थोर स्वातंत्र्यसैनिक, महाराष्ट्राचं लोकाभिमुख नेतृत्व, राज्याचे माजी मुख्यमंत्री, सहकारमहर्षी, पद्मभूषण वसंतदादा पाटील यांचा आज स्मृतीदिन. सांगली जिल्ह्यातील पद्माळे गावात जन्मलेल्या दादांनी महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने आणि ग्रामीण शिक्षणाचा पाया भक्कम केला. त्यांना महाराष्ट्रातील 'सहकार चळवळीचा आधारस्तंभ' मानले जाते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात खाजगी अभियांत्रिकी आणि तांत्रिक शिक्षण संस्था (इंजिनिअरिंग कॉलेजेस) सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही इंजिनिअर बनवण्याचे स्वप्न दादांनी प्रत्यक्षात आणले. आज स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन!
संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) च्या अध्यक्षा, कॉंग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, राज्यसभा खासदार श्रीमती सोनिया जी गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂
#Soniya_Gandhi
बिहारमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या 'वोटर अधिकार यात्रा' आणि जननायक राहुल गांधी यांच्या पटना येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठकांमध्ये सहभागी होऊन आढावा घेतला. यावेळी आमदार @AslamShaikh_MLA वॉररूम इंचार्ज कुमार गौरव, शम्स तबरेज आदी उपस्थित होते.