bhimanwar@mpsc_office
पुन्हा एकदा MPSC विद्यार्थी आक्रमक पवित्रा उचलण्याच्या भूमिकेत आहेत…
वेळीच या जुलमी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, हीच कळकळीची विनंती!
PSI वयोवाढीबाबतचा निर्णय लांबवून विद्यार्थ्यांचा संयम संपवला जात आहे.
न्याय मागणं जर गुन्हा ठरत असेल, तर हा थेट लोकशाहीवरचा हल्ला आहे.
विद्यार्थ्यांचा आवाज दडपता येणार नाही.
हक्कासाठीचा हा लढा अधिक तीव्र होईल, याची जाणीव सरकारने ठेवावी.
⸻
#PSIवयवाढ #MPSC #महाराष्ट्रलोकसेवाआयोग
#विद्यार्थी_न्याय
#StudentsForJustice
#विद्यार्थ्यांसोबतकाँग्रेस
#StudentRights
#JusticeForStudents
#लोकशाहीवाचवा
#जुलमी_सरकार
#StopPoliceAtrocity
#SaveDemocracy
#YouthForJustice
#MaharashtraCongress
#CongressWithStudents
#हक्कासाठी_लढा
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@RahulGandhi जी
अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी एक वर्ष वय सवलत देण्यात यावी,या मागणीसाठी सातारा येथे विद्यार्थ्यांनी आज भेट घेतली.
यावेळी जितेंद्र साळुंखे,शुभम राऊत,अनिकेत उंबरे,चक्रधर पडवळ, विक्रम गायकवाड,प्रशांत यादव,नैतिक इंगवले,रोहित पडवळ या विद्यार्थ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले.
विद्यार्थ्यांची वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्वरित मा.मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी एक वर्ष वय सवलत देण्याची विनंती केली.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
आधीच बेरोजगारी गंभीर असताना, मेहनती तरुणांवर अन्याय होतो आहे. सरकारने तात्काळ PSI वयोवाढीचा निर्णय घ्यावा आणि हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
मा. श्री. विजय वडेट्टीवार
काँग्रेस गटनेते - महाराष्ट्र विधानसभा
@VijayWadettiwar
Pune, Maharashtra: MPSC students in Pune are seeking a one-year age relaxation after a delayed recruitment advertisement. PSI aspirants want the age cutoff extended to January 1, 2026. A delegation met Chief Minister Devendra Fadnavis over the issue.
A student says, "The MPSC students here have only one demand. The advertisement that the government issues every year has been released six months late this time..."
नमस्कार,
#PSI वयोमर्यादा वाढ या विषयावर काँग्रेस पक्षातर्फे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री व राज्य सरकारसोबत संवाद करत असून, ताबडतोब GR निघावा यासाठी ठामपणे प्रयत्न सुरू आहेत.
यासोबतच पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून शांततामय आंदोलन करणाऱ्या परीक्षार्थींवर कोणतेही गुन्हे दाखल करू नयेत, अशी स्पष्ट व ठोस विनंती करण्यात येत आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित राहावे, त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांना न्याय मिळावा, यासाठी काँग्रेस पक्ष सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे.
या संघर्षात परीक्षार्थी एकटे नाहीत काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे. ✊
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@DGPMaharashtra@PuneCityPolice
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
बंडखोर उमेदवारांचे रुसवे फुगवे काढण्यासाठी, त्यांना भेटून "सेटलमेंट" करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ आहे, मात्र सरकारच्या घोडचुकीमुळे आयुष्य पणाला लागलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांना भेटण्यास, त्यांच्या भावना जाणून घेण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही...
हे भावना शून्य, संवेदना मेलेल्या सरकारचे लक्षण आहे !
एवढे निष्ठुर CM आज पर्यंत पाहिले नाहीत. MPSC मुलांचा मुद्दा मार्गी लावण्याला महत्व देण्याऐवजी स्वतःच्या पक्षातली बंडखोरी थांबवण्यासाठी मैदानात उतरलेत म्हणे...... राज्याचे CM आहेत की पक्षाचे तेच कळत नाहीये.
पोरं काय भीक मागत आहे का? चूक प्रशासन करणार आणि अन्याय पोरांवर करता आहात.. जाहिरात 7 महिने उशिरा आल्यामुळे स्पर्धेतून सरकारच बाजूला करत आहे..100+ आमदारांनी विनवणी करूनही मागणी मान्य करत नाही मुख्यमंत्री, हेच का रामराज्य??
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
"फडणवीस साहेब तरुणांच्या संयमाची परीक्षा पाहू नका !
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना PSI वयवाढीबाबत सरकार अजूनही मौन बाळगून आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी आहे. मात्र या परीक्षेची जाहिरात तब्बल 7–8 महिने उशिरा निघाली. या विलंबामुळे हजारो पात्र, मेहनती आणि स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय निकषाबाहेर गेले. ही चूक विद्यार्थ्यांची नाही, ही संपूर्ण चूक शासनाची आहे.
आज पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून वयवाढीसाठी आंदोलन करत आहेत. हातात पुस्तके असणारे तरुण आज पोस्टर हातात घेऊन न्याय मागत आहेत, ही बाब राज्यासाठी लाजिरवाणी आहे.
देशात आणि राज्यात आधीच बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली असताना, शेतकरी आणि गोरगरीब कुटुंबातील लाखो मुलं दिवस-रात्र मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा, नियोजनाअभावी झालेल्या विलंबाचा फटका थेट या उमेदवारांनाच बसतो आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भातील हा संपूर्ण गोंधळ आयोगाच्या आणि सरकारच्या अपयशी नियोजनाचा परिणाम आहे. जाहिरात वेळेत न काढणे, परीक्षा उशिरा घेणे आणि आता वयवाढीवर निर्णय न घेणे या सगळ्याची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी शासनावरच येते.
तरुणांच्या संयमाची परीक्षा पाहू नका. सरकारने तात्काळ PSI वयवाढीचा निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा !
@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@NCPspeaks@supriya_sule
#PSIवयवाढ
#संयुक्तपूर्वपरीक्षा2025
#विद्यार्थीआंदोलन
#तरुणांचा_न्याय
#बेरोजगारी
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना,
PSI वयोमर्यादा वाढीबाबत अद्याप निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मानसिक व शैक्षणिक त्रास सहन करावा लागत आहे.
आधीच ही जाहिरात 7–8 महिन्यांनी उशिरा प्रसिद्ध करण्यात आली. त्यातही वयवाढीसारखा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सोडवण्याची तसदी सरकारने घेतलेली दिसत नाही, ही बाब दुर्दैवी आहे.
याच पार्श्वभूमीवर पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने संवेदनशीलतेने पाहावे.
बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न न करता, विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून समन्वयाच्या माध्यमातून हा प्रश्न तातडीने निकाली काढावा, हीच अपेक्षा आहे.
विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी, ही नम्र पण ठाम विनंती.
@Dev_Fadnavis@mpsc_office@INCHarshsapkal
#PSIवयवाढ
#MPSC
#StudentsForJustice
#विद्यार्थी_न्याय
#YouthVoice
विद्यार्थ्यांना नाईलाजास्त आंदोलन करण्याची वेळ आली आहे त्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण लवकरात लवकर #PSI वय वाढ बाबत निर्णय घेऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती. @CMOMaharashtra@GaneshgSpeaks
संयुक्त गट-ब (PSI) परीक्षेत वयोमर्यादेच्या चुकीच्या निर्णयामुळे गेल्या ७ महिन्यांपासून विद्यार्थी न्याय मागत आहेत, तरीही ढिम्म सरकार मागण्या मान्य करत नाही.
उलट शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अटक करणे ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे.