एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे.
एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल.
जयहिंद ! जय महाराष्ट्र !🙏
ही परिस्थिती त्या असंख्य वारकऱ्यांवर अन्याय करणारी वाटते. विठ्ठलाच्या दरबारात सर्व भक्त समान आहेत. पांडुरंगाच्या दारी कोणताही भेदभाव नसावा, हीच खरी वारीची आणि वारकरी संप्रदायाची शिकवण आहे.
हजारो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरपुरात येतात. इतका प्रवास करूनही त्यांना ५–१० किमी लांब दर्शन रांगेत तासन्तास उभे राहून विठुरायाचे दर्शन घ्यावे लागते. दुसरीकडे मंत्री, अधिकारी किंवा मान्यवर काही मिनिटांत दर्शन घेऊन जातात.
१९७१ च्या युद्धात तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि जगाच्या नकाशावर बांगलादेश नावाच्या नवीन देशाला जन्म दिला, तेंव्हाची ही घटना आहे.
1971 मध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये (आताचे बांगलादेश) स्वातंत्र्याची चळवळ जोरात होती. शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीगने पाकिस्तानच्या निवडणुकीत बहुमत मिळवले, परंतु पश्चिम पाकिस्तानच्या सत्ताधारी वर्गाने सत्ता सोपवण्यास नकार दिला. यामुळे पूर्व पाकिस्तानात हिंसाचार आणि अत्याचार वाढले आणि सुमारे 1 कोटी निर्वासित भारतात आले. पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी आपले सातवे आरमार बंगालच्या उपसागरात पाठवले. हा एक प्रकारे भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता, जेणेकरून भारताने युद्धात हस्तक्षेप करू नये. पण तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी या दबावाला भीक न घालता कणखर भूमिका घेतली आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांना स्पष्टपणे सांगितले की, अमेरिकेने पाकिस्तानला आवरले नाही तर भारताला कारवाई करावी लागेल. त्यांनी लष्करप्रमुख सॅम मानेकशॉ यांना पूर्ण स्वातंत्र्य देत युद्धाची तयारी केली. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ले केले आणि भारताने प्रत्युत्तरात युद्ध पुकारले. अवघ्या १३ दिवसांत भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानात निर्णायक विजय मिळवला आणि १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी शरणांगती पत्करली.
पाकिस्ताने दोन तुकडे होऊन बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतरच इंदिरा गांधी यांनी युद्धविराम घोषित केला. कारण त्या इंदिरा गांधी होत्या…
आर्यन लेडी..!
त्यावेळी विरोधी पक्षात असलेले नेते अटलबिहारी वाजपेयी साहेबांनीही आदराने ‘दुर्गा’ या शब्दांत त्यांचा उल्लेख केला होता. म्हणूनच इंदिरा गांधी या कणखर नेत्याच्या साहस, स्वाभिमान, देशप्रेम आणि नेतृत्वगुणाची आजही उजळणी होते.
एकमेकांचा सन्मान राखणारे, मोठेपण मान्य करणारे आणि अंगी दिलदारपणा, देशप्रेम असणारे, कोणत्याही महासत्तेपुढे न झुकणारे थोर ते तत्कालीन सत्ताधारी आणि थोर ते तत्कालीन विरोधी पक्षाचे नेते!
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तसेच दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.ना.श्री. नरहरीजी झिरवाळ साहेब आपणास वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
@Narhari_Zirwal
धुळे लोकसभा मतदार संघात एका कार्यक्षम,तरुण आणि सर्वसामान्य घरातील बागलाण नगरीतील राहुल पाटील या युवा नेतृत्वाला संधी देवून आदरणीय राहुल गांधी साहेबांनी युवकांचा आणि सर्वसामान्यांचा आवाज लोकसभेत बुलंद करावा🙏
@RahulGandhi@PawarSpeaks@uddhavthackeray@RRPSpeaks@kharge
धुळे लोकसभा मतदार संघात एका कार्यक्षम,तरुण आणि सर्वसामान्य घरातील बागलाण नगरीतील राहुल पाटील या युवा नेतृत्वाला संधी देवून आदरणीय राहुल गांधी साहेबांनी युवकांचा आणि सर्वसामान्यांचा आवाज लोकसभेत बुलंद करावा🙏
@RahulGandhi@PawarSpeaks@uddhavthackeray@RRPSpeaks@kharge