‘सत्य हेच तुमचं कर्म असेल, तर अपयशाची हिंमत नाही तुम्हाला रोखण्याची,’ य��� आशयाची व्हाटसॲपवर आलेली ही रचना अत्यंत अर्थपूर्ण, प्रेरक आणि संघर्षाला बळ देणारी आहे.
नक्की ऐका…!
श��तकरी कर्जमाफी, कांदा खरेदी, MPSC आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न, CET सेलमधील आणि कुंभमेळ्यातील विकासकामांच्या नावाखाली सुरु असलेला भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचं काम करतोय. सध्याही दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध विभागातील आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि सामान्य कुटुंबात दिवाळी साजरी करुन त्यांना आधार देतानाच सरकारलाही उघडं पाडतोय.
त्यामुळं या खुनशी सरकारने याचा चांगलाच धसका घेतलाय, म्हणूनच सरकारबाबतची माझी आक्रमक भूमिका मवाळ व्हावी यासाठी प्रेशर टॅक्टिक्स म्हणून त्यांनी माझ्या व्यवसायाला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचं कळतंय. याबाबतची रणनिती आखण्यात येत असून पुढील काही दिवसांत अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली जाईल. त्यासाठी कोण पुढाकार घेतंय याचीही माहिती आमच्या���र्यंत पोहोचतेय. आता सरकारमधील नेते काय निर्णय घेतात आणि त्याला कोण कोण पाठिंबा देतात याकडं आमचं बारकाईने लक्ष आहे.
विद्यार्थी एकजूटीचा आणखी एक महत्वपूर्ण विजय....!
राज्यभरातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पुण्यात उभारलेल्या #MPSC_विद्यार्थी सत्याग्रह आंदोलनात ३ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या गट क परिक्षेमध्ये जवळपास १८ हजार पदांचा समावेश करावा, ही प्रमुख मागणी होती. सरकारच्यावतीने देख��ल जागा वाढीचा शब्द देण्यात आला होता, तसंच त्यासंदर्भात गेल्या आठवड्यात मुख्य सचिवांची भेट घेऊन तत्काळ विविध विभागांकडून मागणीपत्र मागवण्याची विनंतीही केली होती.
त्यानुसार आता उच्चस्तरीय समितीने गट क परिक्षेत जवळपास ११ हजार पदांची वाढ करून एकूण १६ हजार पदे भरण्याची शिफारस केली आहे. परिणामी आत्ता MPSC आयोगाकडून लवकरच याबाबत शुद्धीपत्रक काढलं जाईल. याचा फायदा राज्यभरातील विद्यार्थ्य��ंना होणार आहे. न्याय्य मागण��यांसाठी ठाम राहीलं की विजय हा होतोच हे यातून पुन्हा अधोरेखित झालं. दिलेला शब्द पाळला त्याबद्ल मुख्यमंत्री साहेबांचे आभार आणि इतर मागण्या देखील दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण होतील, ही अपेक्षा..!
विद्यार्थी एकजुटीचा विजय असो!
#MPSC
मुख्यमंत्री साहेबांचे नवे ‘मोपलवार’ - अनिलकुमार गायकवाड साहेब!
MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या ��ायकवाड साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेकेदारांनी लाखो रुपये खर्च करून जाहिराती दिल्या आहेत. सरकारी अधिकाऱ्यासाठी अशा जाहिराती देता येतात का? ठेकेदार अशा जाहिराती का देत आहेत? याचा अर्थ काय? एकीकडं दुष्काळ आणि दुसरीकडं लाखोंच्या जाहिराती का?
cost escalation करून संपूर्ण राज्याची तिजोरी ओरबाडून खाल्ली जातेय, ही ��स्तुस्थिती आहे, पण कुणीही काहीही बोलत नाही … हे असंच चालू राहिलं तर राज्य कंगाल होईल हे लक्षात असू द्या!
पैसे कोणी दिले, घेतले याच्याशी जनतेला देणेघेणे नाही
महायुतीने २०२४ निवडणुकी आधी ठरवून मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण तापवलं..लोकांची डोकी खराब केली..
हिंदू विरुद्ध मुस्लिम कमी होत की यांनी दोन जातीत भांडण लावली आणि सत्ता बळकावली!
भाजप घाण आहे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी! #महाराष्ट्रधर्म
#MPSC आयोगातील महाभागांनी जास्त हुशारी करण्याचा प्रयत्नच करू नये! आंदोलन स्थगित झालं म्हणजे सर्व शांत झालं आणि आमचं लक्ष नाही, असं कुणीही समजू नये. पेपर फोडून विद्यार्थ्यांच्या भविष्याची हो��ी करणाऱ्या कुणालाच आम्ही सोडणार नाही.
चौकशी होऊद्या, पेपर फोडणारे सगळे घरी जातीलच..!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSCProtest #MPSCStudents #MPSCUpdates
In solidarity with the protests against MPSC exams leaks.
Today’s youth is standing up, asking questions, and demanding a fairer system, for themselves and the coming generations. It was a privilege to speak with them and stand with them.
माझ्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात अनेक आंदोलनं अनुभवली; पण MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने माणुसकीचा एक वेगळाच अनुभव दिला.
विवेकानंद पाटील, ऋषिकेश गांगुर्डे यांच्यासारख्या विद्यार्थ्यांचा संघर्ष पाहताना, प्रसिद्धीपासून दूर राहून गेल्या द���ा दिवसांपासून विद्यार्थ्यांना पाणी पोहोचवणाऱ्या धनंजयने मात्र मन जिंकलं.
रामसेतू बांधताना खारीने दिलेल्या योगदानाची गोष्ट आपण सर्वांनी ऐकली आहे. धनंजयचं काम त्याचीच आठवण करून देतं. कोणत्याही अपेक्षेविना केलेली छोटीशी कृतीही मोठ्या संघर्षाला बळ देऊ शकते.
धनंजय, तुझं आणि तुझ्यासारख्या निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या प्रत्येकाचं मनापासून कौ��ुक! तुझ्या आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांचा अभिमान वाटतो.
#pune #mpscprotest #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #mpsc
नवनाथ बन यांच्यात खरंच दम असेल, तर त्यांनी आज संध्��ाकाळी आंदोलन स्थळी यावं आणि स्वतः डोळ्यांनी पाहावं—इथे आलेले विद्यार्थी फक्त बारामतीचे आहेत की संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत!
घरात बसून खोटे आरोप करण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात येऊन विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि संघर्ष पाहाण्याची हिम्मत दाखवा.
#MPSC #StudentProtest #MPSCStudents
@NavnathBanBJP
हा आहे पंचगंगेचं पाणी पिणारा कोल्हापूरचा पठ्ठ्या… विवेकानंद पाटील. #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात रात्री एकटाच अडीच-तीन तास ‘बॅटिंग’ करत होता आणि सकाळीही जब्बर ‘टोलेबाजी’ केली. चौफेर वाचन, ग्रामीण आणि शहरी समज, सामाजिक-राजकीय परिस्थितीचा आवाका असलेला आणि प्रामाणिक… असे अनेक विद्यार्थी हे #MPSC ची तयारी करतात पण भ्रष्ट व्यव���्थेमुळं शेवटी त्यांच्या हाती केवळ निराशा येते. त्यामुळं #MPSC मधील भ्रष्टाचाराचं प्रमुख खोडच मुळासकट उपटून काढण्यासाठी हे विद्यार्थी सत्याग्रहाला बसले आहेत. एकदा भ्रष्टाचाराचं खोड हटवलं तर फांद्या आपोआप बाजूला होतात.. त्यामुळं भिमनवारांचा राजीनामा होईपर्यंत आता माघार नाही..!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#भिमनवारांचा__राजीनामा_झालाच_पाहिजे
#आता_माघार_नाही
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या वर्णनात्मक उत्तरपत्रिकांच्या गुणांकनाबाबत काही उमेदवारांनी आक्षेप न��ंदवले आहेत. संबंधित उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करून त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. मात्र, संपूर्ण निकाल रद्द करून सर्व उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याऐवजी, सध्या उत्तीर्ण उमेदवारांवर अन्याय होणार नाही आणि न्यायालयीन गुंतागुंतही टाळता येईल, असा सर्वमान्य तोडगा काढण्याची मागणी आज मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी माझी भेट घेऊन केली.
यानंतर विद्यार्थ्यांच्या काही प्रतिनिधींना सोबत घेऊन मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. गुणांकनावर आक्षेप असलेल्या उमेदवारांकडून पुनर्तपासणीचे अर्ज मागवून केवळ त्यांच्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करावी व पुनर्तपासणीनंतर आरक्षण प्रवर्गनिहाय Cut-off पार करणाऱ्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून अतिरिक्त मुलाखतीची संधी देण्याचा सर्वमान्य तोडगा काढण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी मा. मुख��यमंत्री महोदयांकडे केली आहे.
आयोगाशी चर्चा करून पात्र ठरलेल्या व अपात्र ठरलेल्या सर्व संबंधित उमेदवारांना न्याय मिळेल असा सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे.
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @MahaDGIPR
#Devendrafadanvis #MPSC #MPSCStudent #Maharashtra #महाराष्ट्र #भाजप #BJP
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मध्ये ज्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका तपासणीत मानवी चुका किंवा गंभीर त्रुटींचे पुरावे आहेत, त्यांच्या उत्तरपत्रिकांचे तातडीने Revaluation + Retotaling करा.
संपूर्ण निकाल रद्द करून सर्व 438 पात्र उम��दवारांना पुन्हा अनिश्चिततेत ढकलण्याचा निर्णय घेण्याऐवजी त्रुटींचे पुरावे असलेल्या उमेदवारांचे Revaluation + Retotaling करावे. त्यातून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीची संधी द्यावी. आधीच पात्र ठरलेल्या 438 उमेदवारांच्या मुलाखती तातडीने घ्याव्यात. संपूर्ण प्रक्रिया अनावश्यकपणे 5-6 महिने लांबवू नये.
विद्यार्थ्यांना न्याय हवा आहे, आणखी विलंब नाही.
MPSC ने निर्णय घेताना विद्यार्थ्यांचे भविष्य आणि वेळ दोन्ही वाचवले पाहिजेत.
@INCMaharashtra @mpsc_office @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
#MPSC #Rajyaseva2025 #dhananjayshinde #ChhatronKiGoonj
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिका तपासणीमध्ये काही उमेदवारांच्या बाबतीत आयोगाकडून मानवी चुका झाल्याचे पुरावे समोर आले होते. हे पुरावे आम्ही आयोगाकडे सुपूर्द केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा अ��्यंत कमी गुण मिळाले किंवा तपासणीमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा Revaluation + Retotaling ची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आमची भूमिका होती.
मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने मात्र संपूर्ण मुख्य परीक्षेचाच निकाल रद्द करून सर्व उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांचं फेरमूल्यांकन करावं, अशी अव्यवहार्य मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनीही ती मान्य केली. त्यामुळं या प्��क्रियेला पुन्हा किमान पाच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. शिवाय आधीच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या सुमारे ४३८ विद्यार्थ्यांचं भवितव्यही अधांतरी असून याबाबत ते कोर्टातही जाऊ शकतात.
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ज्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाले किंवा तपासणीमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे, तेवढ्याच विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांचं Revaluation+Retotaling करून यातून जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरतील त्यांना अगोदरच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या ४३८ मुलांसोबत मुलाखतीची संधी उपलब्ध करून देणं हाच पर्याय योग्य आहे. अन्यथा ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि कायदेशीर कचाट्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC #JusticeForStudents #StudentsFirst
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री विवेक भीमनवार यांचे औषध निरीक्षक परीक्षेसंदर्भात वक्तव्य...
मुंबई/दि. 2 सप्टेंबर 2026
प्रसिद्धीपत्रक
(औषध निरीक्षक परीक्षेसंदर्भात)
1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या संदर्भात माझ्याविरोधात काही वैयक्तिक आरोप करण्यात येत असून, माझ्या राजीनाम्याची मागणी केली जा��� असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर काही वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते.
2. औषध निरीक्षक परीक्षेशी संबंधित प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी 2026 मध्ये घडल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची म��� 18 फेब्रुवारी 2026 रोजी शपथ घेतली आणि 3 मार्च 2026 रोजी पदाचा प्रत्यक्ष कार्यभार स्वीकारला. तथापि, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने यासंदर्भात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भविष्यात अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुरक्षा उपाय सुचविण्याकरिता आयो���ाने अंतर्गत उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. तसेच, एकूणच परीक्षा प्रक्रियेत आवश्यक समग्र सुधारणा सुचविण्यासाठी शासनानेही उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
3. अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर माझे संपूर्ण लक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा व भरती प्रक्रियेची विश्वासार्हता, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुरक्षितता अधिक बळकट करण्यावर केंद्रित राहिले आहे. आयोगावर सोपविण्यात आलेल्या वाढीव भरतीच्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा व भरती प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण ��ुधारणा हाती घेण्यात आल्या आहेत.
4. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून आयोगाची उच्च परंपरा, निष्पक्षता आणि विश्वासार्हता जपणे तसेच लाखो उमेदवारांना न्याय्य आणि समान संधी उपलब्ध करून देणे ही माझी घटनात्मक जबाबदारी आहे आणि त्याची मला पूर्ण जाणीव आहे. ही जबाबदारी पूर्ण पारदर्शकता, निष्पक्षता आणि सचोटीने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
5. सार्वजनिक परीक्षांबाबत लोकप्रतिनिधी, उम���दवार आणि नागरिकांना प्रश्न उपस्थित करण्याचा तसेच त्यांच्या चिंता व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकशाही व्यवस्थेत अशा प्रश्नांचे मी स्वागतच करतो. मात्र, कोणत्याही गंभीर आरोपाचे मूल्यांकन हे वस्तुस्थिती, अधिकृत नोंदी आणि पुराव्यांच्या आधारेच झाले पाहिजे. सार्वजनिक भरतीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांमध्ये लाखो तरुण उमेदवारांचे भवितव्य गुंतलेले आहे. त्यामुळे अशा विषयांचे ���ैयक्तिक आरोप किंवा राजकीय वादामध्ये रूपांतर होऊ नये, अशी माझी सर्व संबंधितांना नम्र विनंती आहे.
विवेक भीमनवार
अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
@bhimanwar
🔥 #PSI_परीक्षा अवघ्या ३ दिवसांवर!
वयोमर्यादा वाढीचा निर्णय तातडीने घ्या.
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीवर अजूनही तोडगा नाही. महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुद्दामहून PSI वयोमर्यादा वाढीचा निर्णय लांबवत आहेत.
राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी चालवलेला हा क्रूर खेळ आहे.
ही केवळ निष्क्रियता नाही तर ही महायुती प्रणित अन्यायाची नीती आहे. मात्र सुशिक्षित विद्यार्थी हा अन्याय अजिबात सहन करणार नाहीत.
निवडणुकीत मतांसाठी तरुणांची आठवण येते,
पण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आला की फडणवीस सरकार निर्दयीपणे पाठ फिरवते.
हा प्रश्न प्रशासनाचा नाही, तर राजकीय इच्छाशक्तीचा आहे.
आणि ही इच्छाशक्ती महायुती सरकारकडे अस्तित्वातच नाही.
सरकारने ताबडतोब निर्णय जाहीर केला नाही,
तर काँग्रेस पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरेल.
#PSI परीक्षार्थी एकटे ना��ीत, काँग्रेस त्यांच्यासोबत उभी आहे.
🔥 हा लढा नोकरीचा नाही,
हा लढा तरुणांच्या स्वाभिमानाचा आणि न्यायाचा आहे.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
म��ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे सुनील गाडवे यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹55,555 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच��या माध्यमातून विविध विभागातील गट–क लिपीक टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती देण्यास शासन मुद्दाम चालढकल करत आहे. दोन वेळा पुढे ढकलला गेलेल्या रोजगार मेळाव्यातून नियुक्तीपत्रे वाटपाचा ‘चमकोगिरी’ सरकारचा प्रयत्न हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी केलेली थट्टा आहे. सरकारने तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन पात्र उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे, आणि विद्यार्थ्यांना ���्यांचा न्याय हक्क द्यावा अशी अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra
येत्या २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसंदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. हवामान विभागाने दिलेला ���तर्कतेचा इशारा व मराठवाड्यातील सध्याची पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक गावे, शहरे पाण्याखाली असून वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे.
या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी अतिशय कठीण परिस्थितीत आहेत. अशा वेळी त्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचणे ही मोठी समस्या ठरते. नैसर्गिक आपत्तीमुळे विद्यार्थ्यांना जर परीक्षा देता आली नाही, तर ते अत्यंत अन्यायकारक ठरेल. परीक्षेत समान संधी मिळा��ी ही प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा आहे.
पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता सध्या नाही. तयारी असूनही अशा बिकट परिस्थितीत बसून परीक्षा देणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे आयोगाने बळजबरी न करता विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा.
#राज्यसेवा_पूर्व_परीक्षा