Goa State Biodiversity Board आणि Center for Citizen Science यांच्या दरम्यान नुकताच सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या MoU नुसार CCS च्या #Satark या उपक्रमांतर्गत गोवा राज्यासाठी तीव्र हवामान, दरडी यांच्याशी संबंधित पूर्वसूचना, प्रशिक्षण, प्रबोधन आदी उपक्रम राबविण्यात येतील.
सतर्कची दशकपूर्ती!
दरडींची पूर्वसूचना देणारी 'सतर्क' @satarkindia ही यंत्रणा नागरीक आणि शास्त्रज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांतून १५ ऑगस्ट २०१५ ला सुरू झाली. आज या उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाली. #SatarkAlert#Landslides#CitizenScience#India
सध्या आकाशात तेजस्वी दिसणारे गुरू, शुक्र, तसेच शनी, चंद्र आकाशप्रेमींना टेलिस्कोपमधून पाहण्याची संधी #KhagolVishwa च्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.
१२ डिसेंबर, गुरुवारी संध्या. ७ ते ९
स्थळ: इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कुल, बावधन (चांदणी चौकाजवळ)
प्रवेश सर्वांसाठी मोफत खुला.
#Landslide Early Warning System - need and current scenario in India. Story by @nivedita_Him of #PTI which also covers efforts by 'Satark' @satarkindia of Center for Citizen Science in this field. Thanks Nivedita Khandekar Madam for detailed coverage !
https://t.co/78QXp6WQoG
Well articulated @Shravanverse
We do certainly need better prediction and response.
For citizens' initiatives, please check also @mayureshgp who runs a well organized weather collection network with citizen science.
@Vibha_India@scienceccs
https://t.co/CMU2vHa9A5
Center for Citizen Science (CCS) completed 12 years today ! Thanks everyone for your active participation and kind support during this 'Scientific Journey' 🙏 #CitizenScience#ScienceVolunteer
@yash_gupta_62 Thank You Sir for giving us opportunity and wonderful platform to reach out around 25000 Science enthusiasts from all parts of Maharashtra.
🌟 @IUCAAstro Public Lecture 🌟
🤖 ZARTH - How to catch a supernova?
🎙️ Dr. Ashish Mahabal @aschig
📅 13th Dec, 2023
⏰ 6:00 pm
📍 Chandrasekhar Auditorium, IUCAA (in-person)
Find out how you can contribute to Astro discovery using real scientific data with the ZARTH android app
#पुणेविज्ञानसंवाद मध्ये रविवारी आयुकातील शास्त्रज्ञ प्रा. सुहृद मोरे यांचे 'विश्वातील कृष्ण पदार्थाचा नकाशा' या विषयावर व्याख्यान झाले. व्याख्यानानंतर उपस्थितांनी प्रा. मोरे यांच्याशी थेट संवाद साधला.
#पुणेविज्ञानसंवाद येत्या रविवारी (२६ नोव्हेंबर), संध्या ५ ते ७, रानडे इन्स्टिट्यूट येथे. @anoopsmahajan आणि @astrosumo दोघेही तरूण शास्त्रज्ञ, ज्यांच्या संशोधनाची जगभरात दखल घेतली जाते. डॉ. अनूप आणि प्रा. सुहृद यांना ऐकायला, त्यांच्याशी संवाद साधायला नक्की या !
सीसीएसच्या २०२३- २४ च्या विज्ञान स्वयंसेवक अभ्यासक्रमाची आज उत्साही आणि आश्वासक सुरुवात झाली. या अभ्यासक्रमात विज्ञानाचे विद्यार्थी, आयटी प्रोफेशनल, वकील, प्राध्यापक, तसेच विज्ञान, सामाजिक शास्त्रे, आणि भाषा विषयांचे पदवीधर यांचा सहभाग आहे. पुढील पाच महिने या स्वयंसेवकांना विविध विषयांतील शास्त्रज्ञ, तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. त्यांना आकाश निरीक्षण, जैवविविधता, वारसा सर्वेक्षण आदी फिल्ड वर्कचे प्रशिक्षण देण्यात येईल. ते संशोधन संस्थांना भेट देतील आणि पुढे वर्षभर विविध संशोधन प्रकल्पात सहभागी होतील. #CitizenScience #ScienceVolunteer @scienceccs
जुलै २०२३ च्या #पुणेविज्ञानसंवाद मध्ये प्रा. योगेश वाडदेकर यांचे 'गुरुत्वीय लहरींच्या गोंगाटाचा शोध' आणि डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांचे 'महाराष्ट्रातील तीव्र हवामानाच्या घटना' या विषयांवर व्याख्यान झाले. व्याख्यानांनंतरचा शास्त्रज्ञ आणि पुणेकर यांच्यातील संवादही तितकाच अभ्यासपूर्ण होता. कार्यक्रमाला श्री. अमित परांजपे यांची विशेष उपस्थिती लाभली. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'रानडे इन्स्टिट्यूट' येथे संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत 'पुणे विज्ञान संवाद' आयोजित केला जातो. #Pune #ScienceTechnology
#PuneVidnyanSanvad
जुलै २०२३ चा 'पुणे विज्ञान संवाद' ◆ गुरुत्वीय लहरींच्या गोंगाटाचा ऐतिहासिक शोध आणि ◆ महाराष्ट्रातील तीव्र हवामानाच्या घटनांवर असेल. वरिष्ठ शास्त्रज्ञांशी प्रत्यक्ष संवाद साधायला नक्की या.