‘महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती’च्यावतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित केलेल्या आंदोलनाला उपस्थित राहून संबोधित केलं आणि त्यांच्या या आंदोलनाला पाठींबा दिला. MPSC कडून होणारी ऑनलाईन परीक्षापद्धत रद्द करून पुन्हा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, नॉर्मलायझेशनची पद्धत रद्द करावी, शिक्षकांसाठीची TET रद्द करावी, पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवावी तसंच MPSC कडं वर्ग कलेल्या ३ आणि ४ च्या पदांच्या भरतीसाठीचा सिलॅबस जाहीर करावा, वेगवेगळ्या परिक्षांसाठी वेगवेगळं शुल्क न आकारता एकच शुल्क आकारण्यात यावं आदी मागण्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या आहेत.
या सर्व मागण्यांसाठी सरकारकडं वारंवार निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटून आणि विधानसभेतही याबाबत आवाज उठवला आहे. परंतु सरकार दुर्लक्ष करत असल्याने शेवटी आज संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. १२ जुलैपर्यंत या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर त्यानंतर यापेक्षाही अधिक मोठं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनानंतर विभागीय आयुक्तांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं, अपेक्षा आहे की सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेईल. आम्ही मात्र सदैव विद्यार्थ्यांच्या हितासाठी कायम लढत राहू...!
यावेळी प्रा. विठ्ठल कांगणे सर, प्रा. नितेश कराळे सर, कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके, रविकांत जी तुपकर, रविराज साबळे पाटील, संतोष मगर, दीपक केदार, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, मा.आ.सुनील भुसारा, मा. आ.संजय काळे, मा. आ. संजयभाऊ वाकचौरे, पंकजनाना बोराडे, अतुल गावंडे, सिद्धू लोमटे, यांच्यासह विद्यार्थ्यांसाठी काम करणारी अनेक मान्यवर मंडळी आणि राज्यभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#MPSC #mpscstudents #पोलीसभरती #TETExam #chhatrapatisambhajinagar
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://t.co/X0BRMCjGLC
आमदार अभिमन्यू पवार साहेब PSI वयोमर्यादा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.या बाबतीत जर असंवेदनशीलता दाखवली गेली, तर अनेक पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, आपण नेहमी सकारात्मक निर्णय घेत आला आहात.हा पण मुद्दा आपण मार्गी लावावा व मुलांना न्याय द्या.@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील लाखो PSI परीक्षार्थींची मागणी पूर्ण करावीच लागेल, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून परीक्षार्थींना “न्याय” मिळवून देणारच !
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@CMOMaharashtra#PSIवयवाढ_1वर्ष_GR#PSIVivad
#PSIAgeRelaxation
#JusticeForPSIAspirants
#MPSC2025
#SavePSIDreams
#EqualOpportunity
#StudentsWantJustice
#MPSCStudents
#PSIExam2025
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही.
जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी.
PSI_वयवाढ_1वर्ष_GR
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
आदरणीय CM साहेब जाहिरात तब्बल 7 महिने उशिरा आल्याचा फटका अनेक उमेदवारांना बसला आहे.वयोमर्यादा गणनेसाठी 1 Nov 2025 ही तारीख निश्चित केल्याने अवघ्या काही दिवसांच्या फरकाने हजारो विद्यार्थी अपात्र ठरले आहेत संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी.@CMOMaharashtra
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी दि. २९ जुलै, २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यासाठी परीक्षार्थींची वयोमर्यादा ग्राह्य धरण्यासाठी दि. ०१ नोव्हेंबर, २०२५ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. सदर जाहिरात नियमित प्रघाताप्रमाणे अपेक्षित वेळेच्या ७ महिने उशिरा प्रसिद्ध झाली असून, वयोमर्यादा ग्राह्य धरण्यास दिलेल्या तारखेमुळे सदर परीक्षेस अनेक परीक्षार्थी वयोमर्यादा ओलांडल्याने अपात्र ठरत आहेत.
यापूर्वी मागील वर्षी अशाच स्वरूपाची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने राज्य शासनाने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करून उमेदवारांना एक वर्षाची सवलत प्रदान केली होती. तसेच याच वर्षीच्या पोलिस शिपाई भरतीमध्ये सुद्धा वय सवलत देण्यात आली होती.
ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी इच्छुक परीक्षार्थींना एक वर्ष वयाची सवलत देण्यात यावी किंवा त्यानुसार वयोमर्यादा ग्राह्य धरण्याच्या तारखेत बदल करण्यात यावा, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र भाऊ फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office
#MPSC
#वयवाढमुद्दा
In this short clip of a podcast, I tried to explore another angle—one that may be unpopular but needs to be addressed.
We’ve seen videos where people are aggressively refusing to speak even a few words in Marathi. If you’ve been living in a state for years, learning basic words of the local language isn’t a defeat—it’s respect. Even saying, ‘I don’t know Marathi, but I’m willing to learn,’ can defuse half the conflicts before they even start.
It’s not about language. It’s about harmony over ego. #Marathi #Respect #LanguageHarmony #MaharashtraPolitics #RajThackeray #MarathiLanguageRow
@RajThackeray@mnsadhikrut@ShivSenaUBT_
मा. रजनीश सेठ
अध्यक्ष,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बेलापूर, नवी मुंबई.
विषय: लिपिक-टंकलेखक भरती 2023 च्या अंतिम निवड यादी जाहीर करण्याबाबत विनंती
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेली लिपिक-टंकलेखक भरती 2023 ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. आयोगानेच जून 2025 च्या पहिल्या आठवड्यात अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल, असे जाहीर केले होते. परंतु आजपर्यंत ती यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
या भरती प्रक्रियेसाठी हजारो विद्यार्थी गेली अनेक महिने प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यावर मानसिक, आर्थिक व सामाजिक तणाव वाढत आहे. भरतीची प्रक्रिया विलंबाने होत असल्यामुळे अनेक उमेदवारांचे पुढील शैक्षणिक, कौटुंबिक व नोकरीसंदर्भातील निर्णय रखडले आहेत.
आपल्याकडे नम्र मागणी आहे की:
1. लिपिक-टंकलेखक भरती 2023 ची अंतिम निवड यादी तात्काळ जाहीर करण्यात यावी.
2. निकाल प्रक्रियेमध्ये आणखी विलंब होणार असल्यास, त्याबाबत अधिकृत स्पष्टीकरण व निश्चित तारीख जाहीर करण्यात यावी.
3. आयोगाने भविष्यात अशा भरती प्रक्रियांबाबत वेळापत्रकांचे काटेकोर पालन करावे, ही नम्र अपेक्षा आहे.
आपण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही बाब गांभीर्याने घेऊन त्वरित निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती (रोजगार विभाग) करिता,
धनंजय रामकृष्ण शिंदे
प्रत: मा. हर्षवर्धन सपकाळ, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस समिती
@mpsc_office@INCHarshsapkal
मा.@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 फायनल यादी जून 2025 च्या पहिल्या आठवड्यात लागेल असे आपण जाहीर केलेलं आहे.
आज आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. कृपया आज निकाल जाहीर करावा..
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
मा. @mpsc_office जाहिराती मध्ये अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 3 जून तर संकेतस्थळावर 9 जून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक दाखवत आहे......9 जून अंतिम दिनांक समजून काही उमेदवारांनी अर्ज अजून भरलेला नाही...त्यांना आलेल्या या समस्याचे निराकरण करून त्यांचे अर्ज भरून घ्यावे.
#COMBINEAMINS24
महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त परीक्षा २०२४.
📌ही पूर्व परीक्षेपासूनच आरक्षणाच्या कचाट्यात सापडली असल्यामुळे ह्याचा अंत हा अनिश्चित आहे.
📌 राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलणे हा उपाय होऊ शकत नाही.
📌नोंद-तात्पुरत्या पर्याया पेक्षा कायमस्वरूपी उपाय महत्वाचा.
🙏🌱
@mpsc_office