पुण्यात #MPSC ची तयारी करणारा बीड मधील ��िशोर आहेर नावाचा उमेदवार कौन बनेगा करोडपती (KBC) मध्ये पोचलाय..
अभ्यासिकेत काम करून स्वाभिमान आणि कष्टाच्या जोरावर लढणारा हा मित्र विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरावा हीच ईच्छा...
भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या सदिच्छा 💐
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/३१०७०१.
प्रति,
मा. एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र.
विषय : कोविड-19 मुळे परिक्षा न झाल्याने वयोमर्यादा ओलंडणाऱ्या उमेदवारांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या सर्व परीक्षांना बसण्याची संधी उपलब्ध करून देणेबाबत.
संदर्भ : १) सनिव-2023/प्र.क्र.14/कार्या 12.दि 03/03/2023.
महाराष्ट्र शासनाचा निर्णय.
२) F.7(2) DOP/A11/84/.PL दि. 23/09/2022. राजस्थान
शासनाचा निर्णय.
३) क्रमांक सी 3-14/2019/1/3/ दि. 19/12/2022. मध्यप्रदेश
शासनाचा निर्णय.
४) क्रमांक एफ 3-2/2015/1-3/ नवा रायपूर,अटल नगर, रायपूर,
दि. 18/01/2024 छत्तीगड शासनाचा निर्णय.
५) PRPB-1-(150)/2023/1953/6-पु-1-2023-01/2023
दि. 26/12/2023 उत्तरप्रदेश शासनाचा निर्णय.
महोदय,
वरील संदर्भित विषयास अनुसरून आपणास सविनय निवेदन सादर करण्यात येते की, कोविड 19 मुळे परीक्षेला बसण्याची तसेच परीक्षेस लागू होणा��ी विहित वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना आपण ०३ मार्च २०२३ रोजी “शासन निर्णय” परित करून पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
उपरोक्त शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने संधी उपलब्ध करून दिल्यानंतर सुद्धा “महाराष्ट्र लोकसेवा आयोग”(MPSC) “संयुक्त गट ‘ब’ व गट ‘क’ (पूर्व परीक्षा 2023) ही जाहिरात प्रसिद्ध होऊनही काही तांत्रिक कार���ामुळे अर्ज करण्यासाठीची लिंक ओपन न झाल्यामुळे लाखो पीडित विद्यार्थी या उपरोक्त परीक्षेस अर्ज करण्यापासूनच वंचित राहिले होते. तसेच, यासंबंधात शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून देखील उमेदवारांना यश आले नाही. आगामी “उपरोक्त जाहिरात” ही फेब्रुवारी 2024 मधे MPSCच्या वेळापत्रकानुसार अपेक्षित होती व सदर जाहिरातीसाठी पुन्हा एकदा “उपरोक्त” शासन निर्णयानुसार लाखो विदयार्थी अर्जच सदर करू श���त नाहीत कारण सदर शासन निर्णयाचा कालावधी 31 डिसेंबर, 2023 पर्यंतच होता. तसेच, आपण पारित केलेल्या 3 मार्च, 2023 रोजीच्या शासन निर्णयामधे सरसकट 2 वर्षे सूट अशी वय वाढीची मुदत जाहीर करण्यात आली आहे परंतु, प्रत्यक्षात फक्त 10 महिनेच मुदतवाढ मिळाली आहे कारण, ३ मार्च, २०२३ ते ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत जेमतेम १० महिने इतकाच कालावधी मिळतो.
आपणास नम्र विनंती आहे की, उपरोक्त शासन निर्णयात नमूद केल्यानुसार सरसक��� 2 वर्षे इतकी म्हणजे�� 31डिसेंबर 2024 पर्यंत प्रसिध्द होणाऱ्या सर्व परीक्षाना बसण्याची, अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांना "न्याय" मिळेल.
धन्यवाद,
@mieknathshinde @mpsc_office
#MPSC #DHananjayShinde
STI, ASO मुख्य परीक्षा 2023
अजुन किती वेळा निकाल लावुन विकल्प विकल्प खेळणार आहात?
ती कोण लोकं आहेत ज्यांना अजुनही एकापेक्षा जास्त पदांची हाव सुटत नाही.
आयोगाने त्यांची यादीच जाहीर करावी.
#MPSC
चमको अधिकारी आणि क्लास चालकांच्या रील्सने पुढच्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद करायचा विडाच उचलला आहे!
दुर्दैवाने या क्षेत्रातील वास्तव कोणी सांगायलाच तयार नाही.
#MPSC#UPSC
राज्यातील सर्वात मोठा नोकर भरती घोटाळा : #तलाठी_भरती_घोटाळा#तलाठी_भरती_घोटाळ्यात अख्खे परीक्षा केंद्र मॅनेज करण्यात आले होते. त्याबद्दलची ऑडिओ-व्हिडीओ-फोन रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. तलाठीचे एक पद २०-२५ लाखात विकण्यात आल्याचे पुराव्यातून स्पष्ट झालं आहे.
तलाठी भरतीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पोलीस तक्र���र दाखल केली होती. आमच्या तक्रारी नंतरच #धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी FIR दाखल केली आहे.
धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी महसुलच्या अपर मुख्य सचिवांना पाठविलेला गोपनीय अहवाल अनेक महिन्यांपासून आमच्याकडे आहे. तो अहवाल कधीतरी पब्लिक होईलच पण त्यासोबतच इतर सर्व #पुरावे पब्लिक करण्याबद्दल सुध्दा विचार करण्यात येईल.
राज्यातील दहा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी तलाठी भरती दिलेली आहे. तलाठी भरती घोटाळा इतका मोठा आहे की तो
#विधानसभा निवडणुकीसाठी एक मुख्य मुद्दा ठरू शकतो, आणि आम्ही त्याला मुख्य मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करू.
परंतु राज्याचे #गृह_खाते अत्यंत कर्तव्यदक्ष व्यक्तीच्या हाती आहे. तलाठी भरती घोटाळ्याचा तपास धाराशिव पोलीस करत नाहीयेत किंवा अत्यंत संथ गतीने तपास सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण घोटाळा दाबला गेला असून अनेक भ्रष्टाचाऱ्यांची निवड झाली आहे.
#दिल्ली मध्ये बसलेल्या व्यक्तीला रियल टाइम रिमोट ॲक्सेस देऊन भ्रष्ट उमेदवारांचे पेपर सोडविण्यात आले आहेत. यात कोणत्या परीक्षा केंद्राचे मालक सामील आहेत आणि #TCS मधील कोण व्यक्ती सामील आहेत या��ी नावानिशी माहिती आमच्याकडे आहे.
अनेक परीक्षा केंद्र मॅनेज ��ाल्याचे आमच्या तपासात समोर आलं आहे. परंतु आमच्यातील काही फितूर झाले असतील किंवा सरकारने आमच्यावर जी गुन्हे दाखल केले किंवा काही व्यक्तींनी विविध प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे याप्रकरणी आम्हाला पूर्ण पाठपुरावा आजवर करता आलेला नाही याची आम्ही आज दिलगिरी व्यक्त करतो.
निवड झालेल्या उमेदवारांबद्दल आम्हाला कोणताही आकस नाही,पण ते फक्त स्वतःचे बघत आहेत. पण आम्ही तलाठी भरती घोटाळा कधीतरी पूर्ण बाहेर काढूच मग त्यासाठी येत्या विधानसभेत सत्तांतर गरजेचे असेल तर त्यासाठी सुध्दा आम्ही जोमाने प्रयत्न करू.
#महसूल_विभाग किंवा पोलीस विभाग यावर कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे स्पष्ट झालं आहे, त्यामुळे फडणवीस सरकार कडून तपासाची कोणतीही अपेक्षा आम्हाला नाही.
महसूल मंत्री #विखे_पाटील घोटाळा झाला असल्यास संन्यास घेऊ म्हणताय, विखे साहेब नगरच्या जनतेने याआधीच आपल��या पोराला राजकीय बेरोजगार केलं आहे येत्या विधानसभेत आपला पण सुपडा साफ होईल. तलाठी भरतीत घोटाळा झाला ��हे, असेल हिम्मत तर करा आमच्यासोबत बैठक,सर्व पुरावे समोर मांडल्या नंतर निर्णय घ्या अन्यथा महसूल मंत्री पदावरून राजीनामा देऊन मोकळे व्हा.
राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांना तलाठी घोटाळ्याचे फक्त राजकारण करायचे नसेल @RRPSpeaks @bb_thorat तर त्यांनी मैदानात यावं, आपण #पंधरा दिवसानंतर जनतेच्या दरबारात आंदोलनाला बसू. वेळ आणि ठिकाण आपण सांगाल तिथं आम्ही येऊ.
कुणी साथ दिली नाही तरी, योग्य वेळी तलाठी भरती घ���टाळ्याचे वादळ आल्याशिवाय राहणार नाही. #सत्यमेव_जयते !!
@RVikhePatil @Dev_Fadnavis @maharevenue @ssaunik @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @AUThackeray @VijayWadettiwar@SVW790 @AbhiPawarBJP @niranjandtweets @KunalNitinRaut @supriya_sule @PatilKailasB @rajushetti @Ravikanttupkar1 @Prksh_Ambedkar @RajThackeray @ShivSenaUBT_ @NANA_PATOLE @abpmajhatv @saamTVnews @zee24taasnews @girishkuber @bbcnewsmarathi @ashish_jadhao @waglenikhil @_prashantkadam@satejp @satyajeettambe @IYCMaha @INCMaharashtra @BJP4Maharashtra @NCPspeaks @jdipali @drsujayvikhe @Jayant_R_Patil
संयुक्त महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा 2024
जाहिरातीला झालेल्या उशिरामुळे अनेक PSI करणारे उमेदवार शेवटची संधी असूनही वयाधिक झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर फेकले जाणार आहेत.
गृह विभागाला कळकळीची विनंती आहे एक वाढीव संधी देण्याची सोय केल्यास या उमेदवारांना दिलासा मिळेल.
किंवा सर्वच वयाधिक उमेदवारांसाठी सर्व ���रती प्रक्रियेत 31 डिसेंबर 2024 ही तारीख वाढवून दिल्यास सर्वांनाच दिलासा मिळेल.
विचार व्हावा.
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
मा. @RVikhePatil साहेब,
भरती प्रक्रियेसंदर्भात आपणास एक गोपनीय pdf फाईल DM केली आहे. आपल्याच अधिकाऱ्यांनी हा गोपनीय अहवाल सरकारला पाठवला होता, ज्यावर आपल्या सरकारने काहीही कार्यवाही केली नाही. मला हा अहवाल कसा मिळाला हे विचारू नका, कारण सरकारी यंत्रणेतही अनेक अधिकारी पारदर्शक यंत्रणेसाठी प्रयत्नशील असतात.
असो!
आपल्यात हिम्मत असेल तर ही फाईल पब्लिक करून त्यावर स्पष्टीकरण द्यावं आणि खरा महा��ाग कोण हे महाराष्ट्राला सांगावं.
@bb_thorat
तलाठी भरती 2023
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारलेले प्रश्न गंभीर आहेत.
यावर सरकारकडून या अहवालाबाबत नागरिकांना उत्तरे मिळवण्याचा हक्क आहे.
फॉरेन्सिक आणि MIDC सरळसेवा भरती बहूतेक गृह आणि उद्योग विभाग विसरले आहेत.
आदिवासी विभागाचे तर विचारूच नका?
खुप झाला बिंदूनामावलीचा खेळ, तातडीने सुधारीत जाहिरात प्रसिध्द करून सांगा परीक्षेची वेळ!
@samant_uday@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
पुरवठा निरीक्षक भरती 2023
♦️Normalization करूनच सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. असे @ChhaganCBhujbal यांचा विभाग सांगत आहे.
🔹तर मग Normalization करण्यापूर्वीचे मार्क पण जाह���र करायला काय अडचण आहे.
🔹नेमके कोणाचे किती गुण वाढले/कमी झाले ते तर समजेल ना.
https://t.co/Bks7ObyB5a
आजच्या NEET टॉपर्स च्या फेरपरीक्षेला ५०% विद्यार्थ्यांनी दांडी मारली, 1563 पैकी फक्त 813 विद्यार्थ्यांनी दिली परीक्ष���. याप्रमाणेच तलाठी टॉपर्सची फेरपरीक्षा होऊन जाऊ द्या. एकदाचे होऊन जाऊ द्या, दूध-का-दूध और पाणी-का-पाणी.
आज नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने फेर परीक्षा घेण्यात आली, ह्या परीक्षेला 1563 पैकी 813 विद्यार्थीच हजर राहिले म्हणजेच 750 विद्यार्थ्यांनी ही फेरपरीक्षा टाळली, ह्यातूनच #नीट मध्ये गोलमाल झाल्याचे सिध्द होते.
आमचे महाराष्ट्र सरकारला आणि महसूल विभागाला आव्हान आहे, तलाठी भरतीत टॉपर आलेल��या प्रत्येक जिल्ह्यातील ३०-४० टॉपर्सची फेरपरीक्षा घेऊन दाखवा. आम्ही १००% खात्रीने सांगू शकतो फक्त बोटावर मोजण्याइतक्या विद्यार्थांना पुन्हा तितके गुण मिळतील.
@Dev_Fadnavis @RVikhePatil @AUThackeray @RRPSpeaks @CMOMaharashtra @ShivSenaUBT_ @AjitPawarSpeaks @SoniaSethi_IAS @ssaunik @VijayWadettiwar @girishkuber
आरोग्य विभाग नोकरभरतीत गैरप्रकार करणाऱ्या आरोपीचे पुरवठा विभागाच्या अंतिम निवड यादीत नाव आहे?
IBPS ने पुरवठा विभागास दिलेल्या याद्या जश्याच्या तश्या जाहीर न करण्यामागील कारणे उघड व्हायला लागली आहेत.
@ChhaganCBhujbal