@NikhilPatil_MH@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office सर मनःपूर्वक आभार
वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांवर वर्षानुवर्षे झालेल्या अन्यायावर गुजरात तामिळनाडू इ. सारख्या राज्यांमध्ये लेखा व लेखापरीक्षण पदांकरिता स्वतंत्र कॅडर प्रमाणे महाराष्ट्रात देखील स्वतंत्र कॅडर करून वाणिज्य विद्यार्थ्यांना ��्याय द्याल, ही अपेक्षा.
@CMOMaharashtra
राजकीय आंदोलनांच्या गदारोळातही विद्यार्थ्यांच्या भविष्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच होता...!
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय नेत्यांनी राजस्थानच्या धर्तीवर ₹१०० चे कार्ड घेऊन परीक्षा देण्यासंदर्भात विविध मागण्या मांडल्या होत्या. मात्र, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी राजस्थानच्या धर्तीवर ₹१०० च्या कार्डऐवजी सर्व MPSC परीक्षांचे अर्ज पूर्णपणे ₹० (निःशुल्क) भरता यावेत, अशी आग्रही मागणी मी यापूर्वीही केली होती.
परवासुद्धा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब आणि श्रीमती व्ही. राधा जी यांच्याकडे ही मागणी पुन्हा मांडली. मात्र, ही सुविधा सुरू करताना तिचा लाभ केवळ प्रामाणिकपणे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळावा, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी मी केली आहे.
त्याचबरोबर परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता टिकवण्यासाठी आणखी दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
१. प्रश्नपत्रिका छपाईपासून ते परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंतची संपूर्ण यंत्रणा अत्याधुनिक आणि सुरक्षित करण्यात याव��.
२. परीक्षेच्या दिवशी प्रत्येक परीक्षा केंद्राच्या तपासणीसाठी (Inspection) स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.
या सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर शासनाकडून निश्चितच योग्य आणि विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला जाईल, असा मला विश्वास आहे.
माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना एवढेच सांगायचे आहे की, राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा. द��वेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि हा तुमचा निखिल पाटील तुमचा सहकारी म्हणून कायम तुमच्यासोबत उभा राहील. तुम्ही बिनघोर राहा, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका आणि फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
तुमच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याची आणि त्यांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी आहे!
@Dev_Fadnavis @mpsc_office
@CMOMaharashtra
@Ashishjaisw3Adv Sir, you promised justice to Commerce students. Failure to act > 8 days may lead to a loss of trust
Sir, stand by your word. Don't bow to lobby pressure or let Commerce students suffer injustice
Sir, Officials r deliberately delaying decision. Take firm action & ensure justice
@Ashishjaisw3Adv@Ashishjaisw3Adv साहेब आपले प्रयत्न प्रमाणिक आहेत. पण Justice Delayed is Justice Denied! कारण क.लेखापाल, क.लेखापरीक्षक पदांचे मागणी ‘Any Degree’ वर पाठवले गेले आहेत! श्री. राजुरकर समितीने एनी डिग्रीचा अहवाल 14 दिवसांत दिला, आणि आता दोन महिने झाले तरी अहवाल नाही! न्याय द्या साहेब!
@mineralwathn@Sk_alkari@CMOMaharashtra Kahi state madhye tyach post la seperate cadres and anek rajyaat tyach post la commerce compulsory.
Maharashtra madhye kityek govt bodies, local govt, deputation org. madhye pn tyach post la commerce compulsory.
@mineralwathn aaplya study apurn aslyane lokanchi dishbhul karu naye
3/3
स���कारी संस्थांचे अकाउंट सीए फर्मने करावं आणि त्या अकाउंट्सचं ऑडिट मात्र BA, Engg & Agree पदवीचं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी करावं, याने भ्रष्टाचाराला आळा बसेल का? @RRPSpeaks @sushma
प्रशासन गतिमान राहील का? @CMOMaharashtra
यावर लक्ष आहे की हे ठरवूनचं होतंय का?
2/3
मविलेसेतील सर्व पदांच्या विभागीय परीक्षांमध्ये वाणिज्याचा अभ्यासक्रम आहे, मग वाणिज्य पात्रतेचे अधिकारी का नको? गुजरात, केरळ, कर्नाटकसह अनेक राज्यात कॉमर्स केडर असूनही महाराष्ट्र सरकार कॅडर वेगळे का करू शकत नाही?
@mieknathshinde@Dev_Fadnavis@sunetra
1/3
महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील गट अ पासून गट क पर्यंतच्या सर्व पदांना अकाउंटिंग, ऑडिटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, पब्लिक फायनान्स या विषयांची गरज असतेच! तरीही कॉमर्स पात्रता बदलून अन्य पदवीसाठी खुली करण्याचा अन्यायकारक निर्णय कोणाचे हित साधण्या���ाठी घेण्यात आलेला आहे?@CMOMaharashtra
@NikhilPatil_MH@Dev_Fadnavis@mpsc_office@CMOMaharashtra 2/2
दादा, तुमचे प्रयत्न प्रमाणिक आहेत! म्हणून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी अजूनही शासन विरोधी भूमिका घेतलेली नाही! तुमच्या प्रयत्नांना यश मिळो आणि वाणिज्य शाखेतील लाखो विद्यार्थ्यांना न्याय मिळून त्यांची ही दिवाळी आनंदी जावो, हीच प्रार्थना!
@NikhilPatil_MH@Dev_Fadnavis@mpsc_office@CMOMaharashtra Justice delayed is justice denied!
वित्त व लेखासाठी असलेल्या पदांची पात्रता एनी ग्रॅज्युएट करण्याचा डाव शासनातील काही विभागांनी मांडला आहे. त्याला वेगवेगळ्या लॉबींचे आर्थिक पाठबळ आहे! आता शासन त्या आर्थिक ताकदीपुढे झुकते, की कॉमर्स ��ाखेला न्याय देते, हे येत्या काळात कळेलच!! 1/2
Group C 2026 परीक्षेमध्ये १६,००० हून अधिक पदांचा समावेश करण्यासह उमेदवारांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढ देण्याच्या निर्णयाबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
V. राधा समितीने आपल्या अहवालात केलेल्या शिफारशीनुसार, Group C 2026 परीक्षेच्या माध्यमातून १६,००० हून अधिक पदांची भरती करण्यात यावी. तसेच, उर्वरित सर्व रिक्त पदांचे शुद्धीपत्रक तातडीने अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात यावे.
कोणत्याही पात्र उमेदवाराला या महत्त्वपूर्ण संधीपासून वंचित राहावे लागू नये, यासोबतच सदर परीक्षा कोणत्याही परिस्थितीत जानेवारी महिन्यातच घेण्यात यावी, अशी राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली आणि या विषयासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या भावना व अपेक्षा त्यांच्यासमोर मांडल्या.
या चर्चेदरम���यान, वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली अपारदर्शकतेची भावना आणि त्यासंदर्भातील विविध शंकाही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच, राज्यसेवा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ (Objective) स्वरूपातील परीक्षा पद्धतीसह इतर विविध विद्यार्थीहिताच्या विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली.
मला विश्वास आहे की, ही चर्चा अत्यंत सकारात्मक आणि फलदायी ठरली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि भावी अधिकाऱ्यांना निश्चितच आणखी एक आनंदाची बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
@Dev_Fadnavis @mpsc_office
@CMOMaharashtra
कायम कृतीतून उत्तर दिले जाईल..!
विद्यार्थ्यांनी केलेल्या जागावाढीच्या मागणीसाठी मी सातत्याने माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा करत आहेच. विद्यार्थ्यांना दिलेला शब्द सरकार पूर्ण करत आहेत, ही निश्चितच समाधानाची बाब आहे.
व्ही. राधा समितीच्या अंतरिम अहवालानुसार तातडीच्या मुद्द्यांवर लवकरच निर्णय घेतले जाणार आहेत. गट-क परीक्षेतील जागावाढीची मागणी आम्ही विद्यार्थी-शिक्षक शिष्टमंडळाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांकडे मांडली होती. त्यावेळी त्यांनी दिलेला शब्द आज पूर्ण होताने दिसत आहे.
उर्वरित मागण्या, विशेषतः राज्यसेवा परीक्षेचा Objective पॅटर्न आणि इतर विद्यार्थीहिताच्या विषयांवरही सकारात्मक निर्णय होतील, असा मला विश्वास आहे. त्यासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहील.
इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रिया राबवली जात असताना परीक्षा केंद्रांची संख्याही साहजिकच वाढणार आहे. त्यामुळे जिल्हास्तरासोबतच काही ठिकाणी तालुकास्तरावरही परीक्षा केंद्रे उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत प्रत्येक परीक्षा केंद्र सुरक्षित, सुव्यवस्थित आणि गैरप्रकारांना आळा घालणारे असावे, यासाठी शासनाने आवश्यक ती सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लावावी, अशी विनंतीही मी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे.
यासोबतच, गट-क परीक्षेची पूर्व परीक्षा देखील पूर्णतः पारदर्शक पद्धतीने आणि जानेवारी महिन्यातच घेण्यात यावी, अशी ��ग्रही मागणी मी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. परीक्षा वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात, हीच आमची ठाम भूमिका आहे.
तुमचाच,
निखिल पाटील
@Dev_Fadnavis @mpsc_office
एमपीएससी पेपरफुटी प्रकरण समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, या प्रकरणात कोणतेही राजकीय गणित न म���ंडता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सखोल चौकशीची भूमिका घेतली. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी राजकीय आंदोलनात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका राहिली आहे.
याच भूमिकेतून विद्यार्थी आणि शिक्षकांचे शिष्टमंडळ दोन वेळा मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा घडवून आणली. पेपर���ुटी प्रकरणाची चौकशी, परीक्षेचा पॅटर्न, कॉमर्स कॅडरबाबतच्या शंका-अडचणी यांसोबतच आगामी ३ जानेवारीच्या परीक्षेत इंजिनिअरिंग व इतर तांत्रिक संवर्गातील तसेच नर्सिंग सह पदांचा समावेश व्हावा आणि किमान १२ हजारांहून अधिक पदांची जाहिरात यावी, ही आग्रही मागणीही मांडली.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षांनुसार मोठ्या प्रमाणात पदभरतीचा मार्ग मोकळा होईल,असा विश्वास मला देवेन जींवर आहेच पण त्यासोबतच आयोगाची जबाबदारी देखील परीक्षा पारदर्शक आणि वेळेवरच होण्यासाठीची असावी अशी मागणी देखील देवेनजींकडे केली आहे.
विद्यार्थ्यांनी आंदोलनात, सोशल मीडियात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, तुमच्या प्रश्नां��ाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू..! काळजी नसावी.
तुमचाच,
निखिल पाटील
@Dev_Fadnavis
@mpsc_office
@CMOMaharashtra
@Nikhil_A_Patil @Dev_Fadnavis@ACS_GADServices
@Nikhil_A_Patil
कॉमर्स कॅडर बद्दल आपण ���ारंवार पाठपुरावा करत असल्याबद्दल आपले धन्यवाद.
लवकरच मा.मुख्यमंत्री वित्त,लेखा व लेखापरीक्षण सेवेसाठीस्वतंत्र कॉमर्स कॅडर करून वाणिज्य शाखेवर MPSC,FD,GAD मार्फत झालेल्या अन्यायावर वाचा फोडतील, ही आशा बाळगतो.
@Nikhil_A_Patil @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office Thank you @Nikhil_A_Patil
वाणिज्य शाखेवर वर्षानुवर्ष होत असलेल्या अन्याय लवकरच दूर होऊन स्वतंत्र वाणिज्य शाखेचे क��डर होऊन न्याय ��िळेल, हीच मा. मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती.
GAD ने आडकाठीची भूमिका न घेता सहकार्य करावे, ही विनंती.
@CMOMaharashtra
@maha_governor
@ACS_GADServices
काल पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेऊन राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
काही दिवसांपूर्वी राज्यव्यापी शिष्टमंडळाच्या माध्यमातून ज्या मागण्या मान्य झाल्या होत्या, त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतानाच विद्यार्थ्यांच्या नव्याने समोर येणाऱ्या अडचणी आणि प्रश्नही साहेबांसमोर मांडले. यामध्ये Descriptive, Objective आणि Hybrid या तिन्ही परीक्षा पद्धतींचे पर्याय, तसेच Commerce Cadre आणि Engineering Cadre मधील प्रश्नांवरही चर्चा झाली.
या भेटीदरम्यान एक गोष्ट विशेष भावली. साहेबांनी स्वतःहून ह���क मारत विचारलं, "ये निखिल, काय म्हणतोस? काय समस्या घेऊन आला आहेस?" मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची आस्थेने विचारपूस करणं, ही माझ्यासाठी समाधानाची बाब होती. आगामी काळात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवूनच शासन निर्णय घेईल, असा विश्वासही त्यांनी दिला.
माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक जण वर्षानुवर्षे मेहनत घेत आहेत. घरच्या परिस���थितीशी संघर्ष करत, अनेक अपयश पचवत केवळ एका संधीच्या आशेने अभ्यास करत आहेत. तुमच्या या मेहनतीची आणि स्वप्नांची जाणीव ठेवूनच मी सातत्याने तुमचे प्रश्न शासनदरबारी मांडत आलो आहे. तुमच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणं असो किंवा त्यावर निर्णय होईपर्यंत पाठपुरावा करणं असो, मी तुमच्यासोबत होतो, आहे आणि राहणार आहे.
माझ्याबद्दल वेगवेगळे फेक नॅरेटिव्ह पसरवून संभ्रम निर्माण कर���्याचे आणि प्रत्यक्ष कामापेक्षा श्रेय घेण्याचे प्रयत्न होत आहेत. पण स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी सुज्ञ आहेत. कोण प्रत्यक्ष मैदानात उतरून लढतंय आणि कोण केवळ श्रेयासाठी पुढे येतंय, हे त्यांना चांगलंच कळतं. त्यामुळे अशा प्रयत्नांना विद्यार्थी कधीही थारा देणार नाहीत, हा माझा विश्वास आहे.
मला कोणत्याही कामाचं वैयक्तिक श्रेय नको; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा आणि त्या���च्या आयुष्यात सकारात्मक बदल घडावा, एवढीच अपेक्षा आहे.
तुमचा विश्वास हीच माझी ताकद आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठीचा लढा हीच माझी जबाबदारी आहे.!
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@mpsc_office
आज विद्यार्थी आणि शिक्षक संघटना यांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फ��णवीस साहेब @Dev_Fadnavis यांनी दोन तासांपेक्षा जास्त वेळ देऊन सर्वांच्या मागण्या ऐकून घेतल्या, सर्वप्रथम याबाबत मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभार.
परंतु एक नम्र विनंती आहे की ज्या काही गोष्टी आजच्या चर्चेत ठरलेल्या आहेत त्याबाबत कृपया लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी जेणेकरून भविष्यात विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही.....!
#MPSC
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सर्वात जास्त अन्याय हा " कॉमर्स" शाखेवर झालेला आहे.... कॉमर्स विद्यार्थ्यांची मागणी आहे की त्यांच्या शिक्षणाच्या अनुसार सेवा प्रवेश नियम असले पाहिजेत जी अतिशय योग्य आणि रास्त मागणी आहे.
माननीय मुख्यमंत्री महोदय @Dev_Fadnavis साहेब आपण कॉमर्स विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही नम्र विनंती....!
#कॉमर्स
#वाणिज्य
#MPSC_आक्रोश_मोर्चा