Cosmetics chemist, Social worker, political reader, interest in global politics! Social journalist. Proud Maharashtrian & Indian. Retweets are not endorsement.
शासकीय कंत्राटदार रोहित आर्या आणि डॉक्टर संपदा मुंडे
एकाने अवाजवी धाडस करून समाजातील सर्वात निरपराध आणि असहाय संवेदनशील अशा बालकांप्रती आगळीक केली आणि दुसरीने सोबत वावरणाऱ्या सर्वांच्या दबाव दडपणाविरुद्ध आवाज उठवण्याचा इवलासा प्रयत्न केला. त्यात काही एक आशेचा किरण द���सत नसल्याने आणि यंत्रणेच्या हितसंबंधात ब्र काढल्याने स्वतःलाच आरोपी च्या पिंजऱ्यात उभे केल्याने हतबल होऊन स्वतःच्या जीवाशी आगळीक केली. आठवडाभराच्या फरकाने घडलेल्या या दोन्ही प्रकरणात समाजमन ढवळून निघाले आहे.
कालच्या प्रकरणात मूर्ख ठरलेल्या रोहित आर्या ने या मुर्दाड आणि असंवेदनशील व्यवस्थेशी झगडताना स्वतः च्या फाजील आत्मविश्वासावर भरोसा ठेवला आणि अघोरी प्रकार करून बे��ायदेशीरपणे आपले कायदेशीर प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःकाही तरी अचाट प्रयत्न केले आणि परिणामी स्वतःच्या छातीवर यंत्रणेकडून गोळी मारून घेतली. कारण हे एनकाउंटर त्याने स्वतः ओढवून घेतले आहे.
आता ज्यांनी गोळी झाडली किंवा तथाकथित एनकाउंटर केले त्यांनी किती धैर्य धाडस आणि बहादुरी दाखविली.. याची चर्चा तथाकथित पेड हँडलर्स आणि PR एजेन्सीज करतील.
त्या अधिकाऱ्याना कोवळ्या निष्पाप १७ बालकाना सुख���ूप बाहेर काढले आणि मुर्दाड शासनव्यवस्थेच्या लज्जेचे धिंडवडे निघण्यापासून रक्षण केले याबद्दल शौर्य पदक जाहीर होईल.
पण रोहित आर्या च्या इंस्टाग्राम अकाऊंट वर जाऊन व्हिडिओ पाहिले की समजते हा माणूस सुज्ञ तर दिसत आहे. स्वच्छते सारख्या सामाजिक जबाबदारीचं बाळकडू विद्यार्थीदशेत शाळकरी मुलांना शिकविण्यासाठी त्यांन��� स्वच्छतादूत म्हणून जबाबदारी आणि ओळख देवून सामाजिक उपक्रम मुलांच्या सहभागातून राबविण्याचा अभिनव प्रयोग करणारा एक उपक्रमशील जबाबदार नागरिक होता. तसे तर राज्य शासनाच्या सन्माननीय मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत व्यासपीठावर हजेरी लावण्यासाठी संबंधित व्यक्ती मनोरुग्ण आणि फ्रॉड नसावा हा किमान निकष निश्चित असतो. राज्यातील गुप्तचर यंत्रणा तशी खात्री केल्याशिवाय अशा कार्यक्रमास परवानगी साठी ना हरकत देत नाहीत. त्यात तर हा रोहित आर्या तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदया समवेत ईतर मंत्री महोदयाच्या मांडीला मांडी लावून बसला आहे. म्हणजे हा रोहित आर्या जसा दाखविला जातो तसे गेल्या २ वर्षापूर्वी तर ठार मनोरुग्ण नव्हता किंबहुना तसे शक्य नाही आणि जर असे असेल तर संबंधित गुप्तचर यंत्रणा कशासाठी काम करत आहेत. त्यांची काय जबाबदारी आहे.
आणि जर या २ वर्षात ह्या सामाजिक जबाबदारीचे भान असणाऱ्या उपक्रमशील व्यक्तीचे मनोरुग्ण ��्हणून जबरदस्तीचे रूपांतरण करण्यात कोण जबाबदार आहे. याचा शासनाने शोध घ्यावा. नेमके काय घडले आहे याबाबत कोणी त्यास असे पूर्णपणे बेकायदेशीर पाऊल टाकण्यास उद्युक्त केले, काय घडले असेल याबाबत समाज माध्यमावर आलेले व्हिडिओ पाहून ( कारण हे व्हिडिओ या घटनेपूर्वीचे आणि निष्पक्ष आहेत.) तशी खात्री सर्वांना पटली आहे. म्हणून या आठवड्यात घडलेल्या या दोन घटनांमुळे मन अस्वस्थ आणि विषण्ण झाले आहे.
ह्य�� दोन्ही घटना ह्या एक प्रकारच्या संस्थात्मक मर्डर आहेत. शासकीय परिभाषेत किंवा दप्तरी भाषेत त्याना एनकाउंटर किंवा आत्महत्या म्हणतात. आणि आपल्या मनात शासकीय राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेच्या संस्थात्मक
निष्काळजीपणाचे “ बळी “.
एखाद्या चौकशी अहवालात त्यावर पडदा पडणार आणि त्यास मनोरुग्ण, बाहेरख्याली म्हणून ठपका ठेवून त्याच victim ला जबाबदार ठरवून पुढच्या victim साठी तयारी करून ठेवणार.. नव्हे त��या यंत्रणेतील सहभागी असणाऱ्या सर्वाना कायदेशीर सरक्षणाची SOP नियमानुसार तयार करून देणार.
पण आता सर्वच जण दहशतीखाली आहेत. तुम्ही या यंत्रणेमध्ये एक तर सामील व्हा आणि त्याचे थोडे फार फायदे घ्या. नाही तर यंत्रणेच्या प्रत्येक निर्णय आणि अन्मलबजावणी प्रक्रियेस मूक संमती देऊन शांत बसा.
आवाज उठवला किंवा नाराजी व्यक्त केली स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा चाकोरीबाहेर विचार जरी केला तरी तुम्ही एक तर मनोरुग्ण ठरविले जाणार किंवा तुमच्या चारित्र्यावर संशय निर्माण करण्या��ाठी तथाकथित घटनात्मक संस्थेचे प्रमुख म्हणून जबाबदारी भुषविणारे सुपारीबाज प्रेस कॉन्फरन्स घेणार..
मूळ प्रश्न हा नेहमीच बाजूला सारून तुम्ही स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहणार ते पण तुमच्या पश्चात..तुम्ही भितीवरील फोटोतून बघत राहणार मूकपणे…
कसा मूळ मुद्दा आणि तुमची व्यथा पडद्याआड गेली आहे आणि नवीनच निष्कर्ष बाहेर येत आहेत. त्यावर प्रत्येक जण आपआपल्या परीने हितसंबंध जोपासत आहे या���े आश्चर्य वाटत आ��ल्या फोटोवर येणाऱ्या नवीन हाराच्या दडपणाचे ओझे घेऊन. शांत, निश्चल, हतबल आणि असहाय..!
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अतिवृष्टीच्या अनुदान रकमेत वाढ केली.
कोरडवाहू क्षेत्रासाठी ८,५०० ऐवजी १७ हजार प्रति हेक्टर;
बागायती क्षेत्रासाठी १७,५०० ऐवजी २२,५०० रुपये प्रति हेक्टर;
फळबाग क्षेत्रासाठी २२,५०० ऐवजी ३१,००० प्रति हेक्टर.
… पण मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यांमधल्या ओला दुष्काळातील पूरग्रस्त शे��कऱ्यांना कर्नाटकने देऊ केली, त्यापेक्षाही किती तरी अधिक हेक्टरी मदतीची गरज आहे.
The best decision I ever made was marrying you, @MichelleObama. For 33 years, I’ve admired your strength, grace, and determination — and the fact that you look so good doing it all. Happy anniversary!
@LahariyaRashmi Vilasrao predicted this long back and openly suggested in front of Gopinath Munde, Manohar Joshi and others about the issues , he was pro reservations for only and only economically weaker section but this regime politicises the Maharashtra issue for political gain from OBC
मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्���स्थापित मराठा आहेत.
अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असतांना सत्तेत सर्व प्रस्थापित मराठा होते. शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे सर्व प्रस्थापित मराठे सत्तेत होते.
तुम्ही निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केले. तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात पण, गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात. गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ���ंच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का?
पुन्हा एकदा भाजपचा लोकशाहीवर घाला घालण्याचा प्रयत्न..!
विधेयक संविधान विरोधी….!
केंद्र सरकार ने आज नवे विधेयक संसदेत सादर केले आहे.ज्यात एका विषयकान���सार - पंतप्रधान,मुख्यमंत्री,मंत्री जर 30 दिवस कोठडीत गेले तर त्यांना पदावरून हटवले जाईल.आणि तिथली सत्ता राज्यपाल चालवतील अशी तरतूद आहे.
आता हे ऐकायला खूप भारी आणि योग्य वाटेल.पण या विधेयकाचा वापर ED,CBI सारख्या यंत्रणांना हाताशी धरून गैर भाजपा राज्यातील सरकारांना, मुख्यमंत्र्यांना,मंत्र्यांना त्रास देण्यासाठीच जास्ती होईल,हा माझा विश्वास आहे.कारण मागील 10 वर्षात एकाही भाजपाई नेत्यावर कित्येक आरोप झालेले असताना कारवाई झालेली नाहीये.मात्र दुसरीकडे केवळ आरोपावरून अनिल देशमुख,संजय राऊत असतील,मनीष सिसोदिया असतील अशा अनेक लोकांना तुरुंगात टाकण्याचं काम केंद्र सरकारने केले आहे.
हे विधेयक आणल्यानंतर -
गैर-भाजपा राज्यातील मुख्यमंत्र्यांवर खोटे आरोप लावण्याचे काम सुरू होईल.
ED–CBI कडून अटक करून 30 दिवस कोठडीत ठेवण्याची व्��वस्था करण्यात येईल.
31 व्या दिवशी संबंधित मंत्री/ मुख्यमंत्री पदावरून हटवला जाईल.
आणि सत्ता आपोआप भाजप समर्थक राज्यपालांकडे जाईल.
ही पद्धत “गुन्हेगारीवर आळा” या नावाखाली आणली जात असली तरी, प्रत्यक्षात ती राजकीय सूड उगवण्याचं शस्त्र आहे अस माझं स्पष्ट मत आहे.ज्यामुळे -
निवडून आलेल्या सरकारचा जनादेश हिरावला जाईल.
राज्यांची स्वायत्तता धोक्यात येईल.
न्यायालयाऐवजी अटकच शिक्षा ठरेल.
लो���शाहीवर भाजपच्या एकाधिकारशाहीचा शिक्का बसेल.
आपला देश हा जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असणारा देश आहे.
पण जर अशी विधेयके आणली गेली,ती राबवली गेली तर हीच लोकशाही आजारग्रस्त होईल आणि राजकीय सूडबुद्धीचे केंद्र बनेल.याला वेळीच आळा घालणं हे देशातील सर्वच राजकीय पक्षांचं प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे..या देशातील लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
गेल्या विसेक वर्षांत बातमीदारीच्या निमित्ताने कित्येक वेळा ला���व्ह खटका उडाला, टीका-टिप्पणी-वाद झाले, वैयक्तिक पातळीवर अरे-कारे झाले, अगदी विधिमंडळात हक्कभंग चालवण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. अनेकवेळा चारचौघांत एकमेकांचा जाहीर निषेध करून झाला. पण मैत्रीत कधी खंड पडला, ना अबोला फार काळ टिकला. काही आवडलं किंवा खटकलं की पहिला फोन उचलून बोलणं कायमचंच. या मागे कारण एकच शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणी. जात-पात-पंथ-धर्म-गरीब-श्रीमंत न बघता कोणत्याही व्यास���ीठावर पुढे येऊन बिनधास्त बोलणारा माणूस म्हणजे आमदार जितेंद्र आव्हाड!
… वाढदिवसाच्या शुभेच्छा @Awhadspeaks 🌿
डीएमकेचे खासदार अंडीमुथू राजा यांनी लोकसभेत हिंदी न बोलल्याबद्दल टीका झाल्यावर ठामपणे उत्तर दिलं – "मला हिंदी येत नाही, आणि तरीही मी भारतीय आहे. जर तुम्हाला हे मान्य नसेल, तर आम्ही बाहेर पडायला तयार आहोत."
प्रियांका वड्राचं आज लोकसभेत अप्रतिम भ��षण झालं.
मी कांग्रेस चे समर्थन कधीच केलं नव्हतं, खरंतर त्यांच्या विरुद्ध लढून या लढ्यात आलो, पण आता मला वाटतं की ह्या पक्षातील अनेक लोकं, बाकी सगळ्यां पक्षांपेक्षा बरेचं बरे आहेत.
@priyankagandhi
@prithvrj
बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
ज्ञानाचा महासागर,शांती आणि करुणेचे महान उपासक भगवान गौतम बुद्धांच्या जयंती दिनाच्या माझ्या सर्व धम्म बांधवांना हार्दिक शुभेच्छा
भगवान गौतम बुद्ध आपल्या आयुष्यातील आंतरिक ज्ञान आणि शांतीचे मार्गदाते आहेत
#BuddhaPurnima
सातारच्या एका शहीद जवानाच्या लहानग्या मुलाने बापाला पत्र लिहिलं होतं. ते पत्र घेऊन तो कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आला आणि माझ्या हातात दिलं. तेव्हा त्याला घेऊन मी ते पत्र वाचून दाखवलं. सहा वर्षांपूर्वीचा तो व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालाय.
#जयजवान
@ashish_jadhao आई.फक्त शब्द नाही, तर संपूर्ण विश्वातील सर्वात पवित्र भावना आहे.देव सर्वत्र असूशकत नाही,म्हणून त्याने आईची निर्मिती केली.मातृदिनाच्या शुभेच्छा!तुमचा X वरील संपूर्ण लेख वाचला,गेल्या वर्षी मी माझा देव गमावला आणि तुमचा लेख वाचून माझ्या आईने आमच्या कुटुंबासाठी केलेले सर्व काही आठवले