Today is World Environment Day. Against the backdrop of last year's excessive rainfall and the record-breaking summer that everyone has endured, we must view this day beyond mere customary rituals. We, as a society, tend to approach everything with a festive zeal. Consequently, whenever World Environment Day comes around, there is an excessive enthusiasm for planting trees, taking photographs of them, and posting them on social media. Yet, 90% of those trees do not survive even until the same evening. A few years ago, the State Government announced a massive drive to plant millions of trees, and subsequently declared that the task had been completed. Only the government knows where those trees really are. Anyways, at least on this day, both the government and the people of Maharashtra ought to reflect upon what we have already lost, and what we stand to lose in the future, due to the changing environment.
Back in 2014, when I presented the ‘Blueprint of Maharashtra’s Development’, I included a short film as part of the presentation. In it, I emphasized that if development is not coupled with an appreciation for aesthetics and a consideration for the environment, it remains merely superficial and hollow. You have likely witnessed the tangible proof of this reality over the past few years. A competitive race has emerged to claim credit, and to derive satisfaction from, the construction of this road or that bridge. Yet, a single spell of rain, and not even the heavy monsoon rains at that, is enough to throw the entire city into utter chaos. Just the other day, I read a news report stating that during this summer, nobody dared to venture out to work in the fields after 10:00 AM. Are we truly grasping the full significance of what this implies?
Lately, everyone seems to have developed a fascination with big numbers. Fine. Here are some alarming ones:
The loss incurred to the nation's overall productivity this year, due to the extreme heat, amounts to approximately 159 billion dollars. Over the past few years, the inability to work due to scorching temperatures has resulted in an annual loss of roughly 160 billion man-hours. The World Bank estimates that changes in the environment could lead to a decline of 2.5 to 4.5 percent in the country's GDP. According to a global study, 57% of the country's districts, which are home to 76% of the population, are on the brink of suffering severe damage due to environmental changes.
When we cite statistics ranking our economy at this or that position, do we ever intend to take these specific figures into account?
Today, living in cities during the four months of the monsoon is becoming increasingly difficult; in rural areas, excessive rainfall wreaks havoc; and during the four months of summer, life in both rural and urban areas is becoming unbearable. In short, for eight months of the year, we are unable to live a decent life in the very places we inhabit. Why do we feel no remorse over this? I am not opposed to development; building roads and bridges, they are indeed essential, but while doing so, why is there no consideration given to whether we are making our cities truly habitable? In the rains, crops in rural areas get washed away while cars in urban areas float on the water; and yet, are we still going to celebrate this ongoing reality as ‘development’?
Furthermore, under the current central government's tenure over the last 11 years, approximately 173,984 hectares of forest land have been diverted for purposes such as mining, road construction, and the like. And all of this was done specifically for their cherished, singular favorite: the Adani Group. When the country's Prime Minister speaks about climate change during his 'Mann Ki Baat', the true sentiment in his heart remains this: "Regardless of what happens to the forests and trees, our sole objective is to enrich a select few industrialists."
To help you grasp the magnitude of 173,984 hectares, let me offer you an example. 1.73 lakh hectares translates to 1,730 square kilometers. For context, Mumbai's own Sanjay Gandhi National Park covers an area of 104 square kilometers - an ecosystem upon which the very future of the entire city of Mumbai and its surrounding region depends. The loss of 1,730 square kilometers of forest land is equivalent to the destruction of approximately sixteen Sanjay Gandhi National Parks.
Today, young men and women spend their entire days scrolling through various social media platforms; but can we really blame them? We possess nothing substantial in our own surroundings that would compel them to look up and take notice. We lack parks; urban trees have been felled on a massive scale; our hillsides have been hollowed out; and we ourselves have polluted our rivers. Consequently, they seek solace from their loneliness and depression by watching social media 'Reels.' My earnest appeal to these young people is this: insist that the beautiful cities and the preserved natural landscapes you admire on social media be replicated right here in our own land. Hold the system accountable for this; do not be swayed by false statistics or deceptive imagery. If you fail to do this, it is certain that your lives will be reduced to a mere existence no different from that of bugs.
It remains a mystery how our once-nature-worshipping society transformed into one that destroys it. Today, the sacred groves (Devrais) in the Konkan region have survived solely because they were preserved by the local traditions of nature worship. Until we return to our fundamental ethos of nature reverence, things won’t change. We used to believe that discussing or advocating for the environment was the exclusive domain of a handful of nature enthusiasts. However, it has now evolved into a critical issue concerning our economy, public health, agriculture, and the very future of our cities.
Environmental changes have tightened their grip on our lives so inexorably that unless we take immediate action neither we, let alone future generations, will be able to escape their consequences. What kind of Maharashtra are we preparing to hand down to the next generation? A Maharashtra of cities devoid of trees? Of rivers reduced to mere open sewers? Of villages where the summer heat makes it impossible to even step outdoors? Or of lush, beautiful, and livable cities and villages that rival the very best in the world? We must, at the very least, begin to ponder this today. And only if we do so can it truly be said that this World Environment Day has been celebrated.
Raj Thackeray
आज जागतिक पर्यावरण दिन. मागच्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि आजपर्यंतचा उच्चांकी उन्हाळा जो सगळ्यांनी सहन केला या पार्श्वभूमीवर आजच्या जागतिक पर्यावरण दिवसाकडे आपण नेहमीच्या उपचारांच्या पलीकडे जाऊन बघायला हवं. आपल्याकडे सगळ्याच बाबतीत उत्सवी उत्साह असतो. त्यामुळे पर्यावरण दिन आला की झाडं लावून त्याचे फोटोज काढून ते सोशल मीडियावर टाकणे याचा अतिउत्साह असतो. आणि त्यातली ९०% झाडं पर्यावरण दिनाच्या संध्याकाळपर्यंत पण टिकत नाहीत. त्यात काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने काही कोटी झाडं लावण्याची आणि पुढे ती लावून झाली अशी घोषणा केली. ती झाडं कुठे आहेत हे सरकारलाच माहित. असो. पण आजच्या दिवशी तरी सरकारने आणि महाराष्ट्रातील लोकांनी आपण या पर्यावरण बदलाने काय गमावलं आहे आणि काय गमावणार आहोत याचा विचार करायला हवा.
२०१४ साली मी जेंव्हा महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर केला होता तेंव्हा मी फिल्म सादर केली होती. विकासाला सौंदर्याची आणि पर्यावरणाच्या विचाराची जोड नाही दिली तर तो विकास किती वरवरचा आणि पोकळ असतो हे मी त्यात सांगितलं होतं. त्याची साक्ष गेल्या काही वर्षांत तुम्हाला जाणवत असेल. अमुक रस्ता बांधला, तमुक ब्रिज बांधला म्हणून श्रेय घेण्याची आणि ते पाहून खुश होण्याची स्पर्धा सुरु आहे. पण एका पावसाने, तो सुद्धा मान्सूनचा पाऊस नाही, शहराची दाणादाण उडत आहे. आत्ता परवा एका ठिकाणी बातमी वाचली की या उन्हाळ्यात शेतात सकाळी १० नंतर काम करायला जायला महिला पुरुष धजावत नव्हते. याचा अर्थ आपण लावणार आहोत का?
हल्ली सगळ्यांना जरा मोठ्या आकड्यांचं आकर्षण निर्माण झालं आहे. त्यामुळे म्हणलं जरा काही गंभीर आकडे मी पण तुमच्यासमोर ठेवतो.
यावर्षीच्या अति उन्हामुळे देशाच्या प्रॉडक्टिव्हिटीचं झालेलं नुकसान हे जवळपास १५९ बिलियन डॉलर्सचं आहे. अतिप्रचंड उन्हामुळे काम न करू शकल्यामुळे गेल्या काही वर्षात साधारणपणे वर्षाला १६० बिलियन कामाच्या तासांचं नुकसान झालं आहे. पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे देशाच्या जीडीपीत २.५ ते ४.५ टक्क्यांची घट येऊ शकते असा अंदाज वल्ड बँकेचा आहे. एका जागतिक अभ्यासाप्रमाणे देशातील ५७% जिल्हे ज्यात देशाची ७६% लोकसंख्या राहते, हे जिल्हे पर्यावरण बदलामुळे होणाऱ्या जबर हानीच्या काठावर आहेत.
जेंव्हा आपली अर्थव्यवस्था अमुक तमुक क्रमांकाची अशी आकडेवारी टाकतो तेंव्हा या आकडेवारीचा विचार पण करणार आहोत का ?
आज पावसाळ्याचे चार महिने शहरांमध्ये जगणं कठीण होत चाललं आहे, ग्रामीण भागात अतिवृष्टीने हाहाकार उडतो आणि उन्हाळ्याचे चार महिने ग्रामीण आणि शहरी भागांत जगणं असह्य होत चाललं आहे. थोडक्यात आपण जिथे जगतोय तिकडे ८ महिने आपल्याला धड जगता येत नाहीये, याची खंत आपल्याला का वाटत नाहीये? माझा विकासाला विरोध नाही, रस्ते, पूल हे करा ते आवश्यक आहेतच, पण ते करताना आपण आपली शहरं धड जगायला लायकीची करत आहोत का याचा विचार का होत नाही? पावसांत ग्रामीण भागात पिकं वाहून जातात आणि शहरी भागांत गाड्या पाण्यावर तंरगतात आणि तरीही आपण जे सुरु आहे त्याला विकास म्हणून खुश होणार आहोत का?
बरं सध्याच्या केंद्र सरकारच्या काळात गेल्या ११ वर्षांत जवळपास १,७३,९८४ हेक्टर इतकी जंगल जमीन ही खाणी, रस्ते इत्यादींसाठी देऊन टाकली. आणि हे सगळं यांच्या लाडक्या एकुलत्या एक अदानी उद्योगसमूहासाठीच केलं. जेंव्हा देशाचे पंतप्रधान हे पर्यावरण बदलावर मन की बात मध्ये बोलतात तेंव्हा त्यांच्या मनातील खरी गोष्ट ही जंगलांचं, झाडांचं काही का होईना आम्हाला दोन तीन उद्योगपतींनाच मोठं करायचं आहे हीच असते.
१७३९८४ हेक्टर म्हणजे किती याचा अंदाज यावा म्हणून तुम्हाला एक उदाहरण देतो. १.७३ लाख हेक्टर म्हणजे १७३० स्क्वेअर किलोमीटर. आपल्या मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे १०४ स्क्वेअर किलोमीटरचं. ज्याच्यावर आख्ख्या मुंबई आणि परिसराचं भवितव्य अवलंबून आहे. १७३० स्क्वेअर किलोमीटर जंगलाची जमीन गेली म्हणजे साधारणपणे १६ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानं नष्ट झाली.
आज तरुण मुलं-मुली दिवसभर कुठल्यातरी सोशल मीडियावर काहीतरी बघत आहेत, पण त्यांचं काय चुकतंय ? मान वर करून काही बघावं असं धड काहीच नाही आपल्याकडे. आपल्याकडे बागा नाहीत, शहरातील झाडं प्रचंड प्रमाणवर तोडलेली, डोंगर पोखरलेले, नद्या आपणच घाण करून टाकलेल्या, मग जो एकाकीपणा, नैराश्य असतं ते रिल्स बघून घालवतात. माझी या तरुण मुलामुलींना विनंती आहे की जे तुम्ही सोशल मीडियावर बघताय जी जगातील शहरं, तिथला जपलेला निसर्ग हे इथे हवं यासाठी आग्रही रहा. त्यावर व्यवस्थेला जबाबदार धरा, खोटे आकडे, फसवी चित्रं याला भुरळून जाऊ नका. हे जर नाही केलंत तर तुमचं आयुष्य किड्या-मुंग्यांसारखं होईल हे नक्की.
आपण निसर्गपूजक समाज होतो. तो निसर्गपूजक समाज निसर्गविनाशक कधी झाला हेच कळत नाही. आज कोकणात देवराया टिकल्यात कारण त्या तिथल्या निसर्गपूजक परंपरेने टिकवल्यात म्हणून. जोपर्यंत आपण आपल्या मूळच्या धारणेकडे जाणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. पर्यावरण इत्यादीवर बोलणं, भांडणं हे मूठभर निसर्गप्रेमींचं काम होतं असं आपण मानायचो. पण तो आता तो अर्थव्यवस्थेचा, आरोग्याचा, शेतीचा आणि शहरांच्या भवितव्याचा विषय बनला आहे.
निसर्गातील बदल हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला असे काही विळखा घालून बसलेत की जर आजच काही केलं नाही तर यातून तुम्ही तर सोडाच, पुढच्या पिढ्या पण निसटू शकणार नाहीत. आपल्या पुढच्या पिढीला आपण कसला महाराष्ट्र देणार आहोत? झाडांशिवाय शहरांचा? नदीऐवजी गटारं झालेल्या नद्यांचा ? उन्हाळ्यात घराबाहेर न पडता येणाऱ्या गावांचा? की जगातील सर्वोत्तम शहरांशी स्पर्धा करणारी, हिरव्यागार, सुंदर आणि जगण्यालायक शहरं आणि गावांचा ? याचा विचार आजतरी करायला सुरुवात करायला हवी. आणि हे केलं तरच हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा झाला म्हणता येईल.
राज ठाकरे ।
सस्नेह जय महाराष्ट्र,
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत.
बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?
सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही.
२००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ?
ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका 'रेवड्या' वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ?
पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं.
गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा.
Noticed 3 individuals riding triple-seat on a bike at JVLR signal, seemingly under the influence and creating disturbance.
Vehicle No: MH47 CG 7201 / Royal Enfield bullet
Request @MumbaiPolice@MTPHereToHelp to look into this for public safety & take necessary action.
मराठी अभ्यास केंद्रातर्फे मराठी माणसासाठी विशेष 'मराठीकारण परिषद' आयोजित करीत आहोत.
शुक्रवार, दि. ०१ मे २०२६
सकाळी १० वा.
मुंबईतील हुतात्मा स्मारकाजवळ संयुक महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन
संद्याकाळी ६ वा.
छ. शाहू सभागृह, श्री शिवाजी मंदिर येथे 'मराठी गृहनिर्माण धोरण परिषद'
मुंबईतून घटत चाललेल्या मराठी वस्त्या आणि मराठी माणसांचा कमी होणारा टक्का रोखण्यासाठी मराठी माणसाचं मुंबईतील घरनिर्माण धोरण आणि कृतिआराखडा.
शनिवार, दि. ०२ मे २०२६
सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत
छ. शाहू सभागृह, श्री शिवाजी मंदिर येथे 'मराठी अर्थकारण परिषद'
या एक दिवसीय परिषदेत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ:
🔹 स्पर्धा परीक्षांची तयारी व सरकारी नोकऱ्यांच्या संधी
🔹 खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या आणि करिअर विकास
🔹 कमी भांडवलात लहान व्यवसाय व स्टॉल
🔹 फिरते उद्योग विक्री केंद्र (Mobile Business Ideas)
🔹 करिअर समुपदेशन (Career Counselling)
🔹 वैयक्तिक आर्थिक नियोजन (Personal Finance Planning, savings, mutual fund, shares, term policy, medical policy)
प्रश्न तुमचे... उत्तरे तज्ज्ञांची!
#महाराष्ट्रधर्म #मराठीकारण #मराठाप्रथम #जयमराठी
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील.
पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेंव्हा कमकुवत होत आहे त्यावेळेस, 'प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन्स' सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलं. यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत.
स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे. थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. बाबासाहेब हे त्या पिढीतले याबाबतीतले अग्रणी नेते.
छत्रपती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीबा फुले , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीत पातीत विभागणे , त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे , त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो ! नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापूरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापूपीसू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू !
विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकारं रुजवत असताना, या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे. आज प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत आहे !
बाबासाहेबांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन.
राज ठाकरे ।
@amazonIN Absolutely unacceptable! Ordered the same item twice and still didn’t receive it, yet your app falsely shows it as delivered. This is outright negligence. Worst service experience ever. If this is the new standard, it’s time to switch to better alternatives. @myfrido
अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो.
ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.
हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही.
आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे.
आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे.
या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं. गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही. तर आत्ताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच.
पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की.
राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे.
जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं ? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल.
माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका.
काल १९ मार्च २०२६ ला शिवतीर्थावरच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणांत मराठी माणसांचं या राज्याच्या, देशाच्या जडणघडणीत काय जबरदस्त योगदान आहे यावर जरा विस्ताराने बोललो. मला गेली काही वर्ष प्रकर्षाने असं जाणवतंय की मराठी माणसाला, आपण कोण आहोत, आपल्याला किती उज्वल परंपरा आहे याचा विसर पडायला लागला आहे. महाराष्ट्राला जितकी प्रखर बुद्धिमत्तेची, मनगटात अमर्याद शौर्य असणारी, संपूर्ण समाज ढवळून निघेल असा विचार देणारी आणि कृती करणारी माणसं लाभली, तितकी खचितच एखाद्या प्रांताला लाभली असतील. पण महाराष्ट्र गेली काही दशकं हा प्रतिकांच्या प्रेमात जास्त पडला आहे, आणि त्यामुळेच या प्रांताची प्रतिभा किती अद्वितीय होती हे विसरला आहे.
आपल्याला भाग्य आहे की मागे वळून बघायचं म्हणलं तर इतक्या अफाट माणसांची मांदियाळी तरी सापडते, पण अर्थात त्यासाठी भूतकाळात डोकवावं लागेल, त्या माणसांना जातींच्या चौकटीत न अडकवता बघावं लागेल. आणि हे एकदा का साध्य केलं तर सह्याद्रीचा कणखरपणा ज्या मराठी माणसाकडे पिढ्यानपिढ्या आला आहे त्याला जगाला गवसणी घालणं का कठीण असेल ? म्हणून माझ्या कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणात मी संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील प्रतिभावंतांपर्यंत, आपल्या कडे कोण कोण होऊन गेलं याचा थोडक्यात आढावा घेतला. यावर आम्ही अनेक दिवस काम करत होतो. मनापासून सांगतो माणसांची यादी इतकी विस्तीर्ण होत गेली की अनेक नावं वगळताना त्रास होत होता. त्यामुळे काही नावं राहून गेली असतील, किंवा गेली आहेत त्याबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो. पण मनापासून सांगतो की ही नावं शिवतीर्थावर फक्त घेताना सुद्धा जे रोमांच माझ्या अंगावर उमटत होते तसा अनुभव खचितच या आधी कधी आला असेल. माझ्या भाषणातल्या त्या भागाची ही चित्रफीत. ही चित्रफीत जरा मोठी आहे, पण शेवटी ही, 'महा' राष्ट्रातील प्रतिभावंताची यादी आहे, त्यामुळे वेळ काढा, शांतपणे ही चित्रफीत बघा. आपल्या मुलांना दाखवा, जमलं तर तुमच्या अमराठी मित्र-मैत्रिणींना दाखवा, त्यांना पण कळू दे की, हे 'महा' राष्ट्र आहे , आणि ते का आहे ते !
If you live in Maharashtra, please learn Marathi. I am just here for few months and I can understand most of it. Don’t know how ignorant you can be to not learn this language.
These are most helpful & hardworking people of country. Don’t take unfair advantage of their kindness.
मराठीजनहो नमस्कार,
गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा आहे, हे आपण सगळे जाणताच. गेली अनेक वर्षे या दिवसाच्या निमित्ताने अनेक शोभायात्रा निघताना दिसतात. उत्सवी वातावरण असते. लोक एकत्र येतात. एक दिवस संपला की, मराठी नववर्षाचं नावीन्यही संपतं. मग पुन्हा आपल्याला सणासुदीखेरीज मराठी अजिबात आठवत नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मराठी नववर्ष हे काही मंडळींनी बेमालूमपणे हिंदू नववर्षात रूपांतरीत करून टाकलं आहे. त्यामुळे हिंदूंच्या शक्तिप्रदर्शनाचा दिवस आणि महाराष्ट्रातल्या मराठी बोलणाऱ्या अहिंदूंना वगळण्याचा आणखी एक दिवस असं रूप तर या दिवसाला येत नाही ना? याचा विचार आपण केला पाहिजे. पण, नुसता विचार करून काय होणार आहे ? कृतिशील विचार ही आजच्या अस्वस्थ महाराष्ट्राची गरज आहे.
म्हणूनच आपण ‘आपली मराठी नववर्ष स्वागतयात्रा’ यंदापासून सुरू करत आहोत. मराठीकारण आणि महाराष्ट्रधर्माचा ध्वज उंचावण्यासाठी मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व जातिधर्माच्या महाराष्ट्रीयांसाठी ही यात्रा आहे.
मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीपुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न असले तरी यंदाची यात्रा ‘मराठी शाळा, मराठी माणसांचा रोजगार आणि मराठी माणसांसाठी मुंबईत घरं’ या तीन महत्त्वाच्या विषयांना वाहिलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जनाधार नाही असं दाखवत नियोजित पद्धतीने बंद पाडल्या गेलेल्या मराठी शाळा, संघटित-असंघटित क्षेत्रांपासून गीग अर्थव्यवस्थेपर्यंत, 'मराठी माणूस आळशी आहे', असा बागुलबुवा उभा करून मराठी माणसाला अर्थव्यवस्थेतून हद्द्पार करण्याचं कारस्थान आणि सारे भूखंड अदानी-लोढा यांसारख्या भूमाफियांच्या घशात घालून, मराठी माणसाला रायगड-पालघरच्या पलीकडे घरांसाठी फेकून देणारी राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा यांना जाब विचारणारी ही स्वागतयात्रा आहे.
या यात्रेत मराठी भाषेवर, महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत आहे. सण म्हटलं की, आपणा सगळ्यांनाच सजायला, आनंद व्यक्त करायला आवडतो आणि तो केलाही पाहिजे. पण, राज्याच्या चारही दिशांना अस्वस्थतेचे लोट दिसत असताना आपण फक्त डोळे मिटून आनंद साजरा करत राहिलो, तर येत्या २५ वर्षांत किंवा त्याहीपेक्षा कमी काळात मराठी भाषा आणि मराठी माणसाची ओळख समूळ पुसली जाण्याचा धोका आहे. म्हणून नेहमी जसे घराबाहेर पडता त्याच लगबगीने यात्रेत सहभागी व्हा. येताना एकटे न येता तुमचे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, चाळीतले, वस्तीतले, इमारतीतले शेजारी, एवढंच नव्हे तर ज्यांच्यासोबत तुम्ही नित्यनेमाने बस-रेल्वे-रिक्षाचा प्रवास करता आणि त्यामुळे तुमचं त्यांच्याशी नातं निर्माण झालं आहे, अशा प्रत्येक मराठी माणसाला हेच आग्रहाचं आमंत्रण आहे, असं सांगून सोबत आणा. मुंबईची लोकसंख्या अंदाजे दोन कोटींपर्यंत आहे. ज्या एमएमआर प्रांताचा लचका इथली भांडवली ताकद तोडू पाहते आहे, तिथली लोकसंख्या तर जवळपास चार कोटी आहे. प्रवासाने पिचलेला, ईएमआय भरून हताश झालेला, वैद्यकीय सोयींसाठी धडपडणारा आणि कधीतरी स्वच्छ प्रसाधनगृह मिळेल म्हणून वाट पाहणारा प्रत्येक आशावादी आणि लढवय्या मराठी माणूस या यात्रेत दिसावा, अशी आमची मनोमन इच्छा आहे.
सगळ्यांपर्यंत पोहोचणं शक्य होण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे हे निवेदन वाचणाऱ्या प्रत्येकाने नववर्ष यात्रेचा यात्रादूत होणं आणि या यात्रेला यश मिळवून देणं ही आपलीच जबाबदारी आहे, हे मनोमन मान्य करून कृतीत आणणं. १९५६ साली ज्या १०७ लोकांनी मुंबई,बेळगाव,कारवार,निपाणी,खानापूर,बिदर,भालकीसह संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी हौतात्म्य पत्करलं त्यांना महाराष्ट्र निर्माण झाल्याचं पाहता आलं नाही. आपण या राज्यात जन्मलो, वाढलो, इथली भाषा - संस्कृती याचे आपण लाभार्थी आहोत; वारस आहोत, हे संचित काळाच्या ओघात नष्ट व्हायला नको असेल तर हुतात्मा स्मारकाच्या शिल्पात शेतकरी आणि कामगाराची जी वज्रमूठ दिसते आहे, तशी वज्रमूठ महाराष्ट्रातील लेखक, कवी, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, शेतकरी, कामगार, खेळाडू, उद्योजक, प्रशासक, राजकारणी असे सर्वजण मिळून तयार होईल असा विश्वास आहे.
दादरच्या शिवाजी पार्कजवळचे ‘संयुक्त महाराष्ट्र दालन ते परळचे कामगार मैदान’ अशी ही यात्रा असेल. संयुक्त महाराष्ट्र दालनापाशी आपण सकाळी ८.०० वाजता जमणार आहोत आणि शिवाजी पार्क, टिळक पूल, हिंदमाता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गे आपण परळ येथील कामगार मैदानापर्यंत जाणार आहोत. तिथे आपली सभा होईल. या सभेत गेले वर्षभर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आम्ही जी मराठीकारण आणि महाराष्ट्रधर्माची भूमिका मांडत आहोत आणि जिला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे, ती मांडणी मी उपस्थितांसमोर करणार आहे.
तर भेटू या गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता शिवाजी पार्क जवळच्या संयुक्त महाराष्ट्र दालनाशेजारी.
आपल्याला या स्वागतयात्रेची कल्पना पटली असेल तर या मराठी नववर्ष स्वागतयात्रेला पाठिंबा देणारं आपलं निवेदन पाठवावे ही विनंती! आपले निवेदन समाजमाध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. त्यातून इतरांनाही प्रेरणा मिळेल. या स्वागतयात्रेत आपण, आपली संस्था आणि आपले सहकारी सहभागी व्हाल असा विश्वास आहे. नियोजनाच्या सोयीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या कळवावी, अशी विनंती आहे.
(संपर्क : अण्णासाहेब चवरे – ९८६००९००९४)
आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच महाराष्ट्रधर्माच्या पायावर उभे राहिलेले मराठीकारण यशस्वी होऊ शकेल आणि मराठियांचे गोमटे होईल अशी खात्री आहे!
जय मराठी! जय महाराष्ट्र!
आपला,
डॉ. दीपक पवार
(अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र)
@AbhyasKendra