औषध निरीक्षक पदाच्या पेपरसाठी ५० लाख????
पेपरफुटीच्या तपासात पुढं येत असलेले तपशील हे अत्यंत धक्कादायक आहेत.
५० लाख घेऊन पेपर देणाऱ्या सिस्टिममधील या किड्यांपर्यंत तपास पोचला पाहिजे. अन्यथा एकही किडा लपून राहिला किंवा सरकारने त्याला वाचवला तर तो आणखी किड्यांची पैदास केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं व्यवस्था पोखरणारी ही कीड मुळातून नष्ट झाली पाहिजे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असला तरी तो बड्या किड्यांपर्यंत पोचतोय की नाही, यावर आमचं बारकाईने लक्ष आहे.
@Dev_Fadnavis@mpsc_office
"प्रवीण पाटील भरपूर पेपर फोडत असतात कधी सापडत नाहीत,MPSC चा फोडला तर बाकी काय"
अभ्यास करणाऱ्या उमेदवारांच्या अंगावर काटा येणारे हे वाक्य आहे, याने बाकी पेपर तर सहजच फोडले असणार आहेत... सर्व परीक्षांचा तापस होणे गरजेचे..
👉आदर्श शिक्षकाची आदर्श पोरगी..... 🙌
@Dev_Fadnavis
‘रोजगार न्याय यात्रे’तून महाराष्ट्रातील युवकांचा बुलंद आवाज! ✊
रिक्त पदांची तातडीने भरती, प्रलंबित भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे, सर्व परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेणे आणि पेपरफुटीविरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने पुण्यात ‘रोजगार न्याय यात्रा’ काढण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यात्रेचा प्रारंभ केला. यावेळी AICC सचिव व महाराष्ट्र सहप्रभारी श्री. बी. एम. संदीप आणि AICC सचिव व महाराष्ट्र सहप्रभारी श्रीमती रेहाना क्रिस्टी यांनी पुणे महानगरपालिका येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना ठाम पाठिंबा दिला. यात्रेत गोपाल तिवारी व अतुल लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बळीराम डोळे यांच्यासह पुणे शहर व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, युवक, विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दिवसरात्र मेहनत करून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना माफी मिळणार नाही. भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यात्रेदरम्यान सिंचन भवन येथे मुख्य अभियंता तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन युवकांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि भरती प्रक्रिया पारदर्शक, गुणवत्ताधारित व भ्रष्टाचारमुक्त होईपर्यंत काँग्रेसचा हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.
@INCHarshsapkal@BMSandeepAICC@RayazRehana@atullondhe
@CongressRojgar
@PMCPune@CollectorPune #Dhananjay_Shinde #DhananjayShinde
आरोग्य विभागातील रखडलेली गट क ची परीक्षा ही फक्त @mpsc_office मार्फतच झाली पाहिजे. ज्यांना घोटाळे करायचे आहेत त्यांची ही मागणी आहे. @CMOMaharashtra@abitkar_prakash तुम्हाला आताच आम्ही सांगतो परीक्षा जर खाजगी कंपनी मार्फत घेतली तर पेपर पुन्हा फुटले समजा त्यामुळे योग्य निर्णय घ्या
तलाठी या पदासाठी कोतवाल या पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 20% आरक्षण जाहीर केले आहे. या आधी तहसीलदार, नायब तहसीलदार यासारखी पदे 83% पदोन्नतीने भरणार आहेत. तलाठी भरतीबाबतचा निर्णय लवकरात लवकर माघे घ्या. नाहीतर सर्व विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल
@cbawankule@Dev_Fadnavis
MPSC पेपर फुटीची जबाबदारी कोणाची?
MPSC अध्यक्ष व सचिव राजीनामा देणार का?
MPSC मार्फत घेण्यात आलेला "औषध निरीक्षक" / Drug Inspector पदाचा पेपर फुटला या बातम्या समोर येत आहेत, एक तर MPSC चा पेपर बाहेरील व्यक्ती फोडूच शकत नाही पण हा पेपर फुटला कसा? MPSC सचिव एकदा म्हणतात अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करू आणि पुन्हा म्हणतात चौकशी करू.
मागील वीस वर्षात कधीच MPSC चा पेपर फुटला नाही मग तो आत्ताच कसा फुटला? वेळोवेळी MPSC ऑफलाईन पेपर ची पारदर्शकता दाखवून ऑनलाइन परीक्षेला विरोध केला म्हणून हे तर सिद्ध करायचं नाही ना की MPSC चाही पेपर फुटतो म्हणून आम्ही ऑनलाईन कडे वळलो.
MPSC चा पेपर फुटला हे जर सिद्ध झाले तर मात्र MPSC सचिव व MPSC अध्यक्ष यांना राजीनामा द्यावाच लागेल.
मागील वीस वर्षात कधीच पेपर फुटला नाही मात्र हा पेपर जर फुटला असेल तर विद्यमान अध्यक्ष व सचिव यांच्या कृपेनेच हा पेपर फुटला असावा ही शंका नाकारता येणार नाही.
@Dev_Fadnavis साहेब, @maha_governor साहेब जर हा पेपर फुटला असेल तर आपण यांना पाठीशी घालू नये. MPSC अध्यक्ष व सचिव यांना हटवून MPSC ऑनलाईन चा घाट बंद करा आणि पारदर्शकपणे परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यासाठी लायक अध्यक्ष व सचिव निवडा.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@RRPSpeaks@RealBacchuKadu@satejp@AbhiPawarBJP@DrSEShinde@uddhavthackeray@abpmajhatv@TV9Marathi@ibn_lokmat@SakalMediaNews@abhijeet_dipke@mpsc_office
अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा....
आता MPSC ऑफलाइन परीक्षेसाठी एमपीएससी परीक्षार्थींचा उद्रेक पाहायचा नसेल तर लवकरात लवकर संपूर्ण ऑफलाईन ची घोषणा करावी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विद्यार्थ्यांची ताकद लक्षात घेऊन तसेच पुणे आणि मुंबई येथील मोर्चे पाहून आणि MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इतिहास पाहून हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा.
विद्यार्थी ना आता दबावाला घाबरत आहेत ना लाठीचार्जला... विद्यार्थ्यांची भीती तुम्हीच घालवलेली आहे.
विद्यार्थ्यांचा हा जनआक्रोश रस्त्यावर येण्यापूर्वीच निर्णय घ्या? विद्यार्थी रस्त्यावर आले तर तुम्ही निर्णय घेताच पण विनंती ही आहे की विद्यार्थ्यांचा तो वेळ वाया जाण्याच्या आधी तो ऑनलाइन परीक्षेचा निर्णय रद्द करा आणि सरळ सेवा तसेच इतर ज्या पदांच्या जाहिराती रखडलेले आहेत त्या लवकरात लवकर काढा हेच सरकारच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे.
राज्य सरकारने जंतर-मंतर वरील आंदोलनातून शिकावे हीच विनंती...
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@RealBacchuKadu@RRPSpeaks@Dhananjay4INC@satejp@mpsc_office
🚶♂️ पुणे ते मुंबई "रोजगार यात्रा"......
रोजगारासाठी यात्रा – विद्यार्थ्यांच्या न्याय, रोजगार आणि भविष्याच्या हक्कांसाठी!
महाराष्ट्रातील बेरोजगार युवक-युवती, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो तरुणांच्या न्याय्य हक्कांसाठी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्यातील विद्यार्थी, विद्यार्थी संघटना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या संस्था व क्लासेस, शिक्षक, शिक्षक संघटना, विविध सामाजिक संघटना तसेच समविचारी राजकीय पक्ष यांच्या सहकार्याने ऐतिहासिक "पुणे ते मुंबई रोजगार यात्रा" आयोजित करण्यात आली आहे.
ही रोजगार यात्रा देशात NEET, CBSE, MPSC आणि इतर विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांना पूरक आहे. देशभरातील विद्यार्थी परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि न्यायाची मागणी करत असताना, महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार युवक-युवती, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांचा आवाज बुलंद करण्यासाठी ही रोजगार यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
ही यात्रा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून, "देशभरातील विद्यार्थी, युवक आणि रोजगाराच्या हक्कासाठी सुरू असलेल्या लोकशाही लढ्याशी एकात्मता व्यक्त करणारी चळवळ" आहे. नवीन रोजगारनिर्मिती, रिक्त शासकीय पदांची भरती, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, पेपरफुटीला आळा, भरती प्रक्रियेतील घोटाळ्यांवर कठोर कारवाई आणि गुणवत्ताधारित संधी यासाठी व्यापक जनजागृती करून लोकसमर्थन उभे करणे हा या यात्रेचा प्रमुख उद्देश आहे.
आज या यात्रेसाठी आवश्यक "परवानगी, पोलीस संरक्षण, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था आणि राज्यातील सर्व संबंधित पोलीस यंत्रणांमध्ये समन्वय" साधण्यासाठी महाराष्ट्राचे "मा. पोलीस महासंचालक डॉ. सदानंद दाते" यांना अधिकृत निवेदन ई-मेलद्वारे तसेच स्वाक्षरी व शिक्क्यासह सादर करण्यात आले आहे.
📍 यात्रेचा कालावधी : रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ ते शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६.
🟢 शुभारंभ : रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६.
🕙 सकाळी "१०.०० वाजता" पुण्यातील "महात्मा फुले वाडा" येथे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना अभिवादन.
🕛 क्रांती दिनाच्या निमित्ताने दुपारी १२.०० वाजता नऱ्हे, पुणे येथून रोजगार यात्रेला प्रारंभ.
📍 विशेष कार्यक्रम
शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ - महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), सीबीडी बेलापूर, येथे विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येईल.
🇮🇳 समारोप : शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ (स्वातंत्र्य दिन).
📍 छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर** येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन.
📍 चैत्यभूमी** येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.
📍 आझाद मैदान, मुंबई येथे रोजगार यात्रेचा समारोप.
✊ रोजगार यात्रेच्या प्रमुख मागण्या:
✅ राज्यातील सर्व शासकीय विभागांतील रिक्त पदांची तातडीने जाहिरात काढून पारदर्शक, वेळबद्ध व गुणवत्ताधारित भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.
✅ महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ७०,००० शासकीय रिक्त पदांची भरती डिसेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात यावी.
✅ भविष्यातील सर्व "महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा **ऑफलाईन (OMR आधारित)** पद्धतीने घेण्यात याव्यात.
✅ भरती प्रक्रियेत होणारे विलंब, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार तातडीने थांबवून संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक करण्यात यावी.
✅ पेपरफुटी, परीक्षा व भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यात यावा.
🎯 यात्रेची प्रमुख उद्दिष्टे
• राज्यातील रिक्त शासकीय पदे तातडीने भरून नवीन रोजगारनिर्मितीसाठी राज्यव्यापी जनदबाव निर्माण करणे.
• परीक्षा पेपरफुटी, भरती घोटाळे आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर व्यापक जनजागृती करून युवकांच्या न्याय्य मागण्यांना लोकसमर्थन मिळवून देणे.
• स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र आणून राज्यव्यापी लोकचळवळ उभी करणे.
• दररोज किमान ५०० विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिकांच्या सहभागाचे नियोजन** करण्यात आले असून, राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे.
• यात्रा ज्या-ज्या जिल्हे, तालुके आणि शहरांमधून मार्गक्रमण करेल, तेथे समविचारी संघटनांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांच्या माध्यमातून स्वागत, जनसंपर्क, स्थानिक सभा आणि व्यवस्थापन उभारण्यात येईल.
ही रोजगार यात्रा "पूर्णतः संविधानिक, शांततापूर्ण आणि अहिंसक" स्वरूपाची असेल. शहर व गावांमध्ये पदयात्रा करण्यात येईल, तर राष्ट्रीय महामार्गावरील निर्जन अथवा असुरक्षित भाग आवश्यकतेनुसार बस किंवा इतर वाहनांद्वारे पार करण्यात येतील. महाराष्ट्र पोलीस प्रशासनाच्या सर्व अटी, नियम आणि सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येईल.
ही केवळ पदयात्रा नाही... ही महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार युवक-युवतींच्या "रोजगार, सन्मान, समान संधी आणि भविष्याच्या हक्कासाठीची लोकशाही चळवळ आहे.
रोजगार हा उपकार नाही... तो प्रत्येक तरुणाचा घटनात्मक हक्क आहे.
चला, रोजगाराच्या लढ्यात सहभागी होऊया! 🇮🇳
------------------------------------------------------
🚶♂️ Pune to Mumbai "Rojgar Yatra"
A March for Employment – A Fight for Students' Rights, Justice and the Future of India's Youth
To uphold the rights of unemployed youth, competitive examination aspirants, and millions of young people awaiting employment opportunities in Maharashtra, the Maharashtra Pradesh Congress Committee (MPCC), under the guidance of its President Shri Harshwardhan Sapkal, is organizing the historic "Pune to Mumbai Rojgar Yatra" with the participation of students, student organizations, coaching institutes, teachers, teachers' associations, social organizations, and like-minded political parties.
The Rojgar Yatra complements Shri Rahul Gandhi's nationwide "Chhatron Ki Goonj" campaign as well as the ongoing student movements across India against NEET, CBSE, MPSC and other examination paper leaks, recruitment irregularities, and injustice faced by students and job aspirants. At a time when students across the country are demanding transparency, accountability, and fairness in examinations and public recruitment, this Yatra seeks to amplify the voice of millions of unemployed youth and competitive examination aspirants in Maharashtra.
The Yatra is not merely a state-level initiative; it is an expression of solidarity with the nationwide democratic movement demanding transparent examinations, fair recruitment, employment opportunities, and justice for India's youth.
Today, an official representation seeking permission, police protection, traffic management, security arrangements, and inter-departmental coordination for the Yatra was submitted to Shri Sadanand Date, Director General of Police, Maharashtra, through email as well as a duly signed and stamped hard copy.
📅 Duration
Sunday, 9 August 2026 to Saturday, 15 August 2026
📍 Flag-off Ceremony
Sunday, 9 August 2026
10:00 AM: Floral tribute at Mahatma Phule Wada, Pune, paying homage to Mahatma Jyotirao Phule and Krantijyoti Savitribai Phule.
12:00 Noon: Official commencement of the Rojgar Yatra from Narhe, Pune, on the occasion of Kranti Din (August Revolution Day).
📍 Special Programme
Friday, 14 August 2026
A delegation will submit a memorandum highlighting students' demands to the Maharashtra Public Service Commission (MPSC) at CBD Belapur, Navi Mumbai.
🇮🇳 Conclusion
Saturday, 15 August 2026 – Independence Day
The Yatra will conclude with:
Tribute to Chhatrapati Shivaji Maharaj at Shivaji Park, Dadar.
Tribute to Dr. B. R. Ambedkar at Chaityabhoomi.
Public conclusion of the Yatra at Azad Maidan, Mumbai.
✊ Key Demands of the Rojgar Yatra
Immediate notification and time-bound recruitment to fill all vacant posts across Government departments through transparent and merit-based recruitment.
Completion of recruitment for the 70,000 Government vacancies announced by the Government of Maharashtra before December 2026.
All future Maharashtra Public Service Commission (MPSC) examinations must be conducted offline through the OMR-based system.
End delays, corruption, and irregularities in public recruitment and ensure complete transparency and accountability.
Take stringent action against those responsible for examination paper leaks and recruitment scams to restore the confidence of students and aspirants.
🎯 Objectives of the Yatra
• Build a statewide people's movement demanding immediate filling of Government vacancies and creation of employment opportunities.
• Raise public awareness regarding unemployment, examination paper leaks, recruitment scams, and systemic failures affecting students and youth.
• Mobilize competitive examination aspirants, unemployed youth, their families, and citizens across Maharashtra in support of fair recruitment and employment.
• Ensure participation of at least 500 students and youth every day, with people joining the Yatra from different districts across Maharashtra.
• Actively involve District Congress Committees, City Congress Committees, Taluka Congress Committees, frontal organizations, cells, local office bearers, volunteers, student bodies, teachers, coaching institutes, and civil society organizations in organizing public meetings, outreach programmes, logistics, and local coordination throughout the route.
The detailed route, halts, public meetings, district-wise programme, and micro-level planning are currently being finalized and will be announced separately.
The Rojgar Yatra will remain entirely constitutional, peaceful, disciplined, and non-violent. The march will proceed on foot through cities and populated areas, while isolated or unsafe stretches along national highways will be covered by buses or other vehicles. All directions and conditions prescribed by the Maharashtra Police will be strictly complied with.
This is not merely a march.
It is a democratic movement for the right to employment, dignity, equal opportunity, and a secure future for millions of young people in Maharashtra.
Employment is not a favour. It is the constitutional aspiration and rightful expectation of every young citizen.
Join the movement. Stand up for employment. Stand up for India's youth. 🇮🇳
#PuneToMumbaiRojgarYatra #RightToEmployment #Fill70000Vacancies #MPSC #OfflineMPSC #StopPaperLeak #NEET #CBSE #ChhatronKiGoonj #RahulGandhi #EmploymentForYouth #Maharashtra #Congress #Students #Youth #Justice #JaiHind
@TusharG@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@degree_holders@Mpsc_Andolan@VastavKatta @CongressRojgar
#पुणेतेमुंबईरोजगारयात्रा #रोजगारयात्रा #रोजगारहक्कआहे #Fill70000Vacancies #MPSC #OfflineMPSC #StopPaperLeak #NEET #CBSE #छात्रोंकीगूंज #RahulGandhi #EmploymentForYouth #Maharashtra #Congress #स्पर्धापरीक्षा #रोजगार #जयहिंद
असे काही चांगले निर्णय घेतले तर आम्ही तुमचे स्वागत करू. डोक्यावर उचलून घेऊ. पण विनाकारण सरकारच्या दबावाखाली आपण MPSC ऑनलाईन करू नका. आज लाखो विद्यार्थी आपल्याकडे एक आशेने बघतात. एवढे चांगले काम करत असताना ऑनलाईन कशाला?? कालच्या निर्णयाचे खूप खूप स्वागत.
@mpsc_office@bhimanwar
दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्र पोलिसांची दादागिरी पहा...
युवा आंदोलक व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झटणारे
श्री रजिराज साबळे यांना स्लिप डिस्कचा त्रास होतं असताना देखिल हतबल व मुजोर पोलीस कर्मचाऱ्यांनी कश्या प्रकारे ताब्यात घेतलंय....!!
जाहीर निषेध 🏴🏴🏴
#RavirajSabale 💔
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जंतर-मंतर येथे येऊन दिल्ली पोलिसांच्या क्रूर कारवाईनंतर विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
जरांगे पाटील साहेबांनी आमच्या आंदोलनाला आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला आपला जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे.
I sincerely thank Maratha Andolan leader Manoj Jarange Patil sir for coming to Jantar Mantar and standing with the students after the brutal police action by the Delhi Police.
Jarange sir has extended his support to our movement and to our demand of the resignation of the Education Minister.
MPSC ला निष्क्रिय करण्याचा घाट मोडून काढला जाईल, ऑनलाइन परीक्षेचा घाट घालून ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांवर लादल्या गेल्या आणि लगेच एमपीएससी मार्फत भरली जाणारी पदे ही पदोन्नतीने भरण्यात येणार हा शासनाचा निर्णय एमपीएससी ला निष्क्रिय करणारा आणि आर्थिक गैर व्यवहारांना बळ देणारा आहे.
जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज केला आहेच आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला तर कोणालाही नवल वाटणार नाही. एका धर्मेंद्र प्रधान साठी संपूर्ण दिल्ली पोलीस आणि सरकार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठले आहे. महाराष्ट्रामध्ये TCS साठी किंवा इतर कोणासाठी सरकार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठणार तर नाही ना?
#mpscofflineexam
सरकारने लवकरात लवकर १००% भरतीच्या जाहिराती जाहीर केल्या नाहीत, तर पुणे ते मुंबई “बेरोजगार न्याय यात्रा” काढण्याचा गंभीर विचार आम्ही करत आहोत. ही यात्रा पूर्णपणे शांततापूर्ण, संविधानिक मार्गाने, आवश्यक पोलीस परवानगी घेऊन आणि विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांच्या सहभागाने आयोजित केली जाईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीला एकच सांगू इच्छितो, कृपया कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नका, कोणताही टोकाचा विचार करू नका. ही कठीण वेळ नक्की जाईल. तुमच्या वेदना, संघर्ष आणि अपेक्षा आम्हाला पूर्णपणे समजतात.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली, तुमच्या न्याय्य हक्कांसाठी ठामपणे लढत आहे आणि पुढेही लढत राहील.
आपण सर्व मिळून सकारात्मक बदल घडवू आणि तो नक्की घडेल, यावर आमचा ठाम विश्वास आहे.
We are with you. ✊🇮🇳
जय संविधान, जय भारत 🇮🇳!
@INCHarshsapkal@INCMaharashtra
MPSC CBT (ऑनलाईन) परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. हा विरोध विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येत नाही म्हणून नसून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा पारदर्शक होत नाही हे वारंवार सिद्ध झालेले आहे. महापरीक्षा पोर्टल का बंद केले? TCS, IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा MPSC कडे देण्याचा निर्णय सरकारने का घेतला? ऑनलाईन परीक्षा मधील भोंगळ कारभार समोर असतानाही त्याच कंपन्यांना परीक्षा घ्यायला देणे म्हणजे MPSC ला पांगळे करण्यासारखे आहे. मागील वीस वर्षापासून MPSC मार्फत एकदाही पेपर फुटण्याची घटना नाही, कोणताही गोंधळ नाही तरीही परीक्षा ऑनलाईन घेण्याचा घाट का?
ऑगस्ट 2027 नंतर पुन्हा परीक्षा ऑनलाईन घेणार म्हणजे आजचे मरण उद्यावर. 30-40 हजार पदे भरणार ते 2026 मधेच भरणार का? सरळसेवा MPSC मार्फत २०२६ मधेच घेणार का? याविषयी काहीच माहिती नाही.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, जमावबंदी लागू करून विद्यार्थ्यांचा हक्क हिरावला जात आहे. तुम्ही कितीही दडपशाही करा ऑनलाईन परीक्षा मान्य नाहीच.
#onlyofflineexam
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@mieknathshinde
आपल्या मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरही अशाच प्रकारे इंग्रजांकडून लाठीचार्ज केला जात होता... इंग्रजांनाही लाजवणारं हे क्रूर आणि निष्ठूर सरकार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या हुकूमशाही सरकारचा तीव्र निषेध!
दिल्ली मध्ये संसदेवर निघालेला विराट मोर्चा सर्वार्थाने चिरडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. मात्र लोकशाहीमध्ये सर्वात शक्तिशाली रस्त्यावर उतरलेला सर्वसामान्य माणूस असतो हे आज सरकारच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. २० दिवस अन्नत्याग करून देखील शासनाने या आंदोलनाची दखल तर घेतली नाहीच मात्र सोनम वांगचूक यांना हुकुमशाही पद्धतीने उचलण्यात आले. आपली चूक सरकार मान्य करत नाहीच मात्र उलट लोकशाही पद्धतीने आंदोलन देखील करून दिले जात नाही. सरकारने आता तरी शहाणं व्हावं आणि अकार्यक्षम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, नाहीतर हे आंदोलनच त्यांच्या शेवटाची सुरवात असेल आणि हे सरकार असंच वागत राहिलं तर केवळ तांत्रिकदृष्ट्या सत्तेवर असलेल्या या सरकारला देशभरातील तरुण सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत.
@Wangchuk66@abhijeet_dipke@CJP_for_India
#विनाशकाले_विपरीत_बुद्धी
#JantarMantar #CJPProtest